नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विश्वस्तरीय लेखन स्पर्धा २०२१
शीर्षक : औंदाचं साल ( वर्हाडी )
कुत्रं ना खाये असे केले माहे पान्यानं हाल
जलमभर भुलनार नाही ' औंदाचं साल ' ॥धृ॥
पीककर्ज घेऊनशां वावर होतं पेरलं
लेकिच्या लग्नाचं सपन मनामंधी शिरलं,
सपनाचा माह्या पान्यानं केला चकनाचूर
मुया सळून जवून मेली जवान माही तूर,
पर्हाटीवर लाल्या,जवारीचा पुसू नोका ताल ॥१॥
उडीद,मूंग मले भाऊ तोळाच नाही लागला
कोनं-कोनं तोळला, पन थोही निरा डागला,
सूर्य होतां गायप,ऊनीचं गेलं होतं मढं
घुगर्या झाल्या त्याच्या,मांडा लागल्या ढोरापुढं,
सांगू कसं दादा तुले माही पुरी झाली लाल ॥२॥
सोयाबीनचं पीक पाहून बेज्ज्या ये हरीक
गरिबाचं पोर नाचे जसं खातानी खारीक,
पाऊस झाला सुरू तशा गऊ लागल्या शेंगा
सोयाबीननंही दाखवला मले त्याचा ठेंगा,
हुपीजली गंजी जरी ताडपत्री होती ढाल ॥३॥
निसर्गानं साथ सोळली, शासन हाये फेकू
पोशिंदा झाला हवालदिल पाहाताहे टेकू,
उभ्या जल्मी कवा असं पाह्यलं नसन कोनं
रोजच्या रोज रानातून ओलं होऊन येनं
' म्याही असं पाह्यलं नै,' मने चिंधुबुढा काल ॥४॥
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
खुशाल गुल्हाणे,
'वरदा',गोकुळ काॅलनी, साईनगर,अमरावती - ४४४६०७
प्रतिक्रिया
आपल्या वऱ्हाडी बोलीतून तुमी
आपल्या वऱ्हाडी बोलीतून तुमी कास्तकाराची खरी दैना मांडली भऊ. सरे मजा मारत असतांनी पाऊस मात्र, आपल्या कास्तकाराले दोनी बाजुनं मारते. दुष्कायओला असो का कोडला मरण त्याचच होते. राजकारणी दिखावा करून गंमत पाहात बसते. कास्तकाराच्या जीवावर राजकारण करते.एखादा तुकडा फेकून श्रेय लाटत फिरते. वास्तवदर्शी रचना
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने