Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

कोण जाणे कोणासंग टाका भिडून व्हता...।
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥

जवा पाय कसाबचे मुंबईमंधी पडले
“लालबत्ती” वाले तमाम घरामंधी दडले
तवा म्हणान माहा पारा असा काही चढला
दोन ढूशे मारून त्याले तोंडबुचक्या पाडला
पायापोटी तवा कसाब माह्या पडत व्हता... ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥

सुराज्याचं सपन जवा शिवाजीले पडलं
इचिबैन तवा मले जाम स्फ़ूरण चढलं
मंग म्हणान माही तलवार अशी काही चालली
एका हिसक्यात सारी सेना धारातिर्थी पाडली
चूलीमागं औरंगजेब जीव लपवत व्हता... ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥

रावणानं सीता चोरून लंकेमंधी नेली
तळपायीची आग माह्या मस्तकात गेली
तोडून त्याचे नऊ मुंडके, मी संग घेऊन आलो
पण; तवापासून मीच “अभय” दहातोंड्या झालो
काय करू, काय नाही; मले समजत नाही आता
अन्
सपनातून जाग आली तं घाम फ़ुटून व्हता... ॥

                                                  - गंगाधर मुटे
---------------------------------------------------------

Share

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 04/08/2015 - 19:11. वाजता प्रकाशित केले.

    काल रात्री 84079436xx या नंबरवरून फ़ोन आला होता. ते बुलडाना जिल्ह्यातील कवी आहेत. त्यांच्या मते ही कविता कविताच नाही.
    त्यांनी उपस्थित केलेले काही मुद्दे :
    १) कविता अशी नसतेच.
    २) ही कविता वाचताना कालबाह्य व शिळी वाटते.
    ३) कवितेतील संदर्भ फ़ार जुने आहेत. इतके जुने संदर्भ नसावेत.
    ४) कविता वास्तवाला धरून नाही.
    ५) रावणाला दहा तोंडे होती ही कल्पना असत्य असल्याने ते रुपक कवितेत यायलाच नको.
    ६) रावणाला दहा तोंडे होती हे कवीने सिद्ध करून दाखवावे अन्यथा अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये.
    वगैरे वगैरे....
    एकंदरित या कवितेच्या अस्तित्वालाच त्यांनी आव्हान दिले आहे!
    मित्र/मैत्रिनींनो, या कवितेबद्दल तुम्हाला काय वाटते, ते लिहावे.
    आपला स्नेहांकित
    - गंगाधर मुटे
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

    शेतकरी तितुका एक एक!

  • संपादक's picture
    संपादक
    मंगळ, 04/08/2015 - 19:53. वाजता प्रकाशित केले.

    फेसबूक व व्हाटसअ‍ॅप वरिल प्रतिसाद

    श्रीपाद अपराजित : 

    श्री मुटे, स.न.

    कोणत्याही अभिव्यक्तीवर मत मांडण्याची भूमिका स्तूत्यच आहे. विरोधात किंवा बाजुने हा मुद्दा गौण ठरतो. याचवेळी अमुकच प्रतिमा एखाद्या कविने वापरायला हवी हा अट्टाहासही चुकीचा वाटतो. संदर्भांना जुन्या-नव्यांची चौकट लावता येत नाही. EVEN SKY IS NOT THE LIMIT असेही आपल्याला म्हणता येईल. रामायणातील दंतकथांविषयी आक्षेप असू शकतो, मात्र तुलसीदासाच्या महाकाव्यातील काव्यप्रतिभा आपण नाकारत असू तर आपल्यासारखे करंटे आपणच. कविकडे बघण्याची दृष्टी निकोप असली की रसग्रहणाची व्यापकताही वाढते.  

    "रावणाचे मुंडके तोडून आणण्याची मर्दुमकी लोकांपुढे नेण्याच्या उद्देशाने एकच एक गोष्ट दहादा सांगण्याचा प्रयत्न मी करू लागलो किंवा आत्मस्तुतीच्या आहारी गेलो" असाही भावार्थ दहातोंड्या या शब्दातून काढता येतो. तुमच्या इतर कवितांचा दर्जेदार बाज अनुभवल्याने कदाचित या कवितेचा स्तर निम्न असू शकेल. एक रसिक म्हणून हे येथे नम्रपणे नोंदवावेसे वाटते. आक्षेप घेणाऱ्या मित्रवराचे स्वागत. त्यांचे मत पारदर्शीपणे शेअर केल्याबद्दल तुमचे मनस्वी अभिनंदनही. लिखते रहो....    

