Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***मळणी

लेखनविभाग: 
कथा

                             मळणी

रमा आणि उमा दोघेही सख्ख्या बहिणी. काबाडकष्ट करून जिन जगायच्या . रोजंदारीवर कामाला जात होत्या. मिळेल ते काम त्या आपल्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचे. आई बापाचा सहारा अन्  आसरा नियतीने अकालीच काढून घेतला. एक दिवस आई बाप कारखान्याला निघाले होते. समोरून अचानक एक भरधाव वेगाने गाडी आली , बैलगाडीला धडक दिली होत्याचं नव्हतं झालं. बाप एका बाजूला तर आई दुसर्या बाजूला. आईचा पार मुटका झाला. दोघेही  जागेवरच गतप्राण झाले आणि तेव्हापासून या दोघीं च्या वाट्याला फक्त आणि फक्त दुःखाचे भोग आले. नियतीने डाव मांडला आणि दोघींना अनाथ केले.आता दोघींचा लढा जगण्यासाठी चालू होता. रमा उमाची थोरली बहीण.  हाताला मिळेल ते काम शोधायची आणि दोघेही त्या ठिकाणी जाऊन आनंदाने काम पुर्ण करत होत्या.  त्यांना आज जवळच काम मिळाले होते. धावपळ करण्याची गरज नव्हती. त्यामुळे आज निवांत होत्या.  रोज रोज काम करून आंबाट झाल्यामुळे आज जरा निवांत उठल्या होत्या.
रमा घर सावरीत आपल्या बहिणीला म्हणाली, " पटापटा आवर उशीर होईल".
उमा पण म्हणाली," अगं अक्का घाई कशाला करतेस, जायचे ना त्या दुर्गाआत्या कडं. आजवर किती लांब लांब गेलो होतो माहीती हाय ना?"
रमा म्हणाली, " आपल्याला माहिती आहे ना तिचा स्वभाव किती तापट हाय?,  थोडा जरी उशीर झाला तरी ओरडेल? आपल्याला हे असलं नाही सहन होत, म्हणून आपण वेळेवर गेलं पाहिजे".
उमा म्हणाली, "तुझं पण बरोबर आहे अक्का, माझं पण झालं आता भाकरी बांधून.  आज काय जास्त काम नाही. आज फक्त बाजरी करायची."
दोघींनी पण  पटापट आवरलं आणि दोघी दुर्गाबाईच्या शेताकडे निघाले. शेतात पोहोचताच दुर्गाबाईंनी त्यांना हाका मारल्या," ए रमा....., उमा... या ना इकडे!".  आज लय काम आहे आपलं. खळं मोठा हाय. लवकर वेळ मिळणार नाही, त्यामुळे लवकर जेवण करून घ्या. तुमचं जेवण झालं की रमा हे बघ, हे कणसे  पसरुन घे आणि नंतर बसा.   बाया आल्यावर आपलं खळं सुरू होईल. उमा तु पण तिला मदत कर गं." 
दोघींनी पण भाकरतुकडा खाल्ला आणि थोडेसे बसल्या , लागलीच थोड्या वेळाने त्या दोघींनी बाजरीचे कणसे पसरायला घेतले.  खाली वर करू लागले. तोपर्यंत बाया जमा होऊ लागल्या. एकमेकींना ते मदत करू लागल्या.
इकडे गोट्या उपनेर वाल्याला फोन लावत होता पण फोन लागत नव्हता.  दोन तिनदा प्रयत्न करुन अखेर तिसर्यांदा फोन लागला. तवा गोट्या नं फोन बापाकडं दिला. गोट्याच्या बापानं  उपनेरवाला चांगलाच हासाडला,
"तु आज आला नाही ना, तर मी दुसऱ्याला लावीन. पावसाचे दिस हाय. एखादा शिपका आला  तर सगळी नासाडी होईल बघ?".
त्याच्यामुळे  तो उपनेर वाला करतोय काय? , हे त्यांचं ते कडक बोलणं ऐकून ऊपनेर वाला अर्ध्या एक तासात येतो म्हणाला.
अर्ध्या तासाच्या आत ऊपनेरवाला उपनेर घेऊन हजर झाला. तोपर्यंत  उन्हाला कनसे चांगलीच वाळली होती.  खळ्यापाशी उपनेर लावुन उपनेरवाला कनसात उतरला.
उपनेर वाल्यांनं कनीस चावुन बघितलं, चांगलं कड कड वाजलं. दुसरं घेतलं वाकुन बघितलं ते पण मोडलं.  तो म्हणाला "माल लय भारी आहे. चांगली वीस पोते  भरत्याल काळजी करू नका".
लागलीच त्याने उपनेरची पूजा केली आणि ह्यांडल मारला.
घर घर करीत हे उपनेर सुरू झाले.
रमा आणि उमा पटापटा कणसे गोळा करू लागले.  दुर्गाबाई उमाला म्हणाली, उमा उपनेर वर उभी राहा सोनबा अजून आला नाही".
"आत्या काळजी करू नका हो मी आहे ना ?,  मी हे जमा करते आणि नंतर तुम्ही मला सगळे एक एक घमेले माझ्याकडे द्या मी पटकन मशीन मध्ये टाकते".
