पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पुढील दोन दिवसाच्या वातावरणाची निर्मिती ह्या फ्लेक्स वरील शेरांनी केलेलीच होती. असं सर्व सुरू असताना संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री. गंगाधरजी मुटे, संयोजक ऍड सतीश बोरूळकर यांचे समवेत प्रत्येक प्रतिनिधींना ग्रंथदिंडीच्या नियोजना बाबतीत सांगताना सकाळी ७ वाजता सर्वांनी तयार राहावे, अश्या प्रकारची सूचना करीत होते. दुसरे दिवशी पहाटे पाच वाजताच आख्खं सभागृह जाग होऊन तयारीला लागलेलं पाहून मला आश्चर्य वाटलं. मी वर नमूद केल्या प्रमाणे विशेष बाब म्हणजे कुणालाही आरामाकरिता वेगळी स्वतंत्र अशी व्यवस्था नव्हती, ती सामाईक होती ते यामुळेच. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि, पैठण येथील पाचव्या संमेलनात प्रतिनिधीकरिता स्वतंत्र खोलीची व्यवस्था केलेली होती. मी स्वत: ग्रंथ दिंडीत उशीरा पोहचलो होतो. इथे मात्र चहा नाश्ता घेऊन आम्ही सर्व प्रतिनिधी ग्रंथदिंडीकरिता अलिबाग मधील शिवाजी चौकात हजर सकाळी ९ वाजता हजर होतो. वेळेच भान, शिस्त यातून जाणवत होती. स्थानिक कलाकारांच्या ढोल पथकासह अतिशय शिस्तबद्धपणे शिवाजी चौकातून ग्रंथदिंडी नियोजित संमेलन स्थळी वेळेतच पोहचली होती. प्रत्यक्ष संमेलनाचे उद्घाटन सत्र अगदी नियोजित वेळेत सुरू झाले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ऍड प्रदीप पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थितांचे स्वागत करीत संमेलनाचा आस्वाद घ्यावा, कुठलीही अडचण आल्यास तसे सांगावे, अशी आपुलकीची भावना व्यक्त केल्याने आपसूकच जिव्हाळ्याचे वातावरण निर्माण झाले. संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री. गंगाधर मुटे यांनी आपल्या बीजभाषणातून संमेलनाचा उद्देश-भूमिका स्पष्ट करताना अतिशय मौलिक असे वक्तव्य केले की “बोललेले हवेत विरून जात असते परंतू लिहिलेलं चिरंतन राहून ते अनेक पिढ्यांना दिशादर्शक ठरत असते” असे सांगताना संत तुकाराम, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह युगात्मा शरद जोशी, इंद्रजीत भालेराव, विठ्ठल वाघ अश्या अनेक साहित्यिकांनी निर्माण केलेले अस्सल शेतीमातीचे साहित्य आजही आपल्याला प्रेरणादायी ठरत आहे आणि हे केवळ लिहिल्यामुळे शक्य झाले. तेव्हा जास्तीत जास्त वास्तवाशी भिडून शेतीमातीच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे आवाहन केले. संमेलनाचे संयोजक ऍड सतीश बोरूळकर यांनी कोंकण परिसराचा परिचय करून देतानी कोंकणाचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, भौगोलिक दस्तऐवज काव्यमय स्वरूपात उलगडताना अलिबाग या ठिकाणी संमेलन आयोजनामागे असलेली भूमिका सांगतांना स्पष्ट केले की “आपण सर्वांनी यावे, कोंकणाचा हिरवागार निसर्ग बघावा आणि हे हिरवेपण आपल्या लेखणीत उतरावे”. संमेलनाचे उदघाटक आणि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले मा. खासदार संजय राऊत व मा. खासदार सुनील तटकरे हे दोन्ही कोंकणचे पुत्र असल्याने आपल्या भागात संमेलन होत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याची भावना आपल्या भाषणातून व्यक्त केली. आपल्या उद्घाटकीय भाषणातून युगात्मा शरद जोशी यांच्या स्मृतींना उजाळा देतानी खासदार संजय राऊत यांनी युगात्मा शरद जोशी या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू अतिशय भावुकपणे उपस्थितासमोर मांडून शेतीप्रश्नाविषयी आजचे सरकार सकारात्मक पावले उचलत असल्याची विशेषत्वाने ग्वाही देऊन हे शेतकरी संमेलन आता अखिल भारतील साहित्य संमेलनाच्या धर्तीवर राज्याच्या सीमारेषा ओलांडून जायला पाहिजे, असा प्रेरणादायी सल्लाही दिला. आ. खासदार सुनील तटकरे यांनीही आपल्या मनोगतातून शेतीप्रश्नाचा शासकीय पातळीवरून आम्ही पाठपुरावा करण्यास कटिबद्ध असल्याचे सूतोवाच केले. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी आपल्या मनोगतातून संमेलनाचे कौतुक करत प्रसार माध्यमातून शेतीप्रश्न ऐरणीवर आणण्याकरिता संपूर्णपणे मदत करण्याची ग्वाही दिली. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून आ. भास्कर चंदनशिव यांनी शेतीसाहित्य कृषीसंस्कुती अत्यंत व्यापक आढावा घेऊन उपस्थितांना अंतर्मुख केले. अध्यक्षीय भाषण म्हणजे आमच्या सारख्या नवागतासाठी पर्वणीच होती.
