![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
उन्हात तान्हात राबून ,गेली हातपायाची सालपाटे.
पीक कर्जासाठी साले माराय लावतात हेलपाटे
चाळणी करतात अर्जाची आम्ही काय जोडलं खोटं
चुना लाऊन पळून गेली त्यांची काय उपटली शेट्टं?
बड्या धेंडाचं हजारो कोटीचं कसं कर्ज होतं माफ ?
सातबारा कोरा करा म्हटलं की लागतो त्यांना धाप.
तोंडात आलेला घास अनेकदा पाऊस नेहतो हिरावून .
कोरडं पाडतो घशाला, कधी नाचत जातो उरावरुन.
पदरात पडतो पसाखोंगा जेव्हा सोसून सतरा घाव
मोढ्यावर नेहला मालं कि कोसळतात बाजारभाव.
एसीत बसून,ख्या ख्या हसून सल्ले देतात भाडखाऊ
फाटल्यालं सांधतासांधता आधीच आलयं नाकीनऊ
आडवीलं ,नडवीलं त्याला. रुमन्याचा हिसका दाऊ.
मरायचं नाही, गड्यांनो!वेळ आली तर जेलात जाऊ.
--- लक्ष्मण खेडकर
9021068106
प्रतिक्रिया
क्या बात!
ये हुयी हौसलेवाली बात. आक्रमक कविता. मस्त छान आवडली.
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद सरजी
धन्यवाद सरजी
Dhirajkumar B Taksande
जबरदस्त सरजी.....!!!!
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

शेतकरी तितुका एक एक!
जबरदस्त
अतिशय जबरदस्त कविता लेखन खेडकर सर !
मुक्तविहारी
पाने