Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




माझे फेसबूक स्टेटस - 2

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 02/10/2024 - 21:56. वाजता प्रकाशित केले.

    गायीच्या पालन-पोषणासाठी एका गाईमागे दरमहा रु. 5000/- सरकारने दिले पाहिजे. तुमची माय शेतकऱ्यांनी का पोसावी?

     
     #राज्यमाता #राजमाता

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 02/10/2024 - 21:57. वाजता प्रकाशित केले.
    बुध, 02/10/2024


    "प्रत्येक जीवजंतूंचा धर्म वेगवेगळा व ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर अवलंबून असतो." - भगवान श्रीकृष्ण
     

    #शुभरात्री_लोक्सहो #धर्म

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 02/10/2024 - 21:58. वाजता प्रकाशित केले.

    राज्यमातेला मतदानाचा अधिकार असता तर ती सुद्धा 1500 वाली "लाडकी माय" झाली असती.

    #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 02/10/2024 - 21:58. वाजता प्रकाशित केले.

    शेतकऱ्याला "राज्यगुलाम" घोषित करा. बास्स! इतकंच बाकी राहिलेलं आहे.

    #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 02/10/2024 - 21:59. वाजता प्रकाशित केले.

    इंडिया म्हणतो अख्खी शासकीय तिजोरी

    आमच्याच घशात घाला...

    भारत मेला तरी चालेल.

    #गंगाधर_मुटे #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 02/10/2024 - 22:00. वाजता प्रकाशित केले.

    देशावर आणि राज्यावर झालेले कर्ज जनहिताच्या योजना मुळे नव्हे तर वेतन आयोगामुळे झालेले आहे.

    #गंगाधर_मुटे #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 02/10/2024 - 22:11. वाजता प्रकाशित केले.
    अन्न, वस्त्र भयंकर स्वस्त व निवारा भयंकर महाग. भारताचं अर्थशास्त्र ठार मेलं आहे.
     
    #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 02/10/2024 - 22:11. वाजता प्रकाशित केले.

    शेतीव्यवसाय मुख्यत्वे ज्या जातींच्या हाती आहे दुर्दैवाने त्याच जातींना "जातीच्या राजकारणाचे" प्रचंड वेड आहे.

     
    कसा सुटेल शेतीचा प्रश्न?

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 03/10/2024 - 20:00. वाजता प्रकाशित केले.

    पूर्वी लेख पाठवायचो तर ते छापत नव्हते. आता संपादक फोन करून लेख मागतात आणि मला वेळ नाही. Headack Headack

    #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 03/10/2024 - 21:08. वाजता प्रकाशित केले.

    माझ्या जन्मदिवशी (२७ फेब्रू) मराठीला अभिजात दर्जा मिळाला असता ... तर सोन्याहून पिवळे झाले असते. सरकारचे अभिनंदन!
    #गंगाधर_मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 04/10/2024 - 19:19. वाजता प्रकाशित केले.

    भारताचे शस्त्र अर्थात आंदोलनशास्त्र

    मी अमुक-अमुक पक्षाला कधीही मतदान करणार नाही, असे म्हणणे आंदोलन शास्त्रात बसत नाही. तसेच एखाद्या पक्षाची बांधिलकी स्वीकारणे सुद्धा आंदोलन शास्त्रात बसत नाही.

    .... कारण एकदा जर एखाद्या पक्षाला खात्री झाली कि तुम्ही कधीच त्यांना मतदान करणार नाहीत तर तुमच्याविषयीची त्या पक्षाची अनुकूलता संपुष्टात येईल.
    आणि
    ....... ज्या पक्षाला तुम्ही मतदान करणारच आहात अशी खात्री होईल तो पक्ष तुम्ही त्यांच्या खुंट्याला बांधलेलेच आहात असे गृहीत धरून तुमच्याविषयीची त्या पक्षाचीही अनुकूलता सुद्धा संपुष्टात येईल.

    याउलट तुम्ही जर शेतीला अनुकूल धोरणे राबवलीत तर मतदान मी तुमच्याच पक्षाला देणार, असे लालूच देणारे संभाषण करत सर्वच पक्षांना झुलवत ठेवून त्यांना आपल्या बोटावर खेळवत ठेवले तर.... तेच आंदोलनाच्या उद्दिष्टप्राप्तीसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते.

    व्यक्तिगत मताला बाजूला ठेऊन शेतीला केंद्रस्थानी ठेवून विचार करणारा विचारच सर्वात जास्त परिणामकारक ठरू शकतो. त्यामुळे आंदोलनशास्त्र आणि व्यक्तिगत वर्तनशास्त्र कधीही एकत्र येत नाही, हे कायमच लक्षात ठेवले पाहिजे. आंदोलनाच्या पाईकाने संघटनेचा सामूहिक निर्णय स्वीकारलाच पाहिजे.

    मी बहुतांश वेळा भाजपलाच मतदान केले आहे. अन्य पक्षांना फारच कमी वेळा.
    पण भाजप हा शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त घातक पक्ष असल्याची माझी खात्री झाली तर मी प्रतिस्पर्धी- तुल्यबळ उमेदवारालाच मतदान करेन. मग मला काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप, भाकप, रिपाई, तेलगू देसम, वंचित आघाडी आणि मुस्लिम लीग सहित कोणताही पक्ष चालेल.
    पण
    शेतकरी संघटना जसा निर्णय घेईल त्यानुसार मी मतदान करत असतो. मतदान करताना स्वतःचे डोके वापरत नाही.

    - गंगाधर मुटे आर्वीकर

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 05/10/2024 - 19:00. वाजता प्रकाशित केले.

    गल्लीत झित्रुबांनो घुसलेत मांसप्रेमी
    व्हा सज्ज बैल बांनो लेकीस वाचवाया

    #गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 05/10/2024 - 19:24. वाजता प्रकाशित केले.

    पाऊस पडला कि बेडकं जिवंत होतात अन पाऊस पडला नाही कि पर्यावरणवादी जिवंत होऊन "झाडे लावा, झाडे लावा" असे डराव डराव करायला लागतात.

    #तुत्ते_तमिने_हलामी_थाले! #शुभरात्री_लोक्सहो #पर्यावरण #गंगाधर_मुटे #इंडियाvsभारत #जौद्या_आप्ल्याले_काक्रा_लाग्ते

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 06/10/2024 - 19:23. वाजता प्रकाशित केले.
    एकाचा प्रश्न :-  मग झाडे लावायला नकोत का?
    माझे उत्तर :- लावलेच पाहिजे पण ते तुम्ही लावले पाहिजे. "झाडे लावा, झाडे लावा" केवळ असे इतरांना सल्ले सांगायचे नाही. 
    विचार तुमचे तर कृतीही तुमचीच असली पाहिजे. "झाडे लावले, झाडे लावतो" असा नारा द्या. तुम्ही रोज सकाळ-दुपार-सायंकाळ असे ३ व जेवणानंतर १ व झोपण्यापूर्वी १ असे रोज ५ झाडे लावली पाहिजेत. 
    जर तुम्ही इतके साधे करू शकत नसाल तर तुमचे जगणे नरकासमान आहे. अन्यथा निष्कारण जगण्यापेक्षा तुम्ही मेलात तरी चालेल. Smile Lol Lol  
     
    #तुत्ते_तमिने_हलामी_थाले #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 07/10/2024 - 19:35. वाजता प्रकाशित केले.

    झाडे लावा, झाडे जगवा, झाडे तोडा, झाडे विका.... असे धोरण का असू नये रे दीडशहाण्याने??

    #तुत्ते-तमिने-हलामी-थाले #शुभरात्री-लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 08/10/2024 - 20:48. वाजता प्रकाशित केले.

    पोटासाठी बारा वाटा.. पण सद्यस्थितीत 12 पैकी बाराही वाटा फक्त शहरांकडेच जातात आणि थांबतात. Sad Sad

    #इंडियाvsभारत #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 09/10/2024 - 20:57. वाजता प्रकाशित केले.

    राजा व्यापारी तर प्रजा भिकारी. सरकारने नको ते खुटीउपड धंदे करू नये. सर्व पांढरे हत्ती विकून काँग्रेसने केलेली चूक दुरुस्त करावी. हाच जनहिताचा राजमार्ग आहे.

    #गंगाधर_मुटे #अर्थशास्त्र

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 11/10/2024 - 19:12. वाजता प्रकाशित केले.

    सरकार जर शेतीविरोधी नसेल तर वादळ, अतिवृष्टी, महापुर शेतकऱ्यांचं काहीच वाकडं करू शकत नाही!

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 11/10/2024 - 19:29. वाजता प्रकाशित केले.

    एका वृक्षात सरासरी पाच माणसे जाळली जाऊ शकतात. आतापर्यंत ६ लक्ष शेतकऱ्यांनी अल्पवयात आत्महत्या केल्या आहेत. त्यांना जाळायला निदान सव्वा लक्ष वृक्ष निष्कारण खर्ची पडले आहेत. याचाच अर्थ सव्वा लाख वृक्षांची निष्कारण कत्तल करावी लागली आहे.

    पर्यावरणवाद्यांना शेतकरी मेल्याचे दुःख नाही, हे मी समजू शकतो पण सव्वा लक्ष वृक्षांची कत्तल थांबवण्यासाठी तरी त्यांनी शेतकरी आत्महत्त्या थांबवायसाठी प्रयत्न करणे आवश्यक नव्हते का? #सांगा_ब्वॉ

    #तुत्तेतमिने_हलामीथाले! #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 12/10/2024 - 12:34. वाजता प्रकाशित केले.

    धर्मवादी आणि जातीवादी हेच आजचे रावण आहेत. पण त्यांची संख्या 95% आहे. त्यांना पेटवायचे कसे?

    त्यामुळे शुभेच्छा

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 13/10/2024 - 19:29. वाजता प्रकाशित केले.

    व्यवस्था परिवर्तन करायला निघालेले स्वतःच आहे त्या प्रस्थापित व्यवस्थेत शिरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतांना दिसत आहेत का?

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 16/10/2024 - 18:35. वाजता प्रकाशित केले.

    आयला तुम्ही कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी बांधिलकी ठेवून असाल तर तुमच्यासारखा विश्वव्यापी सदासुखी राजा कुणीच नाही राव! प्रसंग कोणताही, निमित्त कोणतेही, घटना कोणतीही असली तरी तुम्हाला स्वतःचे डोके चालवायची गरजच नाही. डोक्याला ताप द्यायची तर अजिबात गरज नाही. अभ्यास करून विचारपूर्वक बोलायची गरज तर अजिबातच नाही. काँग्रेसचे असाल तर काँग्रेसेतर पक्षांना शिव्या घालायच्या आणि भाजपचे असाल तर भाजपेतर पक्षांना शिव्या घालून मोकळे व्हायचे.
    तुमचा नेता म्हणेल तेच अंतिम सत्य!
    तुमचा पक्ष देईल तोच अंतिम न्याय!!
    तुम्ही फक्त सुरात सूर मिसळून री ओढायची. बस्स!!!

    खरंच सांगा राजेहो!
    तुमच्याइतका सदासुखी बादशहा दुसरा कोणी असेल का या संबंध विश्वात?

    #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे #राजकारण #तर्कशास्त्र

    माझी फेसबुक स्टेटस

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/10/2024 - 22:16. वाजता प्रकाशित केले.

    फेसबूक पोस्ट

    शेतीची लढाई आक्रमकपणे लढताना अत्रतत्रसर्वत्र मी माझ्या शत्रूची फौज निर्माण करून ठेवली आहे. Smile Lol Lol

    #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 24/10/2024 - 22:41. वाजता प्रकाशित केले.

    राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून थोडासा विचार करावा.

    आपल्या देशात जात आणि धर्म असे पिंजरे करून ती ती जात आणि तो तो धर्म स्वतःला स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी पिंजऱ्यामध्ये अडकवून घेतो. पिंजऱ्याच्या बाहेर पडून स्वतःला व्यापक करण्याची इच्छाशक्ती जातीचा गर्व असणाऱ्यांना आणि धर्माचा गर्व असणाऱ्यांना नसते.

    त्यामुळे एक जात दुसऱ्या जातीला आणि एक धर्म दुसऱ्या धर्माला मतदान करण्यास तयार नसतो.

    जर राजकीय यश मिळवायचे असेल तर या चौकटीच्या बाहेर पडून एकमेकात मिसळावे लागेल. एकमेकांची मने जिंकावी लागतील. जाती आणि धर्माच्या बाहेरील मतदार आपल्याला मतदान करेल अशी वर्तणूक करावी लागेल. असे करताना कोणी दिसत नाही.

    कोणताही राजकीय पक्ष निवडून येण्याची क्षमता बघूनच तिकीट देणार. यापेक्षा वेगळे काही होऊ शकत नाही. निवडून येण्याची क्षमता नसलेल्यांना तिकीट देऊन कोणीही आपल्या पक्षाचा वाटोळ करून घेणार नाही.

    जे बहुसंख्या आहेत त्यांना जात आणि धर्म दोन्ही परवडतात. त्यामुळे ते जाती-धर्माचे पिंजरे निर्माण करतात.

    जो धर्म आणि ज्या जाती अल्पसंख्या आहेत त्यांना असे पिंजरे तयार करून त्यात बंदिस्त होणे राजकीय दृष्ट्या कधीही परवडणारे नाही. आजही नाही, उद्याही नाही आणि कदाचित हजारो वर्षानंतरही चित्र बदलणार नाही.

    बहुसंख्य करतात म्हणून त्यांचेच अनुकरण करून आपणही स्वतःला जाती धर्मात बंदिस्त करून घेण्यात अल्पसंख्याकाचा मोठा घात होतो.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 01/11/2024 - 22:38. वाजता प्रकाशित केले.

    शेतकरी जर सक्षम झाला आणि आर्थिक संपन्न झाला तर *देवाघेवीच्या अटी* शेतकऱ्यांच्या हाती जातील. त्याची बार्गेनिंग पॉवर वाढेल. चांगला भाव मिळेपर्यंत तो शेतमाल विकणार नाही.

    जर असे झाले तर शेतमाल स्वस्तात स्वस्त भावांने लुटणे शक्यच होणार नाही. *म्हणून शेतकऱ्याला कायमच "गरजू" ठेवणे आणि त्याला कायमचे कर्जाच्या ओझ्याखाली दाबून ठेवणे* हेच सरकार नामक राज्यकर्त्यांचे अधिकृत धोरण असते.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 03/11/2024 - 20:37. वाजता प्रकाशित केले.

    पक्ष, पक्ष नेते, उमेदवार राजकारण करिअर म्हणून करतात. मतदारांनी मतदान करिअर म्हणून करावे का? Smile Lol

    #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 07/12/2024 - 23:05. वाजता प्रकाशित केले.

    शेतकऱ्याला वारंवार कर्जमाफी का दिली जाते? #तुम्ही_शोधा_उत्तर_मी_झोपतो

    #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 07/12/2024 - 23:06. वाजता प्रकाशित केले.

    पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगाम्यांचा आणखी किती राजकीय सत्यानाश व्हायला पाहिजे म्हणजे हे पुरोगामी सुधारतील?

    #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 09/12/2024 - 21:10. वाजता प्रकाशित केले.

    कधीतरी आपल्याच आत झाकून बघू
    गरिबी का आली ते तरी शोधून बघू

    #गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 10/12/2024 - 19:01. वाजता प्रकाशित केले.
    मोह मायेचा त्याग करण्याच्या संत शिकवणीमुळे गरीब समाधानी झाला मात्र सुखी झाला नाही.
     
    असो. #जौद्या_आप्ल्याले_काक्रा_लाग्ते

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 11/12/2024 - 21:25. वाजता प्रकाशित केले.
    चुकीच्या पद्धतीने EVMचा बचाव करून "भाजप बॅलेटला भितो" अशी प्रतिमा तयार होणे लोकशाहीला घातक आहे.
     
    #जौद्या_आप्ल्याले_काक्रा_लाग्ते

    शेतकरी तितुका एक एक!

  • पाने