नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पंढरी
यंदाही नीघाली पाऊले
सारण्या पंढरीची वाट,
टाळ मृदंगाच्या तालात
सजवुनी मुखी अभंगांचा थाट.(1)
जायचे त्या सावळ्याकडे
परी फक्त आभार मानन्या,
आली ओल धरनीच्या कुशीत
आता ना करायच्या वीनवण्या.(2)
आजवर त्यालाच देऊन दोष
दुष्काळाच माथी फोडल खापर,
ना कोणी आता नीजनार उपाशी
प्रत्त्येकाला मीळेल कष्टाची भाकर.(3)
टाकु पाऊले नीस्वार्थपणे
गाऊ हरीरायाचे गुणगाण,
आता काही न मागता त्याला
देऊ करोनी आपल्या भक्तीची जाण.(4)
✍
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!