![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बारावे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन पश्चिम महाराष्ट्र जयसिंगपूर येथे मोठ्या थाटामाटात पार पडले. ८ आणि ९ फेब्रुवारी या दोन दिवशीय शेतकरी साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळ्या विचारांची पेरणी ऐकावयास मिळाली. पहिल्या दिवशी सकाळच्या ग्रंथदिंडीपासून ते दुसऱ्या दिवशीच्या समारोपाच्यासत्रापर्यंत. अतिशय मनमुराद आनंद सर्व साहित्य रसिकांनी घेतला. पहिल्या दिवशी, खरंतर या शेतकरी साहित्य संमेलनाला बारा वर्षापासूची परंपरा आहे. परंपरे प्रमाणे सन्माननीय अतिथी मान्यवरांचं आलेल्या पाहुण्यांचं अतिशय हृदयपूर्वक मनःपूर्वक या ठिकाणी स्वागत आणि सत्कार सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
या जयसिंगपूर नगरीमध्ये अतिशय सुंदर वास्तूमध्ये नगरपालिकेच्या यड्रावकर सभागृहामध्ये आमच्या सर्वांच्या साक्षीने हा सोहळा पार पाडत असताना एक वेगळा अनुभव, एक वेगळी अनुभूती आम्हाला पाहायला मिळाली. माझ्यासारख्या दोन वर्षांपूर्वी या साहित्य चळवळीशी संलग्न असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना या आजच्या १२ व्या संमेलनामध्ये एक वेगळी अनुभूती, एक वेगळा विचार या ठिकाणी मिळाला. आमदार माजी मंत्री आ. संजय पाटील एड्रावकर यांच्या शैक्षणिक संस्थेच्या सहयोगाने हा दोन दिवशीय अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाचा सोहळा येथे संपन्न होत असताना दोन दिवसाच्या वेगवेगळ्या सत्रांमध्ये अनेक मान्यवरांकडून एक वेगळ्या विचारांची पेरणी, शेतकऱ्यांच्या संदर्भातील विषयाचे विश्लेषण अतिशय समर्पक भाषेत या ठिकाणी विचार आम्हाला ऐकायला मिळाले. आम्ही या ठिकाणी मनसोक्तपणे त्याचा आनंद घेतला.
आम्ही जरी चारशे किलोमीटरवरून आलेलो असलो तरी तिथे गेल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्याकडून आयोजकाकडून सन्मानजनक वागणूक मिळाली. आदरातिथ्य झालं. प्रत्येक गोष्ट अगदी स्टेशनवरुन उतरल्यापासून गाडीची व्यवस्था ते निवासापर्यंत अतिशय सुसंपन्नपणे आणि आदरपूर्वक करण्यात आली. घरचा सोहळा आहे असे मला पावलोपावली जाणवत होतं. निवासालयाचा विचार केला तर अतिशय रम्य ठिकाणी जिथे भगवंताचे वास्तव्य आहे, जिथे सर्व शांततामय वातावरण आहे, अशा वातावरणामध्ये सर्व लोकांनी आपुलकीने आमची तिथे राहण्याची व्यवस्था केली आणि इतक्या सुंदर वातावरणामध्ये असं वाटलं की इथं थांबूनच घ्यावं पण कार्यक्रमाचे नियोजन वेळेत असल्यामुळे आम्हाला त्यातून काही फोटोचे सेशन करून लागलेच आम्ही त्याच गाडीने परत जिथे मुख्य समारंभ आहे तिथे साहित्य संमेलन आहे तिथे आम्ही सर्व ज्येष्ठ लेखक, पत्रकार, कवी, गझलकार सर्व मंडळी एका वेगळ्या दिशेने त्या संमेलनापर्यंत पोहोचलो. तिथे सुद्धा आम्हाला अतिशय नम्रपणे या दोन दिवसाच्या वेगवेगळ्या सत्रांमध्ये कुठेही कुठल्याही गोष्टीची तीळमात्र कमतरता आम्हाला भासली नाही.
