Jayashree nande
added a new picture
September 27, 2020 at 03:06pm
काव्यप्रकार- गीतलेखन
शीर्षक- आर आर बळीराजा,,,
आर आर बळीराजा
तु मोकलु नको धाय,
कसताना जिवापाड
जोमताना काळी माय,,,,1
कोपला निसर्ग राजा
परी सोडू नको आसं
नको सोडू संकटात
जगण्याचा निजध्यास,,,,,2
कोरोना आला,आली मंदी
कैक संकटाचे पाश
तुलाच करावा लागे
तुझ्या संकटांचा नाश,,,,3
अनुदाने येतीलही
येती कर्जाचे डोंगर
नाही सुटणार कधी
हातातला रे नांगर,,,,,4
लई पाहिले रे ज्ञानी
पण तूच रे सज्ञान
मातीत पेरून जीव
करी घामाचे सिंचन,,,,5
पॉझिटिव तूच खरा
साऱ्या जगाचा पोशिंदा
होऊ नको निराश तू
तुला तुझाच रे खांदा,,,,6
झुगारुनी दे अन्याय
स्वतःसाठी उभा रहा
रक्तातले पेटव निखारे
उत्कर्ष तुझा तूच पहा,,,,7
जयश्री नांदे