कुणी तरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे
संपूर्ण सातबारा कोरा करू म्हणाले, भूललेत भाडखाऊ दिल्लीत पोचल्याने
हे दोन्ही शेर अनुक्रमे खासदार संजय राऊत आणि खासदार सुनील तटकरे यांनी वाचून दाखवत शेरातील आशय किती यथार्थ आहे याची कबुलीही एकमेकाकडे पाहत आपल्या खुसखुशीत शैलीतून उपस्थितासमोर दिली. संमेलनाच्या प्रथेप्रमाणे काही ठराव मांडले जातात आणि ते शासन दरबारी ठोस कार्यवाही करिता सादर केले जातात. यातून शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी ही अपेक्षाही असते. परंतू उघाटन सत्रातच या दोन्ही खासदार द्वयीनीं शेतीप्रश्नाशी असलेली बांधिलकी स्पष्ट केल्याने उद्घाटन सत्राला एका उंचीवर नेऊन ठेवले, ही संमेलन आयोजनाच्या दृष्टीने श्रम साफल्याची पावतीच होती. पुन्हा दुपारचे सामूहिक जेवण, दुपारच्या सत्रात अतिशय शिस्तबद्धपणे दोन सत्रात पार पडलेले शेतकरी काव्य संमेलन, सूत्रसंचालक कवी गझलकार मित्र अनंत नांदूरकर, नागपूर यांच्या अभ्यासपूर्ण आणि प्रासंगिक निवेदनातून बहरत गेले. परिसंवाद आणि "रात्री कोंकण किनार संगीत रजनी" हा अतिशय सुश्राव्य असा भावविभोर करणारा शब्दसुरांचा आविष्कार अनुभवायला मिळाला. रात्री पुन्हा दिवसभरातील कार्यक्रमावर सामूहिक चर्चा. संमेलनाचे दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात प्रा. डॉ. ज्ञानदेव राऊत यांनी घेतलेली ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शेषराव मोहिते यांची मुलाखत ज्यातून उलगडत गेलेले मोहिते सर. एक निष्ठावंत कार्यकर्ता ते साहित्यिक असा विलक्षण प्रवास बौद्धिक देऊन गेला. विशेष बाब म्हणजे संमेलनात नव्यानेच कथाकथन या विषयाचा केलेला समावेश. ज्येष्ठ साहित्यिक डॉ भास्कर बढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले कथाकथन, ज्यात तीनही कथाकथनकार हे प्रथमच आपली कथा सादर करणार होते. अश्या प्रकारे नव्याने लिहू पाहणाऱ्या हातांना एखाद्या विषयाच्या अनुषंगाने मोठ्या व्यासपीठावर संधी देणे निश्चितच प्रेरणादायी होते. कथाकारासाठी आणि आमच्या सारख्या नवागतासाठीही. संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी गझल मुशायरा, ज्यात ज्येष्ठ गझलकार आ. मसूद पटेल सरांसमवेत सर्वच गझलकारांचे सादरीकरण आणि मुशायऱ्याचे संचालन करणाऱ्या राधिका प्रेम संस्कार, रायगड यांनी प्रत्येक गझलकारांच्या रचनेवर समर्पक भाष्य करून यथोचित न्याय देत केलेल्या प्रभावी निवेदनाला उपस्थितांनी दिलेली उत्स्फूर्त दाद. यामुळे गझल मुशायरा अविस्मरणीय झाला. शेती साहित्याशी निगडित सर्वच साहित्यप्रकाराचे सादरीकरण, उजळणी, संघटन कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, लेखन कौशल्य आत्मसात करणे, सांघिक कार्यकुशलता, सामूहिक चर्चा, संवादाचे महत्त्व, स्वानुभवकथन, वेळेचे नियोजन, प्रत्येक सत्राची नियोजनबद्धपणे आखणी आणि ते वेळेत पार पाडण्याकरिता प्रत्यक्ष अंमलबजावणी. अश्या एखाद्या प्रशिक्षण शिबिरात ज्या प्रमाणे ह्या सर्व बाबीचा अंतर्भाव असतो तश्या प्रकारे मला हे संमेलन एखाद्या निवासी प्रशिक्षण शिबिरासारखे वाटले......!
