![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आनंदसरी
आला मृगाचा पाऊस
बघा धरणी हासली
माना डोलाविती झाडे
जशी मैफिल सजली
पाना फुलांवरी थेंब
जणू माणिक मोतीच
गुरेढोरे आनंदली
रूप पाहून मातीचं
येई मातीचा सुगंध
मज चंदनाच्या परी
मनी हिरवं सपन
देवा फुलदे शिवारी
नावा सोडिती लेकरे
झाला अंगणी चिखल
नववधू चिंब न्हाली
अंग धन्याचं माखलं
पोट नदीचे फुगले
नाले भरुनी वाहती
घरांवरती पत्र्यांच्या
ढोल ताशेही वाजती
सुरू आनंद सोहळा
मिळो कष्टाला पुण्याई
पावसाच्या थेंबातून
रूप पंढरीचे येई
घाम रक्ताचं बियाणं
बळी पेरतो मातीत
खरा पाऊस कळतो
शेतकऱ्याच्या जातीत
होऊ देजो आबादानी
इच्छा एकची या उरी
फास लागोना कुणाला
येवो आनंदाच्या सरी
••••
©अनिकेत जयंतराव देशमुख (पाऊलखुणाकार कवी, निवेदक)
रा- गोपालखेड , पो- गांधीग्राम ,
ता. जि. अकोला 444006
mo-9689634332
©Copyright - Aniket J. Deshmukh
Email Id :-
anudesh25488@gmail.com
प्रतिक्रिया
व्वा!
येओ आनंदाच्या सरी. फारच छान.
Dr. Ravipal Bharshankar
खुपच छान अनिकेत.
खुपच छान अनिकेत.
आनंदाच्या सर्वे
खरा पाऊस कळतो ! शेतकऱ्याच्या जातीत! बरोबर अनिकेत !पावसाची किंमत कळते ते शेतकऱ्याच
अतिशय सुंदर रचना ! मन:पुर्वक शुभेच्छा
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने