नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
क्षत्रिय; विष्णु अवतार हे, रंगलेले चित्र आहे
भगवान गौतम बुद्ध पण, शेत्कऱ्यांचा पुत्र आहे
कर्म सिद्धान्त बुद्धाचा, शेतकऱ्यांचा बीज मंत्र
"जे पेरले ते उगवते", एक प्रमाण सूत्र आहे
अर् म्हणजे ही धरती आणि, आर्य म्हणजे हा शेत्करी
"बुद्ध आर्य आणि शेत्करी", किंबहुना सुमित्र आहे
प्रत्येक बाब मृत्युशय्या, प्रत्येक बाब चढत लोकं
गाठतात स्मशानभूमी, हे बहुतेक पात्र आहे
अन् शिडी करून सर्वांना, जातात कुठे हेच लोकं ?
प्रगति चे साधन तरीही, चांगलेच चरित्र आहे !
मन डोळे भरून थोडे, निशांती उगे राहावे
जीवनाचे मज मिळाले, हे अनमोल छत्र आहे
व्वा! मनासी कळला अर्थ, जसा औषधाने येतो
हमखास गेलेला जीव, परत; किती विचित्र आहे !