रवींद्र अंबादास दळवी नाशिक
Ganesh
सहावे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन 2020, अलिबाग येथे अगदी व्यवस्थित आणि उत्तमरीत्या पार पडले. या सगळ्यांमागे असणाऱ्या नियोजनामुळे हे सगळं घडून आले. त्यासाठी अथक परिश्रम घेणारे मुटे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा मोलाचा वाटा आहे. कितीतरी साहित्य संमेलने अलीकडच्या काळात होतात पण त्यामधून उच्चवर्गीयांच्या मनोरंजनासाठी साहित्य निर्माण होते. त्यामुळे समाजहिताचं, सामान्यांच्या व्यथा मांडणार साहित्य मांडल्या जात नाही.
- कृष्णा जावळे बुलडाणा
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
साहित्य संमेलन नव्हे, प्रशिक्षणार्थी शिबिर
सभागृहाच्या आतील बाजूस प्रासंगिक अश्या शेती विषयावरील अनेक मान्यवर साहित्यिकाच्या शेर वजा ओळी फ्लेक्स वर झळकत होत्या. पडल्यापडल्या वाचन सुरू होते, सोबतच सदरील शेराचा अर्थ, आशय, कवीबाबत चर्चाही रंगत होती. उदा. नागपूरचे प्रसिद्ध गझलकार अझीझखान पठाण यांच्या मनाला अस्वस्थ करणाऱ्या दोन ओळी......
“शेत हतबल मज म्हणाले आर्जवाने!
कासरे लपवून ठेवा पेरल्यावर”
पुढील दोन दिवसाच्या वातावरणाची निर्मिती ह्या फ्लेक्स वरील शेरांनी केलेलीच होती. असं सर्व सुरू असताना संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री. गंगाधरजी मुटे, संयोजक ऍड सतीश बोरूळकर यांचे समवेत प्रत्येक प्रतिनिधींना ग्रंथदिंडीच्या नियोजना बाबतीत सांगताना सकाळी ७ वाजता सर्वांनी तयार राहावे, अश्या प्रकारची सूचना करीत होते. दुसरे दिवशी पहाटे पाच वाजताच आख्खं सभागृह जाग होऊन तयारीला लागलेलं पाहून मला आश्चर्य वाटलं. मी वर नमूद केल्या प्रमाणे विशेष बाब म्हणजे कुणालाही आरामाकरिता वेगळी स्वतंत्र अशी व्यवस्था नव्हती, ती सामाईक होती ते यामुळेच. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि, पैठण येथील पाचव्या संमेलनात प्रतिनिधीकरिता स्वतंत्र खोलीची व्यवस्था केलेली होती. मी स्वत: ग्रंथ दिंडीत उशीरा पोहचलो होतो. इथे मात्र चहा नाश्ता घेऊन आम्ही सर्व प्रतिनिधी ग्रंथदिंडीकरिता अलिबाग मधील शिवाजी चौकात हजर सकाळी ९ वाजता हजर होतो. वेळेच भान, शिस्त यातून जाणवत होती. स्थानिक कलाकारांच्या ढोल पथकासह अतिशय शिस्तबद्धपणे शिवाजी चौकातून ग्रंथदिंडी नियोजित संमेलन स्थळी वेळेतच पोहचली होती. प्रत्यक्ष संमेलनाचे उद्घाटन सत्र अगदी नियोजित वेळेत सुरू झाले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ऍड प्रदीप पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थितांचे स्वागत करीत संमेलनाचा आस्वाद घ्यावा, कुठलीही अडचण आल्यास तसे सांगावे, अशी आपुलकीची भावना व्यक्त