Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




माझे फेसबूक स्टेटस-1

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 12/06/2014 - 03:40. वाजता प्रकाशित केले.

    एकच गुन्हा समान झाला, परी सजा वेगळी त्यात
    आतंकवादी मजेत बाहेर, साध्वी सडते आत

    - गंगाधर मुटे

    ****
    माझी फेसबूक पोस्ट-१९ मे २०१४

    ही झाडे कशाची बरे?
    गांजा, चरस की अफ़ूची?
    जर हे खरे असेल तर...
    महाराष्ट्रात आमच्या शेतकर्‍याच्या शेतात जर एखादे झाड आढळले तर लगेच जेलची हवा खावी लागते मात्र पंजाब, हरयाणा व जम्मूमध्ये ही झाडे पावलोपावली आढळतात. जालंधर ते अमृतसर आणि अमृतसर ते जम्मू या महामार्गाच्या दुतर्फ़ा या झाडांचे अक्षरश: जंगल आहे. एकाच देशात सर्वांना कायदा सारखाच लागू असतो, असे थोडेच आहे!
    *****
    माझ्या संशयखोर स्वभावानुसार मला असे जाणवते आहे की, हा विषय तसा साधासुधा नसावा. कारण माणसे सरळसोट स्वभावाची असतच नाही.
    या प्रवासात मी माझ्या डोळ्याने पाहिलेल्या झाडांची संख्या लक्षात घेता या मालाची किंमत किमान ३०० कोटी रुपये एवढी आहे.
    त्यावरून या तीनही राज्यातील झाडॆ काही हजार कोटीची असू शकतात. हा सर्व किंमती माल उपयोगात आणला जात नसेल असे गृहीत धरणे, संयुंक्तिक वाटत नाही.
    शिवाय...
    १) सिमावर्ती भागातच ही झाडे का?
    २) या झाडांचे पुढे काय होते?
    ३) या झाडांची बेमालूम शेती नसेल कशावरून?
    आणि महत्वाचे म्हणजे
    ४) गांजर गवत निर्मुलनाच्या धर्तीवर भांग/गांजा निर्मुलनाचे शासकिय स्तरावर प्रयत्न का होत नसावेत?

    काही तरी काळेबेरे नक्कीच असू शकते...!

     

     Afu
    *****
    दिनांक : ०७/०४/२०१५
    महाराष्ट्रात सक्त मजुरी व अन्य राज्यात मात्र आनंदी आनंद..!
    काय सुंदर आपला देश आणि त्याहुनही सुंदर कायदे....!!

    Ganja
    ********

    दिनांक १९ जुलै २०१४ : काय लिहावं यार, कायबी कळत नाही. मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या नावाने चालणार्‍या आणि 1,05,168 likes मिळालेल्या पेजवर माझी खालील कविता टाकण्यात आली आहे. कवितेखाली कवीचे नाव घालायला हवे होते. ते तर टाकले नाहीच या उलट कविचे नाव टाळण्यासाठी शेवटच्या कडव्यातील अभय हा मक्ता असलेली आता ’अभय’ मनाच्या धुंदीस या जपावे। ही ओळच गायब करून टाकली आहे! काय म्हणावे?

    LINK

     Raj Thakre
     

    *****
    मा. पंतप्रधान मोदींचे आजचे संसदेतील भाषण ऐकले. अस्थी कृषीवलांच्या पुसतात संसदेला करतात आत्महत्त्या का देश पोसणारे? या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही, हे मला अपेक्षितच होते. शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून येईल एवढा भाव देण्याचे सोडून बाकी सर्वच ते बोलले. कॉग्रेस शेतकर्‍यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे. मात्र शेती सोडून अन्य बर्‍याच क्षेत्रांना ’अच्छे’ दिवस येतील, याची झलक त्यांच्या भाषणात जाणवली. विकासाचा मुद्दा आणि सामोपचाराने निर्णय घेऊन धोरण राबवायचे हा त्यांचा मुद्दा अत्यंत प्रामाणिक आणि देशहितासाठी प्रगल्भ राजकारण कसे असू शकते, हे अधोरेखित करणारा होता. आजचे त्यांचे भाषण अनेक क्षेत्रात क्रांतीकरक बदल घडवून आणणे शक्य आहे, याची ग्वाही देणारे आणि राष्ट्रासमोर सकारात्मक आशादायी चित्र निर्माण करणारे आहे. शिक्षण क्षेत्राविषयीचा त्यांचा मुद्दा ऐकताना माझ्या "वांगे अमर रहे" पुस्तकातील "प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती" या लेखाची आठवण झाली. बर्‍याच काळानंतर देशाला पंतप्रधान मिळाला आणि या देशाला पंतप्रधान आहे, असे जाणवायला लागले आहे.
    - गंगाधर मुटे
    -----------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 13/06/2014 - 00:07. वाजता प्रकाशित केले.

    दिनांक १९/१०/२०१२
    केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने २०११ सालच्या शेतकरी आत्महत्येची अलीकडेच आकडेवारी जाहीर करताना देशभरात १४ हजार ४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक ३३३७ शेतक र्‍यांनी मृत्यूस कवटाळल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली असली तरी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र शेतकरी आत्महत्यांच्या घटनांत घट झाल्याचे विधान करून या आकडेवारीला शह दिल्याने आकडेवारीच्या नेमक्या सत्यतेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी हा आकडा ३१४१ एवढा होता. आत्महत्याग्रस्त महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतक र्‍यांची संख्या जवळजवळ ७० टक्के आहे.
    महाराष्ट्रात २००६ साली कृषीविषयक कारणांसाठी १०३५ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. २००८ साली ही संख्या ८०० पर्यंत घटली, २००७ साली यात आणखी घट होऊन ७०० झाली, परंतु २०१० साली हा आकडा ७४० झाला. त्यानंतर २०११ साली यात एकदम घट होऊन ही संख्या ४८० झाली. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १६८ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती शरद पवार यांनी जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशातही २००६ साली ७५७ शेतक र्‍यांनी मृत्यूला कवटाळले होते. यातही घट झाली असून २०११ साली १९६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, असेही पवार यांनी म्हटले आहे.
    केंद्र सरकारने संसदेच्या मागील पावसाळी अधिवेशनात १९९५ ते २०११ या कालखंडादरम्यान देशभरात २ लाख ९० हजार ७४० शेतकरी आत्महत्या झाल्याची आकडेवारी सादर केली आहे. दिवाळखोरी किंवा आर्थिक चणचण आणि दारिद्रय़ या कारणांनी या आत्महत्या झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
    --------------------------------------------------------------------
    आत्महत्या असो की दुर्घटना, सरकारी मृतांचा आकडा हा वास्तवापेक्षा १/३ ने तरी कमीच असतो.
    .
    त्या हिशेबाने हा आकडा किमान ५ ते ६ लाखाच्या घरात असू शकतो.

    ---------------------------------------------------------------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 14/06/2014 - 22:57. वाजता प्रकाशित केले.

    BT बियाणे आल्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या असे सांगणारा सध्या एक विद्वानांचा ग्रूप कार्यरत आहे.
    ते धादांत खोटे आहे. याउलट या जनुकिय बियाणामुळे उत्पादन वाढले आहे. बियाणाचा एकरी १००० रुपयाने खर्च वाढला असला तरी फवारणीचा खर्च २००० रुपयाने कमी झाला आहे.

    उत्पादन वाढले तो बोनसचा भाग झाला.

    ही मंडळी शेतीविषयक अशिक्षितांसमोर किंवा मिडियासमोर आपले ज्ञान पाजळू शकते. शेतकर्‍यांसमोर जाऊन बोलायची हिंमत यांच्यात कुठे आहे?

    ते धादांत खोटे बोलतात, या बद्दल माझा आक्षेप नाही. काय बोलावे-कसे बोलावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण लोकं शेतकर्‍यांच्या भल्यासाठी आम्ही बोलत आहोत असे भासवून आपापला अजेंडा राबवतात, आपापला स्वार्थ साधण्यासाठी शेतकर्‍याला आणखी गर्तेत लोटून आपापले घोडे पुढे दामटतात ....

    ..... तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते.

    आणि असे बोलणारे मग कुणीही असो, भले मग तो देशवासियांच्या मनात हिरो असो, आदरणीय असो वा पुज्यस्थानी...

    .... मला मात्र तो कस्पटासमान दिसायला लागतो.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 15/06/2014 - 13:30. वाजता प्रकाशित केले.

    Kailas Waghmare,

    <<< Bt ne shetkaryachya atmhatya vadhlya. He 100% khare ahe. Majhyakade akadewari ani mahiti adhare mi sangu shakto. >>>

    कुठे आहे आकडेवारी? कशाची आकडेवारी? कुणी गोळा केली? कशी गोळा केली? वास्तवाला धरून आहे कि महान आकडेतज्ज्ञांनी कोंबडीच्या तंगड्या चघळत फ़ाईव्हस्टार हॉटेलात बसून लिहिली, जरा याचाही शोध घ्या.

    <<< Monsento & balmart ki parishkrut Bt kapas andhra & Rajsthan me vifal ho gai court me case chalu hai. >>>

    आज देशात कपाशीच्या बिनाबीटीच्या वाणाचे बीज अजिबात खपतच नाहीये. जवळजवळ सर्व क्षेत्र बीटीने व्यापले आहे. आंध्र राजस्थानच्या कोर्टात केस टाकणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतात जराशी माहीती घेऊन बीटी वाण पेरले आहे की नॉन बीटी वाण, तेही सांगा.

    <<< Kisan jisase paravalmbi hota ho aise ko samarthan vahi log de sakte hai jiska is compani se santhganth ho. >>>

    देशातल्या सर्वच कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे मोन्सॅन्टोवाले सासरे लागतात म्हणायचे. मोन्सॅन्टोवाल्यांना किती कोटी मुली आहेत तेही सांगून टाका.

    <<<< Ji compani shetkaryala parawalambi kartat tyncha virodh karne.bt kapsache parinam far vaht astat. >>>

    या परावलंबित्वाचा शेतकरी आत्महत्यांशी काय संबंध आहे. परावलंबीपणा मुळे निराश होऊन शेतकरी आत्महत्त्या करतात, असे तुम्हाला म्हणायचे काय?

    <<< Ahe na jaivib sheti >>>

    तुम्ही स्वत: जैविक शेतीच करता आहात का? तुमची उपजिविका जैविक शेतीवरच चालते का? असेल तर सांगा तुमचा आदर्श घ्यायला मी तयार आहे.

    <<< Bt la Gm food la samarthan mhanje deshacha ghat >>>

    या मुद्द्यावर थोडेसे तिरकस उत्तर देतो; "ज्या देशाला लाखो शेतकर्‍यांच्या आत्महत्त्याचे सोयरसुतक नाही, त्या देशाचा घात जर आत्महत्त्याग्रस्तांनी केला तर त्यात काय वावगे आहे."

    <<< Ho karit ahe ata amchya gavat ek shetkari ek gay palat ahe to shetamadhe khat vafrat nahi ani kitaknashak pan vafrat nahi tyala uttam pik yet ahe fakt didh ekaramadhe koradvahu. >>>

    एक गाय किती शेणखत देते, ते किती एकराला पुरते, त्यापासून किती उत्पादन वाढू शकते याचे तरी भान आहे का तुम्हाला? कि काहीही उदाहरण द्यायचा प्रयत्न करता आहात?

    अशाने जैविक शेतीचा आधिच हास्यास्पद असलेला मुद्दा आणखी हास्यास्पद करून टाकाल तुम्ही!

    शेतकरी तितुका एक एक!

  • vinayak kadam's picture
    vinayak kadam
    गुरू, 14/08/2014 - 19:21. वाजता प्रकाशित केले.

    भारतातील लोकसंख्येस पुरेसे अन्नधान्न्य शेतीतुन उत्पादन करावयाचे असल्यास नवीन तंत्राचा वापर करने अनिवार्य आहे.त्यासाठी फक्त सेंद्रिय किंवा रासायनिक वाद न करता 60%सेंद्रिय 40%रासायनिक शेती करने गरजेचे आहे.

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 21/06/2014 - 08:15. वाजता प्रकाशित केले.

    तुरळक अपवाद सोडले तर मनुष्यप्राण्यामध्ये रुढ अर्थाने बौद्धिक क्षमता जसजशी वाढत जाते तसतसे शेतीमधिल वास्तवाचे आकलन होण्याची त्यांची क्षमताही संकुचित होत जाते, असा माझा स्वत:चा आजवरचा व्यक्तिगत अनुभव आहे. कदाचित त्यामुळेच तज्ज्ञ, विद्वान या शब्दांचिच मला किळस यायला लागली आहे.
    माझे वरील मत कोण्या एकाला उद्देशून नसून एकंदरितच शेती आणि समग्र तज्ज्ञ व विद्वान यांना उद्देशून आहे. कारण शेतीची दुर्दशा कोण्याएका तज्ज्ञ किंवा विद्वानामुळे झालेली नाही. त्याला झाडून सारेच जबाबदार आहे.
    ही सारी तज्ज्ञ व विद्वान मंडळी चांगल्याचे श्रेय लाटायला नेहमीच तत्पर असतात मग शेतीची दुर्दशा झाली आहे, हे जर खरे असेल तर त्याची जबाबदारी ही मंडळी स्विकारायला तयार नसेल तर ही जबाबदारी त्यांच्या बापावर ढकलायची काय?????

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 21/06/2014 - 08:17. वाजता प्रकाशित केले.

    हमीभाव हा सुद्धा एक लोच्याच आहे. हमीभाव काढण्याची पद्धत तर अत्यंत असुसंगत आणि अशास्त्रीय आहे.
    भावनेला बाजूला ठेऊन तर्ककठोरपणे हमीभाव ठरविण्याची पद्धत तपासली तर हमीभाव ठरविणार्‍यांना वेड्यांच्या इस्पितळातच पाठवावे लागेल.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 21/06/2014 - 08:18. वाजता प्रकाशित केले.

    शेतकरी-शेतमजूर, बागायती शेतकरी शेतकरी-कोरडवाहू शेतकरी असा फ़ारसा भेदाभेद करण्यासारखी स्थिती नाही.
    एक सुपात आहे तर दुसरा जात्यात.
    एकाची हजामत पाणी लावून होते तर दुसर्‍याची बिनापाण्याने.

    शेतकरी आणि शेतमजूर यांची हलाखीची परिस्थिती सारखीच आहे.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 21/06/2014 - 08:18. वाजता प्रकाशित केले.

    आत्महत्या करणारे शेतकरी केवळ कोरडवाहू शेतकरी नाहीत. आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांमध्ये
    - कोरडवाहू शेतकरी
    - बागायती शेतकरी
    - अल्पभूधारक शेतकरी
    - अत्यल्पभूधारक शेतकरी
    - २० एकराचे शेतकरी
    - ५३ एकराचे शेतकरी
    - मागासवर्गीय शेतकरी
    - ओ.बी.सी. शेतकरी
    आणखी किती पोटजाती लिहू??
    .
    आत्महत्त्या करणार्‍यांमध्ये असा कुठलाही भेदभाव नाही. तसेही भेदभाव करण्याची लागण व तोडा, फ़ोडा, राज्यकरा या रोगाची लागण गोर्‍या इंग्रजांपासून आता काळ्या इंग्रजांना झालेली आहे.
    शेती संबंधी विचार करताना काळ्या इंग्रजांपासून स्वत:ला दूर ठेवणे आवश्यक असते. नाही तर आपली मते सुद्धा कलुषित होतात.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 21/06/2014 - 08:19. वाजता प्रकाशित केले.

    <<< ग्रामीण भागात 250 ते 300 रूपये दिवसभराची रोजी घेणारा मजूर आज सूखी आहे >>>
    शेतकर्‍यापेक्षा शेतमजूर सुखी असेल कदाचित. मग शेतकर्‍यापेक्षा कोण सुखी नाही? रिक्षावाला, हमाल, मास्तर, चपराशी, व्यापारी, पानटपरीवाला, चहावाला यांच्यापासून कारकून, तहसिलदार, कलेक्टर, पुढारी हे सर्व शेतकर्‍यांपेक्षा सुखीच आहेत.
    मग शेतकर्‍याला त्याच्या हक्कासाठी लढायचे असेल तर त्याने त्याच्या शोषकांशीच लढले पाहिजे. आपण ज्याची पिळवणूक करतो अशा शेतमजुरांशी भांडून काय फ़ायदा.
    शेतकर्‍याने शेतमजुराशी लढणे म्हणजे चतकोर भाकरीच्या तुकड्यासाठी दोन कुत्र्यांनी आपआपसात लढण्यासारखे होईल.
    आणि लुटारू मलिंदा खातच राहतील.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 21/06/2014 - 08:20. वाजता प्रकाशित केले.

    काल कोरडवाहू कपाशीची टोकण पद्धतीने लागवड केली आणि पावसाने रजेचा अर्ज दिला. २९ जूनपर्यंत त्याला रजा हवीय.
    पावसोबाच्या रजेचा अर्ज मंजूर करावा कि नाही, मी गोंधळलो आहे.
    मानसोपचार तज्ज्ञांनी कृपया मदत करावी. Wink

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 21/06/2014 - 08:20. वाजता प्रकाशित केले.

    पावसाचे वर्तन लहरीपणाचे आणि नियोजनसुद्धा शेतकर्‍यांनीच करायचे आहे तर,,,,
    हवामानखाते आणि हवामान तज्ज्ञ यांची गरजच काय?
    त्यांना नियमित पगार देवून जगवायचे; एवढाच उद्देश असेल तर त्यांना आपापल्या घरी झोपा काढण्याचाच पगार देऊयात की

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 21/06/2014 - 08:21. वाजता प्रकाशित केले.

    काही सेकंदापूर्वी माझ्या मोबाईलवर (Free SMS) खालीलप्रमाणे SMS आला. या SMS ची शेतीसाठी उपयोगिता काय? त्यांचे पगार सुनिश्चित होण्यापलिकडे काय अर्थ आहे या SMS ला?
    शेतीसाठी आम्हाला पाऊस येणार किंवा नाही याविषयीची माहिती हवी असते. तापमान आणि आर्द्रतेच्या आकडेवारीचे काय करायचे?
    ---------------------
    वर्धा जिल्‍हयामध्‍ये दि. २५ जून पर्यंत आकाश मुख्यत: ढगाळ राहील. कमाल तापमान ३६.० ते ३९.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६.० ते २९.० अंश सेल्सिअस राहील. हवेतील आर्द्रता सकाळी ७५ ते ८० टक्‍के आणि दुपारी ३८ ते ४२ टक्‍के राहील.
    :: Director, Agriculture Meteorology, PUNE
    ----------------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 21/06/2014 - 08:21. वाजता प्रकाशित केले.

    "परवा अडीच वाजता पाऊस येण्याची शक्यता आहे." असे भाकित सहज वर्तवले जाऊ शकते. सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाची तेवढी ताकद नक्कीच आहे.
    तंत्रज्ञान वापरणार्‍या खात्याच्या पात्रतेबद्दलच आपण आता विचार करण्याची गरज आहे.
    मात्र "आता पेरा" असा सल्ला देण्याची काहिएक गरज नाही. शेतकर्‍याला योग्य ती माहिती मिळाली तर स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची क्षमता भारतीय शेतकर्‍यात आहे.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 21/06/2014 - 08:24. वाजता प्रकाशित केले.

    एवढ्या मोठ्या कृषिप्रधान देशात शेतकर्‍यांमध्ये हवामान खात्याला मानाचे स्थान मिळायला पाहिजे होते. पण तसे काहीही झाले नाही.
    हवामान खाते असते हेच शतकर्‍यांना ठाऊक नाही.
    एकाअर्थाने हवामानखात्याची बेइज्जती आणि नामुष्की आहे. पण हे हवामान तज्ज्ञ सुधरतील तर ते तज्ज्ञ कसले?

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 21/06/2014 - 08:52. वाजता प्रकाशित केले.

    तोट्याची शेती आणि बोलघेवडे तज्ज्ञ

    हे खरे आहे की, संपूर्ण भारतवर्षातील शेती तोट्याची आहे, हे माझे ठाम मत आहे. पण मला वाटते तेच सर्व खरे आणि बाकी सर्व चूक असे मी मानत नाही. कारण ज्या अंगाने मी शेतीचा विचार केला त्या अंगाने शेती तोट्याची दिसत असेल पण कोणत्याही विषयाला अनेक अंगे असतात, बाजू असतात. कदाचित वेगळ्या अंगाने विचार केल्यास माझी मते चुकीची ठरू शकतात. म्हणून शेती या विषयाची सांगोपांग चर्चा व्हावी असे मला वाटते.
    मग शेती फायद्याची की तोट्याची हे कशाच्या आधारे ठरवायचे? येथे बोलघेवडे पांडित्य उपयोगाचे नाही. लेखन कौशल्य तर अजिबात उपयोगाचे नाही. येथे कागद आणि पेनच उपयोगाचा.
    पिकाचा उत्पादनखर्च आणि त्याला मिळणारे बाजारभाव किंवा शासकीय आधारभूत किमती यांच्या तुलनात्मक आकड्यावरूनच शेती "फायद्याची की तोट्याची" हे ठरू शकते.
    आणि सर्व राजकारणी, शेतकीतज्ज्ञ, मान्यवर अर्थतज्ज्ञ या विषयावर अजिबातच तोंड उघडायला तयार नाहीत.
    एखाद्या उद्योग उत्पादनाचा उत्पादनखर्च काढणे फारच सोपे आहे, कुणालाही काढता येईल कारण त्याची मार्गदर्शक तत्त्वे, नमुने ठरलेली आहेत.
    पण शेतमालाचा उत्पादनखर्च कसा काढायचा? हे काम एखाद्या CA ला सुद्धा सहज जमायचे नाही कारण त्याची मार्गदर्शक तत्त्वे,नमुने ठरलेली नाहीत. एखाद्या CA ने काढला तरी तो निर्दोष असणार नाही.
    एका अर्थाने शेतीविषयक सांगोपांग चर्चा करणे, शेतमालाचा उत्पादनखर्च काढायचा प्रयत्न करणे ही ऐतिहासिक गोष्ट आहे कारण हे आजवर फारसे घडलेले नाही.
    कृषी विद्यापीठात एखाद्या पिकाचा उत्पादन खर्च काय येतो हे शास्त्रीयरीत्या का शिकवत नाहीत?
    कृषी विद्यापीठात सगळेच विषय असतात पण नेमका शेतमालाचा उत्पादन खर्च कसा काढावा हाच विषय का नसतो?
    कृषी विद्यापीठे, राजकारणी, शेतकीतज्ज्ञ, मान्यवर अर्थतज्ज्ञ, बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत ही मंडळी निव्वळ शेतकऱ्यांना फुकटचे सल्ले देऊन नुसती मुक्ताफळे उधळण्याऐवजी "प्रयोग शेती" का सुरू करीत नाहीत. कृषी विद्यापीठाकडे हजारो एकर जमीन आहे. तेथे ते किती खर्चात किती उत्पन्न घेतात हे जाहीर का करीत नाही?

    याउप्परही, लोकांना जर हे श्रमकारण व अर्थकारण समजत नसेल, तर या निर्णयप्रक्रियेत भूमिका बजावणार्‍या व्यक्तींना, व बाष्कळ बडबड करणार्‍यांना काही काळापर्यंत एखादे शेत पिकवून, त्या उत्पन्नाच्या बळावर तिथे जगून दाखवायला ठेवले पाहिजे.

    कृषी विद्यापीठांकडे हजारो एकर जमीन आहे. त्या शेतीत किमान पाच वर्ष उत्पन्न घेऊन त्याच उत्पन्नावर कुलगुरूसहित सर्वांना आपला उदरनिर्वाह करण्यांस सांगावे. शासकीय अनुदान बंद करावे. वर्षाशेवटी काय शिल्लक राहते ते शेतकर्‍याला स्वानुभवाने दाखवावे. भारतासारख्या कृषिप्रधान देशात असे किमान एखादे "क्रियाशील विद्यापीठ" असणे अत्यंत आवश्यक आहे.

    - गंगाधर मुटे
    ................................................................

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 21/06/2014 - 19:51. वाजता प्रकाशित केले.

    तुमची भूमिका एकदम टोकाची असली तरी ती गैर नाही. परंतु तोट्यात चालणाऱ्या शेतीमध्ये शेतीशी संबंधित काही पूरक उद्योगकिंवा पर्यायी पिके घेऊन भरपूर उत्पन्न घेणाऱ्या मोजक्याच का होईना पण जिद्दी शेतकऱ्यांच्या प्रयत्नाची सुद्धा उदाहरणे आहेतच की. त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशनाची आवश्यकता आहे असे वाटते.

    माझी भूमिका टोकाची वाटत असली तरी वास्तवाला आणि सत्याला धरून आहे आणि सत्य नेहमीच कडवट असते असे म्हणतात. शिवाय शासनाची, शेती तज्ज्ञांची, अर्थशास्त्र्यांची आणि मुख्यत: बिगरशेती समाजाची शेती बद्दलची जी भूमिका आहे ती स्वातंत्र्यानंतरची ६५ वर्षे कुचकामी ठरत आली आहे; एवढेच नव्हे तर दिवसेंदिवस शेतीची अवस्था आणखी बिकट होत चालली आहे. त्यामुळे शेतीसंबंधीची आजवरची भूमिका अयोग्य आहे, हे तर आपोआपच सिद्ध व्हायला हवे. ते सिद्ध करण्याची गरजच पडू नये.
    .
    शासन, शेतीतज्ज्ञ आणि अर्थशास्त्र्यांच्या चुकीच्या भुमिकेमुळे समाजमन एवढे नासले आहे आणि आजही आपल्या शेतीविषयक भुमिकेचा आढावा घ्यायला तयार नाही आहे. त्यामुळे आता शेतीविषयक जुजबी उपाययोजना करण्याच्या पलिकडे आजाराचे स्वरूप गेले आहे. आज ना उद्या, कधी ना कधी देशाच्या शेतीविषयक धोरणाला अरबीसमुद्रात बुडवून टाकावेच लागेल.
    .
    शेतीला जोडधंदे, शेतीला कर्जपुरवठा, शेतीला सिंचनाची सोय किंवा शेतीला अनुदानाचे पॅकेज देणे हे समस्येचे समाधान नव्हेच. रोग एक आणि इलाज भलताच चाललाय.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 21/06/2014 - 20:19. वाजता प्रकाशित केले.

    शेतीविषयक धोरणे का फ़सतात?

    शेतीमध्ये उत्पादन घेण्यायोग्य अनेक पिके आहेत, अगदी फुलझाडापासुन ते फळझाडापर्यन्त, कड धान्यापासुन ते तृणधान्यापर्यन्त, स्ट्रॉबेरी पासुन जेट्रोपा पर्यन्त, निलगिरिपासुन ते सागवानापर्यन्त, एवढंच नाहीतर तंबाखुपासुन ते अफिम-गांज्यापर्यन्त. घेण्यायोग्य पिके खुप आहेत्, कोणतेही पीक कुठेही कृत्रिम वातारणनिर्मीती करुन किंवा हरितगृहाच्या सहाय्याने घेता येणे शक्य आहे. प्रश्न जमिनिच्या दर्जाचाही नाही, शेणखत किंवा कंपोस्ट खताचा भरपुर वापर केल्यास नापिक जमिनितही भरघोस उत्पन्न मिळु शकतं. अडचण कौशल्याचिही नाही, ते शेतक-याच्या नसानसात भिनलं आहे. कारण शेतकरी हा उत्पादक आहे आणि कौशल्य हा उत्पादकाचा स्थायीभाव असतो.
    मग प्रश्न हा की घोडं नेमकं अडते कुठे?
    कुठल्याही व्यवसायाचे मुख्यत्वे दोन भाग असतात. उत्पादन आणि विपणन.
    शेतीव्यवसायामध्ये उत्पादन घेण्यात स्वतः शेतकरीच पारंगत आहे. निसर्गावर मात करायची की त्याच्याशी मैत्री करुन समरस व्हायचं हे जेवढं शेतक-याला कळतं, तेवढं कुणालाचं कळतं नाही. कृषि विद्यापिठात पीएचडी मिळविणार्‍या व दररोज वृत्तपत्रात अथवा नियतकालीकात शेतीसल्ल्याचे सदर लिहिंणार्‍या कृषितज्ज्ञाच्या घरच्या शेतीपेक्षा गांवातील इतर शेतकर्‍यांची शेती नेहमीच चांगली राहात आली आहे.
    शेतीव्यवसायामध्ये अडचणीची बाब म्हणजे विपणन (Marketing) .
    सर्व जगात, सर्व क्षेत्रात, सर्व उद्योग-व्यवसायात Marketing ला अनन्यसाधारन महत्व आहे. उद्योगाचे यश production वर नव्हे तर Marketing वर अवलंबुन असते हा सर्वमान्य सिद्धांत असतांना शेतीतील गरिबीचे कारण Marketing सोडुन production मध्ये का शोधले जाते हा माझा मुख्य प्रश्न आहे. शेतकर्‍याला जोडधंदे करायला सांगणे, शेतीला कर्जपुरवठा वाढविण्याच्या घोषणा करणे, शेतीला सिंचनाची सोय देवू करणे किंवा शेतीला अनुदानाचे पॅकेज देणे production शी संबंधित आहे.
    मात्र शेतीमध्ये शेतीमालाच्या Marketing चा विषय काही केल्या शासकीय धोरणामध्ये प्रतिबिंबित होत नाही.
    शेतीविषयक धोरणे फ़सण्याची आणि शेतीच्या दुर्दशेची कारणे इथेच दडली आहेत.

