नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कोरड्या डोळ्यात पाऊसओढ ...!
बेभारोसी मोसम
भरोसा याचा त्यावरी
निराशा शेवटी पदरी
घेतो शेतकरी ...!
वावराचा तुकडा
भाकरीचा तुकडा
तुकड्यात जगणे
जगतो शेतकरी ...!
याच्या हाती नव्हते
कधीच काही
आधी ही नाही
पुढे असेल असेही नाही ..!
उभ्या बाजारात नसतो
याला काहीच भाव
लुटावे याला कुणीही
जो जे ठरवील तो याचा भाव ....!
माळकरी हा, वारकरी हा
वाट चाले पंढरीची
पावले जरी वारीत
मनाने काळ्या मायेच्या सोबत ...!
नशिबात याच्या आहे
सदाचीच कुत्तरओढ
रिकाम्या आभाळी नजर
कोरड्या डोळ्यात पाऊसओढ ...!
पोशिंदा म्हणती याला
दुनियेचे भरितो हा पोट
दैना दैना तरी सदा याची
दाण्या वाचून रिकामे याचेच पोट ..!
- -अरुण वि.देशपांडे -पुणे.
-----------------------------------------
प्रतिक्रिया
रिकामे याचेच पोट
वास्तव!
हेमंत साळुंके
पाने