पुस्तक समीक्षण
पुस्तकाचे नाव: बळीवंश
वाचनप्रकार:कादंबरी
किमंत:४४०₹
लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे
(संस्कृतचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ इतिहास संशोधक)
डॉ आ.ह.साळूंखे यांनी अतिशय सखोलपणे पाच हजार वर्षापूर्वीच्या इतिहासाची उकल यातून केली आहे.
"इडा पिडा टाळूया ! बळीचे राज्य आणूया"
बळी! सात काळजांच्या आत जपून ठेवावा, असा निरागस 'माणूस'! आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला कष्टाचे व हक्काचे फळ सम प्रमाणात विभागून देणारा संविभागी नेता!!
बळी-हिरण्यकश्यपूचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व ! सुमारे साडेतीन ते पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या भारतीय बहुजनसमाजाचा महानायक, एक महासम्राट, एक महान तत्त्ववेत्ता!
अशा आपल्या महान बळीराजाचा वामनाने कपटाने घात केला. तीन पावले भूमी म्हणजे स्वर्ग, भूमी, पाताळ व्यापणे नव्हे ती तीन पावले भूमीचा अर्थ यज्ञ, वेद आणि वाणी यांना परवानगी देणे असा होतो.
अशा आपल्या पराक्रमी राजाला कपटाने मारुन त्याचा इतिहास विकृत केला व आमच्या बहुजन समाजापासून तोडण्याचा प्रयत्न केला पण आज बळीराजा जीवंत आहे. 'इडा पिडा टळो! बळीचे राज्य येवो' असे म्हणून आपण त्यांचे हजारो वर्षांपासून स्मरण आजही करतो. अशा आपल्या महापराक्रमी सर्वगुणसंपन्न, समतावादी राजाची दिवाळीत घराघरामध्ये पूजा व्हावी आणि आपली मूळ संस्कृती उजळावी ही इच्छा.
पाच हजार वर्षापासून सर्वसामान्यांना प्रतिभेचा मोहर कुणी जाळून टाकला ? तो बहरला का नाही याचे विश्लेषण या पुस्तकात केले आहे.
वामन व बळी ही कथा जरी पौराणिक असली तरी खोट्या संस्कृतीचा मारा संस्कृती आड यात घुसळला आहे.संस्कृतीआड खोट्या गोष्टी यात लपल्या असून आर्य संस्कृतीने मुळ द्रविडीयन संस्कृतीवर आघात केला आहे.द्र्विडीयन ही प्राचीन संस्कृती होती आणि तिचा संबंध हडप्पा मोहनजोदडोशी आहे.
लोकांच्या मेंदूमध्ये गाठी बांधून ठेवणे ,अवैज्ञानिक कथा रचने,वेगळाच इतिहास रचणे यातून त्यांची प्रवृत्ती लक्षात येते.
ब्राह्मण हे ग्रंथाचे नाव होते तर वैदिक वाङ्मयात देव म्हणजे सृष्टीचा निर्माता तसेच विशिष्ट जनसमूह! डॉ. श्रीधर व्यंकटेश यांनी सुद्धा याला पुष्टी जोडलेली आहे. यामध्ये राक्षस ,नाग इत्यादी भागांचा वैदीक वाड्मयात उल्लेख आढळतो .प्राचीन काळामध्ये पशु दोन पायावर चालत होते.ती चार पायाची नव्हती. त्यांनी यज्ञामध्ये बळी जाण्यास नकार दिला.म्हणून नंतर युप नावाची संकल्पना यज्ञातून आली.बळी देण्यासाठी क्लृप्ती शोधण्यात आली. आणि योपन म्हणजे भ्रम निर्माण करणे, फसवणूक करणे असा होतो. अन वज्र या हत्याराची निर्मिती करण्यात आली. यातून पशु बळी जाण्यास तयार झाले. पुढे बहुजन समाजाची अवस्था याच जनावरांसारखी करण्यात आली.अन दावणीला ते बांधल्या गेले. पंरतु छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले ,आंबेडकर,शरद जोशी यांनी विरोध दर्शवला त्यामुळे ते दावलेला बांधले गेले नाहीत. कर्मकांडाच्या आड ते कधी झुकले नाहीत.
