नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पहाटेचा शुक्रतारा । आला सनई घेऊन ।
विनवितो जित्रूपाला । द्यावी घुंगराची धून ॥
तुझ्या घुंगराचा नाद । म्हणे नादवतो मला ।
असा सूरमयी सुर । सर नाही सनईला ॥
तुझ्या कष्टाची कहानी । कधी घुंगरू सांगते ।
तुझ्या वेदनांची गाथा । माझ्या हृदयी गोंदते ॥
सारे जग झोपलेले । मीच एकटा जागतो ।
फ़क्त साथ घुंगराचा । माझ्या जीवाला वाटतो ॥
पहाटेच्या प्रहराला । लय घुमते निराळी ।
जागविण्याला सुर्याला । जणू ऐकवी भुपाळी ॥
- आ. बा. पाटील
प्रतिक्रिया
सुरेख
सुरेख कविता.
शेतकरी तितुका एक एक!