    - गंगाधर मुटे
    --------------------------------------------------------------------------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 22/06/2014 - 19:43. वाजता प्रकाशित केले.

    <<< प्रत्येक फसलेला प्रयोग नवीन सुधारणाच घडऊन आनतो. कदाचीत आजवर झालेले प्रयोग चुकिच्या पद्धतीचे असल्याने पिढ्या बरबाद झाल्या असतील. >>>

    मग तुम्ही काही नवीन वगैरे प्रयोग सांगणार की नाही? गेली ४० वर्षे मी तेचतेच ऐकत आहे. जोडधंदे, कर्जपुरवठा, सिंचन यापलिकडे कुणाला काही बोलताच येत नाही. जोडधंदे, कर्जपुरवठा, सिंचन हे सल्ले गेली ४० वर्ष ऐकत आल्याने आमचे तोंडपाठ झालेले आहे शिवाय हे वाक्य पुस्तकात छापू-छापू आजकाल तर प्रिंटींग मशिनला सुद्धा अजिर्ण व्हायची वेळ आली आहे.
    तेच तेच घोकमपट्टी केलेले छापील पुस्तकातील छापील उतारे वाचण्याचा आणि आम्हाला ऐकवण्याचा तुम्हाला आणि शेतीतज्ज्ञांना ज्या दिवशी कंटाळा येईल किंवा लाज वाटायला लागेल कदाचित त्या दिवसापासून शेतीला बरे दिवस येण्याची सुरवात होऊ शकेल.

    << ती लात सरकार मुळीच काढणार नाही. >>>

    त्याला मात्र आम्ही शेतकरी जबाबदार आहोत. आमच्या मनगटात ज्या दिवशी ताकद येईल त्याच क्षणी आमच्या छातीवर लात देणारे अरबी समुद्रात विसर्जित झालेच समजावे.

    <<< त्यासाठी मार्केटींग ची सुत्र जमेल तितकी शेतक-यांच्या हाती जाणे महत्वाचे नाही काय? >>>

    हे खरेय. सरकार नेमकं तेच होऊ देत नाही.

    <<< सारचं आकलन जर उंठावर बसून केलेलं आहे असा तुमचा पक्का समज झालेला असेल तर मग सगळेच दरवाजे बंद होऊन जातात. >>>

    ज्या दरवाज्याने लक्ष्मी ऐवजी दरोडेखोर आणि लुटारू घुसतात ते दरवाजे तातडीने बंद करण्याची प्राथमिक गरज आहे. हे दरवाजे बंद झाले की नव्या सुर्याची किरणे येऊ शकतील असे दरवाजे निर्माण करता येतील. Smile

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 22/06/2014 - 21:07. वाजता प्रकाशित केले.

    सद्यस्थितीत शेतकरी शेतमालाचे खालीलप्रमाणे मार्केटींग करू शकतो.

    १) वांगी, टमाटर, मिर्ची, लसून, कांदा यांची भाजी करून विकायची. रुपयाला २ प्लेट या भावाने सहज खपेल. महागाई कमी करायची ना?

    २) गव्हाच्या पोळ्या आणि भाताला शिजवून विकायचे. खपले नाही तर सदावर्त करायचे. अन्नदानाचे पुण्य पदरी पडते.

    ३) कापसाच्या वाती वळायच्या. त्या तुपात भिजवून विकायच्या. एकाचवेळी कापसाची शेती आणि गाई पाळण्याचा जोडधंदा भरभराटीस येईल.

    शेतकर्‍यांना याव्यतिरिक्त प्रक्रिया करण्यास व मार्केटींग करण्यास "लायसन्स-कोटा-परमिट राज" परवानगी देत नाही.
    (पाठ्यपुस्तकात हा भाग शालेय अभ्यासक्रमाने छापला नसल्याने, "लायसन्स-कोटा-परमिट राज" याविशयी आमचे शेतीतज्ज्ञ अनभिज्ञ असतात. त्यात त्या बिचार्‍या शेतीतज्ज्ञांचा काय दोष?)

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 24/06/2014 - 18:20. वाजता प्रकाशित केले.

    बळीराजाला शेतीच्या बरोबरीने किंवा पूर्णतया वेगळे व्यवसाय शिकविण्याची गरज आहे.

    १) मरेस्तोवर कष्ट करूनही शेतीतले कामे संपत नाही. सोबत जोडधंदा करायला वेळ कुठून आणायचा?
    २) शेतीसोबत जोडधंदा करण्यापेक्षा शेतीऐवजी जोडधंदाच का करू नये?
    ३) कर्मचारी वेतनवाढ मागतात तेव्हा त्यांना वेतनवाढ देण्याऐवजी नोकरी सोबतच ऑफिसच्या बाहेर फावल्यावेळात "हेअर कटिंग" सलूनचे दुकान लावायला का सांगीतले जात नाही?
    ४) शेतीला उद्योगाचा दर्जा देवून त्यानुसार शासकीय धोरणे आखण्यात नेमका प्रॉब्लेम काय आहे?
    ५) उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याऐवजी त्याला तेवढे सोडून बाकीचे सल्ले देण्यात काय औचित्य आहे?
    ६) निदान उत्पादनखर्च भरून निघेल एवढा तरी शेतमालाला भाव मिळणे रास्त नाही का? एवढी साधी सोपी गोष्ट तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना का कळू नये?

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 24/06/2014 - 20:09. वाजता प्रकाशित केले.

    शेतीच्या दुर्दशेला पाऊस अजिबात जबाबदार नाही.

    शेतीच्या दुर्दशेला पाऊस सोडून अन्य घटकच जबाबदार असताना
    जो तो उठतो आणि पावसाला दुषणे द्यायला लागतो.
    चोर सोडून संन्याशाला फ़ासी, म्हणतात ना, ते यालाच.
    शेतीच्या दुर्दशेला जे घटक जबाबदार आहेत त्यांच्याविरुद्ध ब्र काढण्याची यांची औकात नाहीये कारण
    पगारवाढ, बढती, करचोरी वा अन्यहितसंबंधावर गदा येण्याची भिती

    तो बिचारा पाऊस ह्यांचे काहीच बिघडवू शकत नाही म्हणूनच चेकाळत असावेत हे.
    "मोडक्या कूपावर लाथ द्यायची" सवयच अंगवळणी पडली ह्यांच्या.....!

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 25/06/2014 - 21:54. वाजता प्रकाशित केले.
    महिमा कशाचा ? पात्रतेचा की व्यवस्थेचा?

    उठसूठ आणि तो सुद्धा शेतकर्‍याने न मागताच निष्कारण बाष्कळ सल्ला देण्यासाठी काही लोक फ़ारच उताविळ असतात.  सल्ल्यामध्ये तरी काही नाविन्य वगैरे तरी असावे की नाही? गेली ४० वर्ष ऐकत आल्याने आमचे कान बुजण्याची शक्यता तयार झाली आहे शिवाय हे वाक्य पुस्तकात छापू-छापू आजकाल तर प्रिंटींग मशिनला सुद्धा अजिर्ण व्हायची वेळ आली आहे.

    तेच तेच घोकमपट्टी केलेले छापील पुस्तकातील छापील उतारे वाचण्याचा आणि आम्हाला ऐकवण्याचा या शहाण्यांना आणि शेतीतज्ज्ञांना ज्या दिवशी कंटाळा येईल किंवा लाज वाटायला लागेल कदाचित त्या दिवसापासून शेतीला बरे दिवस येण्याची सुरवात होऊ शकेल. 
    शेतीचा उत्पादन खर्च भरून निघणार नाही एवढे कमी जाणिवपूर्वक शेतीमालाचे भाव  ठरविले जातात, त्यामुळे शेती बकाल अवस्थेकडे झुकली आहे, हे एकतर त्यांच्या गावीच नसतं किंवा ही मंडळी "मंदबुद्धी" असल्याने त्यांच्या आकलनशक्तीला झेपत तरी नसावे.
    शेतीची दुर्दशा शेतकर्‍यांच्या "पात्रतेशी" संबंधित नसून "व्यवस्थेशी" संबंधित आहे, हे ज्यांना मान्य नसेल त्यांनी खालील समिकरण सोडवून दाखवावे, असे माझे त्यांना जाहीर आव्हान आहे.

    हे एक गणित सोडवून दाखवा.

    जर शामराव M.Sc, Ph.D , I.A.S असेल तर....

    १) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता शेतीत वापरली तर तो निव्वळ शेतीच्या बळावर दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?

    २) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता रिक्षा चालविण्यात वापरली तर तो निव्वळ रिक्षा चालवून घाम आणि श्रमाच्या बळावर दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?

    ३) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता अन्य व्यवसायात वापरली तर तो दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?

    ४) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता शासकिय नोकरीत वापरली तर तो अगदी लाचलुचपत न घेताही प्रामाणिकपणे दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?


    ५) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता राजकारणात वापरली तर तो निव्वळ राजकारणाच्या बळावर दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?

    महिमा कशाचा ? पात्रतेचा की व्यवस्थेचा?

    मी पात्रता आणि लायकीबद्दल एवढेच म्हणेन की ज्यांना व्यवस्थेपेक्षा पात्रताच महत्वाची आहे असे वाटते; त्यांनी शेती करून आपली पात्रता/लायकी सिद्ध करून दाखवावे. स्वत:चा अनुभव आम्हाला सांगावा, इतरांचा  अनुभव आम्हाला सांगण्याचा कोडगेपणा अजिबात करू नये.


    वस्तुत: विद्वत्ता/लायकी/पात्रतेच्या बळावर या देशात अर्थप्राप्ती होते हे विधानच खोटे आहे.

    येथे लायकी नव्हे तर व्यवस्थेला महत्व आहे हो भाऊसाहेब......!

    - गंगाधर मुटे
    -------------------------------------------------------------------------------------------------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 27/06/2014 - 10:58. वाजता प्रकाशित केले.

    औंदाच्या शेतीमध्ये वरुणदेव चांगलेच रंग भरेल असे दिसायला लागले आहे. दिनांक १७ जुनला पाऊस हजेरी लावून जो गेला तो अजूनपर्यंत कामावर काही रुजू झालेला नाही. हवामानाच्या अंदाजाप्रमाणे ५ जुलैच्या आधी तो रुजू होण्याची शक्यता दिसत नाही.
    अकस्मात पाऊस निघून गेल्यामुळे कपाशीची लावण बिघडली आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी तातडीने तुषारसिंचन सुरू केले. काहींनी तडकाफ़डकी विकत आणले. पण यामुळे केवळ पिकाचे नुकसान कमी करता आले. आता हा वाढीव खर्च वाढल्याने नुकसान कमी होईल पण अतिरिक्त उत्पादन थोडेच वाढणार आहे? मग हा वाढीव खर्च कसा भरून निघणार? तो निघणारच नाही आहे. सिंचनामुळे जेवढे नुकसान कमी त्यात सिंचनावर केलेल्या खर्चाची भरपाई होईल. म्हणजे सिंचन करूनही पळसाला पाने तीनच!
    यंदा
    कोरडवाहू शेतकर्‍यांची हजामत बिनापाण्याने होईल आणि
    सिंचन करणार्‍यांची हजामत पाणी लाऊन होईल.......

    हजामत होणार ही काळ्या दगडावरची रेघच!

    तुषार सिंचन

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 08/07/2014 - 18:27. वाजता प्रकाशित केले.

    मी 950 किलोमिटरचा प्रवास करून पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीला आलो तर त्याने पण गाभारा सोडून निदान 4-5 पावले तरी बाहेर यायला नको होते काय?
    पण तो त्याची विट सोडायलाच तयार नव्हता. जागेवरून हललाच नाही. शेवटी मलाच जावे लागले त्याच्यापर्यंत!

    नाइन्साफी है ये। बहुत बडी नाइन्साफी है ये।।

    तक्रार कोणाकडे नोंदवू ?

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 13/07/2014 - 16:48. वाजता प्रकाशित केले.
                      गेल्या ४-५ दिवसापासून पावसाची कधी रिपरिप तर कधी सततधार सुरू आहे. हवा’मान’ खात्याचे सारे अंदाज खोटे ठरवीत पावसाने हवा'मान' खात्याला 'मान' खाली घालावयास भाग पाडलेले आहे. तशीही हवा’मान’ खात्याची ’मान’ फ़क्त ताप’मान’ वर्तवण्यापुरतीच ताठ असते. पर्जन्य’मान’ वर्तवताना त्यांचे अनु’मान’ नेहमीच ’मान’ पायाखाली दुमडून उताणे झोपत असते. त्यामुळे शेतकर्‍यांनी स्वत:च्या द’मानं’च घेतलेलं बरं! हवा’मान’ खात्यावर विसंबून आणि आपली ’मान’ हवा’मान’ खात्याच्या मांडीवर ठेवून शेतकर्‍यांनी आपला वर्त’मान’ बिघडवून घेण्यात काहीही अर्थ दिसत नाही.

                      बाहेर पाऊस पडत आहे आणि मी आतमध्ये बसून पेपर चाळत आहे. ’एल-निनो’ ’वृक्षतोड’ या संबंधित एकही बातमी दिसत नाही. कुत्री केकाटण्याचे जसे उत्तरा नक्षत्र असते तसेच ’एल-निनो’ ’वृक्षतोड’ सारखे शब्द उच्चारून केकाटणार्‍यांचे रोहिणी नक्षत्र असते. कधी-कधी पावसाचे आगमन लांबलेच तर ’एल-निनो’ ’वृक्षतोड’ च्या नावाने केकाटणेही थोडेफ़ार लांबत असते. मात्र एकदाचा पाऊस कोसळला की गाढवाच्या सिंगाप्रमाणे हे केकाटणारेही प्रसिद्धीमाध्यमातून गायब होऊन जातात.

                      पावसाचे आगमन लांबले तर त्याला पर्यायी काही उपाय सांगता आलेत तर ते सांगणे उपयोगाचे ठरू शकते पण हे तज्ज्ञ पर्याय सांगण्याऐवजी पाऊस लांबण्याची कारणमिमांसा व्यक्त करण्यात धन्यता मानतात. ज्याचा शेतीला आणि शेतकर्‍याला कवडीचाही उपयोग नसतो.

                      पाऊस किती पडला यापेक्षा तो कसा पडला, यावर शेतीचे पीकपाणी अवलंबून असते, हे साधेसुधे कोडे देखील आमच्या तज्ज्ञांना अजूनपर्यंत उमगलेले नाहीये. यांची भाषा अजूनही पावसाची वार्षिक सरासरी याभवतीच पिंगा घालत आहे. एखाद्या वर्षी पावसाची सरासरी काय होती, ती १००% होती, १५०% होती कि ५०% टक्केच होती यावर पीकपाण्याची-उत्पादनाची शक्यता ठरत नाही. एखादेवर्षी जर २०% किंवा ३०% च पाऊस पडला; पण तो जर थोडा-थोडा आणि नियमित कालावधीत पडत राहिला तरी कोरडवाहू शेतीमध्ये भरघोस उत्पादन येऊ शकते. याऊलट एखादेवर्षी १००% सरासरी पाऊस पडला पण कमी दिवसात/कमी कालावधीत मुसळधार पडला तर कोरडा किंवा ओला दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण होऊन शेतीच्या उत्पादनात प्रचंड घट येऊ शकते आणि नेमके एवढे साधे गमक सुद्धा अजूनपर्यंत हवामान तज्ज्ञांना गवसायचे बाकीच आहे. मुलभूत ज्ञानाचा पायाच जर अव्यवहार्यतेवर आधारला असेल तर कसले बोडक्याचे संशोधन करणार? अशा संशोधनाची आणि सल्याची उपयोगीता तरी काय असणार आहे?

    आणि म्हणूनच

    हवामान तज्ज्ञ शेतीच्या दृष्टीने शोकेसचे जिन्नस झाले आहे, असे वाक्य उच्चारले तर ते चुकीचे ठरणार नाही.

                                                                                                                        - गंगाधर मुटे
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 19/08/2014 - 20:35. वाजता प्रकाशित केले.

    दिनांक - १४-०७-१४ वेळ - २१.१८

    नमस्कार मंडळी,
    गेल्या २८ दिवसांपासून आकाशाकडे नजर करून आम्ही ज्याची आतुरतेने वाट पहात होतो त्या वरूणदेवाचे आमच्या गावात आगमन झालेले आहे.

    १० मिनिटे झालीत पाऊस सुरू होऊन. अंगणातील मोगरा पूर्णपणे चिंब भिजलेला आहे. कॉंक्रिटचे रोड, टीनाची पत्री ओली झाली आहेत. जमीनीवरची माती मात्र अजून ओली व्हायची बाकी आहे.
    बहुतेक त्याची प्रकृती ठीक नसावी किंवा सर्दीपडशाने नोझल्स बुजलेले असावे, असा आमचा गावठी अंदाज आहे.
    --------------------------------------------------------------------------------------------
    दिनांक - १४-०७-१४ वेळ - २१.२३

    जमीनीवरचा मातीचा पापुद्रा किंचितसा ओलसर करून तो आता थांबलेला आहे.

    --------------------------------------------------------------------------------------------
    वरुणदेव प्रसन्न व्हावा म्हणून अनेकांनी प्रार्थना केली. आखाडीच्या दिवशी बॅन्डबाजा लावून मिरवणूक काढली.
    मी मात्र अजिबात त्याला प्रार्थना/विनवणी करत नाही. आमचे सरकार भारतवासी असूनही आम्हा शेतकर्‍यांची प्रार्थना/विनवणी अजिबात ऐकत नाही. मग तो वरूणदेव तर परलोकी स्वर्गवासी आहे, मग तो तरी आमची प्रार्थना/विनवणी ऐकेल कशावरून? ऐकण्याची खात्रीच नाही मग कराच कशाला?
    --------------------------------------------------------------------------------------------
    दिनांक - १४-०७-१४ वेळ - २१.४९

    पुन्हा सुरू झाला आहे मात्र त्याची प्रकृती जैसे थे च आहे.
    --------------------------------------------------------------------------------------------
    दिनांक - १४-०७-१४ वेळ - २२.०१

    पुन्हा थांबला आहे. बहुतेक त्याला डुलकी आली असावी.
    --------------------------------------------------------------------------------------------
    दिनांक - १४-०७-१४ वेळ - २२.१२

    आता थेंब नाही पण कोरडाच गडगडायला लागला आहे. मात्र त्याला घशाचा सुद्धा त्रास असावा. आवाज पण दबका-दबका वाटत आहे.
    --------------------------------------------------------------------------------------------
    दिनांक - १४-०७-१४ वेळ - २२.३७

    बहुतेक वरुणदेव गाढ झोपला आहे. ह्या जगाचं जे व्हायचे असेल ते होऊ दे; आता मी तरी एकटाच कशाला जागू?
    --------------------------------------------------------------------------------------------
    गेली १४ वर्षे मी ज्या घरात राहायचो त्या घरात नेमका माझ्या झोपायच्या ठिकाणी पलंगावर तो कौलांमधून माझ्या अंगावर गळायचा. मग मी छताला बाटली किंवा डब्बा लटकवायचो.

    यंदा मागच्या महिन्यात मी नव्या RCC च्या घरात राहायला आलो. आता त्याला माझ्या अंगावर गळता यायचे नाही.
    कदाचित त्याला हेच आवडले नसावे.
    --------------------------------------------------------------------------------------------
    दिनांक - १५-०७-१४ वेळ - ००.५७

    वरुणदेव बेंबीवर अफ़ूची गोळी ठेवूनच झोपला असावा, असे दिसत आहे. त्याच्या निद्रेला कंटाळून आता तर आकाशही निरभ्र व्हायला लागलेलं आहे.
    --------------------------------------------------------------------------------------------
    दिनांक - १५-०७-१४ वेळ - ०८.०६

    वरुणदेवाने माझे फ़ेसबूक स्टेट्स वाचलेले दिसत आहे. मी लिहिलेलं त्याला बोचलं असावं. किंवा त्याला माझी कीव तरी आली असावी.
    मी रात्री वैतागून २ च्या सुमारास झोपी गेलो. पहाटे जाग आली तेव्हा वरुणदेव गरजत आणि बरसत होता. बहुधा ३.१० ते ३.२० च्या सुमारास तो हजर झाला असेल.
    अजूनही त्यााची रिपरिप सुरूच आहे. नोझल्समधील कचराही त्याने काढून घेतला असावा. पाऊस समाधानकारक आणि पीकपाण्यास योग्य असा झालेला आहे.

    थॅंक्स/धन्यवाद/शुक्रिया वरूणदेवा!
    --------------------------------------------------------------------------------------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 19/08/2014 - 20:37. वाजता प्रकाशित केले.

    भूसंपादन कायद्यात दुरुस्ती करून मोदी सरकार शेतकर्‍यांना पुन्हा एकदा पाताळात गाडण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्याच्या प्रयत्नात दिसत आहे.

    यूपीए सरकारने गाजावाजा करीत संमत केलेल्या भूसंपादन कायद्यात अनेक बदल करण्याचा प्रस्ताव केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने तयार केला आहे. यामध्ये पुनर्वसनार्थ प्रकल्पबाधित व्यक्तींच्या व्याख्येत बदल करण्यापासून ते खासगी व सार्वजनिक भागीदारीच्या प्रकल्पांसाठी 'ज्याच्या मालकीची जमीन आहे त्याच्या मान्यतेची अट शिथील करण्याच्या' प्रस्तावांचा समावेश आहे. हे विधेयक संमत झाल्यास शेतकर्‍याच्या शेतकर्‍यांच्या जमीनी बळकावणे सुलभ होणार आहे.

    केंद्रीय ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने विद्यमान भूसंपादन कायद्यात काही बदल सुचविण्यात आले आहेत, ते असे आहेत.

    *खासगी-सार्वजनिक भागीदारीतून प्रकल्प उभा राहात असल्यास ज्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत अशांपैकी किमान ७० टक्के जणांची पूर्व परवानगी आवश्यक असल्याची तरतूद विद्यमान कायद्यात आहे. तसेच प्रकल्प संपूर्ण खासगी स्वरूपाचा असेल तर हीच संख्या ८० टक्के इतकी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र आता खासगी - सार्वजनिक भागीदारीतून उभ्या राहणाऱ्या प्रकल्पासाठी मान्यतेची अटच नसावी वा ती संख्या ५० टक्क्य़ांपर्यंत आणली जावी, असे सुचविण्यात आले आहे.

    * मूळ कायद्यातील प्रकल्पबाधित व्यक्तींची व्याख्येचा पुनर्विचार करण्यात येईल.

    * भूसंपादन करताना भरपाई रक्कम अदा न केल्यास तसेच जमिनीचा ताबा वेळेत न घेतल्यास करार रद्द करण्याची तरतूद होती त्यामध्येही बदल सुचविण्यात आले आहेत.

    * * * * * *

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 19/08/2014 - 20:38. वाजता प्रकाशित केले.

    कवींची जात आणि इतर जाती यांच्यामध्ये खूप फरक आहे.

    एक कविता म्हणायची परवानगी दिली तर ३ कविता म्हणू पाहणारा, ५ मिनिटात आटपा म्हटलं तरी १५ मिनिटे होऊनही न थांबणारा, तरन्नूम नको म्हटलं तरी हमखास तरन्नूममध्येच सादर करू इच्छीणारा, मंडप खाली व्हायला लागला तरी माईक न सोडणारा प्राणी म्हणजेच कवी ना?

    कवीसंमेलनाच्या व्यासपीठावरील संचालक, कवी लोकांना जेवढ्या उद्धटपणे संबोधित करतो, तसे अन्य कुठल्याही व्यासपीठावर घडताना दिसत नाही.

    काही अपवाद कवी वगळता कवी इतका निर्लज्जम मनुष्य माझ्या पाहण्यात नाही.

    कुणाच्या पाहण्यात असेल तर कृपया मला सांगून माझ्या अज्ञानात भर घालावी, ही विनंती. Smile

    ---------------------------------------------------------------------------------
    @ कवी = कवी + गझलकार

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 19/08/2014 - 20:39. वाजता प्रकाशित केले.

    गेल्या १५-२० वर्षांमध्ये ६ लाखापेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केल्या आहेत; पण त्याची दखल साहित्यक्षेत्राने घेतलेली नाही किंवा त्याचे प्रतिबिंब काही साहित्यात उमटलेले नाही. शेतीतील गरिबीचे, ग्रामिण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मुल्यमापन करणारे एकही पुस्तक साहित्यक्षेत्रात उपलब्ध नाही, ही उणिव साहित्यक्षेत्रात राहिलेली आहे, हे सत्य आहे. शेतीच्या दुर्दशेचे कारण सांगताना शेतकरी आळशी आहे, त्याला तंत्रज्ञानाचा योग्य वापर करता येत नाही, तो अज्ञानी आहे, तो व्यसनाधिन आहे, यापलिकडे साहित्याला काही लिहिताच आले नाही.

    योग्य कारणाचा वेध घेऊन अभ्यासपूर्ण लेखन करण्यात साहित्यक्षेत्राने कुचराई केली ही पहिली चूक आणि जे लिहिले ते निखालस खोटे, अशास्त्रीय लिहिले ही दुसरी चूक.

    मी शाळेत शिकत असताना मी गावाच्या भकासपणाचे कारण शोधत होतो, एकही पुस्तक मला योग्य व समाधानकारक उत्तर देऊ शकलेलं नाही, त्यामुळे मराठी साहित्यविश्व परिपूर्ण नाही, हे विधान करताना मला अजिबात संकोच वाटत नाही.

    खैरलांजी प्रकरण झाले तर त्यावर शेकडोने पुस्तके लिहिली गेली. दिल्लीत एका मुलीवर बलात्कार होऊन खून करण्यात आला तर शेकड्यांनी पुस्तके लिहिली जातात, मात्र; लाखो शेतकर्‍यांच्या आत्महत्या दखल इतपतही साहित्यक्षेत्राला महत्वाच्या वाटत नाही. का? शेतकरी गरीब असतो म्हणून? की त्याच्याकडे पुस्तके विकत घेण्याची ऐपत नसते म्हणून? आणि जर हे कारण खरे असेल तर साहित्य म्हणजे समाजाचा आरसा आहे असे म्हणण्याला अर्थच काय उरतो?

    शेतकरी आत्महत्यांवर सर्वकष प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे आज एकही पुस्तक उपलब्ध नसणे ही बाब साहित्यक्षेत्राला लाजिरवाणीच म्हटली पाहीजे. त्यामुळे माफ़ करा; मी साहित्यक्षेत्राकडे फ़ारफ़ार आदराने पाहू शकत नाही.

    असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
    परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 19/08/2014 - 20:40. वाजता प्रकाशित केले.

    वास्तव हे वास्तव असते आणि ते अगदी वास्तवासारखंच असते.
    ते ऐर्‍यागैर्‍याच्या मर्जीनुसार ओबडधोबड नसते,
    ते कलाकाराच्या मर्जीनुसार सुबक अन रेखीव नसते,
    ते साहित्यकाराच्या मर्जीनुसार मनोरंजक नसते,
    ते कवीच्या मर्जीनुसार कल्पनातीत नसते,
    ते गझलकाराच्या मर्जीनुसार गोटीबंद नसते,
    .
    .
    ते केवळ वास्तव असते, जसं असते तसंच असते!!

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 19/08/2014 - 20:41. वाजता प्रकाशित केले.