    *****
    वैभव कुळकर्णी :

    नागपुरी तड़का म्हणून आजवर जश्या कविता पाहिल्यात म्हणजे फक्कड़ आणि बोलाचालीतल्या वर्हाडी भाषेत हलक्याफुलक्या शब्दशैलीत पण परखड़ आणि परिणामकारक भाष्य करणारी

    अगदीच वृत्तात नसलीतरी बोलक्या लयीत गुणगुणता येणारी यमकाना धरून केलेली विविध संदर्भातून प्रतिमा प्रतीके रूपके यातून विषयाला व्यवस्थित उलगडून दाखवनारी प्रबोधनात्मक पिंड असणारी सामाजिक भाष्य करणारी भारुड ह्या काव्यप्रकाराशी नाते सांगनारी लोकगीतपर रचना असे मी या कवितेबाबत म्हनू शकत आहे

    ज्याउपरोल्लेखित कवीने आक्षेप नोंदवाला त्यांनी काव्य ह्या एका शब्दावर नेमक्या शब्दात 250 शब्दाचा लेख किमान लिहून दाखवावा आणि स्वतःची स्वतःला परफेक्ट वाटणारी कविता मला उपलब्ध करून द्यावी

    त्या दोन्हीचे मी पोस्टमार्टम करून देईन असे ओपन च्यालेन्ज मी देतो कारण त्या तथाकथित कवीची अक्कल वर दिलेल्या 5 व 6 मुद्द्यावरून मला कळालेली आहे

    **********

    अनिल राऊत :

    मुटे सर,

    कवितेतला गर्भित अर्थ आणि आशय समजून न घेता निव्वळ शब्दश: अर्थ घेऊन जे आरोप करतात त्यांना एकतर कविता कळली नाही असे म्हणावे लागेल किंवा पूर्वग्रहदुषित मानसिकतेतून ते आरोप करत असावेत.
    *****

    प्रशांत पनवेलकर :
    ही वर्हाड़ी कविता आहे.
    प्रसिद्ध वर्हाड़ी कवी दे गं सोटे, वर्धा
    ह्यांच्या कवितांची आठवण झाली.अस्सल वर्हाड़ी कविता मुटेजी आपली

    ********
    प्रा. डॉ. दिलिप बिरुटे :

    कविता कशीही असू शकते. आता फक्त गद्य आणि पद्य याच्या सीमारेषा ठरवता येईना इतका गुंता वाढलाय म्हणावं.

    *******
    दिलिप मालवणकर :

    कवीच्या कल्पना शक्तीला व प्रतिभेला आव्हान देऊ नये. सिध्द करण्यासाठी तो काय सिध्दांत मांडत नाही. कविता खुलविण्यासाठी रूपकं वापरावी लागतात. त्यात गैर काही नाही. खरा काव्य रसिक कविता आवडली नाही तर तसे म्हणुन मोकळा होतो. त्याची समिक्षा करीत बसत नाही. ते काम समिक्षकाचे आहे.
    ******

    जयश्री माळी :

    माझ्या मते कविता ही कविच्या कल्पनेचे शब्दरूप असते
    त्याला कसलेही बंधन नसते
    जे न पाही रवि ते पाही कवि
    वरील कविता ही कविची कल्पना आहे
    कवितेत व्यक्त केलेली भावना सिद्ध करुन दाखवायला तो काय वैज्ञानिक सिद्धांत आहे काय? मग तर चंद्र तारे तोडून आणिन असे म्हणणारयाला आधी तोडुन आणून दाखव आणि मगच बोल असे म्हणण्यासारखे आहे. रावणाची दहा तोंडे होती किंवा नव्हती यासाठी कवितेला नव्हे तर रामायणाला आव्हान करावे लागेल. कविकल्पनेला कसलेही बंधन असू शकत नाही असे माझे प्रामाणिक मत आहे......
    *******

    अशोक देशमाने :

