आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा. SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***
कार्यक्रमपत्रिका : दहावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
गंगाधर मुटे यांनी शनी, 24/12/2022 - 16:42 ह्यावेळी प्रकाशित केले.
आता तयार व्हावे | लढण्यास लेखणीने || रक्षण अबोलतेचे | करण्यास लेखणीने ||
जेव्हा चहूदिशांनी | वादळ विराट तेव्हा || द्यावे अभय दिव्याला | जळण्यास लेखणीने ||
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांचे सहयोगाने शेती अर्थ प्रबोधिनी द्वारा आयोजित
दहावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, गुरुकुंज मोझरी
दिनांक : २१ व २२ जानेवारी २०२३
स्थळ : राष्ट्रसंत सभागृह, अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम
ता. तिवसा जि. अमरावती
-=- कार्यक्रमपत्रिका -=-
कल्पनाविश्वात रमणार्या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला भेडसावणार्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषिजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून सेवाश्रमाच्या पावनभूमीत दोन दिवशीय दहावे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
: कार्यक्रमाची रुपरेषा :
शनिवार दिनांक २१ जानेवारी २०२३
सकाळी ०७.०० ते ०७.३० : ग्रंथ दिंडी
सकाळी ०८.३० ते ०९.०० : अग्रीम नोंदणी केलेल्या प्रतिनिधींना प्रवेश पास वितरण
सकाळी १०.०० ते दुपारी ०१.०० : उद्घाटन सत्र
मराठी गौरवगीत, दीपप्रज्वलन, शेतकरी नमनगीत, उद्घाटन आणि स्वागतसमारोह
संमेलनाध्यक्ष :मा. डॉ. किशोर सानप, ज्येष्ठ शेती व संतवाङ्मय अभ्यासक, साहित्यिक, समीक्षक
उदघाटक : मा. विलास शिंदे, शेती उद्योजक, सह्याद्री उद्योग समूह
प्रमुख अतिथी : मा. खा. डॉ. अनिल बोंडे, माजी कृषी मंत्री
विशेष अतिथी :मा. डॉ. रवींद्र शोभणे, कार्याध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ
विशेष अतिथी : मा. पुष्पराज गावंडे, वऱ्हाडी कादंबरीकार तथा म. रा. साहित्य आणि संस्कृती मंडळ सदस्य
सन्माननीय अतिथी : मा. सरोजताई काशीकर, ज्येष्ठ शेतकरी नेत्या प्रमुख उपस्थिती : मा. शंकरराव ढिकले, शेतकरी नेते विशेष उपस्थिती : मा. मंजिरी भोयर, सोशल मीडिया सम्राज्ञी स्वागताध्यक्ष : मा. जनार्दनपंत बोथे, सरचिटणीस, अ. भा. गुरुदेव सेवा मंडळ
कार्याध्यक्ष : मा. गंगाधर मुटे, संस्थापक अध्यक्ष, शेतकरी साहित्य चळवळ
आयोजक :मा. श्री. दिलीप भोयर, अध्यक्ष, आयोजन समिती
सूत्रसंचालन : डॉ. मनीषा रिठे, विभागीय अध्यक्ष, शेतकरी साहित्य चळवळ
मराठी मायभाषा गौरवगीत - नमो मायभाषा जयोस्तु मराठी
शेतकरी नमनगीत : अविरत अवनीवर जो घाम गळवतो, त्या देवाला मी नमन करितो
गीत : गंगाधर मुटे
हार्मोनियम : गणेश मुटे
तबला : गुरुराज राऊत
गायक : तेजू कोपरकर, विवेक मुटे
दुपारी ०१.०० ते ०२.३० : मध्यावकाश : प्रतिनिधी स्नेहभोजन
सत्र - २ : दुपारी ०२.३० ते ०४.०० : शेतकरी कवी संमेलन - भाग १
अध्यक्ष : मा. अॅड. वामनराव चटप, ज्येष्ठ शेतकरी नेते
प्रमुख अतिथी : मा. पुष्पाताई बोंडे, राष्ट्रीय अध्यक्ष, अ. भा. गुरुदेव सेवा मंडळ विशेष अतिथी : मा. लक्ष्मणराव गमे, सर्वाधिकारी, अ. भा. गुरुदेव सेवा मंडळ
सन्माननीय अतिथी : मा. ललित बहाळे, अध्यक्ष, शेतकरी संघटना
सन्माननीय उपस्थिती : श्री. माधवराव गावंडे, शेतकरी नेते