    आज आमच्या घरी "मैत्रीदिनाच्या" निमित्ताने वृक्षारोपण सोहळा गृहमंत्री सन्माणणीय ना. सौ. उज्वलाताई मुटे यांच्या शुभ्रधवल हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाला त्यांच्या मंत्रीमंडळाचे सदस्य उपस्थित होते.

    friendship day

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 19/08/2014 - 20:42. वाजता प्रकाशित केले.

    मातीमोल भावाने विकण्यासाठी भारतातून इंडियाकडे जाणारे दहिदूध रस्त्यातच अडवून "गवळण रोको" आदोंलन करणारा आंदोलक शेतकरी नेता म्हणजे श्रीकृष्ण असे मानावे काय?

    तुम्हाला काय वाटते?
    ----------------------------------------------
    <<<< आम्हाला तरी दूधासाठी पैसे मोजावे लागतात....फुकट नाही मिळत >>>>

    - मातीमोलचा अर्थ फ़ुकट किंवा नि:शुल्क होत नाही. कारण मातीला काहीतरी किंमत असतेच.
    - विकत घेणे याचा अर्थ वस्तुचा योग्य मोबदला देणे असाही होत नाही.
    - एखाद्या वस्तूचे उत्पादन करायला येणारा खर्च भरून निघणार नाही आणि तो उत्पादक देशोधडीला लागत असेल तर ते त्या उत्पादकाचे केले जाणारे शोषणच असते.
    - उत्पादन खर्च आणि विक्रीमूल्य यांचा ताळमेळ न घालताच होणारा व्यवहार ही लूटच असते.

    १ लिटर दूध तयार करण्यासाठी दूध उत्पादकाला किती खर्च येत असेल याची कल्पना आहे का तुम्हाला? नक्कीच नसणार आणि असण्याचे कारणही नाही.
    ग्राहकाला प्रत्येक वस्तू स्वस्तात स्वस्त हवी असते. ग्राहकाला जे काही आवश्यक असते, ते सर्व त्याच्या बजेटमध्ये बसले पाहिजे ही त्याची भावना असते. त्यात गैर काही नाही. शिवाय उत्पादकांना संरक्षण देणे हे सुद्धा ग्राहकाचे नव्हे तर शासनाचे काम आहे.

    पण गंमत अशी आहे की, तुम्ही १ लिटर दूध घेतांना जी किंमत मोजता त्या किमतीने विक्रेता, वाहतूकदार, संबंधित संस्था यांचे तर ठीकठाक असते पण जो काही मार बसतो तो शेतकर्‍यालाच बसतो कारण १ लिटर दुधापोटी जे पैसे त्याला मिळतात त्यात त्याला घाटा येतो आणि दुधाचा व्यवसाय देखील त्याच्यासाठी बुडबाकीचा होतो.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 19/08/2014 - 20:46. वाजता प्रकाशित केले.

    थोडेसे विचित्र आहे पण सत्य असे आहे की, शेतकर्‍यांच्या घरात जन्म घेतलेला शेतकर्‍यांचा नेता होत नाही. शेतकर्‍यांचा नेता होणे किंवा शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कासाठी शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यात त्याला स्वारस्य नाही. या उलट शेतकर्‍यांना लुटून जगणे किंवा शेतकर्‍यांना लुटणार्‍यांच्या टोळीत सहभागी होऊन स्वत:चे जमवून घेणे, हे शेतकरी पुत्राला अधिक चांगले जमते.
    निदान गतकाळातला इतिहास तरी तेच सांगतो.

    शेतकर्‍यांवर आत्महत्येची वेळ का येते, या प्रश्नाचे तपशीलवार उत्तर शोधण्याची शिकून शहाणा झालेल्या आणि शेतकर्‍याच्या पोटी जन्म घेऊन उच्च शासकीय पदावर कार्यरत असणार्‍या शुद्रपुत्रांना अजिबातच गरज वाटत नाही, हाही इतिहास आहे.

    असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
    परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी

    वित्त आले की लढण्याचे सामर्थ्यही आपोआपच येईल, असा जोतीबांनी केलेला कयासही शेतकरीपुत्रांनी-शुद्रपुत्रांनी उताणा-उपडा-तोंडघशी पाडला. शूद्राचा पोरगा जेवढा अधिक शिकला तेवढा तो आपल्या इतर शेतकरी बांधवापासून दूर गेला आणि आत्मकेंद्रीत झाला असेच समीकरण दृग्गोचर झाले. संपूर्ण देशात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले पण हा उच्चशिक्षित शेतकरीपुत्र हादरला नाही, पाझरला नाही, विव्हळला नाही आणि पेटून वगैरे तर अजिबातच उठला नाही. शेतकर्‍याच्या जळणार्‍या चिता पाहतानाही तो ढिम्मच्या ढिम्मच राहिला.

    "एकजूटीची मशाल घेउनी पेटवतील हे रान" या साने गुरुजींच्या ओळी साकार करण्याचा शिकल्या-सवरल्या-शहाण्या आणि बर्‍यापैकी वित्तप्राप्ती केलेल्यांनी कधी प्रयत्नच केला नाही किंवा चुकून कधी त्या मार्गालाही शिवले नाहीत. कदाचित यात त्यांचा दोषही नसावा. जळत्या घरात आगीचे चटके सोसल्यानंतर त्या घरातल्या एखाद्याला त्या पेटत्या घरातून जर बाहेर पडायची संधी मिळाली तर तो स्वत:चा जीव मुठीत घेऊन जीवाच्या आकांताने पळत सुटतो. पुन्हा मागे वळून त्या घराकडे पाहण्याच्या फंदात पडत नाही किंबहुना मागे वळून त्या घराकडे पाहण्याची त्याच्यामध्ये इच्छाशक्ती उरलेलीच नसते. कदाचित अशाच तर्‍हेच्या सामूहिक मानसिकतेतून शेतीच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी झगडण्याऐवजी आहे त्या व्यवस्थेत स्वत:ला समरस करून घेण्याच्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून ही शिकली-सवरली शेतकर्‍यांची मुले "अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण" असे स्वनातही म्हणायला धजावली नसावीत.

    "किसान मजूर उठलेले, कंबर लढण्या कसलेले" असे दृश्य अनेकवेळा पाहायला मिळते पण लढण्यासाठी कंबर कसणार्‍यांमधे अशिक्षित आणि अर्धशिक्षित लोकांचाच जास्त भरणा असतो. उच्चशिक्षितांची संख्या मोजायला एका हाताची बोटे देखिल पुरेशी ठरतात किंवा तितकेही नसतात आणि असलेच तर ते लढण्यासाठी नव्हे तर लढणार्‍यांना हुसकावून लावण्यासाठी असतात, लाठ्या घालण्यासाठी असतात किंवा गोळीबाराचे आदेश देण्यासाठी असतात. आणि नेमका येथेच म. फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या "शिक्षणातून क्रांती घडेल" या तत्त्वाचा पराभव झाला असावा, असे समजायला बराच वाव आहे.

    पुढे वाचा >>>> http://www.baliraja.com/node/38

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 19/08/2014 - 20:52. वाजता प्रकाशित केले.

    4 महिन्यात 559 शेतकरी आत्महत्या

    फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या ४ महिन्यांच्या कालावधीत ५५९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे 85 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली..
    विधानपरिषदेत गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या मदतीवर चर्चा होती. त्याला उत्तर देताना पतंगराव कदम यांनी ही आकडेवारी जाहीर केली.
    हे सर्व शासकिय धोरणाचे बळी आहेत, म्हणून शेतकरी आत्महत्त्यांना शासकियबळीच म्हटले गेले पाहिजे.
    4 महिन्यात 559 शेतक-यांनी आत्महत्या केल्या असतील तर दिवसाला जवळपास तीन शेतक-यांनी आपले प्राण गमावलेत असा त्याचा अर्थ पण ...
    पण ही समस्या इतकी थोडी गंभीर आहे कि,.......
    - देश हादरून जावा,
    किंवा
    - सभ्य आणि सुशिक्षित समाजाला लांच्छनास्पद वाटून त्यांच्या माना खाली जाव्यात,
    किंवा
    - मुख्यमंत्र्यांची झोपमोड व्हावी,
    किंवा
    - पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू यावेत......

    अरे! यह करोडोका देश है. इस विशाल जनसंख्यावाले देश मे ५५९ का आकडा क्या मायने रखता है?
    चलो, इस बहाने आबादी तो घट रही है!
    .
    .
    है ना दोस्तो??????????
    -----------------------------------------------------------------------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 12/11/2014 - 17:03. वाजता प्रकाशित केले.

    मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अशक्य गोष्टीही साध्य करता येतात हे शेतीतही शक्य आहे असे प्रत्यक्ष धान, गहू, बाजरी, कापूस, सोयाबीनची शेती करून सिद्ध करणारा एखादा "यशस्वी मनुष्य" आम्हाला कुणीतरी दाखवा हो.
    अन्यथा
    "मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अशक्य गोष्टीही साध्य करता येतात" ही म्हण शेतकर्‍याच्या दृष्टीने चुलीत जाळण्याच्याच लायकीची आहे.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 12/11/2014 - 17:05. वाजता प्रकाशित केले.

    शेती भकास म्हणून शेतकरी भकास शेतकरी भकास म्हणून त्याचा गावही भकास.
    पण;

    शेतीसंबंधीत उद्योग/व्यवसाय करणारे व्यावसायिक भिकार्‍या शेतकर्‍याच्या तुलनेने भलेही गब्बर असतील, शेतकर्‍यांपेक्षा हजारपट श्रीमंत असतील पण बिगरशेती व्यावसायीकांच्या तुलनेने गरीब/दरिद्रीच आहेत, असे मला वाटते.

    शेतीसंबंधित साहित्य असो, राजकारण असो किंवा व्यापार असो... तो कधीच भरभराटीस आला नाही. धान्याचा व्यापार करणार्‍या एकाही व्यापार्‍याला किंवा शेतमालावर प्रक्रिया करणार्‍या एकाही उद्योजकाला मालमत्तेच्या बाबतीत टाटा-बिर्ला-अम्बानीची उंची गाठता आलेली नाही.

    अर्थात याविषयी मी पुरेपूर अभ्यास केलेला नाही, म्हणून हे माझे मत कच्चे आहे,
    कृपया दुरुस्त्या सुचवा.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 17/11/2014 - 00:46. वाजता प्रकाशित केले.
    !!!! #चिकित्सेचा_वार_रविवार !!!!
     
    शेतकऱ्यांच्या हितासाठी लढू पाहणाऱ्या प्रामाणिक व होनहार पण रस्ता चुकलेल्या कार्यकर्त्यांची चिकित्सा 
     
    नव्या दमाची, उत्साही, दृढ विचाराची आणि शेतीमातीशी नातं सांगणारी प्रामाणिक भुमीपुत्र शेतकर्‍यांसाठी काही करायला निघाली की मला भिती वाटायला लागते. शेती फायद्यात आणण्यासाठी त्यांना अनेक पर्याय दिसायला लागतात. त्यांच्या डोक्यात इतके नानातऱ्हेचे विचार येतात कि त्यापैकी एखादा मार्ग निवडला कि शेतीमध्ये दमदार जीवन जगता येऊ शकते, असा त्यांचा ठाम विश्वास असतो. 
    पण शेतीक्षेत्रात पावलोपावली इतकी जाचक तरतूद करून ठेवण्यात आली आहे की, खरं म्हणजे कुणालाच काहीही करता येत नाही. प्रचंड आशावादाच्या बळावर कार्य करत या भूमीपुत्रांची काही वर्ष निघून जातात. सरते शेवटी हाती काहीच लागत नाही. शेतकरी जिथे होता तिथे किंवा आणखी मागे गेलेला असतो. मात्र प्रामाणिक प्रयत्न करणार्‍या या भूमीपुत्रांची भर उमेदीची वर्षे मात्र त्याच्या आयुष्यातून निसटून गेलेली असतात. जवानीचा काळ निघून गेलेला असतो आणि या भूमिपुत्रांच्या हातून ना स्वार्थ साधलेला असतो, ना परमार्थ! हे लक्षात आले की तो खचून जातो, नाउमेद होतो आणि घेतला वसा टाकून देतो!
     
    आणि याचे कारण एकच कि फक्त रस्ता भटकल्याने त्यांना नेमक्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचता आलेले नसते.
     
    उत्पादन खर्चावर आधारित एककलमी रास्त भावाचा "नेमका" कार्यक्रम घेऊन लढणारे शेतकरी संघटनेचे सच्चे पाईक वगळता या राज्यात सलग ३५-४० वर्षे शेतीच्या हितासाठी झटणारे कोणीच समाज सुधारक, स्वयंसेवक, समाजकारणी, राजकारणी औषधाला सुद्धा आढळत नाहीत, त्याचे कारण इथे दडले आहे.
     
    जो पर्यंत शासकीय धोरण शेतीला अनुकूल होत नाही तोपर्यंत शेतकर्‍यांच्या भल्यासाठी इतरांना अश्रू ढाळण्याखेरीज काहीही करणे शक्य नाही आणि ज्या दिवशी शासकीय धोरण शेतीला अनुकूल होईल त्या दिवशी शेतकर्‍यांसाठी इतरांनी काही करण्याची गरजच भासणार नाही कारण थोडीजरी अनुकूल परिस्थिती तयार झाली तर गरुडझेप घेण्यास शेतकरी स्वत:च समर्थ आहे त्याच्या पंखात कुणी हवा भरून देण्याची आवश्यकताच पडणार नाही.
     
    म्हणून लाख दुखोकी एक दवा है ................ 
    शेतकर्‍यांना संघटीत करणे आणि शासकांच्या विरोधात दबावगट निर्माण करणे. अन्य काहीही मार्ग नाही. ...............
     
    क्यू न आजमाये ???????
     
    © गंगाधर मुटे
    ~~~~~~~~~~~~~~~
    https://www.facebook.com/gangadharmute/posts/2226760470681962
    दि. ११-११-२०१८

    शेतकरी तितुका एक एक!

  • हेमंत साळुंके's picture
    हेमंत साळुंके
    सोम, 17/11/2014 - 20:45. वाजता प्रकाशित केले.

    बळीराज्य आणणे अवघड नाही. हवेत केवळ प्रामाणिक प्रयत्न आणि मरेर्यंत शुध्द हेतूशी एकनिष्टता! आजपर्यंत शेतक-यांशी प्रत्येकजन बेईमान झालेलेच पाहिले आहे.

    हेमंत साळुंके

  • admin's picture
    admin
    सोम, 17/11/2014 - 21:01. वाजता प्रकाशित केले.

    तुम्ही म्हणता हे अगदी खरे आहे. पण त्यातही काही मातीशी इमान राखणारे पण आहेत.

  • admin's picture
    admin
    शनी, 06/12/2014 - 15:16. वाजता प्रकाशित केले.

    पोळा सणाच्या शुभमुहुर्तावर आज सकाळी-सकाळी एक आल्हाददायी शुभवार्ता आहे.
    आजच्या पुण्यनगरीत गझलनवाज श्री भिमराव पांचाळे यांनी आजच्या गझलसंवाद या सदरासाठी माझ्या गजलेची निवड केली.
    बहुत-बहुत शुक्रिया दादा!

    Bhimrao Panchale

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 06/12/2014 - 18:00. वाजता प्रकाशित केले.

    शेती भकास म्हणून शेतकरी भकास शेतकरी भकास म्हणून त्याचा गावही भकास.
    पण;
    शेतीसंबंधीत उद्योग/व्यवसाय करणारे व्यावसायिक भिकार्‍या शेतकर्‍याच्या तुलनेने भलेही गब्बर असतील, शेतकर्‍यांपेक्षा हजारपट श्रीमंत असतील पण बिगरशेती व्यावसायीकांच्या तुलनेने गरीब/दरिद्रीच आहेत, असे मला वाटते.
    शेतीसंबंधित साहित्य असो, राजकारण असो किंवा व्यापार असो... तो कधीच भरभराटीस आला नाही. धान्याचा व्यापार करणार्‍या एकाही व्यापार्‍याला किंवा शेतमालावर प्रक्रिया करणार्‍या एकाही उद्योजकाला मालमत्तेच्या बाबतीत टाटा-बिर्ला-अम्बानीची उंची गाठता आलेली नाही.
    अर्थात याविषयी मी पुरेपूर अभ्यास केलेला नाही, म्हणून हे माझे मत कच्चे आहे,
    कृपया दुरुस्त्या सुचवा.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 06/12/2014 - 18:03. वाजता प्रकाशित केले.
    नव्या दमाची, उत्साही, दृढ विचाराची आणि शेतीमातीशी नातं सांगणारी प्रामाणिक भुमीपुत्र शेतकर्‍यांसाठी काही करायला निघाली की मला भिती वाटायला लागते. शेतीक्षेत्रात पावलोपावली इतकी जाचक तरतूद करून ठेवण्यात आली आहे की, खरं म्हणजे कुणालाच काहीही करता येत नाही. प्रचंड आशावादाच्या बळावर कार्य करत या भूमीपुत्रांची काही वर्ष निघून जातात. सरते शेवटी हाती काहीच लागत नाही. शेतकरी जिथे होता तिथे किंवा आणखी मागे गेलेला असतो.
     
    मात्र प्रामाणिक प्रयत्न करणार्‍या या भूमीपुत्रांची भर उमेदीची वर्षे मात्र त्याच्या आयुष्यातून निसटून गेलेली असतात. जवानीचा काळ निघून गेलेला असतो आणि या भूमिपुत्रांच्या हातून ना स्वार्थ साधलेला असतो, ना परमार्थ! हे लक्षात आले की तो खचून जातो, नाउमेद होतो आणि घेतला वसा टाकून देतो!
     
    शेतकरी संघटनेचे सच्चे पाईक वगळता या राज्यात सलग ३५-४० वर्षे शेतीच्या हितासाठी झटणारे कोणीच समाज सुधारक, स्वयंसेवक, समाजकारणी, राजकारणी औषधाला सुद्धा आढळत नाहीत, त्याचे कारण इथे दडले आहे.
     
    जो पर्यंत शासकीय धोरण शेतीला अनुकूल होत नाही तोपर्यंत शेतकर्‍यांच्या भल्यासाठी इतरांना अश्रू ढाळण्याखेरीज काहीही करणे शक्य नाही आणि ज्या दिवशी शासकीय धोरण शेतीला अनुकूल होईल त्या दिवशी शेतकर्‍यांसाठी इतरांनी काही करण्याची गरजच भासणार नाही कारण थोडीजरी अनुकूल परिस्थिती तयार झाली तर गरुडझेप घेण्यास शेतकरी स्वत:च समर्थ आहे त्याच्या पंखात कुणी हवा भरून देण्याची आवश्यकताच पडणार नाही.
     
    म्हणून लाख दुखोकी एक दवा है ................ शेतकर्‍यांना संघटीत करणे आणि शासकांच्या विरोधात दबावगट निर्माण करणे.
    क्यू न आजमाये ???????
     
    - गंगाधर मुटे
    ----------------------------------------------------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 09/12/2014 - 15:50. वाजता प्रकाशित केले.

    राजकारण हा भारतिय माणसांचा स्थायीभाव असल्याने शेतकरी संघटनेत राजकारण घुसणे हे अपरिहार्य होते. पण संघटनेवर राजकारण वरचढ न होऊ देणे ही जबाबदारी संघटनेच्या पाईकांची होती. इथे संघटनेच्या पाईकांची शक्ती अपुरी पडली, असे मला वाटते.

    त्यामुळेच भविष्यात शेतकरी संघटनेला नेत्यांची नव्हे तर जीव झोकून देऊन कार्य करणार्‍या पाईकांचीच अधिक गरज आहे, असे मला वाटते.

    शेतकर्‍यांच्या घरात शेतकर्‍यांच्या पोटी शेतकर्‍यांसाठी लढणारा लढवैय्या नेता ज्योतिबा फ़ुल्यानंतर आजपर्यंत निर्माण झाला नाही, निदान यानंतर तरी जन्माला आला पाहिजे, अशी देवास प्रार्थना करणे सुद्धा गरजेचे आहे, असेही मनोमन वाटते. कारण ........

    ........ आपण शेतकर्‍यांच्या घरात शेतकर्‍यांच्या पोटी जन्म घेऊनही घरादाराची रांगोळी करून शेतकर्‍यांसाठी लढणारा लढवैय्या नेता आपल्यापैकी कुणीही बनायला तयार नाही, हे शतप्रतिशत खरे आहे. खरे ना?

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 20/12/2014 - 19:28. वाजता प्रकाशित केले.

    आज व्हाट्सअपवर प्रा. डॉ. सदानंद मोरे यांचे स्टेटमेंट वाचले. ते व्हाटसअपवर असल्याने त्यांचेच स्टेटमेंट आहे किंवा नाही याची खात्री नाही. पण जर खरे असेल तर हे सर्व "ज्ञानी महाभाग" शेतीविषयी बोलताना अर्धसत्यच का बोलतात, हेच मला कळत नाही.

    दुष्काळ हा निसर्गनिर्मित असला तरी शेतीला बसणारे दुष्काळाचे चटके मात्र मानवनिर्मित आहेत, हे यांना का कळू नये? शेतीसारख्या विषयावर बोलायचे असेल तर अभ्यास करायला काय अडचन असावी?

    शरद जोशींच्या २५ पुस्तकांपैकी फ़क्त २ पुस्तके जरी वाचली तरी प्रा. डॉ. सदानंद मोरे यांना बर्‍यापैकी जाणीव होऊ शकेल.

    शेतीच्या अर्थवादाचा अभ्यास करायचा नसेल तर माझी त्यांचेवर जबरदस्ती नाही पण; नको त्या विषयात नाक खुपसून आधीच जटील असलेला विषय आणखी जटील करण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्न मला पडतोच पडतो.

    - गंगाधर मुटे
    --------------------------------------------------------------------------------
    (पावसाची अनिश्‍चितता ही अनादी काळापासून आहे. नापिकी किंवा दुष्काळ हा काही नवीन नाही, याची जाणीव ठेवावी. नैसर्गिक आपत्तीमुळे उद्वेग करू नये. निराश न होता परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत. आपली शेती पावसावर अवलंबून आहे. कधी अपुरा पाऊस पडतो, तर कधी पडतच नाही. जेथे पाऊस पडतो तेथे पाणी वाहून जाते. 15व्या शतकामध्ये दुर्गा देवीचा भीषण दुष्काळ आला होता. संत तुकाराम महाराज यांच्या काळातही दुष्काळ पडला होता
    तत्त्वज्ञान सांगणे हे विचारवंतांचे काम मानले जाते; पण तत्त्वज्ञानाचे आचरण करणे अशा पंडितांना जमेलच असे नाही. भगवद्‌गीतेत कृष्णाने कर्मयोग तत्त्वज्ञान सांगितले आहे. महाभारतात अनेक ठिकाणी त्याचा विस्ताराने उल्लेख आला आहे. त्यात गूढवाद वा श्रद्धा नाही, तर ते पूर्णपणे बुद्धिवादी तत्त्वज्ञान आहे. कर्म करणे आपल्या हाती आहे. कर्माचे फळ आपल्या हाती नाही. कर्माचे फळ होण्यासाठी आणखी घटक लागतात, त्यावर आपले नियंत्रण नसते. महाभारतात श्रीकृष्णाने हा कर्मयोग स्पष्ट करताना शेतकऱ्याचेच उदाहरण दिले आहे. शेतकरी जमिनीची मशागत करतो. चांगले बियाणे, चांगले खत वापरतो. मेहनत करतो, आवश्‍यक ते सर्व काही बरोबर करतो; पण एखाद्या वर्षी पाऊस पडत नाही. पीक येत नाही, मोठे नुकसान होते; पण अशा स्थितीतही शेतकरी हताश होत नाही. तो पुन्हा पेरणी करतो. शेतकरी हा स्वभावतःच कर्मयोगी आहे, असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. शेती हा व्यवसायच असा आहे, की यश आपल्या हातात नाही. सर्व काही निसर्गावर अवलंबून आहे.
    दुष्काळे आटिले द्रव्य, नेला मान ।
    स्त्री एक अन्न अन्न करीता मेली ।।
    या शब्दात तुकोबांनी भोगलेल्या दुष्काळातील प्रसंग सांगितला आहे. दुष्काळ कुणाला चुकला नाही. तुकोबांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवावे. शेतकरी हा मुळातःच झुंझार असतो. निसर्गाशी लढण्याची ताकद अंगी असते. संकटाच्या काळात खचून न जाता, वाईट विचार न करता, श्रीकृष्णाने सांगितलेल्या कर्मयोगाचे आचरण करत ठामपणे उभे ठाकले पाहिजे. या अडचणीच्या काळावरही मात करता येईल. हे दिवसही जातील.
    - प्रा. डॉ. सदानंद मोरे,
    अध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य संमेलन.)

    शेतकरी तितुका एक एक!

  • admin's picture
    admin
    शनी, 10/01/2015 - 17:12. वाजता प्रकाशित केले.

    पंढरपूर : मंगळवेढ्यात कृषीक्रांती फार्मर्स ग्रुपने नंदनवन फ़ुलवल्याची व ढोबळी मिर्ची आणि काकडीचं पीक घेतल्याची एबीपी माझाची बातमी लक्षवेधी जरुर होऊ शकते पण महाराष्ट्रासमोर नवा आदर्श घालून दिला असल्याची भाषा ही चक्क दिशाभूल आहे.
    जोपर्यंत गहू, ज्वारी, धान, तूर, सोयाबिन, उडीद, कापूस वगैरे पीक घेऊन कोणी सर्व खर्च वजा जाता लाखो/करोडो रुपये निव्वळ नफ़ा मिळवून दाखवत नाही तोपर्यंत नवा आदर्श घातल्याच्या गप्पा ह्या केवळ वल्गनाच ठरतील. ढोबळी मिर्ची आणि काकडी हे काही देशभरातील बहुसंख्य शेतकर्‍यांच पीक नाहीये की इतरांनी असल्या आदर्शाचे अनुकरण करावे.
    समजा देशभरात अन्य सर्व पिकाऐवजी पूर्ण भारतभर काकडीचेच पीक घेतले तर काय होईल? मग एवढी काकडी कोण विकत घेणार? एवढ्या काकडीचे करणार तरी काय? आणि मग आयुष्यभर भात-पोळी ऐवजी सारेच नुसतीच काकडी व ढोबळी मिर्ची खाणार काय? शिवाय या आदर्शाचे अनुकरण करायचे म्हणून किंवा भरमसाठ नफ़ा मिळतो असे गृहित धरून देशभरात काकडी व ढोबळी मिर्चीची लागवड झाली तर मग भाव तरी मिळतील का? की समुद्रात नेऊन फ़ेकून द्यावी लागेल? मागणी पुरवठ्याचा सिद्धांताला असली आदर्शाची भाषा तरी कळते काय?
    कसला आदर्श नी कसलं काय!
    माझा आक्षेप बातमीला नाही फ़क्त आदर्श या शब्दाला आहे.


    - गंगाधर मुटे
    -------------------------------------------------------------------------------------------------

    http://abpmajha.abplive.in/maharashtra/2015/01/03/article467214.ece/Mangalvedha-success-story

  • admin's picture
    admin
    शनी, 10/01/2015 - 17:28. वाजता प्रकाशित केले.

    आला थंडीचा महीना, झटपट शेकोटी पटवा! (06/01/2015) — at Arvi Chhoti.

    Marotrao Chandankhede

  • admin's picture
    admin
    शनी, 10/01/2015 - 17:37. वाजता प्रकाशित केले.

    आदरणीय म्हात्रे सरांना ज्ञानश्री पुरस्कार
    पुरस्कार वितरण दि.11/01/2015
    सरांचे मनपूर्वक अभिनंदन...!

  • admin's picture
    admin
    बुध, 14/01/2015 - 00:03. वाजता प्रकाशित केले.

    "तीळ गूळ घ्या आणि गोडगोड बोला!"

    च्यायला! गोड बोलण्याच्या बदल्यात फ़ुकटात वाटायला तीळ आणि गूळच म्हणजे शेतमालच सापडतो व्हय?

    डिझेल, पेट्रोल, रॉकेल, टीव्ही, कॅमेरा, मोबाईल, चप्पल, शूज, टेबल, पंखा, घड्याळ, एसी, कूलर, बाईक, पुस्तके, सिलिंडर या पैकी संक्रांतीनिमित्त कुणीतरी फ़ुकटात वाटायला घेऊन या हो आमच्याकडे. बदल्यात आम्ही पण तुमच्याशी गोडगोड बोलू. Smile

    मी ठरवलंय. संक्रातीला तीळगूळ घ्यायचा नाही आणि संक्रांती संपल्याशिवाय गोड तर अजिबातच बोलायचं नाही!! 

    - गंगाधर मुटे

    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 15/01/2015 - 19:34. वाजता प्रकाशित केले.

    कृषिमंत्री

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 15/01/2015 - 19:36. वाजता प्रकाशित केले.

    Negative Subsidy

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 15/01/2015 - 19:37. वाजता प्रकाशित केले.

    http://www.youtube.com/attribution_link?a=XJ3k9OVY7Yw&u=%2Fwatch%3Fv%3Dp...

    अत्यंत दिशाभूल करणारी बातमी.
    इतका गणीताचा लवलेश नसलेला बेहिशेबी मनुश्य कदाचित हजार वर्षापूर्वी सुद्धा अस्तित्वात नसेल.
    जंगली अवस्थेतला किंवा आदिमानवच इतका निर्बुद्ध बेहिशेबी असू शकतो.
    म्हणे ८ एकराचा उत्पादन खर्च पन्नास हजार फ़क्त आणि साडेचार लाखाचा निव्वळ नफ़ा...!
    कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ना ते यालाच!! 

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 15/01/2015 - 19:41. वाजता प्रकाशित केले.

    "तीळ गूळ घ्या आणि गोडगोड बोला!"

    च्यायला! गोड बोलण्याच्या बदल्यात फ़ुकटात वाटायला तीळ आणि गूळच म्हणजे शेतमालच सापडतो व्हय?
    डिझेल, पेट्रोल, रॉकेल, टीव्ही, कॅमेरा, मोबाईल, चप्पल, शूज, टेबल, पंखा, घड्याळ, एसी, कूलर, बाईक, पुस्तके, सिलिंडर या पैकी संक्रांतीनिमित्त कुणीतरी फ़ुकटात वाटायला घेऊन या हो आमच्याकडे. बदल्यात आम्ही पण तुमच्याशी गोडगोड बोलू.  Smile

    मी ठरवलंय. संक्रातीला तीळगूळ घ्यायचा नाही आणि संक्रांती संपल्याशिवाय गोड तर अजिबातच बोलायचं नाही!!

    - गंगाधर मुटे
    ------------------------------------------------------------------------------------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 17/01/2015 - 04:06. वाजता प्रकाशित केले.

    Buldana

         आज कवी संमेलनात भाग घेण्यासाठी बुलडाण्याला जात आहे.

      वर्धेत गझलरंगचा गझलमुशायरा कार्यक्रम होतो आहे, हे आजच कळले. आधी कळले असते तर मी बुलडाण्याच्या कवी संमेलनाचे निमंत्रण स्विकारले नसते. इथेच वर्धेला गझल ऐकण्याचा आनंद लुटता आला असता. काव्याचा आनंद घेण्यासाठी ५०० किमी जायची गरज नव्हती.

         आता पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे वर्धेत उपस्थित राहून दिग्गज गझलकारांच्या गझलेचा आनंद घेता येणार नाही याची खंत वाटत आहे.

         १७ जानेवारी हा फ़ारच भाग्यवान दिवस दिसतो. या दिवसाला असे काय ऐतिहासिक महत्व आहे माहीत नाही पण आज एकाच दिवशी जालना, बुलढाना, उमरखेड येथे साहित्य संमेलने तर डोंबीवली आणि वर्धा येथे गझलमुशायरा आहे. कदाचित ही यादी यापेक्षाही मोठी असू शकेल.

    साहित्यिकांना फ़ारच चांगले सोन्याचे दिवस येत आहे असे दिसते.

           मात्र यातून मराठी साहित्याला चांगले दिवस येतील की त्याऐवजी साहित्यिकांच्या कळपांच्या संख्येत वाढ होईल, हे सांगणे कठीण आहे. मी या क्षेत्रात नवीन आहे. अजून अभ्यास व्हायचा आहे व अनुभव यायचा आहे, त्यामुळे सध्यातरी माझ्यासाठी या प्रकारावर भाष्य करणे कठीण आहे.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 20/01/2015 - 18:41. वाजता प्रकाशित केले.

    चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी लागू होत असल्याची बातमी वेदनादायी आहे. वर्ध्याच्या पाठोपाठ आता चंद्रपूरचा नंबर लागला आहे.

    हा निर्णय अत्यंत अविवेकी आणि भित्रेपणाचा आहे. मी शासनाचा निषेधच नव्हे तर धिक्कार करत आहे......!!

    वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेनेच असे कोणते पाप केले आहे की केवळ त्यांनाच ही सजा दिली जात आहे? मी कधीही मद्यपान करत नाही पण इतरांची/माझ्या शेजार्‍यांची निष्कारण होत असलेली गळचेपी बघून मी असूरी आनंद मिळवू शकत नाही.

    दारू जर वाईट असेल तर पूर्ण देशात दारुबंदी लागू करण्याचे धाडस दाखवावे. कोणतेही शासन भित्रेच असते आणि संपूर्ण देशात दारुबंदी करण्याचा निर्णय घेण्याची कोणत्याच शासनाची ऐपत नसते म्हणून असे बौध्दीक दिवाळखोरी प्रदर्शित करणारे निर्णय शासनाकडून घेतले जातात,

    देशात शासनाकडून सर्वांना वागणूक समानच मिळाली पाहिजे. केवळ त्या जिल्ह्यात थोर पुरुष जन्माला आले किंवा वास्तव्य होते, या कारणासाठी त्या जिल्ह्यापुरता निर्णय घेण्याचे काहीही औचित्य तर नाहीच उलट त्या महापुरुषांना संकुचित भौगोलिक प्रदेशात बंदिस्त करून ठेवण्यासारखे आहे.

    ज्यांना स्वत: दारु पिणे आणि दुसरा पितांना पाहणे जर आवडत नसेल तर पूर्ण देशात दारुबंदी करण्याची त्यांनी मागणी केली पाहिजे. पण जर अशा दारुबंदी समर्थकांची दारुबंदीची भाषा जर केवळ विशिष्ट भौगोलिक प्रदेशाकरिता असेल तर अशा सर्व "पोटदुख्या" व "जळकुकड्यां"साठी एक वेगळा "दारुमुक्त" जिल्हा निर्माण केला जावा आणि त्यांचे त्या जिल्ह्यात सरकारी खर्चाने सन्मानजनक स्थलांतरण व पुनर्वसन केले जावे, अशी मी एक नवी मागणी करत आहे. Wink

                                                                                                                                   - गंगाधर मुटे
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
     

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 24/01/2015 - 20:03. वाजता प्रकाशित केले.

    १९८० पासून शेतीक्शेत्रात काही अत्यंत क्रांतीकारी बदल झाले आहेत. काही बाबतीत उलटापालट झाली आहे.
    उदा.
    भारतात मनुष्य
    पुरुषांमध्ये सर्वात जास्त कष्ट करणारा शेतकरी पुरुष
    महिलांमध्ये सर्वात जास्त कष्ट करणारी शेतकरी महिला
    हेच उरले आहेत.
    तर
    प्राण्यामध्ये सर्वात जास्त कष्ट वाट्यास येणारा शेतीतला बैल हाच प्राणी आहे.
    अनेक कारणामुळे इतरांचे कष्ट कमी झाले आहेत.
    हे खरे आहे का? तुम्हाला काय वाटते? 

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 24/01/2015 - 20:12. वाजता प्रकाशित केले.

    प्राण्यामध्ये जास्त कष्ट करतो बैल
    अन्न पिकवतो बैल
    मरमरमरतो बैल
    आणि
    कौतुक व पूजा होते गाईची
    .
    .
    .
    उलटी गंगा वाहे, पूर आकाशी आला
    एकाएकी नावेमध्ये समुद्र बुडाला
    से संत एकनाथ महाराजांनी भारुडात भविष्यकथन करून ठेवले आहे.


    ते या संदर्भात सुद्धा लागू पडते काय हो!  Smile

    ----------------------------------------------
    २२/०२/२०१५ ची फेसबूक पोस्ट

    वर्ल्ड कप लोणच्या सारखाच असतो.

    माणसाची पहिली भूक अन्नाची असते. ज्यांच्या आयुष्यात अन्नाची भ्रांत हा शब्दच नसतो व अन्नाची समस्या ही समस्याच राहिलेली नसते तेव्हा अशा माणसांना अन्नाव्यतिरिक्त अनेक तर्‍हेच्या भूका लागायला लागतात.

    मग स्वत:चे अन्य चोचले पुर्ण करून घेताना वर्ल्ड कपचा देखील लोणच्या सारखाच उपयोग होतो.
    अन्नाची अजिबात भ्रांत नसलेले चिक्कार लोक ग्रामिण भागात सुद्धा आहे. मी गेल्या ३० वर्षापासून क्रिकेट पाहतच आहे. हा खेळ माझ्या आवडीचा आहे.

    ज्यांची अन्नाची समस्या सुटलेली नाही ते कोणताच खेळ पाहात नाहीत, हे दुर्दैव आहे.
    मी खेळाचा विरोधक नाही, समर्थकच आहे. पण सामाजिक वास्तव आहेच तसे त्याला पर्याय नाही.
    खेळाने उर्जा मिळते. खेळ बघण्याने उत्साह येतो व आनंद मिळतो. पण ही उर्जा फ़क्त काही टक्के लोकांच्याच वाट्याला येते, ही दु:खद बाब आहे.

    सर्वांची म्हणजे १०० टक्के लोकांची अन्नाची भ्रांत मिटावी व तमाम जनतेला खेळातून उर्जा मिळवण्याइतपत उसंत मिळावी, अशी अपेक्षा आहे.
    -----------------------------------
    ०६/०३/२०१५ ची फेसबूक पोस्ट

    हिरव्यांना हिरव्या रंगाच्या
    निळ्यांना निळ्या रंगाच्या
    भगव्यांना भगव्या रंगाच्या
    गुलाबी हृदयांना
    गुलाबी रंगाच्या
    महाभयंकर शुभेच्छा.!!
    * * *
    बाकी उरलेल्यांना
    तिरंगी व सप्तरंगी
    मनपूर्वक शुभेच्छा..!!
    - गंगाधर मुटे
    ----------------------------------------
    बुरा ना मानो होली है!
    ----------------------------------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 30/01/2015 - 23:49. वाजता प्रकाशित केले.

    विदर्भ राज्य आंदोलन समितीची जनजागरण यात्रा

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 08/03/2015 - 23:24. वाजता प्रकाशित केले.

    Punynagari

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 09/03/2015 - 13:29. वाजता प्रकाशित केले.

    गोवंश हत्त्या

    * * *

    गोवंश हत्याबंदी कायदा म्हणजे शेतकर्‍यावरची ’साडेसाती’

    केंद्रात व राज्यात सत्ताबदल झाला आणि नव्या सरकारांनी एकापाठोपाठ एक शेतकरीविरोधी धोरणांची अंमलबजावणी सुरू केली. कांदा आणि बटाट्याला जीवनावश्यक वस्तू यादीत घातले, शेतकर्‍यांना आयुष्यातून उठवून देशोधडीस लावण्याची विकृत क्षमता असलेला भुसंपादन व अधिग्रहण कायदा दुरुस्ती केली आणि त्याच सोबत तब्बल १९ वर्षांपासून रखडलेल्या गोवंश हत्या बंदी लागू करून शेतकर्‍याला पूर्णत: नागडे करण्याचा चंगच बांधलेला दिसत असल्याने मोदी सरकार म्हणजे शेतकर्‍यांसाठी ’साडेसाती’ ठरू पाहत आहे.

    गाय, बैल वा या प्रजातीतील गुरे आजारी किंवा वृद्ध झाल्याचे कारण करून कत्तल करण्यासाठी विकणाऱ्यांना व विकत घेणाऱ्यांना पाच वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. याशिवाय गोवंश हत्या करणाऱ्यास कठोर शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली आहे त्यामुळे आधीच आर्थिकस्थितीने घायकुतीस आलेल्या शेतकर्‍यांनी लेकराला चड्डी घेतली नाहीतरी चालेल पण भाकड जनावरांना पोसण्याचे व सांभाळण्याचे काम करावेच लागणार आहे. शहरी धर्ममार्तंडांनी गोपूजनाच्या गोलमाल गोष्टी सांगायच्या आणि तिला पोसायचे ओझे मात्र शेतकर्‍याने घ्यायचे अशी व्यवस्था निर्माण होणार आहे.

    गोवंश हत्या बंदी कायदा चांगला कि वाईट यापेक्षा शेतकर्‍यावर आणखी फ़ालतू खर्चाचा बोझा वाढणार आहे, हेच शेतकर्‍यांचे मुख्य दुखणे ठरणार आहे.

    भाकड जनावरे पोसण्याचा भुर्दंड शेतकर्‍यावर पडू नये म्हणून सरकारने खालीलप्रमाणे तातडीने निर्णय घ्यावे;

    १) सर्व भाकड जनावरे शेतकर्‍याकडून बाजारभावाने खरेदी करण्याची व्यवस्था करून गोप्रेमींकडे पालन-पोषण करण्यासाठी सुपूर्द करावीत.

    २) भाकड जनावरांची शिरगीनती करून भाकड जनावरांना ’पेन्शन’ योजना सुरू करावी. तसे केल्यास भाकड जनावरे सांभाळण्याचा भुर्दंड शेतकर्‍यावर पडणार नाही.

    सरकारने काहीही उपाययोजना न केल्यास शेतकरी भाकड जनावरे मोकाट सोडून देतील. या मोकाट जनावरांचा उपद्रव शेतशिवारासोबतच नागरी वस्तींनाही होईल. अशा मोकाट जनावरांची चारापाण्याची व्यवस्था न झाल्यास या जनावरांचे अन्नावाचून कुपोषण होऊन ते अल्पावधीच मृत्यूमुखी पडतील. किंवा अशी मोकाट जनावरे चोरूनलपून कत्तलखाण्यात पोचतील व कसाबांचा धंदा आणखी तेजीत येईल.

    योग्य उपाययोजना न झाल्यास हा गोवंश हत्या बंदी कायदा म्हणजे शेतकर्‍यासाठी आणि गोवंशासाठी ’साडेसाती’ ठरणार आहे, हे सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.

    - गंगाधर मुटे
    -----------------------------------------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 31/03/2015 - 23:39. वाजता प्रकाशित केले.

    विज्ञान -अध्यात्म, जुनं - नवं, सनातनी - पुरोगामी, ज्ञानी - अज्ञानी, श्रद्धा - अंधश्रद्धा, डावा - उजवा अशा अथवा तत्सम अशा तर्‍हेच्या कोणत्याही भेदाभेदात मी स्वत:ला गुरफ़टून घेत नाही.

    स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्यासाठी उपयोगाचे असेल ते सारेच मला हवेहवेसे असते. Wink Smile Bigsmile

    - गंगाधर मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 02/04/2015 - 13:40. वाजता प्रकाशित केले.

    गजलगंधर्व सुधाकर कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या नव्या गजल अल्बमची ही नवी टीम.

    Album

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 09/04/2015 - 22:22. वाजता प्रकाशित केले.

    गारपिटीच्या अंगसंगाने गर्भपातल्या रानी
    अश्रू होऊन हवेत विरले पाटामधले पाणी

    - गंगाधर मुटे ’’अभय”
    ==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=

    Garpith

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 09/04/2015 - 22:27. वाजता प्रकाशित केले.

    किसी इन्सान को
    रोटी खिलाकर
    आप एक दिन के
    लिए उसका पेट
    भर देंगे!

    उसी इन्सान को
    रोटी कमाने का तरिका
    बताने के लिये
    आप लंबा चौडा भाषण भी
    ठोक देंगे!

    लेकिन....

    अगर वह कोई काम
    करता है, तो उसका उचित
    मुबावजा देना आप कतई
    स्विकार नही करोगे..!
    आपको उसका पसिना
    सस्ते मे चाहिये...!!
    चाहे वह भुखा मरे
    या
    सुसाईड करे....!!!

    है ना? जरा अपने गिरेबानमे झांककर
    तो देखिये भाईसाब,
    कही मै गलत तो नही लिख बैठा??

    - गंगाधर मुटे
    ----------------------------------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 09/04/2015 - 22:34. वाजता प्रकाशित केले.

    Mushayara

    Mushayara

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 09/04/2015 - 22:38. वाजता प्रकाशित केले.

    modi
    --------------------------------------------
    अरे, ह्या मोदीभाऊला कोणी तरी सांगा रे की
    * शेतकर्‍यांना सक्षम करणे बॅंकाच्या हातात नाही.
    * बॅंका वाढीव वित्तपुरवठा करू शकतात; व्यवसाय फ़ायद्याचा करणे बॅंकांच्या हातात नाही.
    * मात्र बॅंका सक्तीची कर्जवसूली करून शेतकर्‍यांना देशोधडीस लावू शकतात.
    * बॅंका कर्जवसूली करताना शेतकर्‍यास अपमानास्पद वागणूक देवून शेतकर्‍यांना आत्महत्तेस बाध्य करू शकतात.
    * वित्तपुरवठा वाढल्याने नैसर्गीक आपत्ती न आल्यास उत्पादन वाढू शकते पण उत्पन्न वाढेल याची खात्री नसते.
    * शेतकरी मुळत: उत्पादक आहे. शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी भरपूर शक्यता असल्याने व उत्पादन वाढीसाठी जीवाचा आटापिटा करणारी जनुके त्याच्या रक्तात जन्मजातच असल्याने तो मिळेल तेवढे कर्ज काढण्यास कायमच उत्सूक असतो. पण जर शेतमालाचे भाव गडगडले तर "स्मशानघाट दूर नसतो"
    * शेतकर्‍यांना सक्षम करणे न करणे, हा विषय केवळ, फ़क्त आणि फ़क्त शासनाच्याच अखत्यारीत येतो.
    अरे, जारे कुणी तरी! आणि समजावून सांगा जरा त्या मोदीभाऊला ....!!

    - गंगाधर मुटे
    --------------------------------------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 09/04/2015 - 22:45. वाजता प्रकाशित केले.

    मुंबई येथून प्रकाशित होणार्‍या उर्दू टाइम्स दैनिकात रविवारी माझा अनुवादित लेख प्रकाशित झाला आहे. माझ्या लेखाचा अनुवाद प्रा. डॉ. ज़िया ताजी यांनी केला आहे.
    माझा लेख उर्दूमध्ये अनुवादित होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने याला विशेष महत्व आहे.
    धन्यवाद प्रा. डॉ. ज़िया ताजी साहेब!

    urdu

    urdu

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 11/04/2015 - 20:45. वाजता प्रकाशित केले.

    मी RCC च्या घरात दुसर्‍या मजल्यावर निवांत बसलेलो आहे.

    बाहेर वादळाने असामान्य वर्तणूक सुरू केलेली आहे.

    गराडाने गरुडझेप घेत गडबड सुरू केलेली आहे.

    हवा गार वाटत आहे कदाचित गारपिठीचे आगमन होऊ शकते.

    पण;

    मी निश्चिंत आहे. असले किरकोळ बदल RCC च्या घराला धक्का लावू शकत नाही अर्थात माझे फ़ारसे वाकडे होण्याची शक्यता नाही.

    मात्र;

    ज्यांची घरे RCC ची नाहीत त्यांचे काही खरे नाही. त्यांची घरटी उध्वस्त होऊ शकतात. आयुष्य देशोधडीला लागू शकते.

    तात्पर्य एकच;

    याला निसर्गाचा कोप म्हणणे चक्क मुर्खपणा आहे. हा केवळ "RCC चे घर असणे किंवा नसणे" एवढाच फ़रक आहे. दोष निसर्गाचा नसून मानवनिर्मित सुल्तानी व्यवस्थेचा आहे.

    जर काही उद्या अघटीत घडलेच तर इतरांची घरे RCC ची व्हावीत, यासाठी प्रयत्न करण्चाचा प्रयत्न करेन. त्यासाठी एकमेव उपलब्ध असलेला पर्याय "शेतमालाला रास्त भाव" हा लढा लढण्यासाठी आणखी जोमाने स्वतःला राजी करेन.

    उगाच त्यांचेप्रती निष्कारण कणव दाखवून आसू ढाळत बसणार नाही.

    त्यांच्यासाठी धोतर, लुगडे, धोंगडे वगैरे देण्याचे किंवा तत्सम कोणतेही प्रकार करणार नाही, कारण मला "थोर पुरुष" बनायचे नाही अथवा पद्मश्री मिळवायची नाही.

    - गंगाधर मुटे
    ---------------------------------------------------------------------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 23/04/2015 - 19:50. वाजता प्रकाशित केले.

    Facebook

    शेतकरी तितुका एक एक!

  • admin's picture
    admin
    रवी, 10/05/2015 - 11:20. वाजता प्रकाशित केले.

    आजच्या लोकसत्तेत रानमेवा प्रकाशन सोहळ्याचा फ़ोटो.

    Loksatta

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 16/05/2015 - 21:54. वाजता प्रकाशित केले.

    विषय वैविध्याचा विचार करता आजची गझल खूप दर्जेदार आहे. गंगाधर मुटे नावाचे विदर्भातील कवी गझल सारख्या विलक्षण काव्य प्रकारातून शेती, शेतकरी, त्यांचे प्रश्न, शेतकर्‍यांचे शोषण, शासकीय धोरण असे विषय सातत्याने लिहून गझल या प्रकाराची वेगळीच ओळख निर्माण करताहेत. फक्त शेती आणि शेतकरी हा विषय किती वेगळ्या प्रकारे गझलेतून मांडता येतो हे गंगाधर मुटे यांची गझल वाचल्यावर कळते.
    ***********
    (दिनांक १० मे २०१५ च्या अग्रोवनने पान १३ वर प्रकाशित झालेली कमलाकर आत्माराम देसले यांची मुलाखत )

    नव्या जगातला खरा कुबेर शेतकरी असायला हवा.

    1) आपला लेखन प्रवास...

    मी कुणब्याचा मुलगा . माझे वडील आत्माराम (बाबा) डोंगर देसले हे शेतकरी. झोडगे ता. मालेगाव ( नाशिक) हे आमचे गाव . आमच्याकडे चारपाच एकर शेती , आणि तीही कोरडवाहू . आम्ही ज्या गावात रहातो त्या भागाला ' माळमाथा ' असे म्हटले जाते.आमचे गाव उंचीवर म्हणजे माथ्यावर आहे. म्हणून माळमाथा . पावसाचे प्रमाण फार नाही. अधून-मधून दुष्काळ ठरलेला. माझ्या लहानपणी पडलेले दुष्काळ मला स्पष्ट आठवतात. पैकी सर्वात भयानक दुष्काळ बहात्तरचा . या काळात घरातील धान्य संपले होते. ज्वारी - बाजरी उसनवार मिळायची , पण देणार्‍याकडेच संपली म्हटल्यावर कसे मिळणार धन्य ? सरकार रेशन दुकानावर ' अडगर ' नावाची निकृष्ट लाल ज्वारी शेतकर्‍यांना पुरवत होते. बेचव अशी ती अडगरची भाकरी नको वाटायची , पण पोट भरण्यासाठी खावी लागायची. मध्येच कधी बाजरीची भाकर मिळाली की अमृत मिळाल्याचा आनंद व्हायचा. वडील शेतीसोबत शिलाइकाम करत. आई घरकाम आणि शेतात जायची . चार भाऊ दोन बहिणी असा मोठा परिवार .
    श्रम हाच आई-वडिलांचा श्रीराम होता. बाबांना वाचायची खूप आवड होती.आई निरक्षर आहे , पण प्रतिभावंत आहे.जात्यावर पहाटे पहाटे खंडी-खंडी दळण दळतांना ती अहिराणी भाषेतल्या ओव्या गायची.

    अस्तुरी जलम देव घालून चुकना
    सकाय उठूनी बैल घानीले जुपना

    स्त्रीच्या वेदनेचा उद्घोष करणार्‍या अशा अनेक अर्थपूर्ण आणि वाङयीन मूल्य असणार्‍या ओव्या ती गायची. ( असे काहीतरी आपण वाङ्ग्मयीन मूल्य असणारी कविता आपण गातो हे आईच्या गावीही नसायचे.) दुपारी जेव्हा ती दळायची तेव्हा आम्ही तिच्या मांडीवर डोके ठेवून पाहुडायचो. जात्याची लयबद्ध घरघर नि आईच्या गळ्यातून ओवी ऐकायचो . आईच्या ओव्यांची लय नकळत मनात , हदयात कशी झिरपली कळलेच नाही. १९८५ साली जेव्हा कविता सुचू लागली तेव्हा कळले की कवितेचा अनुग्रह आईकडून आपल्याला मिळाला आहे. आणि वाचनाचा अनुग्रह बाबांकडून .

    नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात दरवर्षी होणार्‍या साहित्यिक मेळाव्याला मी जावू लागलो. सटाण्याच्या साहित्यायन संस्थेच्या एक दिवशीय साहित्य समेलनाला मी अनेक वर्ष नियमितपणे जात आलो. या दोन संस्थांनी लिहिणारा म्हणून मला ओळख दिली. नाशिक मेळाव्यात कुसुमाग्रजांसारखा महाकवी सहजपणे समोर बसून आम्हा नव्यांच्या कविता ऐकायचे. शाबासकी द्यायचे . हे आठवले तरी खूप भरून येते. प्राचार्य म.सू.पाटील यांनी सटाण्याच्या समेलनात कविता ऐकल्यानंतर पाठीवरून हात फिरवून ' तू छान लिहितोस , पण छान लिहिण्याला शेवट नसतो . कवितेला जीवनाची साधना समजून लिही.' असे सांगून आजपर्यंत आणि इथून पुढे पुरेल इतके बळ दिले . मी लिहू शकतो हा विश्वास दिला . आणि मी अखंडपणे लिहिता राहिलो. चेतश्री प्रकाशनाचे वा. रा. .सोनार यांनी माझ्या ' ज्ञानिया तुझे पायी ' हा अभंगांचा संग्रह काढला. त्याला गो. नी. दांडेकरांनी आशीर्वाद लिहिलेत. अनुष्टुभ , कवितारती सारख्या दर्जेदार अंकातून कविता छापून आली. मला माझा सुर गवसत होता. कविवर्य खलील मोमीन यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन मला कवितेच्या प्रवासात लाभले. डॉ. तुषार चांदवडकर यांच्या कुसुमाग्रज प्रकाशनातर्फे ' काळाचा जरासा घास ' हा गझल संग्रह प्रकाशित झाला. गझल नवाज भीमराव पांचाळे यांसी प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे. कवितेला जीवनदर्शनाची साधना समजून सतत लिहत आहे. तत्वज्ञान , संत साहित्य मला आवडते. वैचारिक गद्य मी सतत लिहत असतो.

    2 ) मराठी कवितेची, गझलेची सद्यस्थिती, वाटचाल या विषयी काय सांगाल? आपले आवडते कवी, गझलकार यांच्या विषयी..

    काळ ही सर्वात प्रवाही घटना आहे. काळासोबत सर्व काही बदलत असते. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. साहित्यालासुद्धा हा नियम लागू पडतो. प्राचीन साहित्य , मध्ययुगीन साहित्य आणि अर्वाचीन साहित्य यात कालौघात बदल होत गेले. संतांची कविता , पंतांची कविता , शाहीरांची कविता हे सगळे बदलाचे टप्पे आहेत . केशवसुतांनी आणि त्यांच्या समकालीन कवींनी कवितेला आधुनिक केले. विषय आणि अभिव्यक्ती या दोन्ही अंगाने कविता विकसित होत गेली. तीचे हे विकसित होणे आजही चालू आहे. विकासाच्या प्रक्रियेत नवे शिरते तसे सनातन असे चांगले कायम शिल्लक राहते.

    कविता आजही मोठ्या प्रमाणात लिहिली जाते आहे. शिक्षणातून ( पाठ्यपुस्तकातून ) हळूहळू वृत्तकविता तिचे व्याकरण गायब होते आहे. ही फार नुकसानकारक गोष्ट आहे. पुढे पुढे पाठ्यपुस्तकातून छंदोबद्ध कविता तिचे व्याकरण जर शिकवले गेले नाही तर नव्या लिहिणार्‍यांना कवितेचे अंकुर कसे फुटतील ? स्वाभाविक आणि प्राकृतिक प्रेरणेने कवितेचे वृत्त , छंद जीवंत रहातीलच. छंदोबद्ध , वृत्तबद्ध कविता लिहिली जाईलच. पण तिचे प्रमाण कमी असेल . कवितेच्या सृजनशीलतेसाठीतरी पाठ्यपुस्तकातून छंद , वृत्त हद्दपार होवू नयेत .

