नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
"बांधावरती नांगर सोडुन, जर का मीही टाय बांधली असती...
तुझ्या घरीही रोटीसाठी साहेबा कळवंड लागली असती..."
शेतामध्ये बाप राबतो,म्हणून इतकी स्वस्त भाकरी मिळते...
व्यापाऱ्यांनी या घासाची एम आर पी किती ठेवली असती?
मलाच जर का अर्ध्यापोटी सुद्धा देता आला असता ढेकर...
माझ्यानंतर दोन घास मग बापासोबत माय जेवली असती...
डिजिटल भारत माझ्यासाठी डिजिटल अश्रू किती गाळतो आहे..?
डाऊनलोड ते झाले असते...तर मी माझी तूर भिजवली असती...
हमिभावाची रक्कम बघून, बापपणाचा वसा सोडला असता...
माय मानले नसते तर मी, या शेताला आग लावली असती..
- आत्तम गेंदे
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने