नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
दिनांक : ३० जानेवारी २०१७
*************
महिलांची प्रचंड उपस्थिती
*************
बापू कुटी समोर शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात ३० जानेवारी २०१७, सोमवारी दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत संपन्न झालेल्या शेतकऱ्यांचे महात्म्यांना साकडे या आंदोलनात सांगली, सातारा व सोलापूर हे तीन जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून ३००० हजार शेतकरी उपस्थित झाले होते. सभेच्या सुरुवातीला दोन मिनिटे उभे राहून बापूंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बापूंच्या आवडीचे "रघुपती राघव राजाराम" आणि "वैष्णव जन तो तेने कहिये" या भजनांचे दत्ता राऊत आणि संच यांनी गायन केले त्यास उपस्थितांनी आवाजात आवाज मिसळून तालासुरात सामुहिक गायन केले. साकडे आंदोलनाची रुपरेषा विशद करण्यासाठी झालेल्या सभेस सतिश दाणी, मदन कामडे, सिमा नरोडे, गीता खांदेभराड, अॅड दिनेश शर्मा, मध्य प्रदेशचे किसान सुब्रतो त्रिपाठी, किसान समन्वय समितीचे अध्यक्ष, माजी खासदार भुपेंद्रसिंग मान, सरोजताई काशीकर, अॅड वामनराव चटप, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक वर्धा जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी तर संचालन प्रा. पांडुरंग भालशंकर यांनी केले.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट संबोधित करताना.
*************
शेतकर्यांच्या आयुष्यात सुखाचा व सन्मानाचा दिवस येईपर्यंत सतत लढत राहण्याची बापूंच्या समोर शपथ घेताना
*************
बापूंना साकडेनिवेदन देण्यासाठी आश्रमात महिलांनीही अशी गर्दी केली.
*************
बापूंच्या आसनाला साकडेनिवेदन सादर करण्यात आले.
*************
स्वत: शेतकरी संघटनेच्या कामकाजात प्रत्यक्ष भाग न घेता निस्वार्थीपणे कौटुंबिक जबाबदारी सांभाळत कुटुंबातील दुसर्या सदस्यांना कौंटुंबिक जबाबदारीपासून मोकळीक देत व शेतकरी संघटनेच्या पूर्णवेळ कार्यासाठी प्रोत्साहन देत पडद्यामागे राहून कार्य करणार्या व्यक्तींना यथोचित सत्कार म्हणून "कृतज्ञता पुरस्कार" देण्याचा नांदेड येथे संपन्न झालेल्या शेतकरी संघटनेच्या १३ व्या संयुक्त अधिवेशनाच्या आयोजक समितीने निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिला पुरस्कार सौ. शालुताई सुरेंद्र काशीकर यांना प्रदान करण्यात आला.
शालुताई काशिकर यांना सरदार भुपेंद्रसिंग मान "कृतज्ञता पुरस्कार" प्रदान करताना.
*************
क्षणचित्रे :
* सरकारला जागविण्यासाठी सेवाग्राम येथून आंदोलनाची सुरूवात करण्यात आली आहे. १ आणि २ मार्च रोजी राज्य कार्यकारिणीची बैठक होईल. त्यात जिल्हा पातळीवरील आंदोलनांची घोषणा होईल.
* आंदोलनाच्या पुढील टप्प्याची सेवाग्राम ते साबरमती अशी रॅली काढून करण्यात येणार आहे.
* दुरवरचे कार्यकर्ते सकाळपासूनच कार्यक्रमस्थळी पोचायला लागल्याने आश्रम परिसर फ़ुलायला लागला होता.
* शेतकरी कार्यकर्त्यांची शिस्तबद्धता स्थानिक जनतेच्या कुतुहलाचा विषय झाली होती.
* अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद मिळाल्याने कर्यकर्त्यामध्ये नव्याने उत्साह संचारल्याचे जाणवत होते.
*************