![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*पद्य लेखन स्पर्धेसाठी*
*गझल*
*कातळ मागे सोडुन...*
कातळ मागे सोडुन त्यांना पाझर होणे जमले नाही
डोळ्यामधल्या या अश्रूंना बेघर होणे जमले नाही....
पडीकजमिनीगत जीवन हे कुणाच्याच ना कामी आले
कोरडवाहू आयुष्याचा नांगर होणे जमले नाही.,
कणखरतेने घाव झेलले.,पण शेवट मन तुटून गेले
कशी परिक्षा या जन्मीही.,पत्थर होणे जमले नाही.,
त्या नेत्यांनी हळहळ केली दुष्काळाची पोळी केली
कुणा उपाशी या दुनियेचा इश्वर होणे जमले नाही..,
कोळपनीला सुखदु:खाच्या कुठे वाफसा मिळतो हल्ली
दुनियादारी कळली नाही साक्षर होणे जमले नाही...
ओठ सखीचे लालबुंद पण,तिचे बोलणे कडवट होते
गिळून सारे ते कडवट पण.,साखर होणे जमले नाही...
चुकार दाणे जरी फेकले देवावरती तन्मयतेने
त्या दाण्यांना गरिबाची पण भाकर होणे जमले नाही..
*©®डॉ.राज रणधीर*
*९९२२६१४४७१*
*जालना*
प्रतिक्रिया
स्पर्धेत लेखन करण्यासाठी http
स्पर्धेत लेखन करण्यासाठी http://www.baliraja.com/node/add/spardha-2019 या लिंकवर क्लिक करून लेखन करून प्रकाशित करावे. अन्यथा स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून स्वीकारले जाणार नाही.
शेतकरी तितुका एक एक!
पाने