नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
एकिकडे देव केला, लावली अन, धूप- बत्ती
एकिकडे माणसाने, तोडल्या त्या, चार भित्ती
एकिकडे खूप आहे, वीज रस्ते, सर्वकाही
एकिकडे अन्न नाही, औषधी वा, दीप- बत्ती
एकिकडे जीव माझा, फार आहे, मोल किमती
एकिकडे तन मनाने, टाळतो मी, प्रायश्चित्ती
एकिकडे अस्तित्वाला, बंदीशाला, समजले की
एकिकडे वर्ग होते, माणसाची, ढोर- वृत्ती
एकिकडे प्रेम आहे, आणि घटका, मीलनाच्या
एकिकडे धर्मकारण, राजकारण, आणि भक्ती
एकिकडे करत आहे, शेत्करी हा, आत्महत्या
एकिकडे शासनाच्या, येत नाही, जाग चित्ती
एकिकडे मर्त्य माणव, मीच झाला, नीच झाला
एकिकडे निर जिणे मज, मान्य आहे, अनावृत्ती