Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



शेतकरी व राजकारणी

लेखनविभाग: 
वैचारिक लेख

अहोरात्र शेतीत राबणाऱ्या बळीराजाच्या माथी नेहमी निराशाच येते.कारण निवडणूक झाल्यावर पुन्हा पुढच्या निवडणुकीच्या प्रचारालाच येणारे राजकारणी जोपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार नाही तोपर्यंत भारत देश विकसित राष्ट्रांच्या यादीत गणला जाणार नाही.तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही थांबणार नाहीत.
लोकांकडून पैसे घेऊन प्रसंगी दुकानदाराकडून पाच ते दहा टक्‍क्‍यांनी शेकडा दराने बी बियाणे घेणाऱ्या शेतकऱ्यांना पाऊस न पडल्यामुळे जेव्हा दुबार पेरणीची वेळ येते तेव्हा ;त्याचा अनुभव एका खासदार,आमदार ला निवडणूक हरल्यानंतर आलेल्या अपयशाच्या अनुभवा पेक्षा सहस्र पटीने कितीतरी वरचढ असतो.

राष्ट्रपिता महात्मा गांधींनी ओरडून देशाला सांगितले की खेड्याकडे चला या महान व्यक्तिमत्वाने देशासाठी एवढे योगदान दिले.त्यांचा चलनाच्या प्रत्येक नोटीवर छायाचित्र असते.ते जेव्हा खेड्याकडे चला असे म्हणतात तेव्हा सर्वांनी गोष्टीवर विचार करायला हवा.
आज बहुतांशी शेतकरीवर्ग कर्जाच्या विळख्यात इतका अडकलेला आहे की त्याला सहज वाटून जाते कि या जन्मी तरी यातून सुटका होणे शक्य नाही.

प्रत्येक निवडणूक वेळी मग ती विधानसभा असो वा लोकसभा असो; एक खूप मोठे अमिष शेतकऱ्यांना दाखवलं जातं. ते म्हणजे कर्जमाफीच. चालू सरकारने आतापर्यंत जी कर्जमाफी ची व्याख्या केली किंवा त्या अनुषंगाने जी योजना राबवली ती आणखी कुणाला पूर्णपणे कळलेली नाही.मग कशा आत्महत्या थांबणार?

जेव्हा एखाद्या वयात आलेल्या मुलीच्या लग्नासाठी उपाययोजना करताना कितीतरी जणांनी समोर तिच्या शेतकरी बापाला माथा टेकावा लागतो रान गहाण ठेवावं लागतं घरदार गुरंढोरं सुद्धा प्रसंगी विक्रीस काढावी लागतात एवढं करूनही जेव्हा पूर्ण खर्च उभा करता येत नाही तेव्हा तो खचून जातो आणि मग शेतकऱ्याला फाशीचा दोर जवळचा वाटू लागतो. हे टाळण्यासाठी शेतकर्‍यांकडे सरकारने ध्यान देणे फार गरजेचे आहे अन्यथा हा देश कृषीप्रधान आहे हे फक्त कागदोपत्री वाचायला मिळेल .जर या देशाला खरोखरच विश्वगुरु समृद्ध व सुखी बनवायचे असेल तर शेतकरी व त्याची शेती टिकली पाहिजे तर आणि तरच अर्थव्यवस्था टिकेल व बळीराजा सुखी होईल

Share

प्रतिक्रिया