भाकर आणि चटणी

Nilesh's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
गझल

पेटतो वैशाख वणवा एक ठिणगी लागते...
जिंकतो संषर्घ मित्रा जिद्द हृदयी लागते...

केवढे जळते भुकेने ते उपाशी पोट अन्
आपल्याला जेवल्यावर रोज जळकी लागते...

ती जवळ नसली तरीही ती मला सांभाळते
एकटेपण वाटले की एक उचकी लागते...

माणसांनी पाहिजे तो रंग देवाला दिला
देव म्हणतो का? पताका फक्त भगवी लागते...

चोचले ठाऊक नाही या जिभेला माझिया
लागल्यावर भूक भाकर आणि चटणी लागते...

राहणी ह्या माणसांची उंच झाली केवढी
बंगल्यांच्या अंगणाला आज फरशी लागते...

आत्महत्येने बळीची जिंदगी मेल्यावरी
कोणत्या चौकात सांगा मेणबत्ती लागते...

...... निलेश कवडे अकोला

प्रतिक्रिया

मुक्तविहारी's picture

अतिशय जबरदस्त गझल निलेश सर !

मुक्तविहारी

PREMRAJ LADE's picture

आवडली सर कविता

shrikant dhote's picture

Jabardast

ravipal bharshankar's picture

सुदर गझल!

Ravipal Bharshankar

गंगाधर मुटे's picture

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! CongratsCongrats

आत्माराम जाधव's picture

आत्माराम जाधव's picture

आत्माराम जाधव's picture

सिद्धेश्वर इंगोले's picture

जबरदस्त

Rajesh Jaunjal's picture

खुप सुंदर गझल निलेश