नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
एक आणखी झाडावरती लटकून मेला काल
तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल
पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत
एसीमध्ये आखतोस तू सटरमफटरम बेत
तुला दावतो भकासबंजर तू बांधावरती चाल
खते, औषधी, बीज, मजुरी दसपट झाले भाव
वीज, किराणा, डिझेल, डॉक्टर लुटून नेती गाव
अन् तुला पाहिजे स्वस्तामध्ये शेतीमधला माल
शेतपिकाच्या निर्यातीला जगात आहे वाव
बरकत येऊ शकते हे तर तुलाही आहे ठाव
तरी खेळतोस तू शहाण्या का रे तिरपी चाल ?
आयातीवर सूट देऊनी गाडलास तू बळीराजा
म्हणून वाजतो दारापुढती अंत्यक्रियेचा वाजा
स्वदेशीचे ढोंगधतूरे; खातोस विदेशातली दाल
छल कपटाचा नाद सोडूनी भानावर ये आता
'अभय' जाहली जर भूमिकन्या, मरशील लाथा खाता
तुझी हुशारी, अक्कल तज्ज्ञा बेसुरी बेताल
- गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~
बुलडाणा : चार/एक/सोळा
~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~
भोकामध्ये घाल तुझे कागदी नियोजन - एबीपी माझावर वाजलेली, गाजलेली व नावाजलेली कविता मोहाडी, नाशिक येथील १ १ व्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात सादरीकरण
~~~~~~
फेसबुक VDO लिंक
~~~~~~~~~~~~~~~
By: एबीपी माझा वेब टीम | Saturday, 26 March 2016 1:10 PM
VIDEO: राजीव खांडेकर यांनी सादर केलेली कविता
~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रिया
तुझ्या कागदी नियोजनाला...
तुझ्या कागदी नियोजनाला... जबरदस्त आणि परखड काव्य
पाने