केल्याने आपसूकच जिव्हाळ्याचे वातावरण निर्माण झाले. संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री. गंगाधर मुटे यांनी आपल्या बीजभाषणातून संमेलनाचा उद्देश-भूमिका स्पष्ट करताना अतिशय मौलिक असे वक्तव्य केले की “बोललेले हवेत विरून जात असते परंतू लिहिलेलं चिरंतन राहून ते अनेक पिढ्यांना दिशादर्शक ठरत असते” असे सांगताना संत तुकाराम, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह युगात्मा शरद जोशी, इंद्रजीत भालेराव, विठ्ठल वाघ अश्या अनेक साहित्यिकांनी निर्माण केलेले अस्सल शेतीमातीचे साहित्य आजही आपल्याला प्रेरणादायी ठरत आहे आणि हे केवळ लिहिल्यामुळे शक्य झाले. तेव्हा जास्तीत जास्त वास्तवाशी भिडून शेतीमातीच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे आवाहन केले. संमेलनाचे संयोजक ऍड सतीश बोरूळकर यांनी कोंकण परिसराचा परिचय करून देतानी कोंकणाचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, भौगोलिक दस्तऐवज काव्यमय स्वरूपात उलगडताना अलिबाग या ठिकाणी संमेलन आयोजनामागे असलेली भूमिका सांगतांना स्पष्ट केले की “आपण सर्वांनी यावे, कोंकणाचा हिरवागार निसर्ग बघावा आणि हे हिरवेपण आपल्या लेखणीत उतरावे”.
संमेलनाचे उदघाटक आणि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले मा. खासदार संजय राऊत व मा. खासदार सुनील तटकरे हे दोन्ही कोंकणचे पुत्र असल्याने आपल्या भागात संमेलन होत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याची भावना आपल्या भाषणातून व्यक्त केली. आपल्या उद्घाटकीय भाषणातून युगात्मा शरद जोशी यांच्या स्मृतींना उजाळा देतानी खासदार संजय राऊत यांनी युगात्मा शरद जोशी या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू अतिशय भावुकपणे उपस्थितासमोर मांडून शेतीप्रश्नाविषयी आजचे सरकार सकारात्मक पावले उचलत असल्याची विशेषत्वाने ग्वाही देऊन हे शेतकरी संमेलन आता अखिल भारतील साहित्य संमेलनाच्या धर्तीवर राज्याच्या सीमारेषा ओलांडून जायला पाहिजे, असा प्रेरणादायी सल्लाही दिला. आ. खासदार सुनील तटकरे यांनीही आपल्या मनोगतातून शेतीप्रश्नाचा शासकीय पातळीवरून आम्ही पाठपुरावा करण्यास कटिबद्ध असल्याचे सूतोवाच केले. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी आपल्या मनोगतातून संमेलनाचे कौतुक करत प्रसार माध्यमातून शेतीप्रश्न ऐरणीवर आणण्याकरिता संपूर्णपणे मदत करण्याची ग्वाही दिली. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून आ. भास्कर चंदनशिव यांनी शेतीसाहित्य कृषीसंस्कुती अत्यंत व्यापक आढावा घेऊन उपस्थितांना अंतर्मुख केले. अध्यक्षीय भाषण म्हणजे आमच्या सारख्या नवागतासाठी पर्वणीच होती.
