नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*धर्मापेक्षा माणसं प्यारी.*
कोरोना तुझ्या पावरला
मी मनापासुन माणले,
हवेत वावरणाऱ्यालाही
तू जमिनीवर आणले........//धृ//
तेहतीस कोटी देवाला
तुझ्यापुढे झुकवीलास,
माणसातील खरा देव
जगाला तू दाखविलास ,
जाती धर्माची माणसं
एकतेच्या माळेत विणले.
कोरोना तुझ्या पावरला
मी मनापासुन माणले,
हवेत वावरणाऱ्यालाही
तू जमिनीवर आणले. .........//१//
न बोलणारे बापलेक
लागले घरात बोलायला
सुने सोबत सासूबाई
लागल्या लसूण सोलायला
उसवलेल्य नात्यांनाही
तू एकाच धाग्यात तुणले,
कोरोना तुझ्या पावरला
मी मनापासुन माणले,
हवेत वावरणाऱ्याला ही
तू जमिनीवरआणले. ..........//२//
तळीरामाच्या नाकात
घातलास तू वेसन,
आवडू लागली घरातील
चटणी भाकर बेसन,
दारू हे विष आहे
त्याच्या काळजला भिणले,
कोरोना तुझ्या पावरला
मी मनापासुन माणले,
हवेत वावरणाऱ्यालाही
तू जमिनीवर आणले..........//३//
गुरगुरणाऱ्या वाघांनाही
केलेस पिंजऱ्यात बंद,
मोकार माकडांचे
केलेस ढोपर लालबुंद,
सासूचा जाच सोसताना
नाही कोणीही कणले,
कोरोना तुझ्या पावरला
मी मनापासुन माणले,
हवेत वावरणाऱ्यालाही
तू जमिनीवर आणले..........//३//
पैस्यामागे पळणारे
बिळात दडून बसले,
चोचीमध्ये चारा भरवीत
शेतकऱ्यांनी पिल्ले पोसले,
अन्न देणारे शेतकरीच
देशाचे खरे हिरो बनले.
कोरोना तुझ्या पावरला
मी मनापासुन माणले,
हवेत वावरणाऱ्यालाही
तू जमिनीवर आणले ........,//४//
कोरोना तू दाखवली
माणसाला खरी जागा,
जातीभेद विसरून माणसानो
आता माणसासारखे वागा,
धर्मापेक्षा माणसे प्यारी
हे माणसाने आता जाणले,
कोरोना तुझ्या पावरला
मी मनापासुन माणले,
हवेत वावरणाऱ्यालाही
तू जमिनीवर आणले.........//५//
कवी
बा.सो.कांबळे
पंचशील नगर परळी वै जि.बीड.431515
मो.नंबर--9860806747.
Email-kamblebalaji1978@mail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने