नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
साय धरतीच्या दूधाची, जशी पिकात वसते ;
शालू नेसून फाटका, माय राब राबत सजते .
कोरडी धरणे ओसाडले नद्या ओहळ न झरे ;
वात्सल्य आईचे तेव्हा ते दूध होऊन पाझरे .
अशी माऊलीची माया जणू पीठ होऊन गळते;
भूक मिटवाया लेकरांची, आयुष्य जात्यात दळते.
वैशाखी गुलमोहर जणू तिच्या श्वासातून फुलतो;
कोवळ्या कोंबाच्या सावलीसाठी जीव धरतीचा जळतो.
माय वडाची सावली, अन् माय डोंगरा एवढी;
ज्यांची नसते जगात, त्यांची दैना आभाळा एवढी.
किरण शिवहर डोंगरदिवे, समता नगर, वॉर्ड न 5, मेहकर ता मेहकर, जि बुलढाणा पिन 443301 मोबा 75885
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!