नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कविता :- मातीतल्या बियाला
साधाच प्रश्न केला मातीतल्या बियाला
का? उगतोस बाबा पुन्हा इथे मरायला
उगलास की, येतो अंगावर काटा
रात्र रात्र लागत नाही
डोळ्याला डोळा
कितीही पेरलं तरी
हाती फक्त बोळा
ईथे माझेच मला उमजत नाही
त्यात तुझा घोर
भरवश्यावर तुझ्या
अजून उजवली नाही पोर
सांभाळतांना तुला
भरडला जातोय मी
अस्मानी सुलतानी शुक्लकाष्ठाने
एवढे करूनही जगला वाचलास की
टपूनच असतात लांडगे
कळपा कळपाने
मग पोटच्या गोळ्याची पाहून तगमग
माझाही सुटतो धीर,
अन् तू कमावता होण्याच्या आशेवर, कोसळते वीज
तेव्हा ऐक माझं
रहा गपगुमान पडून
होऊ दे बोंबाबोंब
उसळू दे आगडोंब
तसही तुझं कोण करतं मोल
जो तो लावतो तुझी बोली
बिनभावांनच साजरी करावी लागते इथे
दिवाळी अन् होळी
तेव्हा, हो बिनधास्त, एखाद्या निष्पाप पाखराच्या चोचीतला दाना
सांगू दे त्याला, तुझ्या न येण्याची कहाणी जगाला
येऊ दे, तुझी आत्महत्या रोखल्याचं पुण्य फळाला
रवींद्र अंबादास दळवी नाशिक
प्रतिक्रिया
का? उगतोस बाबा इथे मरायला..
Dr. Ravipal Bharshankar
का? उगतोस बाबा इथे मरायला..
Dr. Ravipal Bharshankar
अतिशय छान आणि तितकीच हळवी अशी कविता..
Dr. Ravipal Bharshankar
बढिया! खूप छान कविता रवींद्र सर
निष्पाप पाखराच्या चोचीतला दाना सांगु दे त्याला
तुझ्या न येण्याची कहानी जगाला
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
मातीतल्या बियाला
खूप खूप आभार भारशंकरसर आणि
धीरजकुमार ताकसांडे सर
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
खूपच छान कविता सर
खूपच छान कविता सर
राजेश नारायण सर खूप खूप आभार
राजेश नारायण सर खूप खूप आभार
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
तुमचा बापही देऊ शकला नाही
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण