![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
सटवाई (वर्हाडी बोली )
वावराच्या माथ्यावर
फिरे कर्जाचं गीधाळ
गेल्या मसनात पिळ्या
बंद मुक्तीचे कवाळ
सरकारी सावकारी
फास दोनीचा जबरी
हंगामाच्या वखताले
उभी जये कास्तकारी
साल दरसाल चाले
खेय अघोरी कर्जाचा
नाई ठोकताच आला
खिया नव्याले जुन्याचा
छाती चिरून दाखोते
माती उगल्याच्या खुना
तरी दान्याले मोताज
झाली कास्तकारी गुना
सामसूम जिनगानी
उभी धुऱ्यावर राये
वाट पायता मुक्तीची
अख्खी लटकून जाये
अशे लाखानं गेले रे
इतं बाराच्या भावात
श्याप घिवुन जल्मले
फास कर्जाचा गयात
कोन्या सटवाईनिनं
रेघ कर्जाची गोंदली
वावराच्या लेकराले
दिठ वावराची झाली
रवींद्र अंबादास दळवी नाशिक
प्रतिक्रिया
रविंद्र भाऊ जबरदस्त!!!!!!!
श्याप घेवुन जन्मले
फास कर्जाचा गयात
बढिया कविता सर.... भेटू.........
कोन्या सटवाईनिनं
रेघ कर्जाची गोंदली
वावराच्या लेकराले
दिठ वावराची झाली
यस सर भेटूयात
खूप खूप आभार ताकसांडे सर
भेटूयात
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
रविंद्र दळवीजी,
रविंद्र दळवीजी,
एक उत्तम अर्थपूर्ण रचना.
"गेल्या मस्नात पिढ्या...
तरि दाण्याले मोहोताज....
असे लाखात गेले रे.. सात बाराच्या भावात..."
या अतिशय सुंदर ओळी !!!!
मी अशा प्रवेशीके बद्धल मण्हत होतो.
धन्यवाद!!
Narendra Gandhare
सुंदर रचना
अतिशय सुंदर रचना दळवीजी! भेटुयात नक्की..

Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

शेतकरी तितुका एक एक!
कविता
सुधारीत
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
पाने