विश्लेषण चिकित्सा करायची नाही , बुद्धी वापरायची नाही असाच उच्चभ्रुचा पायंडा होता. धर्मग्रंथ,वेद,पुराणे,उपनिषदे यांचा धाक वाटावा धसका घ्यावा अशी भीती देव हे पात्र आणून पध्दतशीर बहुजनांना दूर केल्या गेले.म्हणून देव ही संकल्पना आडवी केल्या गेली. पाखंडी म्हणजे बुद्धी स्वतंत्रपणे वापरणारा माणूस.
जीवघेण्या संघर्षांतही त्यांची हृदये स्वच्छ आणि मस्तके ताठ राहिली.
बळीवंशातील राजांना सत्ता नको होती असे नाही. परंतु आपली सत्ता विशिष्ट तत्त्वज्ञानावर, नीतिमूल्यांवर, जीवनदर्शनावर उभी असली पाहिजे, याची पुरेपूर काळजी ते घेत होते. त्यांनी आपल्या हाताने आपल्या स्वातंत्र्याच्या आकांक्षा विसर्जित केल्या असत्या आणि आक्रमक आर्य आपल्यापेक्षा वरचढ होत आहेत असे म्हटल्यावर त्यांच्यापुढे शरणागती पत्करली असती, तर त्यांच्या इतक्या पिढ्यांना आपले प्राण गमवावे लागले नसते. त्यांनी स्वतःच वैदिकांच्या रंगात रंगून जायचे ठरविले असते, तर आर्यांचे मांडलिक म्हणून ते सुखेनैव जगू शकले असते आणि त्यांनी टाकलेल्या सत्तेच्या छोट्यामोठ्या तुकड्यांवर पोट भरण्यासाठी लाळ घोटत सुखी राहू शकले असते. परंतु त्यांच्यापैकी कोणीही आत्मद्रोहाचा हा मार्ग पत्करला नाही. त्यांच्या सैन्यातील वा प्रजेतील काही व्यक्तींनी वा गटांनी गद्दारीचा मार्ग स्वीकारला, हे खरे आहे. परंतु हिरण्याक्षापासून बाणासुरापर्यंत कोणीही आपल्या जीवनमूल्यांपेक्षा आपल्या प्राणांना अधिक महत्त्व दिले नाही, मग त्यांच्याकडून जीवनमूल्यांपेक्षा सत्तेला अधिक महत्त्व दिले जाण्याची शक्यता तर फार दूरची झाली. अगदी जीवघेण्या संघर्षांतही त्यांची हृदये स्वच्छ आणि मस्तके ताठ राहिली. त्यांच्या पद्धतीने जगणे हे तर खरे जगणे आहेच, पण त्यांच्या पद्धतीने मरणे हे देखील जीवनाचा झेंडा उंच उंच फडकविण्यासारखे आहे.
हजारो वर्षे ज्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा केली जात आहे, असा जिवलग आणि आमचा लाडका बळीराजा ? तो तर तत्त्वदर्शिनी बुद्धी असलेला बुद्ध. प्रजेतील प्रत्येकाला त्याच्या श्रमाचा योग्य हिस्सा विभागून देणारा संविभागी. स्वतः सर्वांशी समतेने वागणारा आणि प्रजेतील सर्वांना परस्परांशी समतेने वागण्याची प्रेरणा देणारा समतावादी. यज्ञयागांच्या भ्रामक कर्मकांडाऐवजी निर्मितीगर्भ कृषीला जपणारा बळीराजा. वैदिकांची शोषक व्यवस्था नाकारताना एक भावात्मक, सकारात्मक, क्रियाशील समाजरचना घडवून आणणारा समाजशिल्पकार, कारस्थानांना आणि कपटांना निर्मळ-निरागस मनाने सामोरा जाणारा उन्नत महामानव, काही व्यक्ती व समूह यांचा अपवाद वगळता इतरांनी आपल्या हृदयासनावर प्रेममंत्राने अभिषिक्त केलेला आणि सम्यक राज्यकर्ता असलेला सम राजा सम्राट. पराभवातही पराभूत न होणारा शांतचित्त तत्त्ववेत्ता. हजारो वर्षे ज्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा केली जात आहे, असा जिवलग, इतका जिवलग, इतका जिवलग की, सात काळजांच्या आत कायमचा जपून ठेवावा इतका जिवलग !
अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण बळीराजा विषयी, त्याच्या वंशाविषयी मांडणी या पुस्तकात आहे.आर्य संस्कृतीचे आक्रमण क्रमवार लिहिले असून पुराणाचे दाखले जोडले आहे.
अजित सपकाळ
अकोट जि अकोला
9766201539