    अलीकडे मुक्तछंद या प्रकारात कविता लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय दर्जेदार मुक्तछंद लिहिला जातो आहे. नव्या प्रतिमाविश्वासह नवे कवी सकस कविता लिहीत आहेत. मात्र दुर्बोधतेमुळे कवितेचा आस्वाद घेणेही कमी होतांना दिसते आहे. कविवर्य सुरेश भट यांनी खांद्यावर घेतलेली गझलेची पालखी मात्र अनेक समर्थ खांदे पुढे नेत आहेत. वेगळा विचार म्हणजे ' खयाल ' हा गझलेचा आत्मा असतो. शिवाय तो अपरिहार्यपणे तंत्रात अभिव्यक्त व्हावा लागतो. या दोनही निकषावर आजची गझल अतिशय दर्जेदार आहे.अवघ्या दोन ओळींच्या शेरात ग्रंथभर आशयाचा स्फोट करण्याची क्षमता गझलेच्या सुट्या शेरात असते. विषय वैविध्याचा विचार करता आजची गझल खूप दर्जेदार आहे. गंगाधर मुटे नावाचे विदर्भातील कवी गझल सारख्या विलक्षण काव्य प्रकारातून शेती , शेतकरी , त्यांचे प्रश्न , शेतकर्‍यांचे शोषण , शासकीय धोरण असे विषय सातत्याने लिहून गझल या प्रकाराची वेगळीच ओळख निर्माण करताहेत. फक्त शेती आणि शेतकरी हा विषय किती वेगळ्या प्रकारे गझलेतून मांडता येतो हे गंगाधर मुटे यांची गझल वाचल्यावर कळते.

    माझे आवडते कवी खूप आहेत . ज्यांच्या कवितेत माउली ज्ञानोबांसारखे ' विश्वाचे आर्त ' आहे . आणि ज्यांच्या कवितेत तुकोबांच्या अभंगातील ' बुडता हे जन न देखवे डोळा ' नंतर येणारा खराखुरा ' कळवळा ' आहे असे सर्व कवी मला आवडतात. रमेश इंगळे उत्रादकर हे एक प्रातींनिधिक नाव मी आदराने घेईन . कवी खलील मोमीन , डॉ. श्रीकृष्ण राऊत , नितीन देशमुख , सतीश दराडे , प्रशांत वैद्य , किशोर मुगल ,हेमंत जाधव , वीरेंद्र बेडसे , रावसाहेब कुवर , मारोती मानेमोड , वैभव कुलकर्णी , रूपेश देशमुख , अमित वाघ , प्रशांत पोरे, नि:शब्द देव , शुभानन चिंचकर , गोंविंद नाईक , जनार्दन म्हात्रे ,योगिता पाटील , पूजा फाटे , पूजा भडांगे , शर्वरी मुनीश्वर , राजीव मासरूळकर , गौरवकुमार आठवले , लक्ष्मण जेवणे , प्रफुल्ल भुजाडे , विद्यानंद हाडके, नितीन भट , प्रकाश मोरे , अरुण सोनवणे असे अनेक उत्तमोत्तम गझल लिहिणारे हात गझलेचे उज्ज्वल भविष्य घडवित आहेत.

    3) सद्यस्थितीत शेतीसमोर, ग्रामीण भागा समोर कोणते प्रश्न उभे राहिलेत असे आपल्याला वाटते ?

    सातत्याने येणारे दुष्काळ , अवकाळी पाऊस , शेतकर्‍यांच्या उभ्या पीकाचे होणारे लाखोंचे नुकसान, निसर्गातील नुकसानकारक बदलांचे वेध न घेवू शकणारी असमर्थ यंत्रणा , शेतीमालाला न मिळणारा हमी भाव , उपजावू शेतीचे होणारे बीनशेतीकरण , वसाहतीकरण, शेती आणि शेतकर्‍याच्या उरावर बसलेला भूमी अधिग्रहण कायदा , शेतकर्‍यांच्या आत्महत्या अशा कितीतरी समस्या शेतीसमोर आणि ग्रामीण भागासमोर आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्याच्या साठीनंतरही शेती आणि शेतकर्‍यांच्या संदर्भात हे प्रश्न असावेत याहून स्वातंत्र्याची चेष्टा नाही.

    4 ) प्रश्नांवर कोणते उपाय आपण सुचवाल ?

    शिक्षण आणि जाणीव जागृती झाल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत. " सैद्धांतिक ज्ञान हाच मुक्तिरथाचा पाया आहे . " असे कार्ल मार्क्स म्हणतो. कुठलीही गोष्ट जेव्हा स्वच्छपणे कळलेली असते तेव्हा त्यामागील भय संपते. शेतकर्‍यांच्या बाबतीत सांगायचे तर त्याच्यासाठी सर्वच गोष्टी अनिश्चित आहेत. पावसाची , बाजारभावाची, निसर्गाची कशाकशाची खात्री नाही. काहीही होवू शकते. या अनिश्चिततेच्या सावटाखाली शेतकरी सतत वावरत असतो. कवी ग्रेस म्हणतात ते ' भय इथले संपत नाही ' या कवितेचा आशय शेतकर्‍यांना अधिक तीव्रतेने लागू पडतो. भयाच्या बुडाशी फक्त अज्ञान आहे. अज्ञान आहे याची जाणीव सुद्धा खूप शुभ घटना आहे. त्यामुळे त्या अंधारातून प्रकाशाकडे जावेसे वाटण्याची इच्छा तरी होईल. शेतीचाच माल जेव्हा व्यापार्‍याच्या हातात जातो तेव्हा त्याचे मूल्य कोसळत नाही. कारण व्यापार्‍याला बाजाराचे नियम कळतात. त्याच्याकडे माल सांभाळणारे प्रचंड स्टोरेज असते. बाजाराचे नियम कळणे . हवा तसा भाव मिळेपर्यंत माल सांभाळण्याचे तंत्र हातात असणे , योग्य वेळी बाजाराचा अंदाज कळणे , त्यानुसार माल मोकळा करणे किंवा दाबून ठेवणे हे सर्व बाजाराचे नियम शेतकरी ज्या दिवशी समजून घेईन म्हणजे त्याला आपल्या क्षेत्रातले वितरण तंत्र कळेल . त्यादिवशी तो स्वतंत्र आणि स्वावलंबी होईल. आस्मानी आणि सुलतानी दोनही सत्ता शेतकर्‍याच्या ताब्यात नाहीत , पण शेती तंत्राविषयी नवी ऊपयुक्त माहिती , नवी बाजार नीती , व्यापारी मनोवृत्ती थोडीतरी कळायला हवी शेतकर्‍याला . त्याने हे सगळे जाणून घ्यावे. अन्न धान्याची निर्मिती तो मुबलक करतो खरा , पण उपवाशी तोच रहातो . हे भयंकर नाही का ? शेतकरी हा इथला ईश्वर आहे. त्याला शेतमाल निर्माण करता येतो , तसा सांभाळता यायला हवा. आणि योग्य वेळी तो वितरीत करता यायला हवा. यासाठी शेतकरी नव्या ज्ञानाने समृद्ध हवा. शेतीविषयक ज्ञानानेच शेतकरी स्वतंत्र होईल आणि समस्यामुक्त होईल. ' सत्तेला विठ्ठल समजून त्याने फक्त एक आषाढी वारी मंत्रालयावर न्यावी .' असे आमचे एक कथा लेखक मित्र मनोहर विभांडीक सांगतात . त्यांच्या या विचारात तथ्य आहे. भोळ्या शेतकर्‍याच्या वारीची दिशा वळायला हवी. पंढरपूरचा नाही तर सत्तेचा विठ्ठल शेतकर्‍यांचे कल्याण करू शकतो. सत्तेच्या छाताडावर शेतकरी नावाच्या नव्या भृगुने लाथ मारायला हवी. माझ्या एका गझलेतला एक शेर आहे.

    सत्तेच्या छाताडावर हे कुणीच मारत नाही ;
    गळफास तुझ्या घेण्याने रे कुणी शहारत नाही..

    5) सद्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत तरुण शेतकऱ्यांना काय सल्ला दयाल?

    महात्मा फुले म्हणतात तेच खरे आहे. ' विद्येविणा मती गेली '. नवे ज्ञान , नवे तंत्र , नवी बाजारनीती याविषयी जर तरुण शेतकरी जागरूक झाला तरी बरेच प्रश्न कमी व्हायला मदत होईल. हार न मानता आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जायला हवे. व्यसन आणि आत्महत्या यापासून सांभाळायला हवे . निवडणुकीच्या राजकरणात सत्तेची निवड डोळसपणे करावी . नव्या जगातला खरा कुबेर शेतकरी असायला हवा. या संदर्भात माझी एक शेतकर्‍यांच्या संदर्भातील गझल अशी आहे.

    नको तुकोबा शेत सोडुनी निघून जावुस ;
    तुझी पंढरी जळतांना तू नकोच पाहुस ..

    तुझ्या मळ्याचा असा उन्हाळा बघता बघता ;
    चिल्यापिल्यांच्या डोळ्यांमधला रडेल पाउस ..

    भले करावे सत्तेने हा नियम संपला ;
    म्हणून नाही भाव उसाला जळला कापुस ...

    बिना दुधाचे थाने हे तुज कळेल केव्हा ?
    तू सत्तेच्या वांझ म्हशीला नकोच पाळुस ..

    कुरूप काळ्या समर्पितेशी लाव लग्न , पण -
    नको देखण्या प्रश्नांना तू कुंकू लावुस ...

    - कमलाकर आत्माराम देसले
    झोडगे ता. मालेगाव ( नाशिक)

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 16/05/2015 - 22:11. वाजता प्रकाशित केले.

    Apulki
    ****
    Apulki
    ****
    Apulki
    ****

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 16/05/2015 - 22:18. वाजता प्रकाशित केले.

    गोहत्याबंदी कायद्यामुळे सर्वात जास्त आनंद गोचिडांनाच झाला असेल.
    आता ते गोचिड गाय नैसर्गिकरित्या मरेपर्यंत यथेच्छ रक्त पिऊ शकतील.
    या कायद्याने गोचिडांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला आहे.
    म्हणून सारे गोचिड़ फडणविसांना आशीर्वाद देत असतील. नाही का?
    तुम्हाला काय वाटते?
    – गंगाधर मुटे
    -------------------------------------------------------------------
    गोचीडाना आनंद !

    आमचे मित्र Gangadhar Mute यांनी गोहत्या बंदीचा गोचीडाना त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी संपल्याने खूप आनंद झाल्याचे म्हंटले आहे. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की याचा आनंद त्या लिबलिबीत गोचीडानाच झाला असे नाही तर हाडामासाच्या गोचीडाना देखील झाला आहे. गो-रक्षणाच्या नावावर सरकार कडून मोक्याची जागा . मोठे अनुदान आणि फुकटच्या गायी मिळून यांच्याही पोटापाण्याचा प्रश्न सुटणार आहे !
    https://www.facebook.com/sudhakar.jadhav.5
    ---------------------------------------------------------------------
    @Sunny Pawar
    एक गंभीर प्रश्न ?
    गोवंश हत्याबंदीनंतर या दोन तीन महिन्यातच जर्सी गोर्हयांचा प्रश्न निर्माण होतोय ! काही ठीकाणी
    मृत जर्सी गोर्हे व जीवंत गोर्हे रस्त्यावर सोडुन दिलेली आढळली आहेत ..त्या निमित्त प्रश्न .
    गाभण गायीची सोनोग्राफी करून लिंगनिदान शक्य आहे का ?
    कितव्या महीन्यात हे लिंगनिदान करता येईल ? त्या महीन्यात (गर्भ नर असेल तरच ) गायीचा सुरक्षित गर्भपात शक्य आहे का ?
    असा गर्भपात नैतिक निशचित ठरतो ,कारण गर्भधारणा ही कृत्रिम रेतनानेच होते .
    गोर्हयांचा संवर्धन प्रश्नावर अभ्यासू मित्रांशी गंभीर चर्चा करीत असताना एका प्रश्नावर चर्चा थांबली व मी निरूत्तर झालो .शिवाय मित्रांनासुध्दा याचे उत्तर माहीत नाही . मुटेसर आपले मार्गदर्शन बहुमुल्य ठरेल असे वाटते ?
    या विषयी चर्चा होने गरजेचे वाटते का ?
    ---------------------------------------------------------------
    Gangadhar Mute

    लिंगनिदान अणि गायीचा सुरक्षित गर्भपात हा मार्ग शेतकरी स्विकारणाच नाहीत कारण शेतकरी समाजावर भूतदयेचा प्रभाव आहे.

    त्यामुळे या प्रश्नावर वेगळे उत्तर शोधावे लागेल.
    जसे की,,

    १) सरकारला हे बछडे विकत घ्यायला भाग पाडणे.
    २) मुख्यमंत्र्यांच्या नावे विक्रीपत्र लिहून बछडे कलेक्टरच्या कॅबीन मध्ये नेऊन सोडणे आणि रकमेची वसूली क्ररणे.

    इत्यादी इत्यादी...

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 24/05/2015 - 20:09. वाजता प्रकाशित केले.

    Khadase

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 24/05/2015 - 20:11. वाजता प्रकाशित केले.

    Khadase

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 24/05/2015 - 20:12. वाजता प्रकाशित केले.

    Khadase

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 28/05/2015 - 16:10. वाजता प्रकाशित केले.

    मैत्रीण
    मी माझ्या जीवलग मैत्रिणीसोबत रायचूर - हैद्राबाद रोडवर.
    या मंडळी सरकीच्या तेलातील भजे खायला. :gift:
    (25/05/2015)

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 28/05/2015 - 16:35. वाजता प्रकाशित केले.

    आजचा सकाळ
    भाजपने विदर्भाची दिशाभूल केली

    सकाळ

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 30/05/2015 - 20:33. वाजता प्रकाशित केले.

    पावसाळा जसाजसा जवळ येत आहे तसेतसे पर्जन्यमानाचे यंदाच्या पीकपाण्याच्या उत्पादन शक्यतेचे वेगवेगळे शास्त्रीय/अशास्त्रीय अनुमान वर्तवणे सुरू झाले आहे.

    पाऊस सरासरी एवढा पडेल, सरासरी पेक्षा जास्त पडेल किंवा कमी पडेल याचीही भाकिती वर्तविली जाऊ लागली आहेत.

    पण पाउस सरासरी एवढा पडतो, सरासरी पेक्षा जास्त पडतो किंवा सरासरी पेक्षा कमी पडतो याचा शेतीच्या उत्पादनाशी संबंध नसून पाऊस किती पडतो यापेक्षा तो कसा पडतो यावर शेती उत्पादनाचे भवितव्य अवलंबून असते, इतके साधेसुधे वास्तव बहुतेकांना अजिबातच कळलेले नसावे, असे त्यांच्या अनुमानातून ध्वनीत होत असते. त्यामुळे या अनुमानांचा व भाकितांचा उपयोग फ़क्त टाइमपास करण्यासाठी व जिज्ञासा शमविण्यासाठी होते. त्यापलिकडे अनुमानांचा व भाकितांचा फ़ारसा उपयोग नाही.

    याउलट

    "धोंड्याचे (अधीक मासाचे) वर्ष चांगले वर्ष असते" असा शेतकर्‍यांचा विश्वास असतो. मला सुद्धा तशी वारंवार प्रचिती आली आहे.

    शेतकर्‍यांनी विश्वास कुणावर ठेवायचा?
    हवामान तज्ज्ञावर?
    विज्ञानावर?
    ज्योतिषावर?
    पंचांगावर?
    की
    पारंपारिक कानोकानी ज्ञानावर?

    - गंगाधर मुटे
    ----------------------------------------------------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 05/06/2015 - 10:45. वाजता प्रकाशित केले.

    शेतकरी पुत्रांनो,

    जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरणवाद्यांना व पर्यावरण प्रेमींना छाती फ़ुगवून अभिमानाने सांगा की माझा बाप तुमच्यासारखी नुसती तोंडाने हवेची वाफ़ दवडत नाही.

    त्यांना हेही ठणकावून सांगा की, माझा बाप घाम गाळून दरवर्षी आपल्या शेतात कापसाची, तुरीची, सोयाबिनची कोट्यावधी झाडे लावत असतो ज्यामुळे सर्वांना शुद्ध हवा खायला मिळत असते.

    - गंगाधर मुटे
    ------------------------------------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 26/08/2015 - 20:19. वाजता प्रकाशित केले.

    कांद्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा सरकार
    आणि
    शेतक‍र्‍याच्या टाळूवरचे लोणी खाऊ इच्छीणारा इंडियन ग्राहक
    शेतीच्या विपणन अर्थशास्त्रात लुडबूड करायला सज्ज झाला आहे.
    लाखो शेतकरी आत्महत्या करित असले तरी कधीच न हादरणारे, विव्हळणारे व ढिम्मच्या ढिम्मच असणारे हे शेतकरीविरोधी पाताळयंत्री कारस्थानी कांद्याला भाव मिळायला लागल्याबरोबर राक्षसी रूप धारण करायला लागले आहेत.
    शेतकरीपुत्रा आतातरी जागा हो!
    "गरिबी हटविण्यासाठी कुणीही काहीही करण्याची गरज नाही. फ़क्त गरिबी टिकावी आणि वाढावी म्हणून तुम्ही जे प्रयत्न करता आहात; तेवढे बंद करा म्हणजे गरिबी आपोआप हटेल"
    हे मा. शरद जोशी विधान पुन्हा एकदा लक्षात घे!!
    शेतकरीपुत्रा आतातरी अर्थ समजून घे!!!
    *********
    ग्राहकालाही "परवडणारा भाव" हवा हे सुत्र फ़क्त शेतीमालासच का? बिगरशेतीमालास का नाही?

    शेतकरीसुद्धा ग्राहक असतो, त्याला हव्या असलेल्या वस्तू परवडणार्‍या किंमतीत मिळाव्या, अशी व्यवस्था कधी निर्माण झाली का?

    शेतकर्‍याला दुर्धर आजार झाला तर त्याला बिनाऔषधानेच मरावे लागते. तेव्हा "परवडणारा भाव" हे सुत्र कुणीच मांडत नाही.
    *********

    कोणत्याही शेतमालाची किंमत अर्थात भाव शेतकर्‍यांना मिळताना त्यातून वाहतूक खर्च, दलाली वजा होणे क्रमप्राप्त आहे.

    कन्याकुमारित कांदा पिकत असेल आणि तो दिल्लीतील ५२ मजली अपार्टमेंट मधील ५१ व्या मजल्यावर राहणार्‍या ग्राहकाला हवा असेल तर शेतकर्‍याला मिळणार्‍या दरात आणि ग्राहकाला आकारल्या जाणार्‍या दरात फ़रक असणारच.

    त्यात गैर असे काहीही नाही, हे व्यापारशास्त्र आहे. smile emoticon

    कांदा हे नाशीवंत फ़ळ आहे आणि सडला की अन्य कांद्यांनाही सडवतो.
    उग्र वास असल्याने लपवून ठेवण्यासारखी स्थिती नाही.
    आधुनिक तंत्रज्ञान वापरून साठवणूक केल्यास प्रचंड खर्च येईल आणि ती न परवडणारी बाब आहे.

    कांद्याचे भाव साठेबाजी मुळे नाही तर गारपीट व अवकाळी पावसामुळे वाढले आहेत.
    *********
    शासकीय धोरणे व्यापाराला पूरक असल्याने कशाचाही व्यापार केला तरी व्यापारी तुपाशीच खाणार आहेत.
    तुपाशी खाण्यासाठी कांद्याचाच व्यापार करणे गरजेचे व अनिवार्य नाही.

    व्यापारी तुपाशी खातो आणि शेतकरी उपाशी राहतो याला व्यापारी जबाबदार नसून "व्यापाराला तारक आणि शेतीला मारक" अशी शासकीय धोरणेच जबाबदार आहे.

    - गंगाधर मुटे
    -------------------------------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 26/08/2015 - 21:03. वाजता प्रकाशित केले.

    शासकीय धोरणे व्यापाराला पूरक असल्याने कशाचाही व्यापार केला तरी व्यापारी तुपाशीच खाणार आहेत.

    तुपाशी खाण्यासाठी कांद्याचाच व्यापार करणे गरजेचे व अनिवार्य नाही.

    व्यापारी तुपाशी खातो आणि शेतकरी उपाशी राहतो याला व्यापारी जबाबदार नसून "व्यापाराला तारक आणि शेतीला मारक" अशी फ़क्त आणि फ़क्त शासकीय धोरणेच जबाबदार आहे.

    त्यामुळे

    सरकारला सोडून व्यापार्‍यांना दोष देणे केवळ मुर्खपणाचेच नाही तर चक्क नामर्दपणाचे पहिले लक्षण आहे. Lol
    ******
    कांदे थोडेसे महाग झाले तरी इंडियन ग्राहक बोंब का ठोकतात?
    माणसे मरतात का कांदे न खाल्याने?
    स्वस्तात खरेदी करून खाल्लेला कांदाच फ़क्त आरोग्यदायी असतो का?
    महाग कांदा खरेदी करून खाल्ला तर महारोग होतोय का?

    - गंगाधर मुटे
    ~~~~~~~~~~~~~~
    http://www.baliraja.com/node/559

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 24/09/2015 - 19:15. वाजता प्रकाशित केले.

    काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणे चांगले
    याचा अर्थ
    काहीच न खाण्यापेक्षा शेण खाणे चांगले
    असा होत नाही.
    शेतकर्‍यांनी शब्दाच्या गारुडखेळापासून सावध रहावे!

    - गंगाधर मुटे
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 24/09/2015 - 19:16. वाजता प्रकाशित केले.

    वर्ष आता आठवत नाही पण २००५ च्या आसपासची गोष्ट असावी.
    मी पुण्याला बालगंधर्व मध्ये "पुरुष" नाटक बघितले. नायक नाना पाटेकरच होते. मध्यंतरात नानांनी नाट्यगृहात फ़िरुन, प्रत्येकाकडे जाऊन भुकंपग्रस्तासाठी निधी गोळा केला होता. तेव्हा मी सुद्धा त्यांच्या कटोर्‍यात माझ्या यथाशक्ती दान टाकले होते.
    याचा अर्थ इतकाच की;
    - नानांच्या सार्वजनिक जिव्हाळ्याविषयी माझ्या मनात शंका नाही.
    - त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी संशय घ्यायचे मला आजतरी काहीही कारण नाही.
    पण
    अपंगांना, दिनदुबळ्यांना, अन्यायग्रस्तांना, निराधारांना, भुकंपग्रस्तांना, आपत्तीग्रस्तांना मदत करणे हा मानवधर्म आहे. त्यांना मदत केलीच पाहिजे.
    पण
    शेतकरी अपंग, दिनदुबळा, निराधार, भुकंपग्रस्त, आपत्तीग्रस्त नाही. त्याचे शरीर शाबूत आहेत. शेती कसण्यात नैपुण्यप्राप्त आहे, कष्ट करण्याची उमेद आणि धमकही त्याच्यात आहे.
    मात्र
    तो शासकिय अन्यायग्रस्त आहे.
    तो काम करतो, कष्ट करतो, घाम गाळतो म्हणून त्याला मदत करण्याची, भीक घालण्याची गरजच नाही.
    फ़क्त त्याच्या श्रमाचा मोबदला त्याला मिळायला हवा. बस्स!
    निसर्गत: त्याला त्याच्या घामाचा मोबदला मिळू शकतो. पण सरकार नावाची यंत्रणा शेतकरी विरोधी धोरणे राबवून नैसर्गिक प्रवाहाला अवरुद्ध करते आणि त्याला त्याच्या श्रमाचा मोबदला मिळू नये म्हणून शेतमालाचे भाव मातीमोल होईल अशी व्यवस्था करते.
    हे मकरंद आणि नानाला कळले नसते तर समजून घेता आले असते. पण माझ्या माहितीप्रमाणे नानाला हे सारे कळते. माझ्या कच्च्या माहितीनुसार मकरंद अनासपूरे तर स्वत: शरद जोशी यांच्या शेतकरी आंदोलनात सहभागी झाला होता आणि "भीक नको हवे घामाचे दाम" अशा घोषणाही देत होता.
    तरी ही चूक जाणूनबुजून का?
    शेतकर्‍याला त्याच्या श्रमाचा मोबदला तेवढा द्यायचा नाही. त्याला भिकारी बनवून रांगेतच उभे करायचा अट्टाहास का?
    कर्मचार्‍यांना पगार/वेतन दिले जाते; मदत/भीक दिली जात नाही.
    पगाराव्यतिरिक्त बोनस दिला जातो; मदत/भीक दिली जात नाही.
    वेळेपेक्षा जास्त काम केले तर ओव्हरटाईम दिला जातो; मदत/भीक दिली जात नाही.
    व्यापार्‍यांना विमा भरपाई दिली जाते; मदत/भीक दिली जात नाही.
    बेरोजगारांना भत्ता दिला जातो; मदत/भीक दिली जात नाही.
    मग शेतकर्‍यानेच असे काय पाप केले की त्याला घामाचे दाम न देता मदत/भीक दिली जात आहे?
    सरकारने शेतकर्‍यांना पीकाच्या उत्पादनखर्चापेक्षा कमी हमी भाव दिलेले आहेत.
    नाना मकरंदने भीक देत फ़िरण्यापेक्षा सरकारने शेतकर्‍यांच्या केलेल्या लुटीची रक्कम
    म्हणजे
    उत्पादनखर्च - हमीभाव = उरलेली रक्कम
    शेतकर्‍याला भरून द्यावी.
    शेतकर्‍यांना त्याच्या हक्काचे देण्यापेक्षा धर्मादाय सदावर्ते चालवून प्रेषितांचाची भुमिका स्विकारल्याने त्यांचेविषयी संशयाचे वलय निर्माण होणे स्वाभाविक आहे.

    - गंगाधर मुटे
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 24/09/2015 - 19:17. वाजता प्रकाशित केले.

    ना मै राईस खाऊंगा
    ना आज चावल खाऊंगा
    मराठी आदमी हूँ मै
    केवल भात खाऊंगा

    - गंगाधर मुटे
    -------------------------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • admin's picture
    admin
    बुध, 21/10/2015 - 13:35. वाजता प्रकाशित केले.

    तूर डाळ प्रकरण - एखाद्या शेतमालाच्या जराशी तेजी आली की लवकरच "सामान्य" माणसांचा तळतळाट व्हायला लागतो. मग तो शेतमाल चेष्टेचा विषय बनवला जातो. पुन्हा शेतकरी आत्महत्यांच्या नावाने गळे काढून रडायचे सोंग घ्यायला ही "सामान्य" माणसे तयारच असतात.

    यंदा सार्वत्रिक नापिकी आहे. सोयाबिनचा उतारा एकरी १-२ क्विंटलच्या घरात आहे. काहींनी तर काढणी करायला परवडत नाही म्हणून उभ्या पिकात औत घालून नांगरून-वखरून टाकले आहे. जे काही सोयाबिन घरात आले त्याच्या बाजारभावात मंदी आहे.

    कपाशीची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. दरवर्षीच्या तुलनेने यंदा कापसाचे २५ टक्केही उत्पादन येणार नाही, असे संकेत आहेत. कापसाच्या भावात घसरण आहे. म्हणजे यंदा शेती पुरेपूर तोट्यात जाण्याची निसर्गाने उत्पन्नाच्या माध्यमातून आणि सरकारने बाजारभावाच्या माध्यमातून ठोस व्यवस्था केलेली आहे.

    अशा परिस्थितीत तूरीची बाजारभावातील तेजी कायम राहिली तर शेतकर्‍यांच्या घरात ४ पैसे येण्याची शक्यता आहे. पण आता "सामान्य" माणूस शेतकर्‍यांच्या जीवावर उठायला सज्ज झाला आहे. प्रसारमाध्यमातून तुरीच्या भावाची बोंब ठोकून सरकारवर दडपण आणण्याच्या कामाला लागल्याचे दिसत आहे.

    सर्वांनी एकदा विचार करावा. आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकर्‍यांना धीर देण्याऐवजी त्याच्या प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्यासाठी उताविळ होऊ नये. तूर महाग असेल तर कमी खावा. तूर न खाल्याने मनुष्य मरत नाही, आजारी पडत नाही आणि नपुसंकही होत नाही, याचे भान राखावे.

