
|  नमस्कार !  बळीराजावर आपले स्वागत आहे. | 
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
जरी घट्ट माती, तिला नांगरा		पुन्हा ढेकळांची कुळवणी करा
जरा मोजक्या दे सारी पावसा 	धरेच्या कुशीला असो वाफसा
बियाणे असावे असे नंबरी 		पहायास यावेत घन अंबरी
चला रे चला राखणीला चला 		पहा पाखरांचा सुरु गलबला
भलरी
धीर धरून नांगर धरा करा नांगरणी, कुळवणी करा
जरा बरसू दे मिरगाच्या धरा चला गड्यांनो बियाणे पेरा
उन्हाचा मारा ! 	घामाच्या धारा ! 	राबतो गडी शेतकरी
भलं री दादा भलं री भलं गडी दादा भलं री .....१
नकोनकोसे तण वाढता कोळपायला जायचे आता
जपू पिकास जपू या शेता धरू जिद्दीने करी कोयता
काढून तण ! 		करू भांगलण !		धरू या मनी उभारी
भलं री दादा भलं री भलं गडी दादा भलं री.......२
किती थकले ढवळया सर्जा कष्ट फळाला आले रे राजा
बांधू मचाण शेतात माझ्या सुरु झाली पहा पाखरांची ये जा
रानपाखरा ! 		साऱ्या शिवारा ! 	हाका घालते जवारी
भलं री दादा भलं री भलं गडी दादा भलं री.........३
काढून मोती, भरारे पोती, जाऊ द्या गाड्या बाजारी //
सुखाची आशा, खुशीची भाषा, आनंदी राहू या सारी //
   							सौ . भाग्यश्री भालचंद्र कुलकर्णी 
 
      
    
      
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. 
    
 
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने