नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
असेच संमेलन दरवर्षी अविरत पंढरीच्या वारीसारखे व्हावे
११ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे नियोजन आणि अंमलबजावणी अगदी दरवेळीच्या संमेलनासारखी काटेकोरपणे पार पडली. एकंदरीत सांगायचे झाले तर प्रत्येक सत्रातील वक्त्यांची, कवींची, लेखकांची भूमिका सडेतोडपणे उद्घाटन सत्रापासून ते समारोपीय सत्रापर्यंत अगदी विषयाला धरून असलेली ऐकायला मिळाली. सकस साहित्य निर्मिती करत असताना लेखकांनी काल्पनिक जगात वाहवत न जाता वास्तविक परिस्थितीवर भाष्य करावे यावर शेतकरी साहित्य चळवळ प्रकर्षाने लक्ष देते आणि कायम आग्रही असते हे महत्त्वाचे आहे.
शेतीसाहित्याचे प्रश्न, त्यासंबंधीची मांडणी सर्वांगाने कवी, लेखकांनी मांडावी हे रास्तच आहे. शेतीसाहित्याशी निगडित लेखन करणाऱ्या लिहित्या हातांना शेतकरी साहित्य चळवळ व्यासपीठ उपलब्ध करून देते आणि लिहित्या हातांच्या पाठीशी उभी राहते हे फारच उल्लेखनीय आहे. कार्याध्यक्षाच्या भूमिकेत वावरणारी व्यक्ती मुटे सर या अवलिया माणसाची कार्यपद्धती वाखाणण्याजोगीच आहे, हे संमेलनात दरवेळी पाहायला मिळते. असेच संमेलन दरवर्षी अविरत पंढरीच्या वारीसारखे साहित्यिकांनी सहभागी होऊन पुढे न्यावे असे वाटते.
- कृष्णा जावळे
(बुलडाणा)
=======