नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पारितोषिके,सन्मान मिळवण्याची अती आ’वड’ निर्माण झाली तर ती लेखनीला डोई’जड’ होण्याची शक्यता असते आणि मग पारितोषिके मिळविण्याच्या नादात लेखनीची धार बोथट होऊन तो ना ’धड’ लेखक उरतो ना ’धड’ कलाकार.
त्यापेक्षा कुठल्याही पारितोषिकाची अपेक्षा न बाळगता, अथवा त्यासाठी कुणाची चमचेगिरी वा पायधरणी न करता आपला स्वाभिमान आणि अभिव्यक्ती अभिजात राखून स्वमर्जिने मनाजोगे विहरणारे मा’कड’ अधिक बरे असते! नाही का?
* * * * *
सर्वात महागडे अन्नधान्य म्हणजे धान/तांदुळ/भात.
पण गरिबी भात उत्पादक शेतकऱ्याचा पिच्छा सोडायला तयार नाही.
आणि तरीही भारतीय सुशिक्षित, सुजान जनमानसाला "अन्नसुरक्षा" हवी आहे व ती सुद्धा कमीतकमी मोबदल्यात. ऐताखाऊंना एका रुपयात पाच-दहा किलो धान्य मिळाले तर हवेच आहे.
शेतकऱ्याच्या कमरेला धडुतं शिल्लक राहिलं काय, नाही राहिलं काय, पर्वा आहेच कुणाला? धान्याचे भाव जरासे जरी वाढले तरी "महागाई" वाढली म्हणून बोंबलायला मोकळे!
* * * * *
आयुष्यभर "दिवे" नाही लावू शकलो!
मग आजच भरमसाठ पणत्या लावून असा कोणता प्रकाश पडणार आहे?
आयुष्यभर "उजेड" नाही पाडू शकलो,
मग आजच भरमसाठ फ़टाके फ़ोडल्याने असा कोणता गगणभेदी उजेड पडणार आहे?
लक्ष्मीपुजनाचे विचारताय?
मग ऐका, आता माझ्या घरात असलेली लक्ष्मी "बॅंकेच्या मालकीची" आहे. तीची पूजा केली काय नाही काय, तिला तसाही काय फ़रक पडणार आहे?
तिचा "मालक" तिची पूजा करेलच की!
माझ्यावाचून लक्ष्मीचे अडले तरी काय?
"लक्ष्मीपूजन" करावेसे मलाही वाटते, पण;
माझे दैवत माझे श्रम आहे आणि
लक्ष्मीदेवीला "श्रमाच्या घामावर" किंवा
"घामाच्या श्रमावर" प्रसन्न व्हायची अॅलर्जी दिसतेय.
* * *
बळीला पाताळात गाडल्याचा आनंदोत्सव साजरा करणे म्हणजे दिवाळी!
वर्षभर शेतीला लुटून मिळवलेल्या "संचयाची" पूजा करणे म्हणजे दिवाळी!!
नव्या खातेवहीची औपचारीक पूजा करून नव्या दमाने शेतीला लुटायचा संकल्प म्हणजे दिवाळी!!!
शेतकर्याच्या कमरेला धडूतही शिल्लक राहाणार नाही, अशा सरकारी धोरणांची हिरिरीने अमलबजावणी म्हणजे दिवाळी!!!!
* * *
बळीराजाच्या डोक्यावर यंदा निसर्गानेच "फ़ुलझड्या" चेतवल्यात आणि
सरकार बळीराजाच्या बुडाखाली "फ़टाके" फ़ोडायला निघालंय.
* * *
तसं हे आमचं बारमाही गार्हाणं
खणखणीत नसते कधीच नशीबाचं नाणं
सरून गेल्या आशा
मरून गेल्या इच्छा
तरीही मात्र म्हणावेच लागते....
.
.
सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.......!!!!!!!!!!
* * * * *
श्रद्धा ही श्रद्धा असते
एकतर असते किंवा नसते
पण ती डोळस किंवा आंधळी
वगैरे कधीही नसते
* * * * *
कांदा घसरला पाहिजे?
रुपया मात्र वधारला पाहिजे??
व्वा रे पगारी अर्थतज्ज्ञांनो!
येनकेन प्रकारेन का,
शेतकरीच हारला पाहिजे???
* * * * *