नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शीर्षक :- बा
हित भर पोटासाठी
दिन रात्र कष्ट केला,
फाशी वर जाण्यासाठी
दावा बाच्या कमरेला...१
उभ्या शेतामधी भाऊ
नाही सिंचनाची सोय,
कसा उगवेल मोती
सांगा आता काळी माय...२
पावसाच्या पाण्यावर
शेतात जोमात नांगरे,
येता अंकुर दाण्याला
वाहे आटलेले झरे...३
भाव घेतात पाडून
पिक हाती आल्यावर,
पोत्यापाशी बाप माझा
झाला रडून बेजार...४
घास भरवी पिलांना
स्वतः उपाशी राहून,
पाहे लेकरांचे भाव
थोडा आनंदी होऊन...५
हलाकीची जिनगानी
लई गाठी धोतराले,
कोण आधार देईल
सांगा गरीब धन्याले...६
बाप कर्जाच्या ओझाने
लई भयभीत झाला,
गेला साऱ्यांना सोडून
आमंत्रण मरणाला...७
नीरज आत्राम
वरोरा जिल्हा चंद्रपूर
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.
पाने