नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
म्हणे शेती म्हणजे 100 नंबरी सोनं
हक्काच आणि पुढच्या पिढीच्या जिवीताच,
पण उत्पन्न म्हणावं अस तर कधी कधी
नांव सोनुबाई हाती कथलाचा वाळा ll 1 ll
आधी अधिक उत्पनाच आमिष देवून
देशी बियाणांचे वान संपवले,
आता बियाणे , खते , किटकनाशके महाग केली
शेतकरी कर्जबाजारी होवून तेच कीटकनाशक प्राशन करू लागले ll 2ll
त्यातून ही काही शेतकरी तरले तर
मजुरांचे कमी काम अन् वाढते दर याने होरपळले,
एव्हढ्यातूनही पीक आले जोमात तर
आहेच लुटारू घामाचे दाम ही लुटायला ll 3ll
शेतकरी कधी दुष्काळात लुटला जातो
मावा, तुडतुडे , तेल्या रोगानेही लुटला जातो,
उरले सुरले विमा कंपन्याही लुटतात
कागदी घोड्यात कस कसे बुडवायच हे पाहतात ll 4ll
शेतकऱ्यांचा खरा कैवारी असल्याचं ढोंग
नेहमीच विरोधी पक्ष करत असतो ,
सत्तेतला पक्ष नेहमी कोट्यानीकोटिंच्या मदतीची वल्गना करत असतो
लाखोंच्या नुकसानीला शेकडा , हजारात बोळवण करत असतो ll5ll
शेतकऱ्यांना आता नकोत पोकळ घोषणा
द्या इस्राईल शेतीचे तंत्रज्ञान ,
माती परीक्षण करून प्रत्येकाला पुरवा कर्जाने बांधावर आधुनिक बियाणे, खते,
अधिक उत्पन्न वाढीमुळे नाही थकवणार ते बँकेचा हप्ता अन् शासनाचे ही पैसे ll 6ll
शासनाच्या धोरणात आता
उद्योगपती शेतकरी होवू पाहताहेत
शेतकऱ्यांच्या बाजारपेठेत भाव पाडून
छोट्या छोट्या शेतकऱ्यांचे जीवनच बरबाद करू पाहताहेत ll 7ll
शेतकऱ्यांनो तुम्ही ही आता सुधरा
ज्या कारणासाठी कर्ज घेतले तिथेच ते वापरा,
शेतीसोबत जोडधंदा मनापासून करा
हवामानावर आधारीत शेती धंदा आता तरी करा ll 8ll
रासु
अहमदनगर.
मो. 7972107991.