नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
देवी गीते
पहिल्या पंगतीला ,अंबा वाडीत आली भात ,
बालाजी काय बोल ,अंबा सुरेख तुझे हाथ .
दुसऱ्या पंगतीला ,अंबा वाडीत आली वडी,
बालाजी काय बोल ,अंबा हिरवी तुझी साडी .
तिसर्या पंगतीला ,अंबा वाडीत आली पोळी ,
बालाजी काय बोली ,अंबा हिरवी तुझी चोळी .
चवथ्या पंगतीला ,अंबा वाडीत आली वडा,
बालाजी काय बोली ,अंबा हिरवा तुझा चुडा .
पाचव्या पंगतीला ,अंबा वाडीत आली गूळ,
बालाजी काय बोल ,अंबा आवर तुझा झोळ.
सहाव्या पंगतीला ,अंबा वाडीत आली शाख (आमटी )
बालाजी काय बोल ,अंबा जेवण झाल झ्याक .
सातव्या पंगतीला ,अंबा वाडीत आली दुध ,
बालाजी काय बोल ,अंबा जेवण झाल शुद्द .
आठव्या पंगतीला ,अंबा वाडीत आली दही ,
बालाजी काय बोल ,अंबा जेवण झाल लई .
नवव्या पंगतीला ,अंबा वाडीत आली ताक,
बालाजी काय बोल,अंबा जेवण झाल झ्याक .
दहाव्या पंगतीला ,अंबा वाडीत आली कढी,
बालाजी काय बोल,अंबा आवर तुझी साडी .
अकराव्या पंगतीला ,अंबा वाडीत आली तूप ,
बालाजी काय बोल ,अंबा जेवण झाल खूप .
बाराव्या पंगतीला ,अंबा वाडीत आली लोणी,
बालाजी काय बोल ,हाथ धुवाय उन पाणी .
मालुबाई.