नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
जगावं की मरावं ?
शेतकऱ्यांसाठी नेते आता
आमचे करतात तरी काय
आत्महत्तेशिवाय शेतकऱ्यांपुढे
नाही कोणताच तरणोपाय
राबराब शेतात राबुनही
हाती काही उरत नाही
शेतकऱ्याच्या मनावर कधी
शेतमालाचा भाव ठरत नाही
कधी बोगस बियाणे तर
कधी खताचा प्रश्न असतो
शासनाच्या जाचक अटीत
बळीराजा पुरता फसतो
निसर्गाच्या नियमाला निसर्गही
बांधील कधी राहत नाही
हिवाळा उन्हाळा पावसाळ्यातही
नदी कुठली वाहत नाही
कोरडे जातात ऋतू आणि
फोल जातात हवामान अंदाज
काढणीला पीक आल्यावर
अवकाळीचा चालतो माज
मेटाकुटीला जीव असा
शेतकऱ्याचा येतो
उरत नाही पदरात काही
आत्महत्तेने जीवन संपवतो
रोज रोज मरण्यापेक्षा
एकदाच मेलेलं बरं
सावकारच्या आणि बँकेच्या
कर्जाचं देणं फिटंना खरं
शेतकऱ्यापुढेही प्रश्न असतो
टू बी आॅर नाॅट टू बी
जगावं की मरावं हा एकच सवाल आहे
नियतीच्या वागण्याची अशी आहे खुबी !
- मुक्तविहारी,
क्वार्टर क्र. जुने डी ८ , थर्मल काॅलनी,
परळी वैजनाथ, जि. बीड.
पिन - ४३१५२०.
मो. ९८६०९८५९११.
प्रतिक्रिया
जगावं की मरावं
अप्रतिम कविता
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद
भारशंकर सर, मुटे सर आपले मनःपूर्वक धन्यवाद
मुक्तविहारी
पाने