गझल
गझल : धाकात या करोना
माहीत काय आहे नावात या करोना.
झालेत सर्व वेडे नादात या करोना.
झालेत सर्व वेडे नादात या करोना.
बंदिस्त गाव केल्या गेले तरी परंतू,
काही करून शिरला गावात या करोना.
काही करून शिरला गावात या करोना.
मुस्काट बांधले मी अन हात धूत बसलो,
हे कर्म खूप केले काळात या करोना.
हे कर्म खूप केले काळात या करोना.
सोडून काम धंदा बसलो घरात पण मी,
बेरोजगार झालो वादात या करोना.
बेरोजगार झालो वादात या करोना.
होईल तर न आम्हा संसर्ग हा कदाचित,
आहेत लोक अजुनी धाकात या करोना.
आहेत लोक अजुनी धाकात या करोना.
पुर्वी समान आता उल्हास दिसत नाही,
आली अति निराशा लोकात या करोना.
आली अति निराशा लोकात या करोना.
आता जगून काही होणार लाभ नाही,
झाल्यात आत्महत्या रागात या करोना.
झाल्यात आत्महत्या रागात या करोना.
गरदन कशी सुटावी हा यक्ष प्रश्न आहे,
सारेच जन लटकले फासात या करोना.
सारेच जन लटकले फासात या करोना.
वातावरण पसरले सर्वत्र अवदशेचे,
आली तुफान मंदी देशात या करोना.
आली तुफान मंदी देशात या करोना.
मालास शेतकीच्या उरला उठाव नाही,
बरबाद शेत झाले रोगात या करोना.
बरबाद शेत झाले रोगात या करोना.
'रविपाल' संपलेली नाही मुळीच व्याधी,
आहे अजून बाकी जगतात या करोना.
आहे अजून बाकी जगतात या करोना.
• गझलकार •
डॉ. रविपाल भारशंकर
हिंगणघाट, जि. वर्धा.

वा अप्रतिम
महेश
खुप छान गझल
धन्यवाद!
Dr. Ravipal Bh…
खूप खूप आभार महेश ! *Ramram*
व्वाह..
Narendra Gandhare
हा एक नविन संवाद, करोना...!
धन्यवाद!
Dr. Ravipal Bh…
धन्यवाद गंधारेजी *Ramram*
जबरदस्त गझल डॉ. साहेब !
Pradip thool
करोनाचा संपूर्ण इतिहास भूगोल, अतिशय संक्षिप्त परंतू प्रभावी मुद्दे मांडून प्रस्तुत केला आपण या गझल द्वारे. मस्त-छान *bq*
धन्यवाद!
Dr. Ravipal Bh…
आभार आपले प्रदिप भाऊ *Ramram*
लेखनस्पर्धेत ही सर्वात मोठी
Rajesh Jaunjal
लेखनस्पर्धेत ही सर्वात मोठी गझल रचना ठरावी.
सुंदर आणि विस्तारपुर्वक मांडणी.
हो राजेश
Narendra Gandhare
खरेच
धन्यवाद!
Dr. Ravipal Bh…
आभार आपले गंधारेजी आणि राजेश *Ramram*
प्रवेशिकेचे स्वागत
गंगाधर मुटे
*congrats* :congrats: प्रवेशिकेचे स्वागत *bqs*
धन्यवाद !
Dr. Ravipal Bh…
आभार आपले सर *Ramram*