नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
.
...................................................................................................................
दि. १६-११-२०१०
वर्धा, १५ नोव्हेंबर / प्रतिनिधी
शेतकरी संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष व कवी गंगाधर मुटे यांच्या ‘रानमेवा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शरद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. शेगावला नुकत्याच झालेल्या शेतकरी मेळाव्यात हा सोहोळा संपन्न झाला. यावेळी कवी इंद्रजित भालेराव, माजी आमदार वामनराव चटप व सरोजताई काशीकर प्रामुख्याने उपस्थित होते.
‘रानमेवा’त विविध काव्यरचनांचा समावेश आहे. तुंबडी गीत, गझल, बालकाव्य, बडबडगीत, लावणी, देशभक्तीगीत अशा व अन्य स्वरूपातील कविता आहे. काव्यसंग्रहास शरद जोशी यांची प्रस्तावना लाभली असून डॉ. श्रीकृष्ण राऊत, मुकुंददादा कुळकर्णी, डॉ. भारत करडक, स्वप्नाली गुजर यांचे अभिप्राय लाभले आहेत. विडंबन व उपहासात्मक शैलीने यातील काव्य फुलले आहे. वृत्तबध्द शैलीतील हा काव्यसंग्रह ६० रुपये किंमतीस विक्रीस उपलब्ध असून ऑनलाईनसुध्दा उपलब्ध आहे.
........................................................
दि.१६ नोव्हेंबर २०१०
कवी गंगाधर मुटे लिखित ’रानमेव’ या काव्यसंग्रहाचे शेगाव येथील शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात लोकार्पण करतांना शेतकरी नेते शरद जोशी,रवी देवांग,इंद्रजित भालेराव,गंगाधर मुटे व अन्य.
.................................................................................................
दिनांक. २३ जानेवारी २०११
.................................................................................................