![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*कोरोना*
न दिसणारा कोरोना
परिवर्तन घडवून गेला
माणसाला माणुसकीची
शिकवण देऊन गेला
वेळ नव्हता कोणालाच
एकमेकांशी बोलायला
महत्त्व,कुंटूंब,नात्यांचे
हा सर्वाना सांगून गेला
स्वत:चाच विचार करणा-या
प्रत्येक मानवाला
दुस-यांसाठीही काही करण्याचे
सामथ्य देऊन गेला
मंदिरातल्या देवाला मानणा-या
देवाच्या भक्ताला
डाँक्टर, पोलीस,सफाई कामगार
यांच्यातील देव दाखवून गेला
नाव:कवीयञी कु.शुभांगी दिगंबरराव देशमुख
पत्ता: शांती सदन,सन्मिञ काँलनी,ता.माजलगाव
जिल्हा: बीड
मोबाईल नंबर: 9403104412
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने