नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
लेखनविभाग : पद्यकविता
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२१
लेखनाचा विषय : रानातला पाऊस
पद्यलेखन स्पर्धा-२०२१ :
विभाग : अ) पद्यकविता
नभ धारा
नभ झाली माय रोपे तिची बाळ
नभा फुटे पान्हा रोपे होता व्याकुळ ||
पिऊन त्या धारा पिके हालती डोलती
आल्या नभातून धारा झाली सुगंधित माती ||१||
नभातलं पाणी बरसे रानीवनी
झाला हिरवा डोंगर दिसे पाचूवाणी ||
पानापानावर दिसे चहूकडे मोती
आल्या नभातून धारा झाली सुगंधित माती ||२||
पावसान झालं सारं हिरवं रान
पाखरांच्या ओठी आलं नव गाणं ||
पिसार्यात मोर बनी आंब्याच्या नाचती
आल्या नभातून धारा झाली सुगंधित माती ||३||
डोंगर माथ्याला फुटला पाझर
नदी नाल्यातून वाहू लागे झरझर ||
नदी-नाले भेटीसाठी सागराला जाती
आल्या नभातून धारा झाली सुगंधित माती ||४||
नाव : राजेश हनुमंतराव अंगाईतकर
पत्ता : स्टेट बँक चौक, मायादेवी प्लॉट, यवतमाळ -४४५००१
मोबाईल नं : ८२०८९९१८७०
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!