पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
गारपीटीच्या अंगसंगाने गर्भपातल्या रानी अश्रू होऊन हवेत विरले पाटामधले पाणी
एका एका झाडावरती पक्षी हजारो होते क्षणात पडले सड्याप्रमाणे सरली सारी कहाणी
हातामधला हात सुटूनी घरटे विच्छिन्न झाले बुंध्याभवती जमीन नहाली रक्ताळल्या पिलांनी
ऊस झोपला, कापूस निजला खुरटून गेल्या बागा जगण्या-मरण्यामधले अंतर उरले नसल्यावाणी
शाबूत उरल्या धान्यवखारी बंगले, महालमाडया अन्नदात्याचे ‘अभय’ गेले गेले दाणापाणी
- गंगाधर मुटे ‘अभय’
==0=^=0=^=0=^=0=^=0==
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.