    अशा दुष्काळी परिस्थितीत "सामान्य" माणूस शेतकर्‍यांच्या बाजूने उभा राहिला तर शेतकर्‍यांना नक्कीच दिलासा मिळेल.

    - गंगाधर मुटे
    ----------------------------------------

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 20:02. वाजता प्रकाशित केले.

    October 23, 2015
    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1116751021682918

    शेतकर्‍यांना चांगले भाव मिळावे म्हणून व्यापारी ज्या भावात शेतमाल खरेदी करतो त्यापेक्षा पाच-दहा पट जास्तीचे भाव देऊन व्यापार्‍याऐवजी शेतकर्‍यांकडून शेतीमाल खरेदी करणारा भारतीय ग्राहक माझ्या पाहण्यात नाही. कुणाच्या असेल तर सांगावे. शक्य झाल्यास अशा ग्राहकाचा मोबाईल नंबर व संपूर्ण पत्ता सुद्धा लिहावा. म्हणजे निदान माझ्या गावातला तरी संपूर्ण माल तिकडे पाठवतो.
    सरकार तर व्यापार्‍यांपेक्षा कायमच कमी दरात खरेदी करत असते. त्यामुळे "भाववाढीचा फ़ायदा शेतकर्‍यांऐवजी व्यापार्‍यांना होतो" अशी थिअरी मांडणारे कोरडी सहानुभूती शेतकर्‍यांप्रती दर्शवत असतात, असे म्हणायला वाव आहे.
    व्यापारी खरेदी करतो म्हणून शेतमाल खपतो. व्यापार्‍यांऐवजी ग्राहक किंवा सरकार खरेदी करेल तर शेतमालाची आणखी मातीमाती होऊन जाईल आणि बाजारात आणलेला माल शेतकर्‍याला वापस घरी घेऊन जावे लागेल.

    तुम्हाला काय वाटते?

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 20:04. वाजता प्रकाशित केले.

    October 24, 2015
    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1117226041635416

    : शेतमालाची मार्केटींग :

    कोणत्याही व्यवसायाचे उत्पादन, प्रक्रिया आणि विपणन हे तीन स्वतंत्र विभाग असतात. जगाच्या पाठीवर एकच व्यक्ती हे तिन्ही विभाग सांभाळू शकेल असा कुठलाच व्यवसाय अस्तित्वात नाही. औद्योगिक क्षेत्रात सुद्धा यासाठी स्वतंत्र विभाग असतात. मात्र मी जेव्हा शेतीचा विषय सोशल माध्यमात छेडतो तेव्हा दरवेळेस "शेतकर्‍यांनी मार्केटींग शिकावे" अशा आशयाचे निदान दोनचार तरी प्रतिसाद येतच असतात. जगाच्या पाठीवर आजवर जे कुणाला जमलेलेच नाही ते आपण शेतकर्‍याला सांगत आहोत, याचा विसर सर्वांनाच पडतो.

    शेतीमधून कितीही संख्या बाहेर पडली तरी शेती कसायला कोणी तरी उरणारच आहे. जो शेती कसून उत्पादन करतो तोच शेतकरी असतो आणि मी त्याच्याबद्दल बोलत असतो.
    शेती उत्पादन हा पूर्णपणे पूर्णवेळ करायचा व्यवसाय आहे. शेती करताना वेळेची इतकी बचत होत नाही की त्याने जोडीला मार्केटिंगसदृश अन्य व्यवसाय करावा. आजवर अनेकांनी असे चिक्कार प्रयोग केले आहे पण “तेलही गेले, तूपही गेले; हाती धुपाटणे आले” अशीच त्यांची गत झाली, असे इतिहासच सांगतो. याउलट जो शेती सोडून केवळ मार्केटिंगमध्ये गेला त्याने चांगल्यापैकी बस्तान बसवले, असेही इतिहासच सांगतो. जो शेतकरी नोकरी, पुढारीपणा किंवा व्यापार करायला लागतो तो अल्पावधीतच नोकरदार, पुढारी किंवा व्यापारी होतो; शेतकरी म्हणून त्याचे अस्तित्व संपुष्टात येते. सातबारा नावाने असला तर त्याला शेतमालक म्हणता येईल, शेतकरी म्हणता येत नाही. अर्थात शेतकरी फक्त तोच जो शेती कसून उत्पादनाचा विभाग हाताळतो. एका वाक्यात असेही म्हणता येईल की “ज्याची उपजीविका फक्त आणि फक्त शेती उत्पादनावर अवलंबून असते, तोच खराखुरा शेतकरी” भलेही मग सातबारा त्याच्या नावाने असो किंवा नसो. तो भूधारक असो किंवा भूमिहीन असो! आपण जेव्हा शेतकरी असा शब्द वापरतो तेव्हा शेती कसून उत्पादन करणार्‍याविषयी बोलत असतो; व्यापारी, उद्योजक, दलाल यांच्या विषयी बोलत नसतो. शेती कसणे सोडून सार्‍यांनीच व्यापार सुरू करणे अशी कल्पनाच करणे शक्य नाही. इतके साधे गृहितक समजून घ्यायला काय हरकत आहे?

    शेतीमध्ये मार्केटींग आणि सामुहिक शेती हा काही नवीन शोध अथवा नाविन्यपूर्ण विषय नाही. अगदी पुरातन काळापासून शेतकर्‍याचा एक मुलगा शेती, दुसरा व्यापार आणि तिसरा नोकरी करतच आलेला आहे. जो व्यापारात जातो तो व्यापारी बनतो. जो नोकरीत जातो तो सातव्या वेतन आयोगाचा लाभार्थी बनतो पण जो शेती कसून उत्पादन करतो तो शेतकरी म्हणून उरतोच. शेतकरी, व्यापारी व नोकरदार जरी सख्खे भाऊ असले तरी आपापली कमाई एकत्र करतील व मग त्या कामईचे तीन हिस्से करून समसमान प्रमाणात आपसात वाटून घेतील, अशी कुटुंबव्यवस्था आपल्या भारतात कधीतरी अस्तित्वात होती काय? जर कधीच नव्हती तर शेतकर्‍याला असा सल्ला सांगण्याचे काय प्रयोजन आहे?

    तरीही शेतकामातून अतिरिक्त वेळ मिळाला तर किरकोळ मार्केटिंग करणे, शेतकर्‍याला वावगे नाही. अनादिकाळापासून शेतकरी शक्य होईल तसे किरकोळ मार्केटिंग करतच आला आहे. पूर्वी दहा-वीस गावाच्या परिघात एका मुख्य गावी गुजरी भरायची. आठवडी बाजार भरायचा. तिथे शेतकरी आपला शेतमाल स्वत: दुकान मांडून विकायचे. ही शेतमालाची मार्केटिंगच होती ना? आपल्या जवळचा शेतमाल विकून येणार्‍या पैशात अन्य गरजेच्या वस्तू खरेदी करणे, शेतकर्‍यांच्या अंगवळणीच पडले आहे. अगदी पौराणिक काळातला जरी विचार केला तरी गौळणी मथुरेच्या बाजारी दही-दूध-लोणी विकायला घेऊन जायच्याच ना? कुठे मध्यस्थ होता? कुठे दलाल होता? मग मार्केटिंग म्हणजे यापेक्षा वेगळं काय असते? गौळणी मथुरेच्या बाजारी दही-दूध-लोणी विकायला एकएकट्या न जाता गृपने सामुहिकपणे जायच्या. मग सामुहिक शेती म्हणजे अशी काय वेगळी संकल्पना आहे की कुणी ती मोठ्या आवेशात मांडावी?

    शेतकर्‍यांना मार्केटींगचा सल्ला देताना काजू, नारळ, ढोबळी मिरची, संत्री अशाच पीकविक्रीचा सल्ला का दिला जातो? या देशातले बहुसंख्य शेतकरी ही पिके घेतात काय?

    आज मी या देशातल्या तमाम मार्केटींगप्रेमी सुशिक्षितांना, विद्वानांना, तज्ज्ञांना, राजकीय पुढार्‍यांना, अभ्यासकांना, सारस्वतांना, शहाण्यांना, दिडशहाण्यांना, उपटसुंभाना, शेतकर्‍यांच्या हितचिंतकांना तसेच समग्र प्राणीमात्रांना, किड्यामाकुड्यांना, जीवजंतूंना आणि चिंतातूर जंतूंना याद्वारे जाहीर आव्हान देतो की........

    हा देश जाऊ द्या, हे राज्य जाऊ द्या, जिल्हा जाऊ द्या आणि तालुकाही जाऊ द्या..... फ़क्त माझ्या एका छोट्याशा खेड्यात व परिसरात यावर्षी सुमारे ५००० क्विंटल सोयाबिन पिकणार आहे. (दरवर्षी अंदाजे ४०,००० क्विंटल पीकत असते) उत्पादनात यावर्षी घट आल्याने आम्हाला १२,०००/- प्रति क्विंटलपेक्षा कमी भाव परवडणारा नाही. एवढा भाव मिळाला नाही तर कुणालाही कर्जफ़ेड, वीज बील भरणे, किराण्याची उधारी फ़ेडणे, कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे शक्य होणार नाही. कदाचित एखादा आत्महत्त्याही करू शकतो.

    आमच्या आवाक्यात असलेल्या कोणत्याही बाजारपेठेत सोयाबिन नेऊन विकले तरी ४,०००/- प्रति क्विंटलपेक्षा जास्त भाव मिळण्याची शक्यता नाही. याक्षणी यापेक्षा जास्त भाव मिळवून घेण्यास आम्ही असमर्थ आहोत.

    आता वरिलपैकी कुणीतरी आम्हाला थेट मार्गदर्शन करून मार्केटींगचा थेट सल्ला सांगावा, जेणेकरून आम्हांस सोयाबिनला १२,०००/- प्रति क्विंटल भाव मिळू शकेल.

    - गंगाधर मुटे
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    टीप : १) सल्ला येथेच जाहीरपणे द्यावा. खाजगी फ़ोन, मेल अथवा पत्रव्यवहार करू नये.
    २) प्रक्रियेचा नवा सल्ला देवू नये.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 20:17. वाजता प्रकाशित केले.

    October 26, 2015
    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1118155554875798

    आडकित जाऊ, खिडकित जाऊ
    खिड़कित होती राधिकी
    भुलोजीला मुलगी झाली
    नाव ठेवा नापिकी

    - गंगाधर मुटे
    =0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=
    तमाम जनतेला कोजागिरीच्या महाभयंकर शुभेच्छा....!

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 20:20. वाजता प्रकाशित केले.

    November 1, 2015
    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1120944547930232

    : पुरस्कार परत करण्यामागील कारणमिमांसा :

    आज एका साध्या चर्चेमध्ये मला एका मित्राने प्रश्न विचारला की लाखो शेतकरी आत्महत्त्या करत आहेत तरी शासनसंस्था मख्ख आहे. याच्या निषेधार्थ एकाही सारस्वताने आपला शासकीय पुरस्कार वापस करण्याची कधी साधी तयारी सुद्धा दाखवली नाही. याउलट दाभोळकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्या झाल्याबरोबर याच सारस्वतांनी पुरस्कार परतीसाठी रांगा लावायला सुरुवात केली आहे, असे का? सारस्वतांच्या लेखी सहा लाख शेतकर्‍यांच्या जीवापेक्षा या त्रयीची किंमत मोठी आहे का?

    मी त्यावर दिलेले उत्तर थोडक्यात असे :

    सहा लाख शेतकर्‍यांच्या जीवापेक्षा या त्रयीची किंमत मोठी आहे किंवा पुरस्कार परत करायला निघालेल्या सृजनशील कलावंताना दाभोळकर, पानसरे व कलबुर्गी यांचेविषयी अपार प्रेम किंवा आदर आहे, अशातला हा भागच नाही.

    सृजनशील कलावंत सुद्धा माणसेच आहेत आणि कोणत्याही मनुष्याला प्रथम त्याच्या जीवाची व जीवनजगण्याची हमी हवी असते. एवढी हमी असेल तर त्याला नंतर सन्मान, पुरस्कार वगैरे हवे असतात. स्वत:च्या जीवापेक्षा पुरस्कार-सन्मान वगैरे मनुष्याच्या दृष्टीने कधीही मोठे नसतात. सृजनशील कलावंताना आपले लौकिक अस्तित्वच संपुष्ठात येण्याची भीती वाटायला लागली असल्याने त्यांनी पुरस्कार परत करण्याचा पवित्रा घेतलेला असावा.

    शेतकरी सहा लाख मेलेत काय किंवा बारा लाख मेलेत काय, त्यातून सृजनशील कलावंताच्या जिविताला कसलीच असुरक्षिता/हानी/धोका पोचण्याची शक्यताच नाही. कोट्यावधी शेतकरी मेले तरी खायला अन्न, नेसायला कपडे याचीही उणीव भासणार नाही, अशीही त्यांना खात्री आहे. मग या मुद्द्यावर पुरस्कार कशाला परत करतील?

    या उलट धर्ममार्तंडविरोधी लेखन केल्याच्या कारणावरून जर दाभोळकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्त्या झाल्या असतील तर धर्ममार्तंडविरोधी लेखनी चालविणारांसाठी ही धोक्याची घंटा वाटत आहे. आता आपला नंबर सुद्धा लागू शकतो, या भितीने त्यांना ग्रासले आहे.

    आणि म्हणूनच

    शेतकरी आत्महत्त्यांच्या निषेधार्थ पुरस्कार वापस न करण्याची मानसिकता असणारे मात्र दाभोळकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्या झाल्याबरोबर पुरस्कार परतीसाठी रांगा लावत आहेत.

    - गंगाधर मुटे
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 20:26. वाजता प्रकाशित केले.

    November 5, 2015

    सकाळ दि. ०५/११/२०१५
    "माझी गझल निराळी" समीक्षण
    धन्यवाद सकाळ आणि @Raj Pathan सर

    Gazal

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 20:31. वाजता प्रकाशित केले.

    November 12, 2015

    पुण्यनगरी
    रविवार ०८ नोव्हेंबर २०१५

    facebook

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 20:37. वाजता प्रकाशित केले.

    November 14, 2015
    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1126729637351723

    : अनुभवाचे बोल :
    देव आणि ध्येय दोन्ही सारखेच. रस्ता भटकला की कधीच गाठता येत नाही. मग कितीही कष्ट, परिश्रम घेतले तरी ते व्यर्थ गेलेच म्हणून समजा.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 20:44. वाजता प्रकाशित केले.

    December 5, 2015
    https://www.facebook.com/photo.php?fbid=1137117286312958&set=a.170375506...

    ज्या महिलांना शनीचे दर्शन घ्यायचे नव्हते त्या महिला अनादी काळापासून दुरुनही दर्शन घेत नव्ह्त्या. चबुतर्‍यावर चढून दर्शन घ्यायची परवानगी दिली तर दोन दिवस ढोंगधतुरे करतील. नंतर त्या शनीदेवाकडे ढुंकुनही पाहणार नाहीत.

    ज्या महिलांना शनीचे दर्शन घ्यायचे होते त्या महिला अनादी काळापासून दर्शन घेतच होत्या. त्यांना कसलीच अडचण आली नाही, त्यांची भावभक्तीही कमी झाली नाही अथवा त्यांची अस्मिताही संकुचित झाली नाही. यापुढेही त्या दर्शन घेतच राहतील. त्यांना सरकारी वा न्यायालयीन निवाड्याची गरज नाही.

    मी काही महिन्यापूर्वी तृप्ती देसाईंशी बोललो होतो. त्यांचे एक वाक्य

    "आता मला कार्पोरेशनची निवडणूक लढवायची गरज नाही, थेट एमएलए म्हणूनच निवडून येऊ शकते" Lol

    shani Shinganapur

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 21:03. वाजता प्रकाशित केले.

    December 27, 2015

    जनादेश पुरस्कार

    Janadesh

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 21:16. वाजता प्रकाशित केले.

    December 28, 2015

    जनादेश पुरस्कार

    Puraskar

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 21:19. वाजता प्रकाशित केले.

    December 31, 2015

    जनादेश पुरस्कार

    प्रसिद्ध आणि आजच्या युगातील आघाडीचे सिनेगीतकार, कवी, लेखक, पटकथाकार श्री गुरु ठाकूर यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचा योग तर आला पण; उंची कधी गाठता येईल?

    गडकरी रंगायतन, ठाणे ३१/१२/२००५
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~

    Puraskar

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 21:23. वाजता प्रकाशित केले.

    April 9, 2016

    सिजेंटा इंडिया कंपनीचे 1057 या टोमॅटो वाणां मुळे उत्तर पुणे जिह्यातील शेतकऱ्यांचे जवळ पास 100% नुकसान झाले आहे.

    कंपनीला व सरकारला नुकसान भरपाई मागायला हरकत नाही
    पण तत्पूर्वी
    नविन तंत्रज्ञान वापरतांना काही धोके असतात. याची पूर्वकल्पना न देताच उठसूठ शेतकर्‍यांना परंपरागत शेती सोडून नवीन तंत्रज्ञान वापरायचे अनाहूत सल्ले देणार्‍यांच्या दोन-दोन थोबाडात पण हाणायला पाहिजे.

    आधुनिक तंत्रज्ञान वापरले किंवा निसर्गशेती केली तर लगेच शेतकर्‍याच्या घरात पैशाचा पाऊस पडायला सुरुवात होते, असा अक्कलशून्य बभ्रा करणार्‍या पगारी तज्ज्ञांना व गल्लोगल्लीतील अर्धशिक्षित बॅरिस्टरांना तर बदडूनच काढले पाहिजे.

    शेती कशीही करा, आधुनिक करा की परंपरागत, ओलिताची करा की कोरडवाहू
    जोपर्यंत शेतीधोरण बदलत नाही तोपर्यंत शेतकर्‍यांचे मरण अटळ आहे. हे निर्विवाद गणीतीय समिकरण ह्या महाभागांना कधीच मान्य नसते कारण स्वस्तात शेतीमाल लुटून निर्माण होणार्‍या संचयावरच ह्यांची उपजिविका अवलंबून असते.

    शेतकर्‍याला गरीब आणि लाचार ठेवण्यातच ह्यांच्या समृद्धीची व ऐषोआरामाची पायाभरणी झालेली असते.

    - गंगाधर मुटे
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 21:26. वाजता प्रकाशित केले.

    April 11, 2016

    अ‍ॅग्रोवन ११/०४/२०१६

    Agrowon

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 21:31. वाजता प्रकाशित केले.

    पुण्यनगरी ११/०४/२०१६

    Punynagari

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 21:38. वाजता प्रकाशित केले.

    दिनांक : १४/०४/२०१६

    Prashikshan

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 21:41. वाजता प्रकाशित केले.

    दिनांक : १४/०४/२०१६

    शेतकर्‍यांना संपत्ती बाळगण्याचा मूलभूत अधिकार प्रदान करणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ संविधानाची पुनर्स्थापना होऊन घटनेतील परिशिष्ट नऊ रद्द झालेच पाहिजे त्यासाठी प्रयत्न करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १२५ व्या जयंती निमित्ताने आदरांजली अर्पण करुयात!

    - गंगाधर मुटे

    Dr Ambedkar

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 21:44. वाजता प्रकाशित केले.

    दिनांक : १९/०४/२०१६

    शेतकरी संघटनेचा १५ मे रोजी परभणीत मेळावा
    शेतकरीविरोधी पक्षनीती जलाओ आंदोलन; दशमुखी रावणाचा पुतळा जाळणार

    http://www.gangadharmute.com/sites/default/files/fb/fb-11.jpg

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 21:53. वाजता प्रकाशित केले.

    दिनांक : २२/०४/२०१६
    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1224151797609506

    आज तुरीचे भाव प्रति क्विंटल रू १०.०००/- असुनही शेती तोट्यात आहे. पुढील हंगामासाठी सरकार तूरीचा हमीभाव ४६२५/- जाहिर करत आहे. सरकारचा मनसुबा तडीस गेला तर आपल्या बापाचे हाल खायला कुत्रा सुद्धा तयार होणार नाही एवढे साधे गणीत कॉलेजात जाऊन पदवीची पुंगळी प्राप्त करणार्‍या सुशिक्षित शेतकरीपुत्राला कळत नाही. अशा विपरित स्थितीत शेतीतले दारिद्र्य संपणार कसे? शेतकरी आत्महत्या थांबणार कशा?

    कोणत्याच सरकारचे डोके कधीच ठीकाणावर नसते कारण सरकारचे डोके ठीकाणावर आणण्याची शेतकरी पुत्राची शारिरिक, मानसिक आणि बौद्धीक लायकी नाही.

    त्याच्या शेतकरी बापाची कोणत्याही बोथट वस्तर्‍याने कोणीही हजामत केली तरी शेतकरी पुत्राचे रक्तच खवळत नाही.

    समजा एखाद्या शेतकर्‍याला २० क्विंटल तुरीचे उत्पादन झाले तर आजच्या बाजारभावाने त्या शेतकर्‍याला २० क्विंटल तुरीचे २ लाख रु. मिळतात. सरकार शेतकर्‍याला २० क्विंटल तुरीचे ९०२५०/- देवून १ लाख ९ हजार ७५० रुपये डोळ्यादेखत आणि तेही कायदेशीर मार्गाने लुटून न्यायला निघालंय.

    सरकारने शेतकर्‍याला १,०९,७५०/- रुपयाने लुटलं की शेतकरी देशोधडीस लागणार.
    मग त्या शेतकर्‍याने आत्महत्त्या केली की नाना-मका १५०००/- रुपये घेऊन धावत येणार. कुणी त्या विधवा शेतकरनीला लुगडे नेसविणार. कुणी शेतकर्‍याच्या मुलीच्या ड्रेस आणि अंतर्वस्त्राची तजविज करणार. कुणी त्याच्या पोराच्या शालेय शिक्षणासाठी आश्रम उघडणार.

    आणि तरीही आमचा शिकलासवरला शेतकरीपुत्र टाळ्या वाजवणार!

    चला आपुनबी टाळ्या वाजवू.

    Once more, Take a big hand.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 21:59. वाजता प्रकाशित केले.

    पुण्यनगरी : २५-०४-२०१६

    Punynagari

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 22:02. वाजता प्रकाशित केले.

    २७-०४-२०१६
    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1227148143976538

    गेल्या काही दिवसापासून केंद्र आणि राज्य सरकारने शेतीविषयक घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास केला तर हे सरकार आणखी पाच-दहा वर्षे सत्तेवर राहिल्यास .....
    सरकार व्दापारयुगात आणि शेतकरी पाताळात पोचेल, असा निष्कर्ष निघत आहे.

    - गंगाधर मुटे
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 22:06. वाजता प्रकाशित केले.

    पुण्यनगरी - ११/०७/२०१६
    ”आईचं छप्पर”

    Punynagari

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 22:08. वाजता प्रकाशित केले.

    July 12, 2014 ·

    शरद जोशीं यांची जामिनावर सुटका

    शेगाव: लोकमत वृत्त:११जुलै: शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शरद जोशी यांची बुधवारी न्यायालयाने जामीनावर सुटका केली. सन २०१० साली शेगाव येथे एका कार्यक्रमात चिथावणी देणारे भाषण केल्याने शेतकर्‍यांनी शेगावात रेल रोको केल्याच्या त्यांच्यासह ९ जणांवर आरोप आहे.
    ११ ऑटोंबर २०१० साली शेगाव येथे शेतकरी संघटनेने शेतकर्‍यांचा मेळावा आयोजित करण्यात आले होते. स्व.गजाननदादा पाटील मार्केट यार्डात पार पडलेल्या या मेळाव्यात शेतकरी नेते शरद जोशी यांनी आपल्या भाषणातुन शेतकर्‍यांना लगेच रेल रोको सुचविल्या नंतर हजारो शेतकर्‍यांनी शेगावचे रेल्वेस्थानक गाठुन ३ तास रेल रोको केले. या प्रकरणात शरद जोशी यांच्या सह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी वामनराव चटप, रवि देवांग, नामदेव जाधव, अनिल घनवट, सरोज काशीकर, शैलेजा देशपांडे आणि कैलास फाटे अशा ९ जणांविरुध्द शहर पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते.
    तेव्हा पासुन या प्रकरणातील ४ आरोपी पोलीसांच्या रेकॉर्डवर फरार होते. बुधवारी या फरार आरोपींपैकी शरद जोशी, वामनराव चटप, रवि देवांग हे पोलीस स्टेशनला हजर झाल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली. समाधान कणखर रा.वरखेड यांनी शरद जोशी यांची जामीन घेतली.
    या प्रकरणात अनिल घनवट रा.श्रीगोंदा जि.अहमदनगर हे आरोपी सद्या फरार घोषीत केले आहेत.
    (शहर प्रतिनिधी)

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 22:12. वाजता प्रकाशित केले.

    July 12, 2016
    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1281935268497825

    शेतकरी कार्यकर्त्यांसाठी....!

    या विषयावर माझं थोडं वेगळं पण ठाम मत आहे की, आपण कोणी महात्मा, युगपुरुष, थोर, महान यापैकी कोणी असू तर आपण संबंध जगच काय संपूर्ण सृष्टी आणि मनुष्यप्राण्याचा, जीवजंतूंचा देखील विचार करायला आणि त्यांचे प्रश्न सोडवून त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करायला हरकत नाही.

    पण आपण जर सामान्य सर्वसाधारण मनुष्य असू तर आपणाला नक्की मर्यादा आहेत. विचारशक्तीला व कृतीलाही मर्यादाच मर्यादा आहेत. अशा स्थितीत जर आपण सर्वव्यापी प्रश्नांचा विचार करून त्याची सोडवणूक करण्यासाठी दंड थोपटून उभे राहिलो आणि स्वत:ची आहुती जरी दिली तरी त्यातून काहीही निष्पन्न होण्याची शक्यता नाही. एक ना धड भाराभार चिंध्या यापलिकडे कोणताही चांगला निकाल आपल्याबाजूने मिळण्याची शक्यता नाही.

    हे खरे आहे की आपल्यासमोर, आपल्या समाजासमोर, आपल्या राज्यासमोर किंवा आपल्या देशासमोर हजारोच नव्हे तर कदाचित लाखो प्रश्न असतील. त्यातील काही मुख्य असतील जसे की आतंकवाद, भ्रष्टाचार, काळा पैसा, भृणहत्त्या, नासलेली शासनव्यवस्था वगैरे वगैरे. पण हे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण शेतीचा प्रश्न सुटल्यानंतर करायला काय हरकत आहे? किंवा आपण केलाच पाहीजे असे तरी आवश्यक कुठे आहे? हा विचार करायला देशामध्ये मुंग्यांच्या रांगा लागाव्या तशा राजकीय पुढारी, प्रशासन, समाजसेवक, तज्ज्ञ, विद्वान, लेखक, कवी, विचारवंत, पत्रकार यांच्या रांगा लागल्या आहेतच.

    फ़क्त शेतीत सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी "शेतमालाचा भाव" हाच विषय घेऊन लढणारांची वानवा आहे. जे काही आहेत त्यांनीही जर शेतीसोबतच अन्य विषयावर लक्ष केंद्रीत करायचे ठरवले तर शेती हा विषय त्याच्या विचारात आणि कृतीत दुय्यम स्थानी कधी येईल, काही सांगता येत नाही. इतिहास साक्षी आहे की शेतीविषय घेऊन लढायला निघालेले रथीमहारथी कधी शेतीच्या लुटीच्या व्यवस्थेत सामील होऊन शेतीच्या लुटीला हातभार लावते झाले, हे त्यांचे त्यांनाही कळले नाही.

    म्हणून मला असे वाटते की आपल्याला गरज आहे ती फ़क्त शेतीच्या प्रश्नावर संपूर्ण एकाग्रतेने लक्ष केंद्रीत करण्याची.

    - गंगाधर मुटे
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 22:16. वाजता प्रकाशित केले.

    August 01, 2016
    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1291034640921221

    जिकडे तिकडे पाणीच पाणी. दररोज पाऊस. शेतीची ओल्या दुष्काळाकडे वाटचाल.

    लोकांनी झाडं लावली आणि पाऊस बदाबदा कोसळायला लागला.
    झाडं लावायला सांगणार्‍यांना आणि लावणार्‍या एकेकाला हुडकून काढायला पाहीजे. Lol Lol
    आता ओल्या दुष्काळाची भरपाई सरकार किंवा विमा कंपनीऐवजी या झाडं लावणार्‍यांकडूनच वसूल करायला पाहिजे. Lol Lol

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 22:17. वाजता प्रकाशित केले.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 22:35. वाजता प्रकाशित केले.