अगं  तु फक्त तिथे उभा राहा आणि भरलेले घमेले त्या मशीन मध्ये टाक. सोनबा आला की नंतर मग खाली उतर. तुला सांगितलं तेवढंच कर.
पटापटा तिकडं रमा ,दुर्गाआत्या , रखमा व  सुमी कणसे भरायला लागले, जो तो नेमून दिलेली कामे चोख बजावत होता.
उमा  पटा पटा घमेले  त्या मशीन मध्ये रिती करीत होती. मशीन मध्ये अडकलेला कनसाचा लगदा एका हाताने बाजूला काढत होती. बघता बघता सात पोती टाचुन भरले.
इकडे आभाळ जमा होवु लागले. अंधार पसरुन आला. उमेच्या हाताला तर दमच नव्हता. मालकाचा जीव तर कासावीस होत होता.
कधी आभाळ तर कधी कनसे बघत होता.
"आरे हात हलवा भराभरा. आभाळ पडलं ना सगळा सत्यानास होईल". गोट्याचा बाप बडबडत होता.
सगळेच वैतागले होते. एका सकाळी न्याहारी केलेली. आता चार वाजलं तरी काम बंद नाही. तरी सुमी म्हणाली, "मालक थोडं थांबून घास तुकडा खाऊन घेवु?. अंगात त्राण उरला नाही."
"घास तुकडा नंतर बघा, वर बघा काळाकुट्ट झाकाळुन आलंय." मालक म्हणाला.
रमा आणि उमा दोघींच्या जीवाची पण वाताहात चालु होती. सकाळ सकाळ धावत आलत्या. इथं आल्यावर थोडी न्याहारी केली जुंपले लगेच कामाला. उमाला पाहून रमेच्या डोळ्यात आपसुक पाणी आलं. राहुन राहुन वाटायला लागलं आज आई असती तर एवढं हाल झालं नसतं. तीनं कधी उंबरठा ओलांडून दिला नाही का कधी उपाशी निजु दिलं नाही. पण करणी चे भोग कुणाला सुटलेत.....
काम करतानाच रमाच्या डोळ्यासमोरून भुतकाळ सरकला.
तीतक्यात दुर्गाआत्या च्या आवाजाने रमेची तंद्री उडाली. ती भानावर आली.
" रखमा ये रखमा , काय करतेय तिकडे ?, हात आवर पटापटा" दुर्गा आत्या म्हणाली.
"आता मला काय चार हातय व्हय आत्या?" रखमेनं ताडकन उत्तर दिलं.
"अगं तसं नाय, पण लवकर आवरलं म्हणजे लवकर जाता येईल".
"लवकर कशाचं आता, चांगलं दिस ढळुन गेला ना".
"हां माहितीय, मी तरी किती अन् काय करु , तो मेला उपनेर वाला उशीरा आला बघ". आणि ह्यांचा सभाव तुला माहीत नाही व्हय, नुसतं जनावरा सारखं राब राब  राबवायचं. नुसतं मोठं घर नं  पोकळ वासा". बोलता बोलता दुर्गाआत्याच्या डोळ्यात पाणी आलं.
तोच र्हदय हेलावणारी किंकाळी आसमंत दणाणून गेली. सगळ्यांच्या काळजात धस्स झालं.
आई गं..... आई गं......मला वाचव?....अक्का.....…  वाचव..........अक्का मला वाचव......
अचानक उमा च्या आवाजाने सगळे लोक धावत पळत उमा जवळ आले.
बघतेत तर काय , उमाच्या साडीचा पदर उपनेर च्या पट्यात अडकुन तीच्या शरीराचा पार पाचोळा झाल्याला दिसला. ती कन्हत व्ह़ती. आक्रोश करत होती.
उमा ओळखु सुध्दा येत नव्हती.
जो तो उमाला पाहण्यासाठी गर्दी करत होता. शेत शिवारातील सगळे लोक धावत तिथे आले.
इकडे रमाचे डोळे, विस्फारून समोरचं दृश्य बघत होते. तीला रखमेनं  आपल्या बाहुपाशात घेऊन धीर देत होती.
गर्दीतुन रखमेनं रमेला उमापाशी नेलं. तोच तिचा सुध्दा अश्रुंचा बांध फुटला. मोठं मोठ्यानं रडु  लागली......अश्रुंच्या ओघात नकळत शब्द फुटत होते.
"उमे काय झालं गं हे,. ........ दैवं आपल्याच मागं हात धुवून लागलं. आधी आईबाप नेलं अन् आता माझी लाडकी उमी!"..........
"नको ना जाऊं मला सोडून, उमे........ ये उमे!"........ "मी तुझ्या शिवाय कशी जगु गं उमे ........ ऊठ गं उमे!".......
उमेच्या पापण्या हळुच लवलवल्या........
आपल्या हाताला बळ लावुन रमेचे डोळे पुसले .....
"अक्का !"..............अन् एवढंच ती पुटपुटली........शेवटचा हुंदका दिला तो कायमचाच.......उमा ला रमेनं घट्ट मिठी मारली....
"उमे !"............., बाजरीची मळणी करता करता आयुष्याची मळणी झाली गं......
"उमे!".....
र्हदयाचा टाहो फोडून एवढा एकच शब्द आसमंतात  विरळ होत गेला........ तो ही कायमचाच.

                 श्रीकांत दशरथ कारंडे
                 ता. आष्टी , जि. बीड.

Share

प्रतिक्रिया