    मुटे सर, कविता छानच आहे... लक्ष नका देवू... लोक स्वत प्रकाशझोतात येण्यासाठि ही टिका करतात...
    शेतकरी संम्मेलनातुन अश्यांना जोरदार प्रति उत्तर मिळेल

    *******
    श्रेया श्रीधर महाजन :
    विनोदाचे वावडे असल्यास कविता कळणार नाही. सोडून दया हो त्यानले.

    ***
    Dhananjay Reddy :
    कविता जाणणारयाचे मन सुद्धा कवीच असावे लागते

    ***
    Ashok Gaikwad :
    कविता बंधनात नसावी
    तसेच तुमची कविता स्वप्न रंजक आहे. त्यामुळे ती चांगली कविता आहे .
    वेगवेगळ्या वाटा साहित्यिक निर्माण करू शकतो. रूळलेल्या वाटेने सर्वच जातात.

    ***
    बंडोपंत बोढेकर :
    मुटेजी...
    कविता आपली उत्तम आहे. वराडी ,ग्रामीण बोलीतून मांडलेली व्यथा सध्याच्या स्थितीचे प्रभावी चित्रण आहे.केवळ व्याकरण पाहून रचलेल्या कवितेतून जे बहुतेकवेळा साध्य होत नाही..ते सारं या रचनेत मला दिसून आले ...Go ahead ......
    बंडोपंत बोढेकर

    ******

    सरोजताई काशीकर :
    जशी दृष्टी तशी सुष्टी
    आपण आपल काम करावे.
    ******

    जे.डी.भुसारे :
    गंगाधर मुटे,
    कविता कालबाह्य कधीही होत नाही.
    कविता खुप सुंदर आहे. शेवट तर कळस आहे.
    जे.डी.भुसारे

    *******
    सुनील पवार :
    : दहा तोंडाचा संदर्भ आपण मानवी मुखवट्याच्या दृष्टिकोणातुन घ्यायला हरकत नाही जसा रावणाचा एक मुखड़ा शिव भक्त म्हणून ओळखला गेला तसेच त्याचे इतर मुखड़े अथवा मुखवटा अत्याचारी मायावी कपटी विशयाभिलाषी असे काही समजू हीच ती दहा तोड़े घेऊन आता मानव जगात वावरतो आहे असे मला वाटते.

    *******
    शीला राजपूत गहलोत : 
    साहित्यात नव रसाला महत्त्व आहे ..
    शब्द आणि रसमाधुर्य एकत्र येतात आणि साहित्य निर्माण होत..
    कविची कल्पना कुठे कशी विहार करेल सांगता यायचं नाही.
    मुक्त छंदात अनेक विषय अनेक प्रकार समाविष्ट आहेत..
    तो खुप वेगळा नि मोठा विषय आहे.
    कविता खरच वेगळी आहे
    ईतके आक्षेप कां कळले नाही

    *******
    संतोष कोकाटे :

    त्यांना ' जे न देखे रवी ते देखे कवी" चा अर्थ समजाऊन सांगा नाहीतर
    माझी ऐक कविता पाठवतो ती त्यांना पाठवा.
    ******
    अ‍ॅड नरेंद्र डाकोरकर :
    गंगाधरजी, मला वाटत ते तथाकथित कवी कविच नसावे। मला अशांना प्रत्यक्ष भेटायला आवडेल।
    सूर्याला सिमा आहेत ।कविला नाही त्याच्या दृष्टिला नाही।

    *******
    संतोष सपकाळ :
    गंगाधरजी कविता आवडली

    *****
    दर्शन शहा :

    Mute ji tumchi kavita hi mala tar awadli bau ata hi kavita aahe asech mala vatata ani konala kai vatata ha jyachya tyacha buddhi cha prashna
    ******
    गजानन बोरोकार :

    गंगाधरजी मनतलं लेखनीतून व्यक्त होते ते कुणाला आवडो ना आवडो....वांदा नाही....सर लिहतच राहा. मला आवडते आपले साहित्त्य -गजानन
    ॒*******

    संतोष डुकरे :

    मुटे साहेब बुरसटलेल्या मेंदुंचं फार मनावर घेवू नका...

    अशी येडी जत्रा शहाणी करत बसायचं म्हटलं तर आपल्या ७ पिढ्या जातील आणि आठव्या पिढीलाही ही टाळकी परत तोच प्रश्न विचारतील.

    त्याला सांगा म्हणावं तुला समजली नाही कविता म्हणजे ती तुझ्यासाठी नाही. रामराम

    *********
    सुजय कुमठेकर :

    मला कविते बद्दल जास्त काही माहित नाही पन एक कविला त्याचे शब्द कोणत्याही शब्दचि तडजोड न करता रुदयतील आतंरभाव अलगत मंडता येतात तो खरा कवी आणि आपल्या कवितेत ही गोष्ट जाणवते। कविता सुन्दर आहे आणि वस्तववादि आहे.

    शेवटी सत्य,वास्तव आणि इतिहास कितीही कटु आणि अविश्वसनीय असला तरी तो अंतर मनाने नकारता येत नाही। आणि जेव्हा नाकारण्याची भावना निर्माण होते त्यावेळी पळ पुटया विचारांचा जन्म होतो। आणि अविचार रेटण्याचा उद्योग सुरु होतो अगदी त्याचेच हे उदहारण असावे.
    *******

    सदू पाटील :

    गंगाधर जी कविता शान आहे मला खुप आवडली हि कविता मणजे कविला पडलेल एक सपन आहे आणी सपनात कलपना असतातच.
    *******
    समाधान दमधर :

    मुटे सर
    छान कविता आहे
    उदाहराने केंव्हा ची आहेत यापेक्षा कशी स्फुर्ती दायक आहेत हे महत्वाचे
    व अश्या घटनांमूले कवी कसा पेटून उठतो हे दर्शविले आहे.
    ****
    हेमंत वकारे :

    गंगाधर.....
    तुझ्या कविता सरळ मनाला जाऊन भिडतात..
    तुझ्या कवितेसाठी समजण्यासाठी खरे निरपेक्ष मन हवे असते.....
    एवढ्या बाळबोध कविता समजत नसेल तर तो त्याच्या चष्चातुन बघतो हे ञिकालीत बाध्य सत्य आहे...
    तुझ्या कविता दुस-या अनेक ग्रुप वरुन येतात यावरच तुझ्या कविता सर्व सामान्यांना कळतात हे घोतक आहे ...
    तु असल्या कोणाचीही चिंता करु नये असे मला वाटते.
    तुझ्या सोबत आम्ही सदैव आहे व राहु यावर तु विश्सास ठेव ...
    ******
    - रामचंद्र इकारे, बार्शी

    साहित्य निर्मिती वेळी 'स्वानंद' हा हेतू असेल तर आपलं साहित्य समिक्षणात अडकवू नये

    ******
    करण पाटील :

    Aadarniya Gangadhar kaka,
    Walt Disney kuthlya cartoonist school madhe shikla nahi, pan jagatle saglyat bhavya cartoon character tyane tayar kele, Steven Speilberg kuthlya film school la gela nahi, pan jagatle saglyat avismarniya chitrapat ya maushyane banavle, hi zali kala (art) chi goshta, ata bolu vidnyan vishayi (science) , Albert Einstein, Steve Jobs, Thomas Edison, Nicole Tesla, Dr. APJ Abdul Kalam, Shetkari Sanghatneche pranete Sharad Joshi, ani anek diggaj loka, he kay Masuchussets Institutebof Technology (Jagatli number 1 university ) che vidyarthi nahit, pan aplya kartutvane mothe zalele loka.

    Amhala abhimaan aahe kaka, ki tumhi tumche prayatna karat rahta, ani amhala jagruk thevta. Tumhala sampark kelele adarniya kavi he niyam palnare kavi vattat, n hadache kavi nhave. Gangadhar kaka, tumhas ek namra vinanti, tumhi khachu naye. Amhi sagle (atleast me tari) tumchya pathishi ahot :) *Nikola Tesla
    ********
    विवेक गोतमारे :

    Gangadhar Jee,tumchee lekhan tumchya nava sakat me forward kartoo nehemee in my school group,all appreciate it,what ever you write ,told them it is written by my farmer friend,...if you don't write & send to us,what I will forward to them,mazee collar tight kasee honar mag....hence Pls.write...bindast..
    Your name is famous now.
    *********
    इश्वर लिधुरे :