विशेष उपस्थिती : मा. भारत लाखे, शेतकरी कार्यकर्ते
सूत्रसंचालन : मा. जगदीश भगत, केंद्र समन्वयक, रेडिओ वर्धा 90.8 एफ एम
बळीराजाच्या आरतीने समारोप
=-=-=-=
आयोजन समिती
स्वागताध्यक्ष : श्री. जनार्दनपंत बोथे
आयोजक : श्री. दिलीप भोयर
कार्याध्यक्ष : श्री. गंगाधर मुटे
आयोजन समिती : श्री. दिलीप भोयर (अध्यक्ष), श्री. पुरुषोत्तम धोटे, डॉ. सुधाकर डेहनकर, डॉ. निळकंठराव यावलकर (अमरावती), श्री. जयंत बापट, श्री. इंदरचंद बैद, श्री. विक्रम फटींग, श्री किसनराव पावडे, श्री किसनराव ठाकरे, (यवतमाळ), श्री. शिवाजीराव शिंदे (नांदेड), श्री. अरविंद तायडे (अकोला), श्री. गुलाबसिंग रघुवंशी (धुळे), श्री. रमेश खांडेभराड (जालना), श्री. रामेश्वर अवचार (परभणी), श्री. निवृत्ती कर्डक (नाशिक), श्री. पंडीत बाजीराव आटाळे, श्री. दगडूजी शेळके (जळगाव)
नियोजन समिती : श्री. माधवराव गावंडे (अध्यक्ष), श्री. सुधाकर गायकी (अमरावती), श्री. राजेंद्र झोटींग श्री. देवराव धांदे, (यवतमाळ) श्री. मदन सोमवंशी (लातूर), श्री. सोपान संधान, श्री नजमोद्दीन शेख (नाशिक), श्री.सुभाषराव बोकडे, श्री.रवींद्र खोडे, श्री.गजाननराव इखार, श्री प्रभाकरराव झाडे, श्री.प्रकाशराव कोरेकर, श्री.मुकुंद खोडे, श्री.भारत लाखे, धनराज दारुणकर (वर्धा)
स्वागत समिती : श्री जगदीशनाना बोंडे (अध्यक्ष), श्री. नामदेवराव काकडे, श्री. राजेंद्र तेलंगे, श्री. नीतीन पु. देशमुख, श्री. दशरथ बोबडे (यवतमाळ), प्रा. कुशल मुडे (मुंबई), ऍड्. प्रकाशसिंह पाटील, (औरंगाबाद), श्री. माधव कंदे (लातूर) श्री.अरविंदराव बोरकर (वर्धा), श्री ललित जैस्वाल, श्री नंदकिशोर खेरडे (अमरावती), श्री. हेमंत चौधरी (नंदुरबार), श्री. प्रमोद तलमले, श्री.गुरुराज राऊत, (वर्धा)
व्यवस्थापन समिती : श्री. विजय विल्हेकर (अध्यक्ष), श्री. श्रीकांत पाटील पुजदेकर, श्री. सुधाकर थेटे (अमरावती), श्री दुर्वेश उमाटे (यवतमाळ), श्री. जगन्नाथराव काकडे (औरंगाबाद), श्री.दत्ता राऊत, श्री.धोंडबा गावंडे, श्री. सचिन डाफे, श्री. भाऊराव उमाटे, श्री.गजानन इटनकर, श्री. मुकेश धाडवे, श्री. अशोक कातोरे, श्री महादेव धरमुळ, श्री. सुरेश जयपूरकर, श्री. विनोद काळे (वर्धा)
सभागृह व्यवस्था समिती : श्री. गणेश मुटे (अध्यक्ष), श्री. अशोक दांडेकर, श्री.प्रविण पोहाणे, श्री. अक्षय मुटे, ऋतिक उमाटे, शुभम मुटे, शिवम मुटे, सुहास भोमले, कु. अश्विनी दांडेकर, कु. कीर्ती काळे, कु. श्रेया मुटे, कु. चंचल दारुणकर, क्षितिज काळे, आदित्य भोमले, आदित्य कोहळे, शुभम यादव, साहिल चौधरी, प्रकाश दांडेकर
स्वागत कक्ष समिती : श्री. सारंग दरणे (अध्यक्ष), श्री. संदीप अवघड, श्री.अरविंद राऊत, श्री. प्रवीण परमोरे, श्री. नरेश नरड, श्री. राजेश भोमले, श्री. सौरभ मुटे
=-=-=-=
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking) :
प्रतिनिधी सहभाग शुल्क : शुल्काची रक्कम इच्छेनुसार पण अनिवार्य
१० वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन गुरुकुंज मोझरी येथे
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ. शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे. त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा. SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***