आम्हाला खात्री आहे की गेली बारा वर्षापासून आदरणीय आमचे कार्याध्यक्ष, कवी, गझलकार गंगाधरजी मुटे सर अहोरात्र प्रयत्न करून हे संमेलन कसे यशस्वी होईल याकरिता काटेकोरपणे आणि शिस्तप्रिय नियम लावून कदाचित काही लोकांना नव्या लोकांना शिस्तीचे अनुपालन होत नसेल पण त्यांनाही या निमित्ताने ही सवय लागली आणि माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्यांना सुद्धा शिस्त काय असावी आणि कशा प्रकारचे संमेलन असावं, याची अनुभूती आ. कार्याध्यक्ष गंगाधरजी मुटे सरांकडून मिळाले, याचा मनापासून अतिशय विनम्रपणे स्वीकार करतो, आदरही करतो.
पहिल्या दिवशी तर आपण शेतकऱ्यांच्या संदर्भात विषयासंदर्भात जे विचार ऐकलेत ते खरोखरच आम्हाला वेगळे वाटले. यापूर्वी असे परिसंवाद किंवा चर्चा आम्हाला कधी ऐकायला मिळाली नाही. पण नव्याने हा विचार आमच्यासमोर आला आणि आपणही या भविष्यकाळामध्ये काहीतरी सकस लिहू शकतो, चांगले विचारे मांडू शकतो हा विचार आमच्या मनात आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा वेगवेगळ्या सत्रामध्ये असताना आम्हाला संमेलनाचा अनुभव, विशेष दिव्यांग मुलांचा, ज्यांच्या आयुष्यामध्ये अंधार असताना सुद्धा एक वेगळी प्रेरणास्त्रोताची वाट, जगणं काय असतं ह्या विशेष कलाकाराच्या मार्फत आम्ही अनुभवला. एक वेगळी अनुभूती या ठिकाणी आम्हाला मिळाली, म्हणून हा एक वेगळा उपक्रम आदरणीय मुटे सरांनी राबवला.
त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीच्या दिवसभराच्या पूर्ण सत्रामध्ये वेगवेगळ्या मान्यवरांकडून वेगळ्या विचारांची प्रेरणे आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळाली. खरंतर जेव्हा जेव्हा आम्ही सभागृहाच्या बाहेर यायचं आणि जायचं, अतिशय विनम्रपणे तिथली सर्व कार्यकर्ते आदरपूर्वक सन्मानाने आम्हाला बोलत असत. आमचा पाहुणचार करत असत, भोजनाचा विषय असेल किंवा रात्री झोपण्याचा विषय असेल तर अगदी विनम्रपणे ही कार्यकर्ते करत होते. त्यामुळे असं वाटायचे की घरचा सोहळा आहे आणि प्रत्येक जण आपल्या एकमेकांना सुखदुःखाची पेरणी करून सांगत होते.
माझ्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांना दुसऱ्या दिवसाच्या गझलमुशायऱ्याची सूत्रसंचालनाची जबाबदारी मला मोठ्या विश्वासाने आयोजकांनी दिली. नामवंत गझलकारांच्या सोबत माझ्या पद्धतीने छान सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी माझ्यावर पडली. मी ती पार पाडली. मला असं वाटतं की, आदरणीय संयोजकांच्या शब्दाला मी उतरलो असेल की नाही मला माहीत नाही पण मी माझ्या ज्या पद्धतीने या ठिकाणी निवेदनाचे काम केले ते कदाचित आपल्या सर्वांना आवडलेलं असेलच, आणि ही सर्व विचारांची पेरणी, सन्मानाची पेरणी, गुणगौरवाची पेरणी आम्हा सर्वांना लाभली. अशा प्रकारे बारावे अ. भा. शेतकरी साहित्य संमेलनाचा या ठिकाणी समारोप झाला.
अतिशय दुःखी अंत करणाने आम्ही या ठिकाणा वरून निघत असताना असं वाटायचं की आणखी दोन-तीन दिवस संमेलन पुढे जावं आणि नवीन विचार, नव्या कविता, नवीन विचार आम्हाला ऐकायला मिळावा, पण शेवटी दिवसाची आणि वेळेची मर्यादा पाळून आपण पुन्हा नव्याने पुढील वर्षी भेटणारच आहोत, एक वेगळा अनुभव या ठिकाणी आम्हाला संमेलनात मिळाला म्हणून संयोजकाचे विशेषतः आदरणीय कार्याध्यक्ष गझलकार, कवी, श्री गंगाधरजी मुटे सरांना मी मनापासून धन्यवाद देतो.
नक्कीच आपण पुढच्या वर्षीही भेटत राहणार आहोतच..!