नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
दि. ३०/०७/२०२२
९ वे अ. भा. मराठी शेतकरी Online साहित्य संमेलन
नमस्कार मंडळी,
आयोजन समितीने ठरविल्याप्रमाणे यंदापासून दरवर्षी आपण दोन अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन घेणार आहोत. पैकी एक साहित्य संमेलन असेल आणि एक Online साहित्य संमेलन असणार आहे. त्यानुसार युगात्मा शरद जोशी जयंती निमित्ताचे औचित्य साधून दि. ०३/०९/२०२२ ते ०९/०९/२०२२ या कालावधीत ७ दिवशीय Online साहित्य संमेलन आयोजित केले जाणार आहे.
प्रारूप व नियोजन आराखडा
१) सहभागी प्रतिनिधी अग्रीम नोंदणी - दि. ६ ते १० ऑगष्ट २०२२
२) ११ ऑगष्ट २०२२ - कार्यक्रमपत्रिका जाहीर करणे.
३) Online साहित्य संमेलन असल्याने सहभागींना Zoom वापरता येणे बंधनकारक आहे.
४) आठव्या व नवव्या साहित्य संमेलनाची ज्यांनी प्रतिनिधी नोंदणी केली आहे त्यांना नव्याने नोंदणी करणे आवश्यक नाही पण आपली उपलब्धता कळवण्यासाठी जुजबी नोंदणी करणे आवश्यक असेल.
५) संमेलनात सहभाग नोंदवू इच्छिणाऱ्या साहित्यिकांना नोंदणी करणे अनिवार्य असेल.
६) प्रतिनिधी अग्रीम नोंदणी संदर्भात लवकरच विस्तृत पोस्ट http://yugatma.sharadjoshi.in/ या संकेतस्थळावर प्रकाशित केली जाईल.
कृपया नोंद घ्यावी.
आपल्या सूचना आमंत्रित आहेत.