![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
किती दिवस हो रोज मरावे शेतकऱ्यांनी?
मरण्यापूर्वी किती जळावे शेतकऱ्यांनी?
म्हणून झाली पुष्कळ भजने,अभंग आता
गाणे यल्गाराचे गावे,शेतकऱ्यांनी...
नफा राहिला दूर,इथे तर खर्च निघेना
स्वप्न कसे डोळी पेरावे शेतकऱ्यांनी?
गहाण ठेवत,जगण्याला मरणाच्या दारी
तुम्हीच सांगा, कसे जगावे शेतकऱ्यांनी?
घाम पेरून,अमृत जर तो,पीक काढतो
विष तोट्याचे,का पचवावे शेतकऱ्यांनी?
भस्म्या तुमचा,शांत होईना,कसा शेठजी?
उपाशीच हो किती निजावे शेतकऱ्यांनी?
पुरे कायदे,पुरे वायदे,मन च्या बाता..
थापांना या किती फसावे शेतकऱ्यांनी?
खोड मोडण्या,राजकारणी व्यापाऱ्यांची
रणात सत्तेच्या उतरावे शेतकऱ्यांनी...!!
'माही' तू ही गझल लिहूनी,मांड समस्या
कसे नेमके,पुस,वागावे शेतकऱ्यांनी?
- महेश ज्ञानोबा होनमाने
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.