    Poetry is a spontenious overflow of powerfull feelings recollected in tranquility.....
    कविता योग्य / अयोग्य अस नसत मुळीच.....!!
    *******
    संदीप चिचाटे :

    muteji class.
    mazyya mate kavine khoop jast bandhan nasav.tyamule maryada yetat.kahi kavi swatla dalit kavi mhantat .kahi bal kavi kahi nisarg kavi.kavila chokatit bandhan mhanje tyachya bhavna vichar sankuchit karan hoy.pan maz vaiktik mat ahe.konala vait vatlyas sorry

    muteji.tumchi kavita wardhechya aamdar sahebla pathvli tyani like cha response kela
    *******
    शिवशंकर चिकटे :

    मुटे साब ह्या गोष्टी होत राहतात, कोणी कशा दृष्टीने पाहतो,..सर्वांचे वेगवेगळे दृष्टीकोन आहे...हाच नाही तुम्ही कोनता ही विषय काढा...अनुत्तरीच राहते.
    ********

  • विनिता's picture
    विनिता
    गुरू, 06/08/2015 - 16:45. वाजता प्रकाशित केले.

    कविता सुंदर आहेच, पण दुसर्‍याला कमी लेखण्याचा खोडसाळपणा करायची काही जणांची प्रवृत्तीच असते. त्याला आपण काय करणार?

    १) कविता अशी नसतेच.- मग कशी असते? आपण लिहून दाखवावी
    २) ही कविता वाचताना कालबाह्य व शिळी वाटते. - तुमचे नवीन, ताजे संदर्भ द्या
    ३) कवितेतील संदर्भ फ़ार जुने आहेत. इतके जुने संदर्भ नसावेत. - तसे तर मग चंद्र सूर्य हे कवींचे लाडके संदर्भ वगळून कविता लिहाव्या लागतील. ते तर अतिप्राचीन आहेत.
    ४) कविता वास्तवाला धरून नाही. - कविता नेहमी वास्तववादी असावी असे काही नाही.
    ५) रावणाला दहा तोंडे होती ही कल्पना असत्य असल्याने ते रुपक कवितेत यायलाच नको. - ते रुपकच आहे ना!
    ६) रावणाला दहा तोंडे होती हे कवीने सिद्ध करून दाखवावे अन्यथा अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये. - रावणाला दहा तोंडे नव्हती हे तुम्ही सिध्द करावे अन्यथा कवीच्या भावूक मनाला दुखवू नये.

    काय मुटे सर, कवी लोकांना असे सांगणारे बरेच असतात. लक्ष देवू नये.
    "कोणी तुम्हांला कमी लेखू लागले की समजावे, आपली प्रगती होते आहे."

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 06/08/2015 - 17:55. वाजता प्रकाशित केले.

    मायबोलीवरील प्रतिसाद

    राजीव मासरूळकर
    खूप आवडली पलंगतोड स्वप्नांची कविता .
    **********
    दिनेश
    मस्त तडका !
    **********
    UlhasBhide
    मुटेजी,
    नेहमीप्रमाणेच मस्त तडका.
    **********
    मंदार खरे
    सुंदर होउन राहिली....!!!
    **********
    रश्मी..
    अभिनंदन मुटेजी!! तुमच्या कविता खरोखर हृदयातुन उतरलेल्या असतात. ह्याला नागपूरीच काय कोल्हापुरी पण तडका म्हणता येईल असा झणझणीत आहे.

    अशी वर व्यक्त केलेली स्वप्ने खरी झाली तर मात्र आपल्यासारखे नशीबवान आपणच असु.
    **********
    जयनीत
    एक नंबर कडक सुंदरी आपल्या गांजाखेत गोळीबार मधली.

    मुटेजी खरंच जबरदस्त.
    **********
    डॉ.कैलास गायकवाड
    हा असला तडका मुटेजींच्या तोंडून ऐकायला अजूनच धमाल येते.

    बिपाशाले लुगडं आणि बोम्ली आठवली.
    **********
    भारती..
    अभिनंदन मुटेजी या खमंग तडकेबाज कवितेसाठी.
    *********************************************

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 29/10/2018 - 14:10. वाजता प्रकाशित केले.

    शेतकरी तितुका एक एक!