Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***-रेशनचा तांदूळ-

लेखनविभाग: 
कथा

-रेशनचा तांदूळ-

कोरोनाची महामारी आली अन लाईव्ह येऊन कारभाऱ्यानं २४ मार्च चा लॉक डाऊन डीक्लेर केला. ३० दिवसाचा अगदी कडकडित लॉक डाऊन....!
सारा देश ठप्प झाला, रेल्वे पटरी थांबली, महामंडळाच्या एस टी ची चाकं जाम झाली. कारखाने बंद पडले, दुकानांची शटर खाली आली. शहर खाली व्हायला सुरवात झाली, गावाकडची गर्दी वाढली....! चालू होती तेवढी फक्त शेती
कारभारी लाईव्ह येऊन जे जे सांगत होते ते ते आम्ही सर्व ऐकले. अगदी टाळ्या पासून ते थाळ्या पर्यंत. साहेब तुम्ही सांगितल्या प्रमाणे आम्ही दिवे ही पेटवले.
जसा जसा याचा परिणाम इतर व्यवसायावर होत गेला तसाच परिणाम शेतीच्या बाजार पेठेवर झाला, बाजार भावावर झाला. शेती मालाचे भाव खाली आले. शहर हॉटेल व्यवसाय बंद असल्यामुळे भाजीपाला शेतकऱ्याच्या बांधावरच सडला.
मग मात्र कारभाऱ्यानं पॅकेज जाहीर केलं.....!
कितीतरी कोटीचं...!
अश्या कठीण काळात जनतेले पोसायची जिम्मेदारी कारभाऱ्यानं घेतली अन कोणीच उपाशी रायणार नाही याची शास्वती दिली.....!
त्या दिवशी सकाळी सकाळीच दवंडी झाली.
हातात टमरेलचं त् दवंडी कानावर आली.
ऐकाऽऽऽ हो ऐकाऽऽऽऽ....
सर्व गावातील लोकांना सूचित करण्यात येते कि आज पासून कोरोना काळात सरकारनं विशेष पॅकेज अंतर्गत सर्व परमेट धारकांसाठी गहू तांदळाची फुकट वाटप सुरु केली आहे तरी आपापले परमेट घेऊन कंट्रोलच्या दुकानातून आपापले तांदूळ गहू घेऊन या होऽऽऽऽ.....!
टमरेल ठेवतो न ठेवतो त कंट्रोलच्या दुकानं मोहरं ही भल्ली मोठी रांग लागलेली लोकं वायरच्या थैल्या अन पोतड्या घेऊन लायनीत हजरच.
पहा बंर तुम्ही त् म्हणता सरकार काही करत नाही आपल्यासाठी, आता देऊन रायले का नाही फुकटचा तांदूळ. कंट्रोलच्या लायनीत उभे असलेले गोपाळशेठ बोलले....!
व्हाऽऽऽ व्हाऽऽऽऽ कमळाले मत देलं न तुम्ही मग तुमाले नवल असणारच, हणमंतराव सावकारानं लगेच प्रतिउत्तर दिलं.........!
गोपाळराव :- असणार म्हणजे काय सरकारच आमचं आहे....!
हणमंतराव :- काय उपकार नाय करून रायलं, जबाबदारी आहे त्यायची, का घरून तोडीच देऊन रायले, का पंज्या न नाही देल्ल का आजवर...?
गोपाळराव :- हा लय देल्ल तुमच्या पंज्या न त .... अम्च्यालोक कस्स आल नाही म्हणा........?
हणमंतराव :- मार त् पगार घेऊन रायले निराधाराचे अन कस्स देल नाही म्हणता .......? पोट्टे नोकरीवर असून बी त निराधाराच्या नावाखाली लुटून रायले सरकारले. कांग्रेसच्या काळातच त फायली झाल्या न तुमच्या.
गोपाळराव :- ह्म्म्म ..... जस काही याय्न यायच्याच घरातून देलं, अहो मोदी होता म्हणून तुमच्या आमच्या शेतकऱ्यायले सहा हजार रुपये तरी भेटून रायले कान्ग्रेस वाल्याय्न त ते बी नाय दिलं.
हणमंतराव :- हा हा देऊन रायले न, त्याले कुटाणे तेवढेच आहे, कधी आधार जुळतं त ठसे उमटत नाही, अन ठसे उमटले त् आधार जुळत नाही, अश्या ऑनलाईन योजना तुमच्या. अन सोयाबीन चालली तीन हजार रुपये.
गोपाळराव :- आता भाव का सरकारच्या हाती रायते, जसं पिकते त्यावर ठरते भाव अन् नाही परवडत तुम्हाले सोयाबीन त पेरता कश्याले दुसरं पेरानं काही
हणमंतराव :- हो हो पेरतो न आता, गांज्याच पेरतो, तुम्ही परमिशन त द्या म्हणा.....बी टी च्या कपाशीले परमिशन द्या म्हणा पहिले.
तेवढ्यात कंट्रोलच दुकान उघडलं.....
चला द्या परमिट, अन बसा एका रांगीत
ज्याच ज्याच नाव घेतो त्यायन या पुढं
अन रुमाल-फडकं बांधा तोंडाले
आम्हाले का कोरोना झाला राजेहो
एक एक परमिट रेशन दुकानदार हाती घेऊन त्याची ऑनलाईन नोंद करीत होता. दोन चार परमिट झाले अन नेट गेलं.
आटपा हो दुकानदार लय टाइम झाला, शेती जायचं आहे.
अहो त आता नेट का मह्या घरचं आहे का टावर नाही त्याले मी काय करू..?
ऑनलाईन झालेत सारे काम, काहीच घोळ रायला नाही आता, तुम्हाले किती तांदूळ दिला ते डायरेक्ट मोदिले दिसते. लय पारदर्शक झाला आहे कारभार. पयल्या सारखं नाही रायलं आता.
आल का नेट...?
नाही अजून
हणमंतराव :- मोदीनं लय अवघड करून ठेवलं हो आमच्या कांग्रेसच्या काळात भोंगळ पोट्ट्याले जरी पाटवलं तरी कंट्रोल मिळत होतं आता नेट पाहिजे ठसे पाहिजे अन काय त म्हणे पारदर्शक .....!
गोपाळराव :- हम्म मिळत होतं न तुमच्या काळात अर्ध कंट्रोल नेत्यायच्या घरात अन अर्ध दुकानदारायच्या, आपण नुसत्या होतो रिकाम्या पिशव्या घेऊन. आता सगळ रेकार्ड रायतं किती आले किती गेले, कुठं भ्रष्टाचारले वावच नाही रायला.
हणमंतराव :-कोणाले म्हणून रायले हो तुम्ही...? कोण्या नेत्याय्न अन काय खाल्लं...?
गोपाळराव :- काय खाल्लं...!
काय नाय खाल्लं ते विचारा गहू काय, तांदूळ काय, डाळ काय, तेल काय, अहो ढोरा-वासरायचा चारा कमी पडला तुम्हाले...!
चला आलं हो नेट , आणा थैल्या.....
अन रूमाल बांधा तोंडाले
हम्म हे पंधरा किलो तांदूळ, अन हे पंधरा किलो गहू
एवढेच..!
हो माणसी पाच किलो आहे
पण आम्ही चार मानसं अहो न घरात, पोराचं लगन झालं न आता
चार असायले काय करता ....... परमेट वर तीघायचेच नाव आहे त तीघायचच कंट्रोल मिळेल.
मग लिहा न चौथं नाव तुमच्याच हातांन
मह्या हातांन लिहून कसं चालन ऑनलाईन दिसलं पाहिजे ते.
द्या मग आता काय करता ..... पंधरा त पंधरा किलो एरी कोण खातं ते कंट्रोलचे गहू......
एका माघ एक परमिट ऑनलाईन नोंद करून दुकानदार कंट्रोल वाटप करत होता.
गर्दी कमी कमी होत होती......
सुभानराव पाटलाचा नंबर आला खरी पण पाटलाचे ठसे काही मशीनवर उमटत नव्हते, उमटणार तरी कसे रट्टे घट्टे पडलेले ते हात, कामात सारं आयुष्य गेलेलं . आता ते ठसे उमटत नाही यात त्यायचा काय दोष ...?
पाण्यानं हात धुतले, साबणानं हात धुतले पण काही केल्या ठसे काही उमटत नव्हते.
मग आता ...? कंट्रोल नाही भेटणार कि काय ...?
कस्सं भेटणार पाटील आपण पाहिले प्रयत्न करून पण नाही जमून रायलं अन तस नाही देता येत ऑनलाईन आहे सारं रेकार्ड.....
आता ठसे उमटत नाही त्याले मी काय करू.
हाच का तुमचा पारदर्शक कारभार...? मलेच नको तुमचं कंट्रोल, सकाळ पासून रांगेत थांबलेले पाटील आता तापले होते ..... सरकार काय पोसते आम्हाले, एके काळी बारा बलुतेदार पोसणारे आम्ही, खळ्यावर बलुते दारायची अशी रांग रायची तव्हा हातात येईल त्या मापानं आम्ही गहू ज्वारी भर भरून द्यायचो. अन आता आम्हाले सवय लावली तुम्ही रांगेत उभी राहायची. अहो मी त् म्हणतो बंद करायले पाहिजे हे फुकटच कंट्रोल, आयदी बनून रायले लोकं यानं, कामाच्या फास्या येऊन राय्ल्या, वावरात मजूर म्हणता मजूर भेटून नाही रायलं. दोन रुपये किलोचा गहू तांदूळ भेटल्यावर कोण येत हो तुमच्या शेतात कामावर..? अन आल तरी अडून रोज मागते हे..... काय नाय फालतू योजना आहे या सरकारच्या...... असं म्हणत तशीच रिकामी थैली घेऊन सुबणराव पाटील रिकाम्या हातांन घरी परतले.
“अवैध्य गहू तांदूळ घेऊन जाणारा रेशनचा ट्रक पोलिसांनी पकडला” दुसर्या दिवशी सकाळीच वर्तमान पत्रात छापून आलेली हि बातमी.
कसला आला पारदर्शक कारभार अन कसलं काय...!
सारा सावळा गोंधळ सुरु आहे...!
योजनाच्यां नावाखाली लुट सुरु आहे नुसती, योजनाच्या नावाखाली तिजोरी रिकामी करायची फक्त शासणाले.... पण आपल्या बोलण्याने थोडीच फरक पडणार आहे म्हणा......!
सलग पाच महिन्यापासून रेशनचा तांदूळ अन् गहू भेटत होता, घरात गोण्या भरल्या होत्या.
गल्लीतून आवाज आला.
ऐ$$$ का तांदूळ, गहू हरभरा,,,,,
एरवी घ्या..... एरंडी मोहरी, तागाचं बी म्हणणारा मामू आता गहू तांदूळ विकत घेत होता,
तांदूळ काय भाव घेऊन रायले हो मामू, सुमनबाई न विचारलं
मामू;- दस रुपये किलो,,,, कित्ते है ...?
सुमनबाई :- त्या दोन पोतड्या तांदळाच्या अन तेवढे कट्टा भर गहू
मामू:- द्या मग
सुमनबाई :- भाव जरा वाढवून द्या न
मामू:- और कित्ते बढाने के आजी...? हमको बी तो रोज-मजुरी मिलने को होना न वैसे भी बहोत तांदूळ गेहू आहे है ये कोरोनाके
सुमनबाई:- ते त् आहेच म्हणा, अन खातंच कोण ते कंट्रोलचा गहू, घरचेच गहू सरता सरेना.
