नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७
लेखनाचा विषय : शेतकरी आत्महत्त्या
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
विभाग : अ) पद्यकविता
(१) नाही करायची आत्महत्या
ओस पडतोया सारा गाव, काय उरलंया खेड्यामंधी
पोट भराया नाही काही, चल जाऊया शहरामंधी ॥
तिथं हायेती मोटारगाड्या
लोका रहाया कॉंक्रिट माङया
आपुबी जाऊ तिथंच ऱ्हाऊ, जरी आसल वस्ती गंधी
पोट भराया नाही काही, चल जाऊया शहरामंधी ॥ १ ॥
नाही पिकलं इथं औंदा
तिथं मिळलं काम धंदा
पोरंभी घेऊ, कसबी ऱ्हाऊ, आलीया आरथिक मंदी
पोट भराया नाही काही, चल जाऊया शहरामंधी ॥ २ ॥
करज झालया डोक्यावरती
नेतं त्यांचंच पोटं भरती
कोंड्याचा मांडा करून खाऊ, आपल्याला कुणाची बंदी
पोट भराया नाही काही, चल जाऊया शहरामंधी ॥ ३ ॥
नाही करायची आत्महत्या
सौसार करूया आपू फत्या
समाजामंधी लोकं ईतकी, केली का मदत कंधी ?
पोट भराया नाही काही, चल जाऊया शहरामंधी ॥ ४ ॥
पाऊस पडंल तवा येऊ
बि बियाणं खतं घेऊ
पिकंल बिकल सुखात ऱ्हाऊ, तुम्हासंग आहे मी खंदी
पोट भराया नाही काही, चल जाऊया शहरामंधी ॥ ५ ॥
के. एन. साळुंके
१७, साईकृपा सोसायटी,
विद्यावर्धिनी कॉलेजमागे,
साक्री रोड, धुळे - ४२४००१
महाराष्ट्र
मोबाईल नंबर – ९८५०६१२७६०
Email: knsalunke2013@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
छानच
छान कविता
Dr. Ravipal Bharshankar
छान कविता
छान कविता
शेतकरी तितुका एक एक!
पाने