Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



IT कार्यशाळा - इंटरनेट म्हणजे काय? - भाग-४

IT कार्यशाळा - इंटरनेट म्हणजे काय? - भाग-४
 
इंटरनेट म्हणजे एक संगणक तंत्रज्ञान आहे जे जागतिक पातळीवर एकमेकांशी जोडलेले आहे. ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या घरात बसून जगातल्या कुठल्याही विषयावर हवे असणारे ज्ञान प्राप्त करू शकता. हे ज्ञान कोणत्याही भाषेतून लिहू किंवा वाचू शकता. इंटरनेटमुळे सर्व जग एका खेड्यासारखं एकत्रितपणे एकत्र आलं आहे. हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या व्यक्तीशी संभाषण करू शकता. मिटिंग आयोजित करू शकता. थेट बोलू शकता तसेच त्याला स्क्रीनवर पाहू शकता. जेथे पोचायला विमानाने पोचायला सुद्धा २४ तास लागतात... अशा व्यक्तीपर्यंत केवळ २४ सेकंदात पोहचू शकता. प्रत्यक्ष बँकेत जाऊन जो आर्थिक व्यवहार करायला काही तास घालवावे लागतात ..... तेच काम आपण नेटबँकिंग वापरून अगदी काही मिनिटात आणि तेही निर्धोकपणे पार पाडू शकता.
 
वेबसाईटचे प्रकार :
 
वेबसाईटचे अनेक प्रकार आहेत त्यापैकी सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात जे उपयोगाचे आणि महत्वपूर्ण आहेत... त्याच प्रकारांची आपण येथे चर्चा करणार आहोत.
 
१] वेब पोर्टल – वेब पोर्टल म्हणजे एका विशिष्ट प्रकारचे ग्राहक किंवा वापरकर्ते एकत्र येऊन अश्या प्रकारची वेबसाइट निर्माण करून वापरत असतात. उदा. मोबाईल कंपनीचे पोर्टल, इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे पोर्टल.
 
२] सोशल मीडिया वेबसाईट – 
अ) फेसबुक >>>
https://www.facebook.com/gangadharmute/
 ट्विटर >>>
https://twitter.com/gangadharmute/
वगैरे. 
 
ब) बळीराजा डॉट कॉम >>>
http://www.baliraja.com/
शरद जोशी डॉट इन >>> 
http://www.sharadjoshi.in/
वगैरे.
 
यापैकी काही साईटसवर सदस्यत्व घेणाऱ्यालाच प्रवेश असतो. आधी सदस्यत्व (Sign Up) घ्यायचे व त्यांनतर Log In करून प्रवेश घेतला तरच वेबसाईटवरील मजकूर वाचता येतो. अन्यथा वाचता येत नाही. उदा. फेसबुक, ट्विटर वगैरे.
 
याउलट काही साईटवर सदस्यत्व न घेताही मजकूर वाचण्याची मुभा असते. मात्र लेखन करायचे असेल किंवा प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर  सदस्यत्व घेऊन लॉगिन करणे अनिवार्य असते. उदा. बळीराजा डॉट कॉम, शरद जोशी डॉट इन वगैरे.
 
३] ई-कॉमर्स वेबसाईट – ज्या वेबसाईटवर वापरकर्ता (यूजर) ऑनलाईन वस्तूंची खरेदी करत असेल आणि अशी खरेदी करताना ऑनलाईन बँकिंग / डेबिट कार्ड / क्रेडिट कार्डचा वापर करत असेल तर त्या प्रकारच्या वेबसाईटचा समावेश ई-कॉमर्स वेबसाईट मध्ये होतो. 
उदा. फ्लिपकार्ट >>>
https://www.flipkart.com/
ऍमेझॉन >>>
https://www.amazon.in/
 
अशा वेबसाईटवरून सर्व प्रकारची उत्पादने जसे कि कपडे, बूट, कॅमेरा, मोबाइल फोन्स, लॅपटॉप, खेळणी, फॅशन उत्पादने, खेळाची साधने, दागिने यापासून ते दैनंदिन जीवनातील किरकोळ वस्तू सुद्धा ऑनलाईन खरेदी करता येतात.
 
४] ब्लॉग – एका विशिष्ट विषयावर किंवा अनेक विषयावर आधारित लेख अथवा स्फुट लेखन करण्यासाठी  ब्लॉगचा वापर केला जातो. 
उदा. 
 
५] फोरम – डिस्कशन फोरम म्हणजे विशिष्ट विषयावर किंवा एकत्रित विषयांवर चालू असणारी लिखित स्वरूपातील चर्चा असलेली वेबसाईट असते. इथे अनेक प्रश्नांची उत्तरे आपसात चर्चा करून शोधण्याचा प्रयत्न केला जातो.
 
६] न्यूजवेबसाइट - सर्व वृत्तपते आजकाल असे पोर्टल वापरतात त्यामुळे वाचकांना विनामूल्य एका क्लीकवर हवे ते वृत्तपत्र वाचण्याची ऑनलाईन सोय झाली आहे.
 
७] व्हीडिओ वेबसाइट्स – काही वेबसाईट केवळ व्हिडियोच्या प्रकाशनाच्या हिशेबाने तयार केल्या जातात..अशा साईटवर युझर व्हिडिओ अपलोड करू शकतो, तसेच इतर वापरकर्त्यांनी अपलोड केलेले व्हिडिओज पाहता येतात. यात युट्यूब ही आजची अग्रगण्य साईट आहे.
https://www.youtube.com/user/gangadharmute
 
- गंगाधर मुटे 
=========
Share