कुणी तरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे
संपूर्ण सातबारा कोरा करू म्हणाले,
भूललेत भाडखाऊ दिल्लीत पोचल्याने
हे दोन्ही शेर अनुक्रमे खासदार संजय राऊत आणि खासदार सुनील तटकरे यांनी वाचून दाखवत शेरातील आशय किती यथार्थ आहे याची कबुलीही एकमेकाकडे पाहत आपल्या खुसखुशीत शैलीतून उपस्थितासमोर दिली. संमेलनाच्या प्रथेप्रमाणे काही ठराव मांडले जातात आणि ते शासन दरबारी ठोस कार्यवाही करिता सादर केले जातात. यातून शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी ही अपेक्षाही असते. परंतू उघाटन सत्रातच या दोन्ही खासदार द्वयीनीं शेतीप्रश्नाशी असलेली बांधिलकी स्पष्ट केल्याने उद्घाटन सत्राला एका उंचीवर नेऊन ठेवले, ही संमेलन आयोजनाच्या दृष्टीने श्रम साफल्याची पावतीच होती. पुन्हा दुपारचे सामूहिक जेवण, दुपारच्या सत्रात अतिशय शिस्तबद्धपणे दोन सत्रात पार पडलेले शेतकरी काव्य संमेलन, सूत्रसंचालक कवी गझलकार मित्र अनंत नांदूरकर, नागपूर यांच्या अभ्यासपूर्ण आणि प्रासंगिक निवेदनातून बहरत गेले. परिसंवाद आणि "रात्री कोंकण किनार संगीत रजनी" हा अतिशय सुश्राव्य असा भावविभोर करणारा शब्दसुरांचा आविष्कार अनुभवायला मिळाला. रात्री पुन्हा दिवसभरातील कार्यक्रमावर सामूहिक चर्चा. संमेलनाचे दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात प्रा. डॉ. ज्ञानदेव राऊत यांनी घेतलेली ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शेषराव मोहिते यांची मुलाखत ज्यातून उलगडत गेलेले मोहिते सर. एक निष्ठावंत कार्यकर्ता ते साहित्यिक असा विलक्षण प्रवास बौद्धिक देऊन गेला. विशेष बाब म्हणजे संमेलनात नव्यानेच कथाकथन या विषयाचा केलेला समावेश. ज्येष्ठ साहित्यिक डॉ भास्कर बढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले कथाकथन, ज्यात तीनही कथाकथनकार हे प्रथमच आपली कथा सादर करणार होते. अश्या प्रकारे नव्याने लिहू पाहणाऱ्या हातांना एखाद्या विषयाच्या अनुषंगाने मोठ्या व्यासपीठावर संधी देणे निश्चितच प्रेरणादायी होते. कथाकारासाठी आणि आमच्या सारख्या नवागतासाठीही. संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी गझल मुशायरा, ज्यात ज्येष्ठ गझलकार आ. मसूद पटेल सरांसमवेत सर्वच गझलकारांचे सादरीकरण आणि मुशायऱ्याचे संचालन करणाऱ्या राधिका प्रेम संस्कार, रायगड यांनी प्रत्येक गझलकारांच्या रचनेवर समर्पक भाष्य करून यथोचित न्याय देत केलेल्या प्रभावी निवेदनाला उपस्थितांनी दिलेली उत्स्फूर्त दाद. यामुळे गझल मुशायरा अविस्मरणीय झाला. शेती साहित्याशी निगडित सर्वच साहित्यप्रकाराचे सादरीकरण, उजळणी, संघटन कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, लेखन कौशल्य आत्मसात करणे, सांघिक कार्यकुशलता, सामूहिक चर्चा, संवादाचे महत्त्व, स्वानुभवकथन, वेळेचे नियोजन, प्रत्येक सत्राची नियोजनबद्धपणे आखणी आणि ते वेळेत पार पाडण्याकरिता प्रत्यक्ष अंमलबजावणी. अश्या एखाद्या प्रशिक्षण शिबिरात ज्या प्रमाणे ह्या सर्व बाबीचा अंतर्भाव असतो तश्या प्रकारे मला हे संमेलन एखाद्या निवासी प्रशिक्षण शिबिरासारखे वाटले......!
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
आठोनीतलं साहित्य संमेलन
जगण्याला प्रतिष्ठा देणारे संमेलन
Ganesh
व्यवस्थेचा खरा चेहरा दाखवणारे संमेलन
सहावे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन 2020, अलिबाग येथे अगदी व्यवस्थित आणि उत्तमरीत्या पार पडले. या सगळ्यांमागे असणाऱ्या नियोजनामुळे हे सगळं घडून आले. त्यासाठी अथक परिश्रम घेणारे मुटे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा मोलाचा वाटा आहे. कितीतरी साहित्य संमेलने अलीकडच्या काळात होतात पण त्यामधून उच्चवर्गीयांच्या मनोरंजनासाठी साहित्य निर्माण होते. त्यामुळे समाजहिताचं, सामान्यांच्या व्यथा मांडणार साहित्य मांडल्या जात नाही.
- कृष्णा जावळे
बुलडाणा
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
मोबाईल अॅप