    August 15, 2016

    गोरा इंग्रज पाडाव दिनाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा

    Punynagari

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 22:41. वाजता प्रकाशित केले.

    September 10, 2016

    सध्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. मराठवाडा आणि विदर्भात यांचे प्रमाण जास्त आहे. त्याची कारणे वेगवेगळी असली तरी राज्यकर्त्यांना अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे बळीचा 'बळी'चा जात आहे. आज जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त दैनिक पुढारी ( सोलापूर आवृत्ती) मध्ये घेतलेला हा वेध.

    shetkari

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 22:46. वाजता प्रकाशित केले.

    November 11, 2016
    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1385815528109798

    वाचन ही आपली जीवनशैली झाली पाहिजे हे खरे असले तरी पुस्तकी वाचनात शेतकर्‍यांच्या बाजुने काही तरी आढळायला हवे की नाही? सारी भाषा शेतीच्या लुटीला पोषकच असेल तर शेतकर्‍यांनी वाचून तरी काय उपयोग?

    साहित्याने समाजाची दिशाभूल केली असा माझा स्पष्ट समज/गैरसमज झाल्यापासून कोणी "वाचाल तर वाचाल" असे म्हटले की माझ्या अंगावर काटा उभा राहतो.

    - गंगाधर मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 22:50. वाजता प्रकाशित केले.

    November 14, 2016
    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1388814317809919

    "आयात कर सुरु आणि निर्यात कर रद्द" व्हावा असे अर्थक्रांतीचे अनील बोकील यांचे म्हणणे आहे. तसे झाले तर भारतीय शेतीला काही अंशी फ़ायदेशीर ठरु शकते.

    - गंगाधर मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 17/11/2016 - 22:53. वाजता प्रकाशित केले.

    16-11-2016
    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1390891214268896

    अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!

    मी कविता लिहितो, साहित्य संमेलन भरवतो, लेखनस्पर्धा आयोजित करतो पण यातून शेतीचा प्रश्न सुटणार आहे, असा मी कधीच दावा केलेला नाही कारण यातून फ़क्त वैचारिक उत्क्रांतीची दिशा बदलू शकते आणि त्यातून फ़ळ हाती लागायला कदाचित शेकडो वर्षे लागू शकतात.

    कूलरची हवा खात फ़ेसबूकवर पोस्टी टाकल्याने किंवा सरकारचे पाय दाबत बसल्यानेही शेतीला आर्थिक स्वातंत्र्य व आर्थिक मुक्ती मिळणार नाही, याचेही मला भान आहे. सर्वांनी भानावर यावे, अशी अपेक्षा मी ठेवणे गैर नाही.

    शेतीचा प्रश्न सोडवायचा असेल तर कधीना कधी हातात मशाली घेऊन मैदानात उतरावेच लागेल. वेळ प्रसंगी हौतात्म्य पत्करण्याची तयारीही करावी लागेल.

    मी तयार आहे आणि ज्यांना ज्यांना शेतीची आर्थिक पारतंत्र्यातून मुक्तता व्हावी असे वाटते, त्यांनीही तशी तयारी केली पाहिजे, असे माझे मत आहे.

    अन्य काही मार्ग असतील तर सुचवा.... स्वागत आहे!

    - गंगाधर मुटे
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 20/11/2016 - 10:48. वाजता प्रकाशित केले.

    चलन तुटवड्यामुळे शेतकरी हैराण
    नवकाळ दिनांक - २०-११-२०१६

    Navakal

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 22/08/2017 - 16:12. वाजता प्रकाशित केले.

    केंद्र सरकारने उडीद आणि मुगाच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने गेल्या दोन आठवड्यात तीन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. उडीद आणि मुगाच्या आयातीवर निर्बंध, कच्च्या आणि पक्क्या तेलावरील आयात शुल्क 5 आणि 7 टक्क्यांहून 15 आणि 25 टक्के केलं. तर तूर डाळीच्या आयातीवरही निर्बंध घातले आहेत.

    सोयाबीन तेलावर 12.5 टक्के आयात शुल्क होतं, ते आता 17.5 करण्यात आलं आहे. कच्च्या पामतेलावर 10.2 टक्के आयात शुल्क होतं, ते 15.2 टक्के केलं. रिफाईन पाम तेलावर 10 टक्के आयात शुल्क होतं, ते आता 25 टक्के करण्यात आलं. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत शेतमालाच्या भावावर अंशतः का होईना पण त्याचा नक्कीच परिणाम होईल.

    तुरीचे बाजारभाव कोसळल्यानंतर हमी भावाने तूर खरेदी प्रकरणात सरकारची चांगलीच शेकली. त्यामुळे आता सरकार भानावर यायला लागले कि काय असे वाटायला लागले आहे.

    - गंगाधर मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 23/08/2017 - 10:51. वाजता प्रकाशित केले.

    ऊत्पादन खर्च म्हणजे काय? तो कसा काढायचा असतो? शेतमालाचा उत्पादन खर्च काढण्याची पद्धत किती सदोष आहे? शेतमालाचा सरकारी उत्पादन खर्च किती फसवा आहे, एखाद्या पिकाचा उत्पादन खर्च प्रत्यक्षात किती निघतो. याविषयी ऊत्पादन खर्च+50% नफा या मागणीचा उच्चार करणाऱ्यांना फुल ना फुलाची पाकळी एवढी तरी माहिती आहे काय? कि नुसतीच जीभ उचलून टाळूला लावत आहेत?

    देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातील शेती मालाचा उत्पादन खर्च काढला तर आजच्या हमी भावाच्या (msp) निदान तिप्पट - चौपट तरी निघतो.

    ऊत्पादन खर्च+50% नफा या मागणीचा अर्थ शेतमालाला हमी भावाच्या (msp) किमान सहापट भाव असा अर्थ होतो.

    उदा. गव्हाला प्रति क्विंटल १० हजार रुपये भाव द्या अशी मागणी एखादा येडपटच करू शकतो. त्यामुळे ऊत्पादन खर्च+50% नफा हि मागणी अव्यवहार्य ठरते.

    (अधिक माहितीसाठी युगात्मा शरद जोशी समजून घ्यावे.)

    - गंगाधर मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 07/03/2019 - 21:50. वाजता प्रकाशित केले.

    प्रसिद्ध आणि आजच्या युगातील आघाडीचे सिनेगीतकार, कवी, लेखक, पटकथाकार श्री गुरु ठाकूर यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचा योग तर आला पण; उंची कधी गाठता येईल? गडकरी रंगायतन, ठाणे ३१/१२/२०१५
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    https://www.facebook.com/photo.php?fbid=1150917248266295&set=a.376155589...
    Guru Thakur

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 07/03/2019 - 21:58. वाजता प्रकाशित केले.
    दुसरे अभंग साहित्य संमेलन
    स्थळ : मा. सा. कन्नमवार सांस्कृतिक सभागृह तहसिल कार्यालयामागे, राजुरा जि. चंद्रपूर

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 07/03/2019 - 22:03. वाजता प्रकाशित केले.
    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
    आंतरराष्ट्रीय चर्चासत्र
    मराठी गझलेचा जागतिक संचार
    दि. १२, १३ व १४ जानेवारी २०१७ 

    https://www.facebook.com/photo.php?fbid=1457753507582666&set=a.141053692...

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 07/03/2019 - 22:06. वाजता प्रकाशित केले.

    अध्यक्षीय मंडळाची बैठक, श्रीगोंदा (अहमदनगर) ३१/१२/२०१६

    https://www.facebook.com/sharadjoshi.in/photos/a.510330199061169/1318586...

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 07/03/2019 - 22:11. वाजता प्रकाशित केले.

    "आपलेच घोडे दामटण्याऱ्या" जीवजंतूंनी हे विश्व व्यापलेले आहे. मनुष्य नावाचा प्राणी याला अपवाद असेल काय?

    © गंगाधर मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 07/03/2019 - 22:12. वाजता प्रकाशित केले.

    "सरकार शेतकऱ्याचं मायबाप असते." अशी अंधश्रद्धा बाळगणाऱ्या "क्वालिफाईड अंधश्रद्धाळुंनी" शेतीचं पार वाटोळं केलंय.

    © गंगाधर मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 07/03/2019 - 22:13. वाजता प्रकाशित केले.

    शेतकरी संघटना चालवताना युगात्मा जोशींनी "क्वालिटी" आणि ''क्वांटिटी" दोन्ही बाबी पाळून उत्तुंग उंचीवर नेऊन ठेवले.

    © गंगाधर मुटे

    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1772510279440319

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 07/03/2019 - 22:14. वाजता प्रकाशित केले.

    १९८५ नंतरची प्रत्येक निवडणूक शेतकरी संघटनेचा लचका तोडूनच गेली आहे. कधी आणि कोण थांबवेल हे दुष्टचक्र?

    © गंगाधर मुटे
    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1770356902988990

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 07/03/2019 - 22:16. वाजता प्रकाशित केले.

    "नोटबंदीचा फटका शेतकऱ्यांना बसला" हे अशा अविर्भावात सांगताहेत कि, जणू काही त्यांनी आजवर त्याला तळहातावरच जपले होते.

    © गंगाधर मुटे
    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1769382573086423

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 07/03/2019 - 22:18. वाजता प्रकाशित केले.

    शेतीच्या आयुष्यात काहीच बदल घडणार नसेल तर नुसती सरकारे बदलण्यात व्यर्थ शक्तिपात का करून घ्यावा?

    © गंगाधर मुटे
    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1768360826521931

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 07/03/2019 - 22:19. वाजता प्रकाशित केले.

    जो विचार अगणित प्रश्नांची व अनंत उपप्रश्नांची तर्कसंगत उत्तरे देऊ शकतो, तोच खरा विचार आणि तेच खरे विचारधन !!

    © गंगाधर मुटे
    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1762633937094620

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 07/03/2019 - 22:20. वाजता प्रकाशित केले.

    सर्व राजकीय पक्षांशी माझे भांडण फक्त त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणांविषयी आहे. एरवी सर्वच पक्ष मला सारखेच प्रिय/अप्रिय आहेत.

    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1761387797219234

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 07/03/2019 - 22:22. वाजता प्रकाशित केले.

    कळत-नकळत "मोदींची शेतकरीविरोधी धोरणे" या मुख्य केंद्रबिंदूपासून भरकटत शेतकरी आंदोलकांचा गुरुत्वमध्य मोदीद्वेषाकडे सरकतो आहे का?
    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1754610097897004

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 07/03/2019 - 22:26. वाजता प्रकाशित केले.

    ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री "डॉ. भालचंद्र नेमाडे" यांच्या भेटीचा सुंदर योग जुळून आला. देहयष्टी पासून साहित्यातदेखील आपली वेगळी उंची गाठणारा हा साहित्यिक माणूस म्हणूनही मनाने उंच जाणवला. छोट्याश्या भेटीत सरांनी खूप मोठ्या गप्पा मारल्या. मनमोकळेपणे संवाद साधला. बोलण्यात वयाची उंची आणि अनुभवाची खोली प्रकर्षाने जाणवत होती. या भेटीत आम्हीही खूप श्रीमंत झालो.

    आज ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पद्मश्री डॉ भालचंद्र नेमाडे यांची भेट झाली. त्यांना "माझी गझल निराळी" भेट दिली. सोबत प्रा. कुशल मुडे, प्रा. भुपेश मुडे, प्रा. रमेश झाडे आणि गजलकार मित्र जनार्दन म्हात्रे.

    https://www.facebook.com/photo.php?fbid=1725448724146475&set=a.376155589...

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 07/03/2019 - 22:29. वाजता प्रकाशित केले.

    विजय जावंधियांनी शेतकरी संघटनेचा बिल्ला लावणे म्हणजे .......
    नवऱ्याच्या नावाने कुंकू लावून त्याच्याशीच प्रतारणा करत उजळ माथ्याने गावभर चरुन येण्यासारखे आहे.

    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1713518832006131

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 07/03/2019 - 22:31. वाजता प्रकाशित केले.

    शेतकरी संघटनेचे आदेश पाळत नाही, ध्येय्य धोरणाशी सहमत नाही, तरी Vijay Jawandhia भाऊ स्वतःला शेतकरी संघटनेचा पाईक म्हणवून घेतात. हा मूर्खपणाचा कळस नाही काय?. Lol

    निदान घटस्फोटीत पाईक
    किंवा
    परित्यक्ता पाईक
    असे तरी म्हणावे कि नाही?

    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1712075855483762

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 07/03/2019 - 22:33. वाजता प्रकाशित केले.

    तो दिवस कधी उजाडेल ?
    ज्या दिवशी
    शेतीच्या प्रश्नावर डावे-उजवे
    एकमेकाच्या ........ बसतील?

    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1710961135595234

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 07/03/2019 - 22:44. वाजता प्रकाशित केले.

    काल एक मित्र मला म्हणाला की, शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला शीक.

    मी म्हटले भाऊ, मी शेतीमध्ये विमान, हेलिकॉप्टर, रॉकेट, क्षेपणास्त्र, अण्वस्त्र वगैरेचा वापर करुन मी शेती करायला तयार आहे. पण मग गव्हाचे भाव प्रति किलो २५ लक्ष रुपये, कांद्याचे भाव प्रति किलो २० लक्ष रुपये, वांग्याचे भाव प्रति किलो १५ लक्ष रुपये वगैरे पडतील.
    या भावाने खरेदी करायची तुझी मानसिकता आणि आर्थिक कुवत तरी आहे काय? कि नुसती जीभ उचलुन टाळुला लावतोस?

    अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने कोणत्याही पिकाचा उत्पादनखर्च आणखी वाढत जातो हे या देशातल्या धुरिनांना, अर्थतज्ज्ञांना ते एक दिवस वय संपून मरुन जातील पण जिवंतपणी कळायचे नाही.

    आणि अशा बैताडांच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी पिचला जात आहे.

    - गंगाधर मुटे
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~
    https://www.facebook.com/gangadharmute/posts/1580170245340991

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 06/11/2020 - 10:54. वाजता प्रकाशित केले.

    कोरोनाने अमिताभच्या "नाकात नऊ" आणि अमिताभने लोकांच्या "कानात नऊ" आणले.

    - एक आर्वीकर #गंगाधर_मुटे #आर्वीकर #rvkr

    Posted by Gangadhar Mute on Thursday, November 5, 2020

    ====

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 04/12/2023 - 21:05. वाजता प्रकाशित केले.
    तोट्याच्या शेतीला विमा लागू करणे हे विचारवंतांचे वैचारिक दारिद्र्य व वाह्यात अव्यवहारी अर्थशास्त्र होय.
     
    #शुभरात्री_लोक्सहो ३०/११/२०२३

    https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid0jnjkqu3sCNs69E7uUebpV...

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 06/12/2023 - 19:03. वाजता प्रकाशित केले.
    १०० ना ओरबाडून १० ना मलम लावणे व उरलेले ९०% घबाड स्वतःच्या घशात ओतणे म्हणजेच सट्टा, मटका, लॉटरी आणि विमा.
     
    #शुभरात्री_लोक्सहो

    https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid02TcjRLS1dgC5URYd8iDD7...

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 08/12/2023 - 17:13. वाजता प्रकाशित केले.
    शेतकरी बळीराजा असल्याने डोक्यावर लाथ देणाऱ्यापुढे झुकतो आणि हीत जोपासणाऱ्याचे डोळे फोडतो. 
    #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे

    https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid0o3EgjsvNm7K8DvbzQtASn...

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 08/12/2023 - 17:14. वाजता प्रकाशित केले.
    शेती हा असा एक रोमहर्षक खेळ आहे की.... खेळ खेळून हरतो भारत अन न खेळताच जिंकतो इंडिया
     
    #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
     

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 09/12/2023 - 18:50. वाजता प्रकाशित केले.
    "माझ्या बाजूने लढा" असे शेतकरी कधी म्हणतच नाही. तुमालेच खरूज हाये म्हून लढता. हाये कि नई? 
     
    #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
     

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 09/12/2023 - 18:53. वाजता प्रकाशित केले.
    फार्मर्स प्रोडूसर कंपनी ही काळाची गरज : भाग - १
    पतपुरवठा वाढवण्यासाठी शेतकरी संघटना करणार नाविन्यपूर्ण आंदोलन
     
    ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 20/12/2023 - 21:11. वाजता प्रकाशित केले.
    हा विचार कुणाकुणाला पटतोय खरंच छातीवर हात ठेवून सांगा बरं!
     
    "मेंदूने विचार करणारे महात्म्याचा पराभव करतात तर हृदयाने विचार करणारे महात्म्याला कोंदणात सजवतात"
     
    - गंगाधर मुटे

    फेसबुक लिंक

    शेतकरी तितुका एक एक!

  • admin's picture
    admin
    बुध, 20/12/2023 - 21:13. वाजता प्रकाशित केले.

    मी शेतकरी संघटनेत का आलो? ABP माझा वरील जाहीर प्रकटन

    https://youtu.be/gye5Nyh-pks

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 21/12/2023 - 14:47. वाजता प्रकाशित केले.
    मित्र मला म्हणाला "माटावेल आणला का?" माटावेल म्हणजे काय ब्वॉ?  Wink  Lol
     
    #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • admin's picture
    admin
    गुरू, 21/12/2023 - 14:49. वाजता प्रकाशित केले.
    35 वर्षानंतर आज अचानक व. पु. काळेंची "पप्पा" ही कथा मिळाली. 
     
     
    #शुभरात्री_लोक्सहो
  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 22/12/2023 - 19:12. वाजता प्रकाशित केले.
    शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिल्यास शेतकरी तुमचा तेलंगणा करतो. Wink  Lol Lol 
     
    #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे

    फेसबुक लिंक

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 22/12/2023 - 19:16. वाजता प्रकाशित केले.
    शहजादे, पप्पू, फेकू, पनौती अथवा तत्सम शब्द उच्चारू शकणाऱ्यांचे अंतर्मन अस्सल रानटीच असते.
     
    #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
     
     

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 22/12/2023 - 19:53. वाजता प्रकाशित केले.
    हिंदूंचा पक्ष भाजप व अन्य पक्ष हिंदू विरोधी .... असे राजकीय ध्रुवीकरण होत आहे, याला जबाबदार कोण?
     
    #शुभरात्री_लोक्सहो

    फेसबुक लिंक

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 24/12/2023 - 19:38. वाजता प्रकाशित केले.
    नाही निवडता आला कुणाला, जन्मदाता बाप
    कशास मिरवता व्यर्थच गडे हो, धर्म आणिक जात?
     
    © गंगाधर मुटे #आर्वीकर #rvkr
     

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 24/12/2023 - 19:48. वाजता प्रकाशित केले.
    पाटलांची पाटीलकी तमाशामुळे नव्हे तर सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे गेली. Smile Smile
     
     
    #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
     

    फेसबुक लिंक 

    शेतकरी तितुका एक एक!

  • admin's picture
    admin
    सोम, 01/01/2024 - 05:01. वाजता प्रकाशित केले.

    महागडी, ब्रँडेड, इम्पोर्टेड दारू पिऊनही मास्तरची मास्तरकी, साहेबांची साहेबकी, व्यापाऱ्यांची व्यापारकी, उद्योजकांची उद्योजककी, पुढाऱ्यांची पुढारकी गेलेली नाही...
    मग
    सडकी, गावरान, गावठी, सस्ती दारू पिल्याने पाटलांची पाटीलकी कशी जाईल?

    ज्याच्यात हिम्मत असेल त्यांनी मला यामागील अर्थशास्त्र आणि तर्कशास्त्र समजून सांगावे.
    अन्यथा
    मान्य करावे की पाटलांची पाटीलकी दारूमुळे नव्हे तर सरकारच्या शेतीच्या लुटीच्या धोरणामुळे गेलेली आहे.

    "दारूमुळे पाटलांची पाटीलकी गेली" असा विचार डोक्यात येणे हे वैचारिक दारिद्र्य आहे. आर्थिक आणि सांस्कृतिक दारिद्र्य संपेल तेव्हा संपेल.... पण वैचारिक दारिद्र्य तरी सरत्या वर्षासोबत संपून प्रत्येकात... विशेषत: प्रत्येक शेतकरीपुत्रात निदान नव्या वर्षात तरी वैचारिक श्रीमंती यावी यासाठी......

    सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

    - गंगाधर मुटे

  • Andi2702's picture
    Andi2702
    मंगळ, 02/01/2024 - 07:48. वाजता प्रकाशित केले.

    नवरा आणि बायको दोघेही अपघातात वारले…

    नवरा भूत बनला आणि बायको चेटकीण

    काही दिवसांनंतर दोघे पुन्हा भेटले

    बायको - किती वेगळे वाटता भूत बनल्यानंतर…

    नवरा - पण तू अजिबात बदलली नाहीस…
    Lol

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 05/01/2024 - 22:20. वाजता प्रकाशित केले.

    माझ्या नावाने फेक खाते कोणी बनवत नाही. त्यांना माहित्येय की माझे FB फ्रेंडस नवा पैसाही कुणाला देत नाहीत. Lol Lol

    #शुभरात्री_लोक्सहो © गंगाधर मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 12/01/2024 - 19:20. वाजता प्रकाशित केले.
    *फार्मर्स प्रोडूसर कंपनी ही काळाची गरज : भाग - १*
    पतपुरवठा वाढवण्यासाठी शेतकरी संघटना करणार नाविन्यपूर्ण आंदोलन
     
    शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची घोषणा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
     
     

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 12/01/2024 - 19:25. वाजता प्रकाशित केले.
    आरक्षण हवे की नको?
     
    1) काही लोकांच्या मते भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्याने आता आरक्षण पुढे ठेवण्याची गरज नाही ते रद्द केले पाहिजे असे त्यांचे मत आहे पण भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली पण या 75 वर्षात मागासले होते त्यांचा मागासपणा दूर व्हायला हवा होता पण तसे न होता याउलट मागासले होते ते आणखी मागास झाले मग आरक्षण नको हा मुद्दा कसा टिकणार?
    स्वातंत्र्य पूर्वी जे मागासले होते, 75 वर्षात स्वातंत्र्यानंतर ते इतरांच्या बरोबरीने आर्थिक पायावर उभे राहायला हवे होते तेच झाले नाही तर.... 75 वर्षे काय आणि 750 वर्षे काय, वर्षाचा हिशोब काय कामाचा?
    2) आरक्षण रद्द करा याचा अर्थ नोकरीच्या 100 टक्के जागा मोकळ्या करून त्या आमच्यासाठी 100 टक्के मोकळ्या करा, असे म्हणणे म्हणजे आडपडद्याने आरक्षण मागणेच आहे. 
    आरक्षण रद्द करून 100 टक्के जागा मोकळ्या झाल्या की आम्हाला जास्तीत जास्त संधी उपलब्ध होतील आणि आम्ही जास्तीत जास्त संधीचा फायदा घेऊ शकू असा त्याचा आडपडद्याने अर्थ आहे. म्हणजे आरक्षण नको म्हणणे हे सुद्धा आमच्यासाठी सर्व जागा आरक्षित करा असे म्हणण्यासारखे आहे.
    उदा. : बापाच्या हाती दहा चॉकलेट असतील आणि त्यातील काही चॉकलेट बापाने शेजाऱ्याच्या लेकराला द्यायचे ठरवले तर त्याचा मुलगा म्हणतोय की शेजाऱ्याच्या पोराला अजिबात देऊ नको. त्याला देऊ नको याचा अर्थ सगळे चॉकलेट माझ्यासाठीच राखून ठेव,  सर्व चॉकलेट मी एकटाच खाईल... हा त्याचा अर्थ असतो.
    निष्कर्ष : इतरांना देऊ नको याचा अर्थ स्वतःसाठी आरक्षण मागणे असाच असतो.
    ज्यांना आरक्षण नकोच त्यांना आरक्षण असले काय आणि आरक्षण नसले काय, फरक पडायलाच नको, त्यांनी यात मुंडके खूपसायची अजिबात गरज उरत नाही. Lol
    माझी भूमिका स्पष्ट आहे. मी आरक्षणाचा विरोधही करत नाही आणि समर्थनही करत नाही. कारण केवळ अर्ध्या भाकरीच्या तुकड्यासाठी 99 टक्के लोकांनी कुत्र्यासारखे भांडणे.... या पलीकडे याला काही अर्थ नाही. 
    आरक्षण आणि नोकरीमुळे केवळ 1 - 2 टक्के लोकांचाच रोजीरोटीचा प्रश्न सुटू शकतो. बाकी कष्टकरी जनतेच्या आयुष्यात काळाकुट्ट अंधारच शिल्लक राहणार आहे.
     
    - गंगाधर मुटे
     

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 14/01/2024 - 14:27. वाजता प्रकाशित केले.
    ३ ग्रॅम तीळगुळासाठी गोड गोड बोलायला नाही परवडत... म्हणजे अज्जीबात नाही परवडत. Lol
     
    #सुप्रभात_लोक्सहो #गंगाधर_मुटे

    LINK

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 15/01/2024 - 18:04. वाजता प्रकाशित केले.
    भांडणात सिनेमातल्या स्त्रिया पुरुषांच्या मागे मागे तर गावातल्या स्त्रिया पुरुषांच्या पुढे पुढे का असतात?
     
    #शुभरात्री_लोक्सहो

    LINK

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 27/01/2024 - 12:53. वाजता प्रकाशित केले.
    15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला की भारतीयांच्या तावडीतून इंग्रज स्वतंत्र झाला?
     
    #सुप्रभात_लोक्सहो #गंगाधर_मुटे

    Facebook Link

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 27/01/2024 - 12:55. वाजता प्रकाशित केले.
    प्रजेची सत्ता आणू इच्छिणाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
     
    - #गंगाधर_मुटे
     

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 27/01/2024 - 15:59. वाजता प्रकाशित केले.
    मोदींचे कौतुक किंवा विरोध केल्यानंतर वेळ वाचला तर जेवण वगैरे करत जा लोक्सहो!  
    देशाला तुमची भयानक गरज आहे.   Lol
     
    #शुभरात्री_लोक्सहो

    Facebook Link

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 28/01/2024 - 11:19. वाजता प्रकाशित केले.
    "माझ्या बाजूने लढा" असे शेतकरी कधी म्हणतच नाही. तुमालेच खरूज हाये म्हून लढता. हाये कि नई?
     
    #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे

    Facebook Link

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 02/02/2024 - 08:13. वाजता प्रकाशित केले.

    व्हॉट्सॲपवर लोक एकमेकांना "हाय" मागतात आणि बुजुर्ग म्हणतात "हाय लागली तर जीवन उद्ध्वस्त होते"

    #गंगाधर_मुटे #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 02/02/2024 - 19:24. वाजता प्रकाशित केले.
    काही साहित्यिक स्वतःचं कौतुक स्वतःच करतात. भाट वगैरे ठेवत नाहीत.
     
    #जौद्या_आप्ल्याले_काक्रा_लाग्ते #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे

    फेसबुक लिंक 

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 06/02/2024 - 10:26. वाजता प्रकाशित केले.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 06/02/2024 - 11:19. वाजता प्रकाशित केले.
    शेतमाल म्हंजी हपापाचा माल व्हय का MSP च्या भावात गपापा करायाले?    Headack Headack Angry
    MSP नक्को, घामाचे दाम हवे!
     
    #गंगाधर_मुटे #शुभरात्री_लोक्सहो

    फेसबुक लिंक

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 06/02/2024 - 11:23. वाजता प्रकाशित केले.
    काँग्रेसने रामदेवबाबाला सलवार नेसवली होती. आंदोलन चिरडणे सरकारला अवघड नसते.
     
    #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे #rvkr

    फेसबुक लिंक

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 06/02/2024 - 11:24. वाजता प्रकाशित केले.
    MSP ऐवजी उत्पादन खर्चावर भाव मागणारे आंदोलन असते तर हे फुकटखाऊ साहित्यिक बायकोच्या पदरामागे जाऊन दडले असते ना?
     
    #गंगाधर_मुटे #rvkr

    फेसबुक लींक

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 06/02/2024 - 11:26. वाजता प्रकाशित केले.
    ४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई
    सिंहावलोकन - भाग २
     
    प्रास्ताविक भाषण
     
            चौथ्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनातील माझ्या भाषणाची चित्रफीत बघितली. स्वाभाविकपणे स्वतःच्या त्रुटी स्वतःला लक्षात यायला लागतात. त्या भाषणात मी उपस्थित केलेले मुद्दे किती लोकांना कळले असतील, देवच जाणे!
            कामाच्या धबडग्यात चिंतनाला अथवा पूर्वतयारीला वेळ न मिळाल्याने उभं राहिल्यानंतर जे सुचले ते बोललो. पण मर्यादित वेळेमुळे व वेळेचे बंधन पाळण्यामुळे बहुतांश मुद्दे अत्यंत त्रोटकपणे आलेले आहेत. एकेक मुद्दा सविस्तर घ्यायचा म्हटले तर त्या भाषणाला किमान एक तास तरी वेळ हवा होता. मी आयोजक किंवा सर्वेसर्वा असलो तरी प्रास्ताविक करणाऱ्याने किती वेळ बोलावे, याचे मला भान होते. अध्यक्षांच्या भाषणापेक्षा प्रस्ताविकच जास्त लांबीचे झाले तर ते "जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा" या वर्गवारीत तर जातेच पण चेष्टेचा विषयही होत असते.
            पण मी मांडलेले काही मुद्दे शेतकरी साहित्य चळवळीच्या दृष्टीने महत्वाचे होते. पण मुद्दे नवीन होते आणि मुद्याचा विस्तार न केल्याने त्यांचे अत्यंत त्रोटकपणे प्रकटीकरण झाले. त्यामुळे ते किती लोकांना कळले असतील,असा स्वाभाविक प्रश्न मला पडलेला आहे.
            शेतकरी साहित्य चळवळीची भूमिका आणि भविष्यातील वाटचाल याविषयी भाष्य होणेही अत्यंत महत्वाचे आहे. ही भूमिका आयोजकालाच पार पडायची असेल तर पुरेसा वेळ मिळणेही आवश्यक आहे.
    भविष्यात यातून मार्ग कसा काढायचा, प्रास्ताविकाऐवजी बीजभाषण करायचे कि काय, हा विचार करावा लागणार आहे.  
     
    - गंगाधर मुटे  
     

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 07/02/2024 - 09:05. वाजता प्रकाशित केले.

    भविष्य उज्वल नसलेला भविष्यकाळ लाथाडण्याची तयारी असलेल्यांचा भविष्यकाळ उज्वल असतो.

    #सुप्रभात_लोक्सहो #गंगाधर_मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 07/02/2024 - 09:06. वाजता प्रकाशित केले.

    दिल कहे दिलदार मिला,
    हम कहें हमें प्यार मिला
    प्यार मिला, हमें यार मिला,
    एक नया संसार मिला
    आस मिली अरमान मिला
    जीने का सामान मिला
    मिल गया एक सहारा

    "मिला" या शब्दाभवती किती सुंदर, नादमय, काव्यात्मक गुंफ़ण केली आहे या ओळींत!
    कुठलाही अवजड शब्द न वापरता, शब्दाच्या दुर्बोध खेळ्या न करता अगदी सहज आशय साधलाय या ओळीत गीतकाराने.
    प्रांजळ आणि सोज्वळ शृंगाराचा उत्कृष्ट नमुनाच म्हणायला हवे हे गीत.
    हे गीत सिनेमाचे असले तरी कवितेचा आणि साहित्यिक दर्जाचा उत्कृष्ट अविष्कारच वाटतो मला. Smile

    धन्यवाद साहीर लुधियानवी....!

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 10/02/2024 - 20:20. वाजता प्रकाशित केले.
    वर्धा जिल्ह्यात प्रचंड गारपीट 
    पण 
    यंदाचं गारपीट माझ्या गावाच्या बाजूने कडेकडेने ३-४ किमी वरून गेलं. आमचं गाव सोडून दिलं. असं पहिल्यांदाच घडलं. नाहीतर असं कधी होत नाही.
    निसर्गाच्या लिस्टीत आमचं गाव अग्रस्थानीं लिहून आहे.    

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 11/02/2024 - 21:25. वाजता प्रकाशित केले.

    विचारधारा व सिद्धांत सिद्धतेच्या कसोटीवर सिद्ध करायचे असतात, बहुमताच्या बळावर नव्हे!

    #गंगाधर_मुटे #आर्वीकर #rvkr #अस्सलशेतकरी

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 11/02/2024 - 21:26. वाजता प्रकाशित केले.

    राजकारणजीवी, भ्रष्टाचारजीवी, कमिशनजीवी, पगारजीवी…… नसण समजलं तर झोपा गो फेसबुकजीवींनो?

    #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे #आर्वीकर #rvkr #अस्सलशेतकरी

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 12/02/2024 - 20:54. वाजता प्रकाशित केले.
    ‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन
    श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत,शेगांव येथे बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०१० रोजी ‘रानमेवा’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा. शरद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रविभाऊ देवांग, कवी इंद्रजित भालेराव, माजी आमदार मा. वामनराव चटप, माजी आमदार मा. सरोजताई काशीकर आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला अंदाजे दिड लाख शेतकरी उपस्थित होते. 

    FaceBook Link

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 12/02/2024 - 20:55. वाजता प्रकाशित केले.
    स्टार माझा या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनी तर्फे जगभरातल्या मराठी भाषिक ब्लॉग लेखकांसाठी नुकतीच “ब्लॉग माझा-३” ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. नुकतेच यास्पर्धेचे विजेते ब्लॉग जाहीर करण्यांत आलेले आहेत, या विजेत्यांच्या यादीमध्ये “रानमोगरा – शेती आणि कविता” (http://gangadharmute.wordpress.com
    ) या माझ्या ब्लॉगचाही समावेश आहे.

    Facebook Link

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 14/02/2024 - 22:52. वाजता प्रकाशित केले.

    एकट-दुकट व्यक्तीवर Love करायला मी रिकामटेकडा नाही. मी एकाचवेळी संबंध चराचरावर LOVE करतो.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 14/02/2024 - 22:53. वाजता प्रकाशित केले.

    एकट-दुकट व्यक्तीवर Love करायला मी रिकामटेकडा नाही. मी एकाचवेळी संबंध चराचरावर LOVE करतो.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 16/02/2024 - 11:26. वाजता प्रकाशित केले.

    अनुभव समृद्धीची खोली वाढवायची असेल तर सकारात्मक-नकारात्मक, पुरोगामी-अधोगामी-सनातनी, धार्मिक-निधर्मिक, नास्तिक-आस्तिक.... असल्या (फालतू) संकल्पनाच्या संकुचित कोषातून बाहेर पडून उपभोगाच्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावत जाणे आवश्यक आहे. त्यासाठी जे जे दिसेल, जे जे मिळेल त्यात स्वतःला समरस करून घेतले पाहिजे. त्यात उगीच मनाच्या कोतेपणाचे अडथळे नकोतच.

    तर सांगायचं तात्पर्य इतकचं की..... मी पण म्हटलं तुम्ही पण म्हणा.... "राधे राधे"

    (At बाके बिहारी टेम्पल, वृंदावन, उत्तर प्रदेश)

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 16/02/2024 - 11:27. वाजता प्रकाशित केले.

    दिल्लीची राजधानी नागपूरला हलवल्याखेरीज पाकशी युद्ध असंभव.
    तोपर्यंत युद्धाचा पर्याय अनुपलब्ध.

    © गंगाधर मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 16/02/2024 - 11:27. वाजता प्रकाशित केले.

    चक्रीभुंग्याने सोयाबीन नेलं, गुलाबी अळीने कापूस. आता गारपीट यावा अन गहू झोपवून जावा. Welcome रे गारपिट्या.

    #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे #आर्वीकर #rvkr #अस्सलशेतकरी

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 18/02/2024 - 09:43. वाजता प्रकाशित केले.

    अन्न व वस्त्र स्वस्तात मिळत असल्याने देशात निष्कारणचे वितंडवाद होत राहतात. कामच उरले नाही बिचाऱ्यांना! Lol Lol Lol Lol
    झोपा आता #शुभरात्री

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 18/02/2024 - 09:46. वाजता प्रकाशित केले.

    "शेतकरी नपुसक असल्याने आत्महत्या करतात"असे पुढाऱ्याऐवजी साधुसंताने म्हटले असते तर अनिसवाल्यांनी केवढा गदारोळ आणि आकांततांडव केले असते.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 18/02/2024 - 09:46. वाजता प्रकाशित केले.

    अंधश्रद्धा या शब्दाची धड कुणालाच व्याख्या करता आलेली नाही. तरीही हा शब्द योग्य समजून वापरत राहतात. अंधश्रद्धाळू कुठले! Lol Lol Lol

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 18/02/2024 - 09:47. वाजता प्रकाशित केले.

    प्रबोधनाची लढाई प्रबोधनानेच झाली पाहिजे. अनिसवाल्यांनी कायद्याच्या मागे लपून शरसंधान करण्याऐवजी प्रबोधनाच्या मार्गाने जावे. इंदुरीकरांना ऐकायला लाखो माणसे मिळतात. अनिसवाल्यांना ऐकायला २५ माणसे मिळत नसतील तर अनिसवाल्यानी उटपटांग हरकती करण्याऐवजी लोकांमध्ये आपल्या विचाराचे स्थान निर्माण करावे. स्वतःची विश्वासाहर्ता निर्माण करावी.

    कायद्याची लढाई कायद्याने
    बंदुकीची लढाई बंदुकीने
    तलवारीची लढाई तलवारीने
    तसेच
    विचाराची लढाई विचारानेच
    लढली गेली पाहिजे.... इतकी समज अनिसवाल्यांना ज्या दिवशी येईल त्या दिवशी अनिसवाले माणुसकीत आले असे म्हणता येईल.

    तुम्ही शांतीदूत नसला तरी हरकत नाही पण निदान रानटीपणा तरी दाखवू नका.

    - गंगाधर मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 20/02/2024 - 18:43. वाजता प्रकाशित केले.

    *ज्याचा पक्ष, जात आणि धर्म शेती हाच असतो तोच फक्त शेतीसाहित्यिक असतो... बाकी सर्व शेतीच्या शोषकांना पोषकच!*

    https://www.facebook.com/share/p/UrDHC7oRoaF1XYE8/?mibextid=oFDknk

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 20/02/2024 - 18:44. वाजता प्रकाशित केले.

    *"पिढ्यान्‌पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न" म्हणजे शेतकरी साहित्य संमेलन!*

    https://www.facebook.com/share/p/vrBn6KaSKg9Frz5R/?mibextid=Nif5oz

    शेतकरी साहित्य चळवळीची कार्यपद्धती या विषयावर मी फेसबुक वर चर्चेसाठी काही मुद्दे मांडतो आहे.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 20/02/2024 - 18:44. वाजता प्रकाशित केले.

    *शेतीच्या शोषकांना पोषक लेखन करणारे शेतीसाहित्यिक असू शकत नाही... जरी त्यांच्या नावाने सातबारा असेल तरीही!*

    https://www.facebook.com/share/p/1YUDeUmEQRLVBr6p/?mibextid=Nif5oz

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 21/02/2024 - 22:58. वाजता प्रकाशित केले.

    *"धुऱ्यावरच्या शेतकऱ्याने एका हातात नांगर आणि दुसऱ्या हातात लेखणी धरावी यासाठी मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे प्रयोजन."*

    https://www.facebook.com/share/p/89P7Knx6UTDw6Jo6/?mibextid=Nif5oz

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 22/02/2024 - 11:12. वाजता प्रकाशित केले.
    मी बोट दाखवत Bus Bay (बस बे) म्हणालो तर तो म्हणाला... का बसू?
    मी कुणाच्या बापाच्या जागेवर उभा आहे का?

    म्हणून मराठीत "बस स्टॅन्ड" असेच म्हणत चला रे ब्वॉ. नसत्या आफती नकोत. Lol
     

    #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे

    Facebook Link

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 22/02/2024 - 11:14. वाजता प्रकाशित केले.
    22 February 2021
      · 
    आज सह्याद्री फॉर्मर्स प्रोड्युसर कंपनी, मोहाडी (नाशिक) ला भेट दिली. चेअरमन श्री विलास शिंदे यांनी सर्व कामे बाजूला सारून मला भरपूर वेळ दिला. त्यामुळे सविस्तर चर्चा करता आली. 
    कंपनीचे 95 एकरावर विस्तीर्ण बांधकाम असून वेगवेगळ्या विविध पिकासाठी ब्लॉकचैन निर्माण करून शेतमाल थेट निर्यातक्षम गुणवत्तेचे तयार करण्याचे त्यांचे प्रयत्न अवाक करणारे आहे.
    शून्यातून विश्व साकारणारी शेतकऱ्यांची ही देशातील सर्वात मोठी कंपनी कंपनी आहे.
    =======
    आज शेतकरी संघटनेचे श्री निवृत्ती कडलग, श्री सोपान संधान, श्री अर्जुनतात्या बोराडे, श्री शंकरराव पुरकर यांची भेट घेऊन रावेरी संमेलनाचे निमंत्रण दिले.

    Facebook Link

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 22/02/2024 - 11:16. वाजता प्रकाशित केले.
    एक पोरगी वावरामधी दिसली होती, पाह्यली होती
    चिखलामधी पडली होती..... शेणामध्ये भरली होती
    ए...... लाव रे थो व्हिडीओ SSSS

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 22/02/2024 - 11:17. वाजता प्रकाशित केले.
    तमाशेवाली बघून हृदयात गुदगुल्या व कीर्तनकार बघून मेंदूत संताप येतो.... ते "पुरोगामी" असतात. 
     
    - गंगाधर मुटे आर्वीकर

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 22/02/2024 - 11:17. वाजता प्रकाशित केले.
    22 February 2020
     
    श्रद्धा परिसीमा ओलांडून अतिरेकी पातळीवर पोचली तर मनुष्य "श्रद्धांध" (श्रद्धेत आंधळा) होऊ शकतो.
     
    - गंगाधर मुटे आर्वीकर

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 22/02/2024 - 11:18. वाजता प्रकाशित केले.
    22 February 2015
      · 
    वर्ल्ड कप लोणच्या सारखाच आसतो.
    माणसाची पहिली भूक अन्नाची असते. ज्यांच्या आयुष्यात अन्नाची भ्रांत हा शब्दच नसतो व अन्नाची समस्या ही समस्याच राहिलेली नसते तेव्हा अशा माणसांना अन्नाव्यतिरिक्त अनेक तर्‍हेच्या भूका लागायला लागतात.
    मग स्वत:चे अन्य चोचले पुर्ण करून घेताना वर्ल्ड कपचा देखील लोणच्या सारखाच उपयोग होतो. 
    अन्नाची अजिबात भ्रांत नसलेले चिक्कार लोक ग्रामिण भागात सुद्धा आहे. मी गेल्या ३० वर्षापासून क्रिकेट पाहतच आहे. हा खेळ माझ्या आवडीचा आहे.
    ज्यांची अन्नाची समस्या सुटलेली नाही ते कोणताच खेळ पाहात नाहीत, हे दुर्दैव आहे.
    मी खेळाचा विरोधक नाही, समर्थकच आहे. पण सामाजिक वास्तव आहेच तसे त्याला पर्याय नाही. 
    खेळाने उर्जा मिळते. खेळ बघण्याने उत्साह येतो व आनंद मिळतो. पण ही उर्जा फ़क्त काही टक्के लोकांच्याच वाट्याला येते, ही दु:खद बाब आहे.
    सर्वांची म्हणजे १०० टक्के लोकांची अन्नाची भ्रांत मिटावी व तमाम जनतेला खेळातून उर्जा मिळवण्याइतपत उसंत मिळावी, अशी अपेक्षा आहे.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 24/02/2024 - 14:42. वाजता प्रकाशित केले.
    शेतकरी साहित्य चळवळीची कार्यपद्धती : ठळक मुद्दे
     
    शेतकरी साहित्य चळवळीची कार्यपद्धती या विषयावर मी फेसबुक वर चर्चेसाठी काही मुद्दे मांडतो आहे.

    आणि त्यावर चर्चा घडवून आणत आहे.
    आपण फेसबुकवर असाल तर सहभागी व्हायला हरकत नाही.
     
    https://www.facebook.com/gangadharmute?mibextid=ZbWKwL

    १) "पिढ्यान्‌पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न" म्हणजे शेतकरी साहित्य संमेलन!


    लिंक

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 24/02/2024 - 14:45. वाजता प्रकाशित केले.

    २) शेतीच्या शोषकांना पोषक लेखन करणारे शेतीसाहित्यिक असू शकत नाही... जरी त्यांच्या नावाने सातबारा असेल तरीही!

     

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 24/02/2024 - 14:45. वाजता प्रकाशित केले.

    ३) ज्याचा पक्ष, जात आणि धर्म शेती हाच असतो तोच फक्त शेतीसाहित्यिक असतो... बाकी सर्व शेतीच्या शोषकांना पोषकच!

     

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 24/02/2024 - 14:45. वाजता प्रकाशित केले.

    ४) धुऱ्यावरच्या शेतकऱ्याने एका हातात नांगर व दुसऱ्या हातात लेखणी धरावी यासाठी म. शे. साहित्य संमेलनाचे प्रयोजन!

     

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 24/02/2024 - 14:46. वाजता प्रकाशित केले.

    ५) कोणत्या स्वभावाच्या व्यक्तींना आसपास फिरकू द्यायचे नाही हे शेतकरी साहित्य चळवळ आधी ठरवते. नंतर सहकारी जोडते.

     

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 24/02/2024 - 14:46. वाजता प्रकाशित केले.

    ६) शेतीच्या लुटीचे शस्त्र आणि शास्त्र

     
    शेतमालाच्या भावाच्या मुद्द्यास पद्धतशीरपणे बगल देऊन शेतकऱ्यांना वेगवेगळ्या उपायोजना, नाना तऱ्हेच्या शेतीपद्धती, ज्ञान-विज्ञान, पौराणिक-आधुनिक, सेंद्रिय-जैविक-रासायनिक, शाश्वत-अशाश्वत, किटनाशक-गोमूत्र, एमएसपी-एमआरपी, अशा एकापेक्षा एक सरस व आकर्षक भुलभुलैय्यात गुंतवून....  अगडबंब यंत्र-मंत्र-तंत्र वगैरे अंगीकारायला सांगण्याचे नवनवे खुळखुळे वापरायचे आणि शेतकऱ्यांना खेळवत व झुलवत ठेवून पद्धतशीरपणे वर्षानुवर्षे शेतमाल स्वस्तात लुटत राहायचे..... हे शेतीच्या लुटारुंचे शास्त्र आणि शस्त्र आहे... याची अर्थशास्त्रीय पायावर तर्कशुद्ध जाणीव साहित्यिकांना करून देण्यासाठी मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे प्रयोजन आहे.
     
    #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे  #शेतीचे_अनर्थशास्त्र

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 24/02/2024 - 14:48. वाजता प्रकाशित केले.
    माझ्या साहित्यविषयक पोस्टवर साहित्यिकांपेक्षा शेतकरीच जास्त व्यक्त होतात. हाच भविष्याच्या आशेचा किरण. Lol Lol
     

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 24/02/2024 - 19:28. वाजता प्रकाशित केले.

    देवीदेवतांमुळे "भारत" गरीब नाही.
    "भारत" गरीब आहे म्हणून देवीदेवता आहे व गरिबी असेस्तोवर देवीदेवता राहतील.

    - गंगाधर मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 24/02/2024 - 20:08. वाजता प्रकाशित केले.

    तस्कर, अफसर, गुंडा, मवाली, चोर, डाकू, भक्त, चमचा, निळा, लाल, भगवा, हिरवा.. "शेतीशी इमान" असलेला कुणीही शेतकरी साहित्य चळवळीला चालतो.

    https://www.facebook.com/share/p/4tckRSd8M8y2KVCD/?mibextid=oFDknk

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 07/04/2024 - 09:07. वाजता प्रकाशित केले.

    हो आहे ना आपल्याकडे क्वालिटी.
    पण "आमच्याकडेही क्वालिटी आहे" असे मुजोरी करून सांगण्यापुरतीच आहे ना?

    गरज पडली तर दाखवण्यापुरती कुठे आहे?

    संतांकडून चार गोष्टी शिकाव्यात..... तर त्याऐवजी त्यांची टर उडवण्यात आपण आयुष्य घालवले.
    अनुभवी व्यक्ती कडून चार गोष्टी शिकाव्यात.. तर आपण स्वतःला त्यांच्याही पेक्षा मोठे समजत आलोत.
    युगात्मा शरद जोशी सारखा थोर तत्ववेत्ता मिळाला तर त्यांची किंमत आपल्याला करताच आली नाही.

    थोर समाज सुधारक आले आणि बोंबलू बोंबलू एक दिवस मरूनही गेले. ऐकायला आपल्याकडे कानच नव्हते.
    मग
    आपल्याकडे क्वालिटी येईल कुठून?

    ती काय आभाळातून पडत असते काय ?

    १७ वर्ष शाळा-कॉलेजात घालवल्याने आपल्यात पुस्तकी क्वालिटी आली पण सातव्या वेतन आयोगाचे लाभार्थी होता आले तरच ही क्वालिटी सोन्याच्या भावाने खपते. नाही तर कवडीपेक्षाही कमी किंमत या पुस्तकी क्वालिटीची असते.

    कुणी तरी शिवाजी येतो... आपल्याला स्वराज्य मिळवून देतो.
    कुणी तरी शाहू महाराज येतो... आपल्याला प्रतिष्ठा मिळवून देतो.
    कुणी तरी फुले येतो... आपल्याला शिक्षणाचा हक्क मिळवून देतो.
    कुणी तरी गांधी (वगैरे) येतो...आपल्याला गुलामीतून मुक्ती आणि स्वातंत्र्य मिळवून देतो.
    कुणी तरी आंबेडकर येतो... आपल्याला सन्मानाचे जिणे मिळवून देतो.
    कुणी तरी जोशी येतो... आपल्याला शेतमालाचे भाव मिळवून देतो.

    जे काही करायचे ते "कुणीतरीच" तर करतंय.

    आपण १०० कोटी लोक्स नेमकं काय करतो?
    मग आपली क्वालिटी गेली कुठे? कोणत्या दुर्बीणने शोधावी म्हणजे सापडेल?

    या पक्षात असेल तर त्या पक्षाच्या नेत्याला रात्रंदिवस शिव्या घालत बसतो.
    त्या पक्षात असेल तर या पक्षाच्या नेत्याला रात्रंदिवस शिव्या घालत बसतो.

    कधी राहुलच्या जिभेने बोलतो तर कधी मोदींच्या जिभेने बोलतो,
    शक्यतो आपण आपापल्या जातीच्या नेत्याच्या जिभेनेच बोलतो ना?

    आपली स्वतःची म्हणजे जन्मताच मिळाली त्या जिभेने कधी बोलणार आहोत आपण?

    जरा कुणी तरी सांगा ब्वॉ जाहीरपणे...!
    आमच्या ज्ञानात भर घाला ब्वॉ जाहीरपणे.....!!

    असं नका म्हणू की..... #जौद्या_आप्ल्याले_काक्रा_लाग्ते #आपण_बरे_आपले_काम_बरे

    #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
    ====

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 12/04/2024 - 08:28. वाजता प्रकाशित केले.

    मोठ्या वृक्षाखाली वाढ खुंटते म्हणून, रोपटं छायेबाहेर गेलं
    पण कडक उन्हाच्या झळा सोसंना, मग तडपू तडपू मेलं.

    © गंगाधर मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 28/04/2024 - 20:05. वाजता प्रकाशित केले.
     
    "धन-द्रव्य-पैशासाठी स्वत्व गहाण टाकणे" ही वंचितांची नैसर्गिक प्रेरणा असते?
     
    #जौद्या_आप्ल्याले_काक्रा_लाग्ते #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 17/09/2024 - 10:39. वाजता प्रकाशित केले.
    सेंद्रियशेती/निसर्गशेती/झिरोबजेट करा म्हणजे बायका "आन मिलो सजना" गाणं सामूहिकपणे म्हणायला मोकळ्या.
     
    #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे फेसबूक स्टेटस Facebook Status

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 17/09/2024 - 10:42. वाजता प्रकाशित केले.
    सकाळी निळसर होतास तू, दुपारी धुळसर झालास तू
    अशी काय जन्मघुटी, सांग प्यालास तू 
     
    #गंगाधर_मुटे #गूढकाव्य #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 20/09/2024 - 00:37. वाजता प्रकाशित केले.

    उत्तेजना अशी तू देऊ नकोस वाऱ्या
    मी पंख कापले बघ, माझ्यात मी स्थिराया

    #गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 20/09/2024 - 23:36. वाजता प्रकाशित केले.

    दिसण्यात कार्य अपुले, दिसतेय सारखे पण
    तू धावते पळाया, मी धावतो धराया

    #गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो

    https://www.facebook.com/share/p/V49MHehY6ETqGiKv/?mibextid=oFDknk

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 21/09/2024 - 21:09. वाजता प्रकाशित केले.

    जे जे दिसेल ते ते, सारेच प्रिय त्याला
    इतरांस सांगतो की, ही व्यर्थ मोहमाया

    #गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो
    https://www.facebook.com/share/p/DmCuXcz3HCTAmYKq/?mibextid=oFDknk

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 22/09/2024 - 19:07. वाजता प्रकाशित केले.

    शासनाचे शेतीविरोधी धोरण बदलले नाही तर शेतमालाची खरेदी राम करो की रावण; काहीही फरक पडणार नाही.

    #गंगाधर_मुटे #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 24/09/2024 - 19:31. वाजता प्रकाशित केले.

    स्वसंरक्षण, पोषण आणि प्रजनन या सजीवाच्या स्वतःच्या जबाबदाऱ्या आहेत. सरकार वा अन्य घटकांची गरजेपेक्षा जास्त लुडबुड नसावी.

    https://www.facebook.com/share/p/WmRKokxCfSmE5AF5/?mibextid=oFDknk

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 25/09/2024 - 21:09. वाजता प्रकाशित केले.

    देशावर आणि राज्यावर झालेले कर्ज जनहिताच्या योजना मुळे नव्हे तर वेतन आयोगामुळे झालेले आहे.

    #गंगाधर_मुटे #शुभरात्री_लोक्सहो

    https://www.facebook.com/share/p/M3fBfeJREUfC6yeJ/?mibextid=oFDknk

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 26/09/2024 - 18:56. वाजता प्रकाशित केले.

    इंडिया म्हणतो अख्खी शासकीय तिजोरी
    आमच्याच घशात घाला...
    भारत मेला तरी चालेल.

    #गंगाधर_मुटे #शुभरात्री_लोक्सहो

    https://www.facebook.com/share/AHYuFTWHE64TEtcA/?mibextid=oFDknk

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 27/09/2024 - 19:17. वाजता प्रकाशित केले.

    च्यायला, देवाचं नाव घेतलं तरी लोक आजकाल
    त्याच्याकडे भाजपचा कार्यकर्ता
    म्हणून बघायला लागतात. Smile Lol Lol

    #अव्घडच्यह्येब्वॉ #जौद्या_आप्ल्याले_काक्रा_लाग्ते #गंगाधर_मुटे

    https://www.facebook.com/share/p/i3gzFCKTBE73P2cK/?mibextid=oFDknk

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 29/09/2024 - 19:03. वाजता प्रकाशित केले.

    ज्या डोकेबाजाला इतरांच्या हृदय-भावनेचा सन्मान करता येतो तो माणूस... बाकी सब जनावरेच.

    #शुभरात्री_लोक्सहो #इंडियाvsभारत

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 02/10/2024 - 14:32. वाजता प्रकाशित केले.

    शेतकऱ्याला "राज्यगुलाम" घोषित करा. बास्स! इतकंच बाकी राहिलेलं आहे.

    #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 02/10/2024 - 14:33. वाजता प्रकाशित केले.

    गायीच्या पालन-पोषणासाठी एका गाईमागे दरमहा रु. 5000/- सरकारने दिले पाहिजे. तुमची माय शेतकऱ्यांनी का पोसावी? #राज्यमाता #राजमाता

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 02/10/2024 - 14:35. वाजता प्रकाशित केले.

    "प्रत्येक जीवजंतूंचा धर्म वेगवेगळा व ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर अवलंबून असतो." - भगवान श्रीकृष्ण

    #शुभरात्री_लोक्सहो #धर्म

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 02/10/2024 - 19:38. वाजता प्रकाशित केले.

    राज्यमातेला मतदानाचा अधिकार असता तर ती सुद्धा 1500 वाली "लाडकी माय" झाली असती.

    #शुभरात्री_लोक्सहो
    ...

    शेतकरी तितुका एक एक!

  • पाने