नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

विधिलिखित

संदीपकुमार's picture

नेहेमीप्रमाणे सकाळी ११ वाजता क्लिनिकला आलो. देवाजवळ अगरबत्ती लावली. इतक्यात रिसेप्शनीस्टने पेशंट आल्याचे कळविले. मी त्यांना आत पाठविण्यास सांगितले. साधारण ६० वर्षे वयाच्या काकू आत आल्या. चेहऱ्यावर थकवा स्पष्टपणे जाणवत होता.त्यांना मी यापूर्वीही बघितल्याचे जाणवत होते; परंतु ते स्मरत नव्हते.त्यांना आदराने बोलवून खुर्चीवर बसवले.त्यांनी त्यांची तक्रार सांगितली. मी त्यांना तपासून औषधे लिहून देण्यासाठी प्रिस्क्रिप्शन pad घेतले व नाव लिहिण्यापूर्वी अंदाज म्हणून विचारले, " आपण जोशी काकू नं?"
" होय, सौ. नंदा जोशी".(काल्पनिक नाव).
मी औषध लिहित असतांना त्या म्हणाल्या ,"आजकाल डॉक्टरांकडे जाण्याची हिम्मत होत नाही," अन् त्यांना अचानक रडू कोसळले.
मी पुरता गोंधळून गेलो. मला कळेनासे झाले. मी त्यांना आश्चर्याने कारण विचारले असता त्या म्हणाल्या," सुमारे सात महिन्यांपूर्वी माझा ३७ वर्षे वयाचा मुलगा नागपूरला एका रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान दगावला". हे ऐकून मला धक्काच बसला.
त्या सांगू लागल्या," पित्ताशयातील खड्याच्या शस्त्रक्रिये दरम्यान काहीतरी अडचण निर्माण झाली आणि सुमारे २ तासांनी डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले. शस्त्रक्रियेपूर्वी सगळं काही व्यवस्थित होतं. तो हसतच शस्त्रक्रिया कक्षात गेला आणि त्यानंतर हे असं झालं. त्याच्यामागे पत्नी व एक ११ वर्षांची मुलगी आहे. ह्या घटने नंतर ४ दिवसांनी यजमानांना अर्धांगवायूचा झटका आला." हे ऐकतांना माझ्याही डोळ्याच्या कडा नकळत पाणावल्या. मला आठवू लागले, साधारण वर्षभरापुर्वी तो त्याच्या मुलीला व पत्नीला माझ्याकडे तपासणीला घेवून आला होता.
मी त्यांना धीर दिला . त्याही डोळे पुसून म्हणाल्या, "तेव्हापासून मी माझे दुखणे अंगावर काढते आहे. शेवटी सुनबाई म्हणाली कि आता तुमच्या शिवाय आम्हाला कोण आहे, तुम्हालाही काही झालं तर आमचे कसे होणार? म्हणून मी आज तपासण्याकरिता आलेय. मला इतर डॉक्टरांकडे जायची भीती वाटते. तुम्ही मला माझ्या मुलासारखेच आहात. मी यापूर्वीही तुमच्याकडे येवून गेलीय. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. मला काही घाबरण्यासारखे तर नाही ना झाले डॉक्टर?" त्यांनी मनातली शंका उपस्थित केली.
मी त्यांना धीर देत म्हणालो, " तुम्हाला काळजी करण्यासारखे काहीच झाले नाही. आणि आता मी आहे ना! तेव्हा चिंता नको." त्यांच्याही जीवात जीव आला. त्यांना मी औषधे कशी घायची ते सांगितले व ३ दिवसांनी परत दाखविण्याचे सुचविले.काकू निघून गेल्या.
माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. त्यांनी माझ्यावर मुलासारखा विश्वास दाखविला त्याचे समाधान होते खरे; परंतु वैद्यक शास्त्रात एवढी प्रगती होऊनसुद्धा डॉक्टर देखील विधीलीखितापलीकडे जावू शकत नाही. नाही तर एखादी अशक्य वाटणारी शस्त्रक्रियासुद्धा प्रचंड यशस्वी होते. शेवटी अशा घटनांकडे 'डॉक्टरांचा हलगर्जीपणा' या व्याख्येखाली बघण्यात येते.
"ईश्वर आत्म्यास शांती देवो व कुटुंबास हिमतीने जगण्याचे बळ देवो , हिच प्रार्थना!"

संदीपकुमार
दि ३१ मार्च,२०१५

Share