घ्या मोजून,
मामूनं तराजू पारड काढलं अन किलो किलोंन तो तांदूळ अन गहू मोजू लागला.
मामू:- हम्म तांदूळ हो गये ऐंशी किलो अन हे गेहू छप्पन किलो
एक सो छत्तीस किलो भरले
तेरासो साठ रुपये हो गये तुमारे
सुमनबाई :-फक्त...!
मामू:-फक्त बोले तो अच्छा है न मावशी फुकट के तो मिल रहे हे कोरोना के वजह नहि तो ये बी कहा मिलते
अस्स करता करता मामुनं एक एक करता गावातून गहू तांदूळ जमा करता अख्खा टेम्पो भरला, काही आपल्या जवळच्या तराजू पारड्यानं मोजला त् काही गोदामच्याच काट्यावर...! आता तो त्याच्या परीनं कोणत्या तरी मार्केटला विकणार, दोन चार रुपये तो बी त कमावनारच होता.
मी म्हणतो एवढा उठाठेव कश्यासाठी म्हणायचा ......!
नुसती नावाले योजना, योजनेच्या नावाखाली फुकटचा तांदूळ – गहू, त्यात धान्य घ्यायला रांगाच्या रांगा, वाहतूक खर्च, हमाली, अन पुन्हा मिळालेला माल दारावर येणाऱ्या व्यापाऱ्याला विकायचा, तो त्याची गाडी आणणार त्याचा पेट्रोल पाण्याचा खर्च, हमाली वेगळीच. व्यापाऱ्याकडून पुन्हा हाच गहू तांदूळ विक्री प्रक्रियेत जाणार अन् कदाचित शासनालाच पुन्हा हमी हाच रेशनचा तांदूळ गहू खरेदी करावा लागणार. ते पण हमी भावाने. ...!
त्यापेक्षा याला काही पर्यायी मार्ग काढता आला असता तर....?
पण काही नाही योजना फक्त नावालाच,
अजून लुट काही थांबली नाही.....
भ्रष्टाचार काही केल्या थाबला नाही, कोरोना तर निमित्त झालं योजनेच्या नावाला, रेशनचा गहू तांदूळ खऱ्या गरजू लोकांपर्यंत कधी पोहचलाच नाही, गरीब, झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांकडे परमेट नाही म्हणून त्यांच्या चुलीवर रेशनचा भात कधी शिजलाच नाही, फक्त आपण नावालाच डिजिटल झालोय साहेब, खऱ्या गरजू लोकांचे हाताचे ठसे जुळणं कठीण झालेत त्यांच्या आधार कार्डशी.
साहेब आणि पुन्हा तुमच्या आत्मनिर्भर भारताच्या घोषणा....!
आता तुम्हाला कोण सांगणार कि या देशाचा शेतकरी पिढ्यान पिढ्या आत्मनिर्भरतेनेच जगतो आहे म्हणून. तो कधीच आत्मनिर्भर झाला आहे. बारा बलुतेदारी पोसणारी हि जात आहे. तो आजही स्वतः आत्मनिर्भर होऊन पोसतो आहे अख्ख्या देशाला. आणि कोरोना काळातही जीवाची पर्वा न करता शेतातला गहू, हरभरा, तांदूळ, दुध, डाळ-दाणा त्यानं पुरवलाच की पूर्ण देशाला. शेतातल्या बांधावरचा भाजीपाला त्यानं शहरवासीयांच्या दरवाजा पर्यंत नेला, पैस्यासाठी नाही तर शहरात राहणारा माझा भाऊ जगला पाहिजे म्हणून तो हे सारं करत होता. त्याला कोणती सुरक्षा होती...? कोणतं विमा संरक्षण होतं...? त्याचा जीवही गेला असता भाजीपाल्याच्या भावात बेभाव....! अन् तुमच्या दप्तरी झाली असती त्याच्या मृत्यूची नोंद....! आजवर शेतकरी आत्महत्तेची होत आली तसी.....!

Share

प्रतिक्रिया