Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



अन्नदात्या संस्कृतीचा महानायक : बळीराजा

लेखनविभाग: 
ललितलेख
लेखनाचा विषय: 
शेतकऱ्याचा राजा बळीराजा
अन्नदात्या संस्कृतीचा महानायक : बळीराजा
 
बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा असे मानतात. त्यामुळे आजही शेतकऱ्याला बळीराजा असे म्हटले जाते. पुराणकथेनुसार बळी हा राजा सप्तचिरंजीवी, प्रख्यात विष्णूभक्त आणि उत्कृष्ट योद्धा होता. असुरराज बळी सर्व युद्धतंत्रात निपुण होता. सुमारे साडेतीन ते पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महासम्राट आणि एक महातत्ववेत्ता ! बळीराजाच्या पूर्वजांनी केलेल्या उत्तम शेतीमुळे पिकलेल्या धान्याने सिंधू संस्कृतीमधील धान्याची कोठारे भरली होती. बळीराजांनीही आपल्या पूर्वजांच्या अनुसरण करत त्यांच्यापेक्षा अधिक कौशल्याने पेरणी सुरू केली. पेरणी धान्याची होती, पेरणी संस्कृतीची होती, पेरणी जीवनमूल्यांची होती, पेरणी जगण्याच्या कलेची होती, पेरणी रक्तमांसाची होती आणि माणसासाठी नव्या नव्या स्वप्नांची होती. बळीराजा हा एक कर्तृत्ववान आदर्श राजा होता. ज्याने आपले राज्य प्रजेच्या हिता सुखासाठी समर्पित केले होते. आपल्या राज्यातील प्रजेचा विकास आणि संरक्षणांकडे त्याने आधीच लक्ष दिले. हे करत असताना त्यांनी कोणताही वर्ण, जात, धर्म व पंथ पाहिला नाही. न्याय करताना कधीही भेदभाव केला नाही म्हणूनच बळीराजा हा उदारमतवादी, मोठ्या मनाचा, शूर, पराक्रमी, अनेक गुणसंपन्न, बलवान, मितभाषी, शत्रू, आर्य ब्राह्मणांना रणांगणात पाठ न दाखवणारा, योग्य काळाची वाट पाहणारा, सत्यशील, सर्वांविषयी सावध असा महान राजा होता. बळीराजा हा शेतकऱ्यांवरती आर्यां द्वारे कुठे अन्याय, अत्याचार घडत असतील तर लगेच तो शत्रू आर्यास कठोर शासन करीत असे. बळीराजा हा गोरगरिबांना न्याय हक्क देणारा होता. बळीराजाच्या काळात शेतकरी अतिशय सुखी व संपन्न होता. शेतकऱ्यांना शेती विषयक सर्व ज्ञान असल्यामुळे त्यांची शेती समृद्ध होती. प्रजा सुखी समाधानी व कर्तबगार होती. कुठलाच अधर्म नव्हता. शोषण विरहित समाजरचना हे बळीराजाचे खास वैशिष्ट्य होते. स्त्री पुरुष आपापल्या कुवतीनुसार आणि कौशल्यानुसार राज्याच्या सर्वच वैभवात भर टाकत असतात. अत्यंत सुरेख आणि समृद्ध अशी नगरे सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी वसवली होती. तसेच स्वतःची समृद्ध नगरे होती. याचा अर्थ त्यांचे जीवन अत्यंत समृद्ध आणि संपन्न, विकसित असे होते. दसऱ्याच्या दिवशी या पराक्रमी बळीराजाला कपटाने मारण्यात आले. वामनाने व त्याच्या सैन्याने त्या दिवशी बळीच्या प्रजेला प्रचंड लुटले. सोने, चांदी, धनधान्य सर्वस्व लुटले. प्रजा हताश झाली. त्यावेळी बळीच्या शूर मुलाने बाणासुराने प्रजेला धीर देताना सांगितले की आपल्या राजा मेला नाही तो आपल्याला २१ दिवसांनी भेटायला येणार आहे. दसऱ्यानंतर २१वा दिवस म्हणजे प्रतीप्रदा. केरळमध्ये ओणम नावाचा सण साजरा केला जातो.
 
या दिवशी बळीराजा आपल्या दुःखी व कष्टी प्रजेला भेटायला येतो .प्रजा आपले सर्व दुःख बाजूला ठेवून आनंदाने आपल्या राजाचे स्वागत करते. नवे कपडे, मिठाई, फटाके, रोषणाई अशा जल्लोषात बळीराजाचे स्वागत होत असते. प्रजा सुखी आहे हे पाहून तो आनंदाने परत जातो अशी समजूत आहे. बळी पाताळात गेला याचा अर्थ त्यांनी केरळ राज्य स्थापन केले असावे असे अभ्यासकांचे मत आढळते. कन्याकुमारीच्या दक्षिणेला समुद्रात गेलेल्या एका भूशिरावर त्याची राजधानी होती असे उल्लेख तमिळ वाड्.मयात आढळतात त्रिविक्रम वामनाने बळीला पातळात ढकलले या विषयावरची देखील अनेक शिल्पे दक्षिणेत आढळतात. या दिवशी तांदळांनी बळीची आकृती काढून त्याचे पंचरंगी चित्र काढून पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करण्याचाही प्रघात आहे. घराघरात बलिपूजन केले जाते. म्हणूनच दिवाळीतील महत्वपूर्ण दिवस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो.
 
या दिवशी माता बहिणी घरातील पुरुषांना ओवाळतात. ग्रामीण भागात बहिणी भावाला ओवाळताना 'इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो' असे म्हणतात. खंडोबा, म्हसोबा, मल्हार, मार्तंड हे बळीराजाच्या मंत्रिमंडळातील कार्यक्षम मंत्री होते असे मानतात. बळीराजाचे राज्य नऊ खंडी होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला खंडोबा म्हणतात . आज प्रत्येक राज्याच्या प्रमुखाला मुख्यमंत्री म्हटले जाते. त्यावेळी खंडात छोटे छोटे सुभे असायचे. अनेक सुभे मिळून एक महासुभा होता. महासुभ्याचा प्रमुख महासुभेदार म्हणजे म्हसोबा होय. त्याप्रमाणे जिल्ह्याचा प्रमुख जोतिबा मल्हार व मार्तंड हे सुरक्षा अधिकारी होते. बलिप्रतिपदेला केवळ बळीराजाचीच पूजा होते असे नाही तर त्याच्या या मंत्री व अधिकाऱ्यांचीही पूजा होते. यावरून बळीच्या राज्यातील प्रजा किती सुखी व संपन्न होती हे लक्षात येईल .सुखी व संपन्न राज्यावर नेहमी परकीय आक्रमक वाईट नजर ठेवत असत. बाहेरून आलेल्या परक्यांनी कपटाने बळीराजाला ठार मारले व राज्य बळकवले .युद्धात जिंकता येत नाही म्हणून आर्यांच्या सेनापती असलेल्या वामनाने बळीराजाला कपटाने मारले असे म्हटले जाते.
 
असुरराज बळी महाबलवान होता पण तो विष्णूभक्तही होता. त्याने देवांना जिंकले व तो स्वर्गावर राज्य करू लागला. देव विष्णूकडे गेले. विष्णूने कश्यप ऋषींची पत्नी अदितीच्या पोटी जन्म घेतला. ते जन्मतः बुटके होते म्हणून त्यांचे नाव वामन ठेवले. त्यावेळी शुक्राचार्यांच्या सल्ल्याने बली अश्वमेघ यज्ञ करत होता व शंभराव्या यज्ञाच्या तयारीत होता. इतक्यात वामन बटूवेषाने त्याच्या यज्ञात प्रविष्ट झाला व "मला भूमि दे" असे म्हणू लागला." किती देऊ तेव्हा तीन पावले इतकी पुरे असे म्हणायला त्याचे खरे रूप ओळखले व बळीला नकार देण्यास सांगितले पण बळी यज्ञ दिक्षा घेतलेली असल्याने नाकारू शकत नव्हता. तो दानाचे उदक वामनाच्या हातावर सोडण्यास सिद्ध झाला. त्याला अडवण्यासाठी शुक्र सूक्ष्मरूपाने झारी मध्ये गेले पण बळीने झारीत काडी घातली व झारीचे तोंड मोकळे केले. काडी लागून शुक्राचार्यांचा डोळा फुटला व ते एकाक्ष झाले. रागाने ते बाहेर निघून गेले. दानोदक वामनाच्या हातावर पडताच वामनाने प्रचंड आकार धारण करून दोनच पावलांत स्वर्ग मृत्यू पाताळ व्यापले व आता तिसरे पाऊल कुठे ठेवू म्हणून विचारले. बळीने नमस्कार करत
 
मस्तकावर ठेवण्यास सांगितले. वामनाने बळीच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला सुतल नावाच्या पाताळात नेले. त्याला तेथील राज्य देऊन आपल्या आपण त्याच्या दारावर पहारेकरी म्हणून राहिला. देवांना पुन्हा स्वर्गाचे राज्य मिळाले.
 
ज्याप्रमाणे वामनाने कपटाने बळीला हरवले आणि ठार मारले त्याप्रमाणे आजही बहुजनांच्या हिताची प्रत्येक गोष्ट गाडून टाकण्यात आली. बळीराजा असलेल्या शेतकऱ्याला आज आत्महत्या करावी लागत आहे. रात्रंदिवस शिवारात काम करूनही कर्जबाजारी झालेला बळीराजा हताश होऊन स्वतःच्या गळ्यात फास टाकत जीवाचे बलिदान करत आहे. इतिहासातील बळीराजा आक्रमकांविरोधी लढता लढता मेला. आजचा बळीराजा लढण्याऐवजी मरणे पसंत करत आहे. सुरुवातीलाच तो पराभव पत्करत आहे. त्याच्या कष्टाची जाण नसलेला समाज मात्र ताठ मानेने जगत आहे, समाजात स्वाभिमानाने वावरत आहे. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांनी बळीराजाचे जे प्रतीक दिले आहे त्याच्या मुळाशी सांस्कृतिक संघर्षाची पार्श्वभूमी आहे. या दृष्टिकोनातून बळीराजाचा अभ्यास अजून व्हायचा आहे. वामनाच्या या तीन पावलांचा तार्किक अर्थ असा की पहिल्या पावलाने विशिष्ट भूप्रदेशातील लोकांना यज्ञाच्या कर्मकांडात गुंतवून टाकले, दुसरे पाऊल वेदाप्रमाणे होते. लोकांनी वेदांवर विश्वास ठेवावा आणि आपली बुद्धी स्वतंत्रपणे मुळीच वापरू नये असा या पावलाचा अर्थ होता. तिसरे पाऊल बहुजनांच्या वाकशक्तीला कुंठित करून टाकणारे होते म्हणजे वाणी वापरण्याचा खराखुरा अधिकार ठराविक लोकांनाच असेल आणि इतरांना लिहिणे वाचणे बोलणे याबाबतीत स्वतंत्रता राहता कामा नये असा कठोर नियम करण्यात आला. तात्पर्य यज्ञाने भूमी व्यापणे, वेद ब्राह्मण यांनी लोकांना गुलाम करणे आणि वाणीवर एकाधिकार प्रस्थापित करणे हा वामनाच्या तीन पावलांचा खरा अर्थ आहे. महात्मा फुले यांनी दस्यूचा पोवाडा म्हणून जो पोवाडा दिला आहे त्याच्या तिसऱ्या कडव्याची सुरुवातच त्यांनी "बळी राज्यादी कुळस्वामीला" या शब्दांनी केली आहे.
 
बळीराजा संदर्भातील असुर वंशातील बळीराजा याच्या शेतकऱ्यांच्या बळीराजाशी काही संबंध नाही. भगवान श्रीकृष्णाचे बंधू आणि शेषाचे अवतार मानले गेलेले बलराम हे शेतकऱ्यांचे बळीराजा होते अशी देखील मान्यता आहे. एका हातात गदा किंवा मुसळ तर दुसऱ्या हातात किंवा खांद्यावर नांगर दिसतो. मुसळ आणि नांगर शेतकऱ्याचे प्रतीक आहे. ती दोन्ही रामांच्या हातात आहेत. बळीराम, बल,बली, संकर्षण अशी नवीन विविध नावे देखील वापरण्यात आली. याशिवाय भगवान श्रीकृष्णांनी बसवलेल्या द्वारकानगरीचे सम्राटपद बलरामांकडे होते म्हणून त्यांना बळीराजा असे म्हटले जाते.
 
सौ. भारती दिलीप सावंत
खारघर, नवी मुंबई
 
9653445835
 
Share