नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शहर अजून…
शहरी पंचतारांकित मनांच्या
ठसे पावलांचे
उमटू लागलेत हल्ली
शेणाने सारवल्या मातीच्या भुईसरावर
शोभेसाठी उभारलेल्या
पर्णकुट्यांच्या,
बैठक नैसर्गिक अनुभवण्यासाठी
जेवणाची;
आणि टाळण्यासाठी
घुसमट पोटातली
शहरी असात्मपणाची
शोधत बहाणे जवळ जाण्याचे
निसर्गाच्या...
वैराण रानातली झोपडी मात्र
निघालीय प्रवासाला केव्हाच
घेऊन सोबत उखडलेपण स्वतःचे
मोजत निपचित पडलेले दगड मैलांचे
डांबरीपण गमावू लागलेल्या
तप्त रस्त्याच्या अंगावर नाचवत पाय
अनवाणी;
सोबत घेऊन जाणीव
शहर अजून खूप दूर असल्याची
..........
शहरात पोहोचल्यावरही...
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने