नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कवितेचे रसग्रहण
शेतकरी राया
शेतामध्ये राबणारा धनी माझ्या पिरतीचा
राब राबुनी पिकवितो तो मोत्याला
ऊन तहान नाही माझ्या राजाला
साथ माझी त्याच्या कष्टाला
दिवसभर राहतो तो शेताला
रात्रीचा घास खातो सोबतीला
शेतामध्ये राबणारा धनी माझ्या मायेचा
तोच आधार माझ्या जगण्याचा
गुरढोर गाई आहे संगतीला
तेच आधार माझ्या परिवाराला
चार पैसा देता माझ्या संसाराला
धनी माझं जाता दूर हो कामाला
शेतामध्ये घर माझ मातीच
तेच आनंद माझ्या जगण्याचा
फाटकी साडी आणि चोळी
धन्याकड नाही पायातली जोडी
तरीपण गातोय सुखी संसाराची गाणी
एकच आहे आमची मागणी
एकच करत आहो आम्ही विनंती
आमच्यासारखे लाखो शेतकरी
घामाचा भाव द्या हो पिकासी
घामाचा भाव द्या हो पिकासी
कवी-विशाल औताडे
१) शेतामध्ये राबणारा धनी माझ्या पिरतीचा
राब राबुनी पिकवितो तो मोत्याला
ऊन तहान नाही माझ्या राजाला
साथ माझी त्याच्या कष्टाला
या ओळीत शेतकऱ्याची पत्नी तिच्या सोबतीची तिच्या पतीच्या कष्टाची ओळख करून देताना म्हणते, जो शेतात राबराब राबतो तो माझ्या प्रेमाचा धनी आहे ,माझ्या जगण्याचा आधार आहे, तो शेतीत मोत्याला पिकवतो ,स्वादिष्ट भोजन ज्या अन्नापासून बनत त्या अन्नाला ती मोती म्हणते, माझा धनी ऊन तहान याची परवा करत नाही, सतत कष्ट करत राहतो.
२) दिवसभर राहतो तो शेताला
रात्रीचा घास खातो सोबतीला
शेतामध्ये राबणारा धनी माझ्या मायेचा
तोच आधार माझ्या जगण्याचा
माझा धनी दिवसभर शेताला राहतो आणि अनवाणी पायाने फिरतो, रात्री मिरची भाकर माझ्यासोबत बसून खातो आणि दिवसभर झालेल्या गोष्टी मला सांगतो .
पुढे ती म्हणते,
३) गुरढोर गाई आहे संगतीला
तेच आधार माझ्या परिवाराला
चार पैसा देता माझ्या संसाराला
धनी माझं जाता दूर हो कामाला
आमच्या घरी गाई वासरे आहेत, माझ्या दोन गाई दूध देतात तेच आमच्या कुटुंबाला आर्थिक मदत करतात, आणि एवढंच नाही तर माझे धनी कामालाही जातात.
४) शेतामध्ये घर माझ मातीच
तेच आनंद माझ्या जगण्याचा
फाटकी साडी आणि चोळी
धन्याकड नाही पायातली जोडी
तरीपण गातोय सुखी संसाराची गाणी
पुढे ती म्हणते ,आमच्याकडे आलिशान सुंदर असा बंगला तर नाहीये झोपडीच घर आहे ते पण मातीचं, आणि झोपडीच्या घरातही आम्ही आनंदी आहोत, माझ्याकडे फाटकी साडी आणि चोळी आहे म्हणजेच माझ्याकडे सुंदर अशी साडी ही नाही, याचं मला कधी दुःखही नाही, माझा धनी तुटलेली चप्पल घालून कामाला जातो याचेही त्याला कधी वाईट वाटत नाही, आणि तरीही आम्ही आनंदी आहोत, आमचा संसार सुखी आहे. पण....
५) .एकच आहे आमची मागणी
एकच करत आहो आम्ही विनंती
आमच्यासारखे लाखो शेतकरी
घामाचा भाव द्या हो पिकासी
घामाचा भाव द्या हो पिकासी
आमची सरकारकडे एक मागणी आहे आमच्यासारखे लाखो शेतकरी शेतात राबराब राबतात आम्हाला फुकटचा पैसा नाही लागत आमच्या घामाचा, आमच्या कष्टाचा ,आमच्या पिकाला भाव द्या हो असे म्हणत भावुक होते.
नाव- औताडे विशाल भाऊसाहेब
९६०४००४१७७
घोटेवाडी, सिन्नर, नाशिक