![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
none
आता तर ...
माझ्या चतकोर वावराशेजारीच
राहिलाय उभा एक कारखाना.....
सोडू लागलाय सुस्कारे
चिमणीतून
जागतिकीकरणाच्या वासाचे....
आणि डोक्यावरल्या मोकळ्या अवकाशात
वावरू लागलेत
पिंजारलेले काळे ढग
धमकावत फुफुसांना...
तशातच
डरकाळ्या राक्षशी आवाजच्या
कान-काळजाचे अस्तित्व
नाकारणाऱ्या.......
एव्हाना
काळवंडू लागलीत मुकी झाडे
आणि
बिथरू लागलीत पाखरंही
अंगाखांद्यावर खेळणारी....
आता तर ,
पोरगं माझंही
ओढलं गेलंय नव्या प्रवाहात-
ठरवत वेडगळ जुन्या पिढीला....
रावसाहेब खं. जाधव
८६६८३६२६११