![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गझल:
कर्जातल्या जिवांच्या नशिबास कोण तारी.
°
कर्जातल्या जिवांच्या नशिबास कोण तारी.
मारक जिथे व्यवस्था मरणार कास्तकारी.
°
पाहून घ्या कसा तो रचतात सापळा हे,
देऊन कर्जमाफी गिळतात कास्तकारी.
°
या योजना कुणाच्या ठरल्या कुणास लाभी,
अन दाम मागणारे झाले इथे भिकारी.
°
हिसकून घेतल्याने स्वातंत्र्य दौलतीचे,
फास्यात कायद्याच्या फसली जमीन सारी.
°
जाऊ नकोस 'धीरज' तू मागली कुणाच्या,
अपुले शरद जोशी हे एकची पुढारी!
°
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!
आभारी आहे!
आभारी आहे सर!
छान गझल सर
छान गझल सर
धन्यवाद!
खूप खूप आभार! राजेश.
खूप छान गझल
खूप छान गझल
धन्यवाद!
धन्यवाद!!! तलवटकर सर
आपल्या रचनेच्या प्रतिक्षेत.....
उत्तम गझल
फारच छान गझल गुरूजी
पाने